Showing posts with label इंटरनेट. Show all posts
Showing posts with label इंटरनेट. Show all posts

Thursday, August 13, 2009

भुवन :- गुगल अर्थ आणि विकीमॅपीयाचा कर्दनकाळ

इंटरनेटवरून स्वतःची गल्ली, नगर, घर शोधण्यासाठी तुम्ही आजवर गुगल अर्थ किंवा विकीमॅपीयाच वापरत आला असाल पण आता त्या दोन्हीला विसरून जा कारण आता तुमच्या मदतीला येणार आहे भुवन.



भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) गुगल अर्थ, विकीमॅपीयापेक्षा अत्यंत नवीतम, अधिक जवळून आणि अधिक सुष्पष्ट छायाचित्रे उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.



गुगल अर्थ आपल्याला २०० मीटरपर्यंतच झूम करून दाखवू शकतो पण भुवन मात्र त्याच फोटो तुम्हाला अत्यंत जवळून म्हणजे १० मीटरपर्यंत झूम करून दाखवतो.



गुगल त्याचा फोटो डाटाबेस दर चार वर्षाला अपडेट करतो, याऊलट भुवन दरवर्षी डाटाबेस अपडेट करणार आहे.
इतकेच नाही तर तुम्हाला भुवनद्वारे तुमच्या आसपासच्या परीसरातील खूप माहिती मिळणार आहे. (उदा. शाळा, चित्रपटगृह, शॉपिंग सेंटर्स इत्यादी.)

 

Google Earth Vs ISRO Bhuvan

Google Earth
    * Zoom levels up to 200 mt
    * Single layer information
    * Images upgraded every 4 years
    * No alternate viewing options
    * Uses international satellites
 
 
Bhuvan

    * Zoom levels up to 10 mt
    * Multi-layer information
    * Images upgraded every year
    * Options of viewing on different dates
    * Uses Indian satellites



:: भुवनची ऑफिशियल वेबसाईट ::

http://bhuvan.nrsc.gov.in/

 
 

Wednesday, July 15, 2009

नांदेड कंप्युटर डिलर्स असोसीएशन

नांदेड कंप्युटर डिलर्स असोसीएशनच्या संकेतस्थळाचा पत्ता.
http://ncdananded.com/



Monday, June 22, 2009

दैनिक सत्यप्रभा आता इंटरनेटवर

नमस्कार मित्रांनो,
नांदेडच्या 'दैनिक सत्यप्रभा' या वृत्तपत्राची आवृत्ती आता इंटरनेटवरही उपलब्ध झाली आहे.
आणि अशा प्रकारे नांदेडच्या स्थानिक वृत्तपत्राची आवृत्ती सर्वप्रथम इंटरनेटवर आणण्याचा बहुमानदेखील दैनिक सत्यप्रभानेच पटकावीला आहे. :-)

साईटवरच्या काही सुविधा अजून पुर्णपणे कार्यान्वीत झाल्या नसल्या तरी लवकरच त्या सुरळीत होतील आणि तुम्हाला त्यांचा फायदा घेता येईल अशी आशा करूयात.

दैनिक सत्यप्रभाच्या भावी वाटचालीस 'नांदेडीअन्सतर्फे' हार्दिक शुभेच्छा !


:: Link ::
http://satyaprabha.com/



Monday, February 23, 2009

नांदेडीअन्स कम्युनिटीचे शतक

अभिनंदन !

अभिनंदन !!

अभिनंदन !!!





नमस्कार मित्रांनो, जसे की आपण पहातच असाल, आपल्या ब्लॉगच्या ऑर्कूटवरील कम्युनिटीचे १०० सभासद झालेले आहेत.




आपण माझ्या ब्लॉगला आणि ब्लॉगच्या कम्युनिटीला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहीन.




आपण आपल्या शंका, सुचना, प्रतिसाद आम्हाला कळविल्या तर आम्हाला आनंदच होईल.





सदैव आपल्या सेवेत.






तुमच्यापैकीच एक नांदेडीअन,


सौरभ सुरेश सावंत.









ऑर्कूटवरील कम्युनिटीचा पत्ता :-

http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=53386905

Friday, October 3, 2008

किंगफिशर एअरलाईन्स वेळापत्रक (नांदेड ते मुंबई व्हाया लातूर)


होय मित्रांनो, ज्या गोष्टिचे स्वप्न आपण मध्यमवर्गीय अगदी चातकाप्रमाणे बघत होतोत ते स्वप्न आता प्रत्यक्षात खरे झाले आहे.

होय, किंगफिशर एअरलाईन्सने मुंबई ते नांदेड विमानसेवा सुरू केली आहे.
म्हणजे आता तुम्ही २ तासात नांदेड ते मुंबई हे अंतर गाठू शकणार आहात.
हेच अंतर केवळ १ तासात पूर्ण झाले असते, पण ही फ्लाईट व्ह्याया लातूर केल्यामुळे प्रवासाचा एक तास तर वाढलाच आहे आणि शिवाय तुम्हाला आणि तुमच्या खिशाला १००० ते १५०० रुपयाचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागेल.
म्हणजेच नांदेड ते मुंबई विमान प्रवासासाठी एका व्यक्तीला साधारणतः ४००० ते ४५०० रुपये, तर नांदेड ते लातूरसाठी १५०० ते १८०० रुपये भाडे आकारले जाईल.


आठवड्यातून तीन दिवस मुंबई - नांदेड - लातूर - मुंबई ही विमानसेवा राहणार आहे.

नांदेडच्या विमानतळावरून सोमवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा राहील.
सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण होईल व दुपारी साडेबारा वाजता ते नांदेडला पोचेल, तर दुपारी दीड वाजता हे विमान लातूरच्या दिशेने उड्डाण करील.
दुपारी एक पन्नास वाजता ते लातूरचा पोचेल व दुपारी अडीच वाजता मुंबईच्या दिशेने प्रयाण करील. साडेतीन वाजता सांताक्रूझ, मुंबई येथे पोचेल, असा अंदाज आहे.


दरम्यान किंगफिशर कंपनीच्या एटीआर - ७२ ह्या ६६ प्रवासी क्षमता असलेल्या विमानाने मुंबई - नांदेड ही उड्डाण चाचणी २६ सप्टेंबर रोजी केवळ एका तासात यशस्वीरित्या पूर्ण केली.


वेळापत्रक



जुने वेळापत्रक बदलले आहे.


नविन वेळापत्रक :-



Wednesday, September 3, 2008

(*) नांदेड KMZ मध्ये (*)

खाली दिलेल्या .KMZ फाईलमध्ये मी नांदेड शहरातील आणि शहराच्या आसपासची काही महत्त्वाची ठिकाणे सेव्ह केली आहेत.

तुम्हाला तुमच्या संगणकामध्ये फक्त
गुगल अर्थ इंस्टॉल करावे लागेल जेणेकरून तुम्ही ही ठिकाणं पाहू शकाल.


गुगल अर्थ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
नांदेडची ठिकाणं सेव्ह असलेली KMZ फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



गुगल अर्थ इंस्टॉल केल्यानंतर ह्या फाईलवर माऊसने डबल क्लिक करा किंवा ही फाईल गुगल अर्थमधून उघडा.



इतर काही अडचण आल्यास जरूर विचारा
माझा ई-मेल ऍड्रेस तर तुम्हाला माहितच असेल.

power_8383@yahoo.com




Saturday, March 8, 2008

काही नाही ठीक

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं - काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :)

भारतीय वाहन बाजारावर एके काळी अधिराज्य गाजवणारा हा उद्योग समूह आणि त्यांची एक गाडी जी फक्त कंपनीच्या नावानेच आजवर ओळखली गेली/जाते, त्या गाडीची थोडी माहिती वाचण्या पूर्वी, या कंपनी बद्दल थोडे फार …

Luna TFR Luna Super भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले.

मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लुना हा वाहन प्रकार सायकलला पर्याय असा पुढे आला म्हणायला काही हरकत नसावी. एरवी आपोआप चालणारी अन गरज लागल्यास खरोखरच्या सायकल सारखी सुद्धा चालवण्याची सोय या वाहनात होती/आहे. या वाहनाला एकच स्पर्धक होता तो म्हणजे टिव्हीएस ५०. लुना नंतर कायनेटिक सफारी आली. पण कायनेटिक हे नाव जास्त लोकप्रिय झाले म्हणा अथवा त्यांचे जे वाहन फक्त कंपनीच्या नावानेच ओळखले गेले ती म्हणजे कायनेटिक स्कूटर होय. सायकल सदृश गाड्यांना, अवजड अन तोल सांभाळायला अवघड अश्या बजाज, एलएमएलच्या स्कूटर्सना सशक्त पर्याय म्हणजे कायनेटिकची स्कूटर. या गाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीने शहरातल्या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला.







भारतीत वाहन उद्योगात ८० चे दशक म्हणजे बजाजच्या स्कूटरचा सुकाळ होता. काही पैसे भरून, 4S वाट पाहून बजाजांची स्कूटर मिळवणे म्हणजे लोकांना प्रचंड कौतुक होते. या काळातच स्त्रिया सुद्धा आत्मविश्वासाने कार्यालयीन नोकरी करू लागल्या होत्या. पण त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या “ह्यांच्या” स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने. एखादी जास्त स्वावलंबी स्त्री असेल तर लुना. पण स्कूटर म्हणजे परिवाराची गाडी होती. बदका सारखा आकार, सामान ठेवायला थोडी जागा, मोपेड पेक्षा जास्त शक्ती, सोबत गियर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती, पत्नी, एक पुढे उभे राहणारे मूल आणि एक आईच्या मांडीवर बसणारे लहान मूल अशा चौकोनी कुटुंबाला वाहून नेण्याची क्षमता ही या स्कूटर्सची ठळक वैशिष्ट्ये होती.








याच
काळात भारतीय वाहन उद्योगात जपानी कंपन्यांनी प्रवेश केला. १९८४ साली कायनेटिकने जगप्रसिद्ध होंडा कंपनी बरोबर सामंजस्य स्वीकारले आणि स्कूटरचे उत्पादन सुरू केले. वर लिहिल्या प्रमाणे बजाज- एलएमएलच्या स्कूटरची ठळक वैशिष्ट्ये होतीच. पण त्याच सोबत काही वेळा स्कूटर्सची अशी काही वैशिष्ट्ये होती की जी डोके दुखी ठरायची. त्यातली काही Nova 135 म्हणजे, डाव्या हाताला सगळे गिअर्स आणि क्लच, पाय ठेवायच्या सपाट जागेत मध्येच डोके वर काढणारा मागच्या चाकाचा ब्रेक, एका बाजूला असलेले इंजिन आणि फक्त मधले स्टँड. तसेच बंद पडल्यास चालकाच्या बसण्याच्या जागे जवळ असलेला पेट्रोलचा नियंत्रक आणि चोक यांच्या मदतीने स्कूटर सुरू न झाल्यास, रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा. या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेऊन आणि खास करून नोकरदार स्त्रिया हा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कायनेटिक होंडाने आपली स्कूटर बाजारात आणली.

कमी पसारा असलेली, दिसायला सुंदर, काही तरी नवे वाहन असा ठसा उमटवणारी, मुख्य म्हणजे, इंजिन मध्यभागी असल्याने तोल सांभाळायला सोपी, गिअर विरहित, त्यामुळे चालवायला सहज सोपी, बसायला एकसंध आणि मोठी सीट, पेट्रोल नियंत्रकाची - चोकची कटकट नसलेली, वाहनक्षमता स्कूटर इतकीच असलेली, एका बाजूला कलून Flyte लावण्याची व्यवस्था असलेली, स्कूटर इतकीच शक्तिशाली अन सुसाट धावणारी आणि मुख्य म्हणजे किक अथवा फक्त एक खटका दाबून सुरू होणारी अशी हि स्कूटर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या स्कूटरने, या वाहन प्रकारात, फक्त एक खटका दाबून सुरू होणे, गिअर बॉक्स ऐवजी व्हेरीएटर (गिअर्स टाळण्या करिता), दोन्ही ब्रेक हातात, हि नवीन वैशिष्ट्ये बाजारात आणली. कायनेटिक होंडा डिएक्स आणि झेडएक्स असे दोन प्रकार उपलब्ध होते. ९८ घनसेमी क्षमतेच्या आणि टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये पहिला बदल झाला तो २००१ साली. इंजिनाची क्षमता ११० घनसेमी झाली. पण बाकी सगळे तेच होते. मधल्या काळात १९९८ साली होंडा कंपनीने साथ सोडली. अन स्वतःची भारतात वेगळी चूल मांडायचे मनसुबे सत्यात आणायला सुरुवात केली. मग २००५ साली कायनेटिकने बाह्य स्वरूप तेच ठेवून ११३ घनसेमी क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन वाली हिच स्कूटर ग्राहकांसमोर आणली. पण तोवर उशीर झाला होता. अनेक स्पर्धकांनी आपापल्या अशाच गाड्या, स्कूटरेट बाजारात आणल्या होत्या. खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.

कायनेटिकने स्पर्धा म्हणावी तेवढी योग्य प्रकार हाताळली नाही. मग ती स्कूटरेट प्रकारातली प्राइड असो, कायनी, नोवा अथवा त्यांच्या मोटर सायकल असोत, अथवा स्टेप थ्रु, अथवा आयात केलेल्या इतर कंपन्यांच्या गाड्या. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कायनेटिक म्हणावी तेवढी यशस्वी ठरली नाही. आज सुद्धा कायनेटिक नव्या गाड्या सादर करत आहे.

बिपाशा बसूला घेऊन केलेल्या जाहिरातीमुळे फ्लाईट नावाची स्कूटरेट थोडी फार विकली जात आहे. पण तीन गिनेज रेकॉर्ड करणार्‍या कायनेटिक होंडाच्या स्कूटरच्या यशाची उंची गाठणे अवघडच दिसते आहे.

अरुण फिरोदियांच्या कन्या, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी या कंपनीची कमान सांभाळत आहेत. पण पूर्वीचे यश अन आजची स्पर्धा पाहिल्यावर जर त्यांना कोणी विचारलं, कस काय चाललंय सगळं तर त्या नक्कीच म्हणती, फार खास असं, काही नाही ठीक…..


साभार : http://aryachanakya.wordpress.com/

Sunday, March 2, 2008

नांदेड शहर : विकिपीडिया

नांदेड हे महाराष्ट्रातील राज्यातील नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. मराठवाडा या विभागात असलेले नांदेड शहर हे नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे .नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते। नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे.


भौगोलिक स्थान

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर-पश्चिम सीमेजवळ हा जिल्हा येतो. नांदेड महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील एक महत्वाचा जिल्हा आहे. लातूर, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि निजामाबाद हा आंध्रप्रदेशातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.

वाहतूक व्यवस्था

नांदेड हे भारतीय रेल्वेच्या दक्षीण मध्य विभागात येते आणि मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडसाठी थेट सेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते जी दिल्ली, आग्रा, औरंगाबाद या मोठ्या शहरांशी जोडते. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेडसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची थेट बससेवा उपलब्ध आहे.



भाषा

नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते.तेलगु,व उर्दुचा उपयोगही केला जातो.

परंपरा

माळेगावची जत्रा , हिंदु व शिख समुदायाचा दसरा हे वार्षीक सोहळे अत्यंत छान असतात.येथे गणेश उत्सवसुद्धा उत्साहाने साजरा केला जातो.

वृत्तपत्रे

नांदेड येथून प्रसिद्ध होणारी वृतपत्रे -

  • दैनिक प्रजावाणी
  • दैनिक गोदातीर
  • दैनिक लोकपत्र
  • दैनिक देशोन्न्ती
  • दैनिक भुमीपुत्र

शिक्षण

नांदेड हे शैक्षणीकदृष्ठा महत्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात.

विद्यापीठ

इ.स. १९९५ साली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि सध्या १७२ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.

उच्च माध्यमिक परिक्षा विभाग

  • लातूर
  • नांदेड
  • उस्मानाबाद

शैक्षणिक संस्था

उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालये

अभियांत्रिकी महाविद्यालये
  • श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय
  • महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालये
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
  • शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखा महाविद्यालये
  • नांदेड एज्युकेशन सोसायटीचे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज|सायन्स कॉलेज
  • नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज
  • शारद भुवन शैक्षणिक संस्थेचेयशवंत महाविद्यालय
  • नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय
  • वसंतराव नाईक महाविद्यालय


राजकारण

नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. स्व. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकिय स्तरावर माहित असलेले महत्वपूर्ण व्यक्ति होते. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादि पदे भूषविली.

Wednesday, February 27, 2008

ऑर्कूटवरील नांदेडची कम्युनिटी .

ह्या कम्युनिटीमधे नांदेडच्या भुकंपाबाबत बरीच चर्चा झालेली आहे.
अनेकांनी तिथे भुकंपाच्या नोंदीसुद्धा लिहून ठेवल्या आहेत. ( वेळ आणि तारिख )

अशी अपेक्षा करतो की ही माहिती आपल्या कामाला येईल.


:: कम्युनिटी ::
LINK

:: भुकंपाचा टॉपिक ::
LINK



ऑर्कूटवर असलेल्या नांदेड शहराच्या काही कम्युनिटी







काही मराठी वेबसाईट्स.

१) http://awaaz-bandh।blogspot.com/

AwaazBandh Is A COLLECTION Of Links of new music,films releases.
( A lots of entertainment thats 4 sure )

प्रत्येक मराठी गाणे मिळू शकते इथे।


२) http://www.iit.edu/~laksvij/language/hindi.html

Transliterate to मराठी


३) http://marathiblogs.net/

List of nearly all Marathi blogs available।


४) http://www.maayboli.com/

( Marathi resources around the world )



५) http://www.marathimati.com/

( Portal dedicated to Marathi language, Maharashtra and its culture, Lots of Entertainment।)


६) http://www.onesmartclick.com/marathi/marathi.html

This site is created by Mr.Prashant Mehetre.

( OneSmartClick Marathi is full of Marathi, Marathi Kavita, Prem Kavita, Marathi Jokes, Marathi Charolya, Marathi Ukhane, Marathi Vinod। )



७) http://www.geocities.com/udaywalve/

This Geocity webpage is designed by Mr.Uday Walve.

Its has lots of Marathi websites links, jokes, poems etc.



८) http://www.manogat.com/


:: Editorial ::
ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे। आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.



९) http://marathikavita1.blogspot.com/

मराठी कविता, प्रत्येक मनासाठी



१०) http://www.mazafm.com/

chk this rapchik link...................



११) http://www.geocities.com/clipower/mymarathi.htm

(Links to many Marathi websites।)


१२) http://www.geetsargam.net/

Marathi गीते



१३) http://www.nemm.org/

New England Marathi Mandal।



१४) http://www.marathiworld.com/

मराठी अथपासुन इथपर्यंत



१५) http://www.kusumaavali.org/

कुसुमाग्रजांचे काव्यग्रंथ



१६) http://www.bhawishya.com/

Name says it all।



१७) http://www.puladeshpande.net/

P.L. Deshpande - Bhav vidh


Tuesday, February 26, 2008

नांदेड शहराशी संबंधित संकेतस्थळे म्हणजे गावामागे गोविंदा !

मी हा लेख सकाळ आणि लोकमत या प्रसिद्ध वर्तमानपत्रांच्या कार्यालयात नेउन दिला होता पण त्यांनी हामाहितीवजा लेख छापलाच नाही, कदाचित त्यांना हा लेख निरर्थक वाटला असेल.

हा लेख मी यासाठी लिहिला होता की निदान हा लेख वाचुन तरी ही संकेतस्थळे अपडेट होतील, पण माझी ही अपेक्षाफ़ोल ठरली.

पण मी मराठी स्वराज्य ह्या साप्ताहिक वर्तमानपत्राचा सदैव आभारी राहीन कारण सर्वप्रथम त्यांनीच हा लेखछापला .(28 जानेवारी 2008)