Showing posts with label संमिश्र/विविधा. Show all posts
Showing posts with label संमिश्र/विविधा. Show all posts

Sunday, October 3, 2010

युवक महोत्सव

स्वा.रा.ती.म. आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशवंत २०१०’ या युवक महोत्सवाचे आज उद्घाटन झाले.
यावेळी मा. मु. श्री. अशोकरावजी चव्हाण, शाहरूख खान, करण जोहर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

यशवंत कॉलेजच्या मैदानात सुमारे दहा हजार प्रेक्षक बसू शकतील असा वॉटरप्रूफ सभामंडप तयार करण्यात आला आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यांतील शंभर महाविद्यालयांचा विक्रमी सहभाग या युवक महोत्सवात असणार आहे.

नवीन शहर बससेवा

होय, लालपरी बंद झाली एकदाची.penat
गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडलेल्या नवीन सिटीबसेसना आता रस्त्यावरून धावण्याचा मुहूर्त लागला आहे.
मनपाला JNNURM अंतर्गत मिळालेल्या ३० बसेस एस.टी. महामंडळ चालवणार आहे.
आज या बससेवेसे उद्घाटन झाले.

गोवर्धन घाट पुलाचे उद्‌घाटन

गोवर्धन घाट पुलाचे उद्‌घाटन काल मा. मुख्यमंत्री श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते झाले.
गोवर्धन घाट पुलामुळे नवीन पुलावरील वाहतूकीचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

Tuesday, September 28, 2010

ट्रेजर बाजारमध्ये अतिरेकी.

नेहमीप्रमाणे काल दुपारी विद्यापीठातून घरी येत होतो.
रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त दिसत होता.
‘ट्रेजर बाजार’कडे जाणारे सगळे रस्ते बंद केले होते.
‘काय झालं’ म्हणून ३-४ ट्रॅफिकवाल्या मामांना विचारलं पण ते एका शब्दानेही बोलायला तयार नव्हते.
शेवटी नावघाट पुलावरून घरी आलो.

थोड्याच वेळात मित्रांचे फोनवर फोन यायला लागले.
काही मित्र या घटनेबद्दल विचारपूस करत होते, तर काही मित्र ऎकिव गोष्टींना फुगवून सांगत होते.
‘देगलूर नाक्याजवळ काहीतरी भांडण झाले आहे.’, ‘ट्रेजर बाजारमध्ये आतंकवादी घुसले आहेत.’ अशा वेगवेगळ्या अफवांना दिवसभरात अक्षरशः ऊत आला होता.

वातावरण इतकं भयपूर्ण आणि तणावग्रस्त होतं की अशी काही घटना घडली असती तर न्युज चॅनल्सवर आत्तापर्यंत बातमी आली असती.
पण कोणत्याही न्युज चॅनलवर या प्रकाराची बातमी येत नव्हती त्यामुळे मला वाटतं होतं की ही पोलीसांची नक्कीच एक मॉकड्रील असावी.(मी मित्रांना तसं सांगितलंसुद्धा होतं.)

नक्की काय घडतंय हे कुणालाही कळत नव्हतं.
रात्रभर नांदेडमध्ये सगळीकडे याच विषयाची कुजबुज सुरू होती.
नांदेडीअन्स वेगवेगळे तर्क-वितर्क लावत होते आणि वातावरण अजूनच तणावग्रस्त होत होतं.
शेवटी सकाळी वृत्तपत्रांमधून कळाले की हे पोलीसांचं एक प्रात्यक्षिकच होतं.


वर्तमानपत्रांनी पोलीसांच्या या कृतीचा चांगलाच ‘समाचार’ घेतलाय.

1) उपस्थित युवकांनी या अतिरेक्यालाच अशी भिती घातली



2) दुसरा अतिरेकी हातात स्टेनगन घेवून युवतींना पळवून लावण्याचा प्रयत्न करीत असताना युवती मात्र मोठ्या आनंदात बाहेर पडल्या.



3) तर तिसरा अतिरेकीही अशी पोज देत होता.
ही संधी साधून मॉलमधील एका युवतीनेही आपल्या मोबाईलमध्ये या अतिरेक्याला बंदिस्त केले.



4)सकाळ



5) उद्याचा मराठवाडा



6) प्रजावाणी



7) लोकमत

Thursday, August 19, 2010

हेतू चांगला, पण कृती..... ?

नमस्कार मित्रांनो,
बागवान समाजाने टी.व्ही. फोडल्याची बातमी आपण विसरला तर नाहीत ना ?
विसरला असाल तर इथे वाचा.
http://nandedians.blogspot.com/2010/06/blog-post.html

या घटनेच्या काही दिवसांनंतर प्रजावाणी वृत्तपत्रात श्री. अभयकुमार दांडगे यांचा ‘टी.व्ही. नकोच : बागवान समाजाचा स्तुत्य उपक्रम’ हा लेख प्रकाशित झाला होता.
या लेखामध्ये दांडगे सरांनी बागवान समाजाची ही कृती योग्य असल्याचे म्हटले होते.

प्रतिवाद करण्याइतका मी काही ज्ञानपंडीत नाही पण मला हा लेख कुठेतरी खटकला होता.
त्यामुळे मीसुद्धा माझ्या मनातल्या भावना प्रजावाणीपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले, पण माझ्या मतांवर चहूबाजूने टीका होईल या भीतीने मी माझा लेख माझ्याजवळच ठेवला.gigil

तो लेख आपल्या ब्लॉगवर टाकावा की नाही, याबद्दलसुद्धा बर्‍याच दिवसांपासून द्विधा मनःस्थितीत होतो, पण आज हिंमत करून तो लेख इथे प्रकाशित करतोय.



रविवार दि. १३ जूनच्या प्रजावाणीच्या अंकात श्री. अभयकुमार दांडगे यांचा ’टी.व्ही. नकोच : बागवान समाजाचा स्तुत्य उपक्रम’ हा लेख वाचला आणि आश्चर्याचा धक्का बसला कारण बागवान समाजाचा हेतू चांगला असला तरी त्यांचा उपक्रम मला स्तुत्य नक्कीच वाटला नाही.

८-१० दिवसांपूर्वी शहरातल्या देगलूरनाका परिसरात मोठ्या संख्येने राहत असलेल्या बागवान समाजाने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या भावनेतून घरातील टी.व्ही. मशीदीसमोर आणून फोडून व जाळून टाकले.
बातमी होतीच तशी महत्त्वाची.
त्यामुळे दुसर्‍या दिवशी सगळ्याच वृत्तपत्रांनी ही बातमी हायलाईट केली.
एका नावाजलेल्या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर जेव्हा ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा त्यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या.
त्यातलीच एक विचार करायला भाग पाडणारी अशी एक प्रतिक्रिया :-
"एखाद्या गरजू संस्थेला या टी.व्ही. दान करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकला असता. टी.व्ही. फोडण्याणे आणि जाळण्याणे जे ई-वेस्ट तयार झाले, त्याला जबाबदार कोण ?"

ही बातमी कळाल्यानंतर सगळ्याच पालकांना हा प्रकार चांगला वाटला असेल; कारण प्रत्येक पालकाला टी.व्ही. नावाच्या वस्तूबद्दल राग वाटतोच.
(मुलगा अभ्यासात हुषार नसेल किंवा त्याला कमी गुण मिळाले; तर बहुतांश वेळा त्याचे खापर टी.व्ही.वरच फोडल्या जाते.)
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट.
वाईट याचे वाटते की, आपण नेहमी वाईट बाजूच अगोदर पाहतो आणि तिलाच अवास्तव महत्त्व देतो.
चांगली बाजू नेहमी उशीरा पुढे येते आणि तेव्हा आपण पश्चाताप करत असतो.

तुम्ही म्हणाल, 'टी.व्ही.ला काय चांगली बाजू असू शकते ? तो इडिअट बॉक्स वेळ वाया घालवण्याशिवाय काय करू शकतो ?’
पण तसे नाही, उलट टी.व्ही.पासून नुकसानापेक्षा फायदेच अधिक आहेत.

दांडगे सरांनी टी.व्ही.वर दाखवली जाणारी अश्लील गाणी, चित्रपट इत्यादींवर आक्षेप घेतला आहे.
मान्य आहे की हल्ली टी.व्ही.वर असे कार्यक्रम सर्रास दाखवले जातात पण टी.व्ही.चा रिमोट तर आपल्याच हातात असतो ना !
हल्ली प्रत्येक टी.व्ही.मध्ये ’चाईल्ड लॉक’ किंवा ’पॅरेन्टल कंट्रोल’चे सॉफ्टवेअर येते, त्याद्वारे तुम्ही मुलांनी कोणते चॅनल्स पाहावेत आणि कोणते नाही हे सहज ठरवू शकता.
हां, जे पालक आपल्या मुलांना डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट, हिस्टरी किंवा नॅटजीओसारखे चॅनेल्ससुद्धा पाहू देणार नसतील त्यांनी परग्रहवासी असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे म्हणजे त्यांना कुणीही काहीही म्हणणार नाही.setan


मला जाणवलेले टी.व्ही.चे काही फायदे :-

१) मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास कुणामुळे होतो ?
याच टी.व्ही.मुळे ना ?
हल्लीची पिढी फार हुषार आहे, असे आपण वारंवार का म्हणतो ?
हा निसर्गातील बदल आहे का ?
नाही.
टी.व्ही.चा वाढता वापर हेच यामागचे मुख्य कारण आहे.

२) इंटरनेट हा माहितीचा सगळ्यात मोठा खजिना आहे, पण आजही इंटरनेट खेड्यापाड्यांत पोहोचलेले नाही किंवा सगळ्यांना त्याचा वापर करता येत नाही.
पण टी.व्ही.चे तसे नाही.
आज प्रत्येक घरात टी.व्ही. आहे, प्रत्येकाला तो हाताळता/चालवताही येतो, त्यामुळे टी.व्ही. हाच माहितीचा सगळ्यात मोठा Easy to access खजिना आहे, असे म्हणावे लागेल.

३) टी.व्ही.मुळे मुलांनी मैदानी खेळ खेळायचे सोडून दिले, असे आपण नेहमी म्हणतो.
अहो, पण आज मैदाने आहेतच कुठे ?
आणि भारत तर ठरला क्रिकेटवेडा देश, मग मुलांनी घरात क्रिकेट खेळलेलं चालेल का तुम्हाला ?
टी.व्ही.वर बुद्धीला चालना देणारे बरेच खेळ असतात, मुलांनी थोडावेळ ते खेळले तर काय बिघडलं ?

४) २४ तास सुरू असलेल्या वृत्तवाहिन्यांमुळे आपल्याला घरबसल्या कळतं की आपल्या आजूबाजूला काय चालले आहे.
सध्याच्या अपडेटेड युगात आपल्याला मागे पडून चालणार नाही.
आणि अपडेटेड राहायचं असेल तर टी.व्ही.ला पर्याय नाही.


एका नावाजलेल्या चॅनलच्या, नावाजलेल्या कार्यक्रमामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे.
’प्रॉब्लम्स तो है सबके साथ । बस नजरीये की है बात ।’sembah

आपला दृष्टिकोन महत्त्वाचा.
आपण ज्या रंगाच्या चष्म्याने जगाकडे बघू, जग आपल्याला त्याच रंगाचं दिसेल.

म्हणून मी माझ्या या मतावर ठाम आहे की, बागवान समाजाचा हेतू चांगला असला तरी त्यांचा उपक्रम मात्र नक्कीच स्तुत्य नव्हता.

Friday, August 6, 2010

धन्यवाद ई-सकाळ.

मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे.
‘सहस्त्रकुंडचा धबधबा’ या आपल्या मागच्याच ब्लॉगपोस्टला ई-सकाळने त्यांच्या ‘फोटो फीचर’ या सदरामध्ये जागा दिली आहे. (5 August 2010)

E-Sakal :- http://www.esakal.com/esakal/20100805/4771680647032254495.htm
आपला ब्लॉगपोस्ट :-http://nandedians.blogspot.com/2010/08/blog-post.html


‘गे मातृभाषे तुझे मी फेडीन पांग सारे..’ हा ब्लॉगपोस्टसुद्धा ई-सकाळच्या ‘फीचर्स’मध्ये प्रकाशित झाला आहे. (5 August 2010)

E-Sakal :- http://72.78.249.124/esakal/20100805/4712705764724752231.htm
आपला ब्लॉगपोस्ट :- http://nandedians.blogspot.com/2010/03/blog-post_28.html


ई-सकाळने ‘माझा ऍंगल’ या सदरात मागच्या आठवड्यासाठी ‘कावळा’ हा विषय ठेवला होता, त्यात मी फोटो काढलेल्या एका 'नादेंडीअन' कावळ्याने स्थान पटकावले आहे. jelir (2 August 2010)



खोल जंगलात, आंतरिक समाधानात हरवलेला, ध्यानात मग्न झालेला, जटाजूट धारण केलेला, लांब दाढी वाढलेला हा ऋषीच जणू! उगाच नाही वडाला, वटवृक्ष म्हणत!
http://www.esakal.in/ar/220810_maza_angle.aspx



यापूर्वीसुद्धा ई-सकाळने ‘राहेर’वरील माझ्या माहितीवजा लेखाला प्रसिद्धी दिली होती. (21 October 2008)

आपला ब्लॉगपोस्ट :- http://nandedians.blogspot.com/2008/10/blog-post_19.html


रानफुले लेऊन सजल्या हिरव्या वाटा (19-09-2010)
http://72.78.249.124/esakal/20100919/4802356899225169331.htm


तुम्हालासुद्धा तुमच्या कथा, कविता, मजेशीर अनुभव किंवा फोटोज ई-सकाळसोबत शेअर करायच्या असतील तर तुम्ही ते webeditor@esakal.com या E-mail ID वर पाठवू शकता.


नवोदित फोटोग्राफर्स, लेखक, कवी इत्यादींना आपली कला, आपले लेखन सादर करण्यासाठी E-sakal ने ही एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.
ज्यांचे फोटो, लिखाण प्रकाशित झाले आहेत त्यांना तर यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. senyum

माझ्यासारख्या नवशिक्या फोटोग्राफरच्या फोटोज, लेख ई-सकाळने छापल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. cium

Friday, July 30, 2010

‘बाभळी’चे काटे रूतले.

पोटनिवडणुक डोळ्यापुढे ठेवून केलेला बाभळीचा स्टंटसुद्धा चंद्राबाबूंना वाचवू शकला नाही.
चंद्राबाबूच्या मोहर्‍यांना त्यांचं डिपॉजीटसुद्धा वाचवता नाही आलं. ihikhik
या स्टंटमुळे सहानुभूतीची लाट येईल असे चंद्राबाबूंना वाटले होते, पण महाराष्ट्राच्या पाण्यात आहेच अशी ताकद की भल्या-भल्यांना या लाटेचा तडाखा खावा लागतो. encem
आता गोदावरीत येऊन पापक्षालन करा म्हणावं त्यांना.sengihnampakgigi

Thursday, July 22, 2010

पाऊस परतला.


काही दिवस दडी मारून बसलेला पाऊस आज परत विजांच्या प्रचंड कडकडाटात धो-धो बरसतोय.



Thursday, July 8, 2010

मंगळवारी रात्री झालेला मुसळधार पाऊस.

मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगोली गेटच्या अंडरब्रीजला असे स्वरूप आले होते.









ता.क. :- १३ ऑगस्ट २०१० (11:20 AM)
किड्स किंग्डम शाळेच्या बसच्या ड्रायव्हरने आज ४०-५० मुलांचा जीव धोक्यात घातला होता.
त्या साहेबांनी इतके पाणी असतांनाही आणि मुलं नको म्हणत असतांनाही बस सरळ पाण्यात उतरवली होती.
भुयारी मार्गाच्या मध्यभागी आल्यावर बसमध्ये पाणी शिरले आणि ती बंद पडली.gigitjari
मग काय ? ड्रायव्हर साहेब मुलांना तसंच सोडून तिथून पळून गेले.
मुलांचा ओरडण्याचा आवाज ऎकून आसपासचे लोक तीथे धावत आले आणि त्यांनी त्या लहान मुलांना वाचवले.doa
धन्य ते ड्रायव्हर साहेब.marah
मी आत्ताच ही बातमी झी २४ तासवर पाहिली.

Friday, July 2, 2010

धो डाला !

एखाद्या दुःस्वप्नासारखा आलेला यावर्षीचा उन्हाळा, असह्य करणारा उकाडा, आणि त्यात भर म्हणून की काय कोरडे गेलेले मृग नक्षत्र पाहता निसर्गाची नांदेडवर अवकृपा झाली की काय असे वाटू लागले होते.
पण जूनच्या २८ तारखेपासून थोडीफार विश्रांती घेत पाऊस बर्‍यापैकी पडतोय.

कालच्या पावसाने तर नांदेडको धो डाला. (काल "घन ओथंबून येती" या ब्लॉगपोस्टवर अपडेट दिले होते.)
काल संध्याकाळी ४:३० वाजता सुरू झालेला पाऊस रात्री १२ वाजेपर्यंत अविरत सुरूच होता.
शेवटी शेवटी पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी सुरूवातीच्या तीन तासांच्या मुसळधार पावसाने नांदेडीअन्सची त्रेधातिरपिट उडवून टाकली होती.


कालच्या या दणकेबाज पावसाच्या काही बातम्या :-

Lokmat
पावसाची घुसखोरी
विष्णूपुरीच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ
जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी
हदगाव-तामसा रस्ता दोन दिवसांपासून बंद

Esakal

Tuesday, June 15, 2010

घन ओथंबून येती.

व्वा, काय पडला पाऊस !
मनसोक्त भिजलो बुवा.

दोन दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत होत्या की ’सगळा मराठवाडा भिजला’, ’मराठवाड्यात जोरदार पाऊस’ वगैरे पण नांदेडमध्ये पाऊसच पडत नव्हता.
मान्सून मराठवाड्यात तसा ११ जूनलाच दाखल झाला होता.
परभणी, औरंगाबाद, बीड, हिंगोली इथे जोरदार पाऊस पडत होता पण नांदेडकरांना अजून पावसाचे दर्शन झाले नव्हते.

फक्त नांदेडवरच निसर्गाची अवकृपा झाली की काय अशी भिती वाटायला लागली होती कारण आकाशात काळे ढग तर जमून यायचे पण त्याच वेळी जोर्‍याचा वारा सुटून त्या ढगांना आपल्यासोबत घेऊन जायचा. :-(
पण सुदैवाने आज तसे झाले नाही.
सकाळपासूनच ढगांनी गर्दी केली होती आकाशात आणि आत्ता ५.१५ च्या सुमारास तो बरसलाच अन्‌ तेही मनसोक्त. :-)

आता मान्सून सगळ्या मराठवाड्यात सक्रीय झाला असे म्हणायला हरकत नाही.


ता. क. :- २८ जून २०१० १०.५१ AM
पडला बुवा काल पाऊस मस्तपैकी.
१३ दिवसांनंतर पडला पाऊस.
काय झालंय पावसाला ?soal


ता. क. --> २८ जून २०१० 4:18 PM
मस्त, जोरदार पाऊस पडतोय बाहेर.menari


ता. क. --> १ जुलै २०१० 4:26 PM
गेल्या ४ दिवसांपासून थोडी थोडी विश्रांती घेऊन दमदार पाऊस पडतोय नांदेडात.tepuktangan
आज तर थोडा मनसोक्तच बरसतोय.
गेला तासभर जोरदार पाऊस पडतोय.
जून महिण्याची सगळी कसर जुलैमध्ये भरून काढणार बहुतेक वरूणराजा.

Friday, May 28, 2010

Discovery :- LIFE


From the makers of Planet Earth, Discovery Channel presents the all-new, 11-part series LIFE.


प्लॅनेट अर्थ सिरीजने सगळ्या दुनियेला वेड लावले होते.
याच सिरीजमुळे डिस्कव्हरीच्या रेटींगमध्ये प्रचंड वाढ झाली होती.
प्लॅनेट अर्थच्या बरोबर 2 वर्षांनंतर आता ही डॉक्युमेंटरी येत आहे.



२४ मे ते ६ जूनदरम्यान दररोज रात्री ८ वाजता ही मालिका डिस्कव्हरी वाहीनीवर दाखवण्यात येणार आहे.
(सध्या जास्त ऑनलाईन येणे होते नसल्याने हा टॉपिक काढायला थोडा उशीर झाला त्याबद्दल माफ करा.)[:(]

१२ जूननंतर ही सिरीज दर रवीवारी रात्री ८ वाजता दाखवण्यात येणार आहे.


७० बेस्ट ऑफ द बेस्ट कॅमेरामन्सच्या मदतीने जगभर फिरून शूट केलेले हे व्हिडीओज खरंच अचंबित करणारे आहेत.
(ह्या शुटींगला ३,००० दिवस लागले म्हणे.[:o])
व्हिडीओ क्लियारीटीसुद्धा फारच मस्त आहे.

याचसंदर्भातले एक वाक्य वाचा :-
"If there was ever a reason for someone to have HD (High Definition) or to invest in an HD set, this is it," said Clark Bunting, president and general manager of Discovery Channel.



:: या मालिकेतील एपीसोड्सचे विषय ::

Reptiles and Amphibians
Mammals
Fish
Birds
Creatures of the Deep
Hunters and Hunted
Insects
Plants
Primates
Making of Life




:: Videos ::

http://www.youtube.com/watch?v=YIjiIAQpCsQ
&
http://www.youtube.com/watch?v=BoqCcHQZlWw&feature=related



अनेक दिवसांनंतर डिस्कव्हरीवर एक चांगली सिरीज सुरू झाली आहे.
जरूर पाहा.



Tuesday, May 25, 2010

काळेश्वर येथे बोटींग सुरू.

होय मित्रांनो.
हा रखडलेला प्लॅन आता सुरू झालाय.

काळेश्वर मंदीराजवळच्या शंकरसागर जलाशयात बोटींग सुरू झाली आहे.
इथे साध्या बोटींगसहीत वाटर स्कूटर, मोटर बोटसारखे वाटर स्पोर्ट्ससुद्धा सुरू झाले आहेत.

तेव्हा उशीरा का होईना, पण नांदेडीअन्सना सुट्ट्या एन्जॉय करण्याची आणखी एक जागा मिळाली म्हणायची. :-)

वेळ :- सकाळी ९ ते सुर्यास्तापर्यंत.





Saturday, May 22, 2010

ये रे ये रे पावसा....

हुश्श्श......!
एप्रील-मेमधले रेकॉर्डब्रेक तापमान आणि गेल्या काही दिवसातला प्रचंड उकाडा (अगदी रात्रीदेखील.), या दोनगोष्टींपासून आता नांदेडीअन्सची
बहुतेक सुटका होण्याची चिन्हं दिसताहेत.

मी हा ब्लॉगपोस्ट टाकत असतांना बाहेर मस्त जोरदार पाऊस सुरू झाला होता, पण हा पोस्ट टाकेपर्यंत तो निघून गेला. (तुम्ही लोकांनी मला पावसात भिजायचा आनंदसुद्धा घेऊ दिला नाही.) :(

जाऊ द्या, असाही चातक झालोच आहे मग अजून थोडी वाट पाहतो पावसाची. :P

चला, बाय.

Friday, May 21, 2010

भटकंती @ नांदेड



एव्हाना तुम्हाला सुट्ट्या लागल्या असतील.
सुट्ट्यांमध्ये 'फिरायला कुठे जायचे ?' हा एक यक्षप्रश्नच असतो.
आपण नेहमी ठरवतो की सुट्ट्यांत कुठेतरी शांत, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायला हवे, पण तसे ठिकाण ठरवण्यातच सुट्ट्या निघून जातात.
मग असे ठिकाण ठरवण्यासाठी डोकेफोड आणि बजेटचे बॅलंस बनवण्यासाठी आकडेमोड सुरू होते.


बाहेर फिरायला जाल तेव्हा जाल, पण अगोदर नांदेडमधली तरी काही ठिकाणं पाहून या.


आपल्या ब्लॉगमध्ये डाव्या साईडच्या "Labels" या कॉलममधील "निसर्ग/पर्यटन/प्रवासवर्णन" या लिंकवर क्लिक करा.
तीथे मी नांदेडमधील काही अशा पर्यटनस्थळांची माहिती दिली आहे जी फार कमी लोकांना ज्ञात असतील.
त्या ठिकाणांची माहिती वाचूनही तुमच्या डोळ्यापुढे जर त्या ठिकाणाचे काल्पनिक चित्र उभे राहत नसेल तर माझ्या ऑर्कूट प्रोफाईलला भेट द्या, तीथे मी या सगळ्या ठिकाणांच्या फोटो टाकलेल्या आहेत.

एव्हढ्या उन्हामध्ये तर तुम्ही काही निघणार नाही घराबाहेर, तेव्हा पावसाच्या १-२ सरी येऊन जाऊ देत मग तुम्ही जा या ठिकाणांना भेट द्यायला.

ते ठिकाण पाहून आल्यानंतर तुमचे अनुभव आणि तीथे काही छायाचित्रं काढली असतील तर ती शेअर करा आमच्यासोबत.

चला बाय, हॅप्पी जर्नी. :-)

Monday, April 19, 2010

यांचा काही नेम नाही.



नांदेड भारनियमनमुक्त होईल हे स्वप्न पाहायचे सोडून द्या. (मी सोडून दिले आहे.)

१ एप्रील पासून नांदेड भारनियमनमुक्त होईल असे जाहीर करण्यात आले होते.
लोडशेडींगपासून तर काही मुक्तता झाली नाही नांदेडची, हां पण १ तासाने लोडशेडींग वाढली जरूर आहे.

चला प्रकाशाकडून अंधाराकडे.....

Thursday, April 8, 2010

सूर्यनारायन कोपतोय.

सूर्यनारायन कोपला.
आठवतोय का हा ब्लॉगपोस्ट ? (इथे क्लिक करा.)
मागच्या वर्षी २० एप्रीलला लिहीला होता मी तो ब्लॉगपोस्ट. (तेव्हा नांदेडचे तापमान ४२ अंश सेल्सीअसवर पोहोचले होते.)

यावर्षीही परीस्थीती काही वेगळी नाहीये.
यावर्षीच्या एप्रीलच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ४२ ते ४३ च्या दरम्यान जाऊन पोहोचले आहे.
अजून मे यायचा बाकी आहे.


मार्चमध्ये ४-५ वेळा पाऊस पडून गेला, तोही अगदी मुसळधार.
नंतर १-२ दिवस वातावरण थंड झाले होते, पण एप्रीलपासून उन्हाने परत आपला पारा चढवलाय. (त्यात वीज वितरण कंपनीने एप्रील फूल केलेच आहे आपल्याला. [हा पोस्ट वाचा.])


मागच्या वेळी मी खरंतर म्हणालो होतो की ग्लोबल वार्मिंगची समस्या अजूनही हाताबाहेर गेलेली नाही, पण या १ वर्षात अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यांच्यामुळे मला माझ्याच विधानावर विश्वास ठेवावा वाटत नाहीये. (अनेक देशांमध्ये रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टी, जंगलातील भयंकर मोठे वणवे, आपल्याकडे तर मागचा पावसाळा कोरडा आणि हिवाळा विनाथंडीचा झाला इ.)


चला, किमान प्रार्थना करूया की नांदेडच्या उन्हाळ्याने यावर्षी कोणताही रेकॉर्ड ब्रेक करू नये.


ता.क. :- (१५ एप्रील २०१० ३.३० PM)
आपल्या ब्लॉगवरील विजेट आणि Weather Underground वर नांदेडचे आजचे तापमान ४४° दाखवत आहे.


ता. क. :- (१६ एप्रील २०१० ८:२८ PM)
ग्लोबल वार्मिंगवर लिहून लिहून थकलोय मी.
अर्ध्या तासापूर्वी सोसाट्याचा वारा सुटला होता शहरात. (शहरात काही पाऊस पडला नाही, पण नांदेडच्या आसपासच्या परीसरात खूप जोरदार पाऊस पडला म्हणे.)


ता. क. :- (२९ एप्रील २०१० ६:३६ PM)
छान पाऊस पडतोय बाहेर.
मातीचा सुगंध दरवळतोय.


ता.क. :- ४ मे २०१० (८.५५ AM)
तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
सध्या तापमान ४३ अंशावरून ३३-३४ अंशावर आले आहे.


ता. क. :- ११ मे २०१० (८.३७ AM)
रेकॉर्डब्रेक !
काल नांदेडचे तापमान ४४.१ अंश सेल्सीअस होते. (कालचे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त.)


ता. क. :- १६ मे २०१०
२ दिवसांपूर्वी नांदेडचे तापमान ४४.३ होते.
गेल्या ३-४ दिवसांपासून भयंकर उकडतंय.
तापमान अजून २ अंशाने जरी वाढले तरी तंदूरी चिकन बनवण्यासाठी भट्टीची गरज भासणार नाही.
दुपारी भयंकर उन आणि रात्री प्रचंड उकाडा !
काही खरं नाही बुवा.


ता. क. :- (३ जून २०१० ७:४० AM)
सुटलोत (बहुतेक ?) एकदाचे या गर्मीपासून.
काल सकाळी पाऊस पडला आणि दिवसभर ढगाळ वातावरण होते.
काही दिवसांपूर्वीच सकाळी ७ वाजतादेखील चांगलेच तापायचे, पण आज सकाळचे ८ वाजत आलेत तरीही उन पडले नाही आणि वातावरणसुद्धा थंड आहे.

Tuesday, March 23, 2010

ग्रीन सिटी - नांदेड

गुरूद्वारा लंगर साहिब यांनी शहराला ’हरीत शहर’ म्हणून ओळख मिळवून देण्याचा संकल्प केला होता हे तर आपल्याला माहितच असेल.
सध्या शहरात त्याचीच अंमलबजावणी होतांना दिसून येत आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला किंवा डिव्हाईडरच्या जागी बर्‍यापैकी वाढ झालेली शोभेची झाडं लावण्यात येत आहेत.
यामुळे खरोखरच नांदेडची शोभा वाढत आहे.

पण मूळ प्रश्न हा आहे की या झाडांची निगा घेतली जाणार आहे का ?
जर निगा घेतली जाणार असेल तर कोण घेणार, मनपा की गुरूद्वारा लंगर साहिब ?

Monday, March 22, 2010

८३ वे हायटेक अ. भा. मराठी साहित्य संमेलन


पुण्यातील ८३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन खरोखरच हायटेक बनले आहे.
तुम्ही नांदेडमध्ये असूनही पुण्यातील साहित्य संमेलनाचा आस्वाद घेऊ शकता.

ज्या साहित्यप्रेमी रसिकांना साहित्य संमेलनंस्थळी जाणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच आहे.
होय, नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात बसूनदेखील तुम्ही या साहित्य संमेलनातील प्रमुख कार्यक्रम पडद्यावर पाहू शकता.

हे शक्य केले आहे पुण्याच्याच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ या संस्थेने.
संमेलनातील सर्व प्रमुख कार्यक्रम पडद्यावर लाईव्ह दाखवण्यासाठी या संस्थेने महाराष्ट्रातील ९ शहरांची निवड केलेली आहे आणि त्यात नांदेडचाही समावेश आहे.
आणि विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम तुम्ही शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात विनामुल्य पाहू शकता.
आहे की नाही आनंदाची बाब ?


:: कार्यक्रमाचे वेळापत्रक ::

२६ मार्च
सकाळी ९:०० ते दुपारी १:०० पर्यंत काही स्थानिक कार्यक्रम आणि संमेलनाच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण.
सायंकाळी ५:०० ते रात्री १०:०० पर्यंत संमेलनातील कथाकथन, कविसंमेलनाचे थेट प्रक्षेपण.

२७ मार्च
सायंकाळी ४:०० ते ६:०० या वेळात नांदेडच्या कवींचे कविसंमेलन.
आणि सायंकाळी ६:०० वाजता संमेलनातील कवि मंगेश पाडगावकर यांचा मुलांशी संवाद

२८ मार्च
सायंकाळी ६:३० च्या अगोदर परिसंवाद आणि कथाकथन.
सायंकाळी ६:३० ते ८:०० संमेलनाचा सांगता समारंभ.



तुमच्याकडे High Speed Broadband Internet Connection असेल तर तुम्ही घरबसल्या इंटरनेटवरसुद्धा संमेलन लाईव्ह पाहू शकता.

:: संकेतस्थळ ::
http://www.mkcl.org/mss/





:: साहित्य संमेलनाचे अधिकृत संकेतस्थळ ::
http://www.sahityasammelan2010.com/



Friday, March 19, 2010

पक्ष्यांना वाचवूया चला....

कित्येक पक्षी उन्हाळ्यात पाण्यावाचून मरतात, आपल्या एका छोटाश्या मदतीने विशेष कष्ट न घेता आपण त्यांचा जीव वाचवू शकतो .. नाही का ?

हे करा :-

आपल्या घराच्या / वाड्याच्या / बंगल्याच्या गच्चीवर , अंगणात , वरांड्यात , गॅलरीत छोट्याश्या भांड्यांमध्ये , फुलपात्रात किव्हा दगडी कुंड्यात पाणी भरून ठेऊ शकतो जेणेकरून पक्ष्यांना अगदी सहजपणे उन्हाळ्यात पाणी मिळू शकेल व त्यांचा जीव वाचू शकेल.

विचार करा आपल्यापैकी प्रत्येकाने हे छोटेसे काम केल्यास पक्ष्यांना सहजपणे पाणी उपलब्ध होईल.

शेवटी आपणच झाडे कापून त्यांची जागा बळकावली आहे आता थोडीशी मदत करून प्रायश्चित करायला काय हरकत आहे ?


not a big deal... isn't it?






उद्या जागतिक घरचिमणी दिवस आहे. (२० मार्च)

मी माझ्या घराच्या अंगणात लावण्यासाठी २ स्पॅरो हाऊस आणले आहेत.





माझ्या घराच्या गच्चीवर भरलेली पक्ष्यांची मांदियाळी :-