Saturday, May 16, 2009

नांदेडचे नवनिर्वाचित खासदार

नांदेड मतदारसंघातून राष्ट्रीय कॉंग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर हे निवडून आले आहेत.


मित्रांनो, लोकसभा निवडणूकीत संयुक्त पुरोगामी आघाडी बहुमताच्या दिशेने पुढे पाऊल टाकते आहे.
सध्या हाती आलेल्या बातमीनुसार यु.पी.ए.ने १२९ जागा पटकावून आघाडी घेतली आहे तर एन.डी.ए. ७८ जागा पटकावून दुसऱ्या नंबरवर आहे. तिसऱ्या मोर्चाला ३० तर चौथ्या मोर्चाला केवळ ७ जागा पटकाविण्यात यश आलेले आहे. इतर १२ जागांवर आहेत.

आत्ता चालत असलेल्या आघाडीनुसार यु.पी.ए. जवळपास २५२ जागा पटकावून सरकारस्थापनेचा प्रस्ताव ठेवणार असेच जाहीर होते.

Monday, May 11, 2009

°o.O आता तुम्हीही व्हा नांदेडीअन्सचे लेखक O.o°

मित्रांनो,
तुम्ही माझ्या ब्लॉगला आजवर भरभरून प्रतिसाद दिला आणि देत आहात, त्यामुळेच मला माझा ब्लॉग नेहमीअपडेटेड ठेवावासा वाटतो. :)

माझ्या ब्लॉगवरचे सगळे लिखाण नेहमी माझेच असते, त्यामुळे मला आता अशी भिती वाटू लागली आहे की नांदेडीअन्स फक्त माझ्या एकट्याचे लिखाण वाचून-वाचून कदाचीत कंटाळले असतील. :(

त्यामुळे मी आता नांदेडीअन्स ब्लॉगसाठी नवीन लेखकांच्या शोधात आहे.
तेव्हा चला, लिहायला लागा. :)

तुम्ही लिहीलेली माहिती, लेख, प्रवासवर्णन, कविता इत्यादी लेखनप्रपंच नांदेडशी संबंधीतच असायला हवा.

तुमचे लिखाण माझ्यापर्यंत पोहोचवा.
निवडक लेखनाला तुमच्या नावासह, संपर्क पत्त्यासह नांदेडीअन्स ब्लॉगवर प्रसिद्धी देण्यात येईल. :)

माझा ई-मेल आय.डी. तर तुम्हाला माहितच आहे.
power_8383@yahoo.com

Thursday, May 7, 2009

‘परिस्थितीच्या अभ्यासा’साठी शीघ्र कृतिदल नांदेडमध्ये

जातीयदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या राज्यातल्या जिल्ह्य़ांची यादी तयार झाली असून त्यात नांदेड अग्रभागी आहे, असे सांगण्यात आले.
या पाश्र्वभूमीवर संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास

करण्यासाठी शीघ्र कृतिदलाचे पथक येथे दाखल झाले आहे.

क्षुल्लक कारणावरून नेहमी घडणाऱ्या दंगलीसंदर्भात राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणा यांनी अभ्यास केला.
ज्या जिल्ह्य़ात दंगली होतात अशा जिल्ह्य़ांची यादी तयार करण्यात आली आहे. दंगली, नक्षलवादी समस्या, बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे कार्य व अन्य बाबींचा अग्रक्रम लावण्यात आला आहे.
दंगलीत नांदेड अग्रभागी असल्याचे स्पष्ट झाले; तर अन्य बाबीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शहरातील दंगली नेहमीच क्षुल्लक कारणावरून होतात.
बळाचा वापर केल्याशिवाय ही दंगल नियंत्रणात येत नाही, असे वेळोवेळी स्पष्ट झाल्याने किंवा गुप्तचर यंत्रणांनीही तसा अहवाल दिल्याने त्या जिल्ह्य़ाचा अभ्यास करण्यासाठी शीघ्र कृतिदलाच्या दक्षिण विभागातील बटालियनचे पथक नांदेडात दाखल झाले आहे.
हे पथक सर्वच अतिसंवेदनशील, संवेदनशील भागाचे सर्वेक्षण करणार आहे.
इत्थंभूत माहिती घेऊन मंदिर, मशीद, विहार, चर्च, गुरुद्वारा याची तपशीलवार तसेच वेगवेगळ्या मिरवणुकांचे मार्ग, वाद होणारी ठिकाणे, अंतर्गत रस्ते, टोलेजंग इमारती याची संपूर्ण माहिती घेऊन हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे, असे सांगण्यात आले.

भविष्यात जातीय किंवा कोणत्याही कारणाने दंगल झाली तर ती नियंत्रणात आणण्यासाठी शीघ्र कृतिदलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.
संपूर्ण शहराची माहिती त्यांना असावी या उद्देशानेच या पथकाचा अभ्यास दौरा असल्याचे सूत्रांनी सांगितले.


:: Source ::
Loksatta

Wednesday, May 6, 2009

मराठी सॉफ्टवेअर्स

एक अब्जापेक्षाही जास्त अस्लेल्या बहुभाषिक भारतियांना एकमेकांच्या संपकीत
आणण्यासाठी माहीती तंत्रज्ञान विभागाचे भाषा तंत्रज्ञान एक महत्वाची भूमिका बजावत आहे.
भाषा तंत्रज्ञानामधे विकसित उपकरणें सर्वसामान्य पर्यंत पोहचवण्याच्या उद्देशनि भारत
सरकारच्या माहीती तंत्रज्ञान विभागाच्या तरतूदी अंतर्गत
www.ildc.gov.in तसेच
www.ildc.in वेबसाईट मार्फत व्यवस्था
करण्यात आली आहे.



या उपकरणांमधे तसेच सेवांमधे मुख्य आहे...
फ़ॉन्ट, कोड परिवर्तक, वर्तनी संशोधक, ओपन ऑफ़िस, मैसेंजर, ई-मेल क्लायंट, ओ सी आर, शब्दकोश, ब्राउज़र, ट्रांसलिटरेशन, कॉर्पोरा, शब्द-संशोधन.




::
डाऊनलोड पेज ::
http://www.ildc.in/Marathi/mdownload.html



दोन गटांमधे सशस्त्र हाणामारी

शहरातील भाग्यनगर भागात आज दुपारी दोन गटांमधे तुंबळ हाणामारी झाली आहे.
त्यात ४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्रथमदर्शी तरी हे भांडण राजकीय वादातून झाले आहे असे वाटते.


राज्याचे मुख्यमंत्री आज नांदेडमधे आलेले असल्यामुळे सर्व पोलीस फौजफाटा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.
या कारणामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले.
पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हमलावरांच्या तलवारी, चाकू-सुरे हे सर्व रस्त्यावरच पडून होते.

दिवसाढवळ्या इतके मोठे आणि खुणशी भांडण नांदेडीअन्सनी कधीच पाहिले नसल्यामुळे आज घटनास्थळावर व आजुबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांमधे एकच धावपळ उडाली.
या घटनेमुळे शहरातील भाग्यनगर, स्नेहनगर इत्यादी भागांमधील बाजारपेठ काही काळापुरती बंद झाली होती.

घटनेची अधिक माहिती हातात आल्यावर मी हा टॉपिक परत अपडेट करेन.


(संध्याकाळचे ६ वाजून ३७ मिनिटे)
अधिक माहिती अशी हातात आली आहे की हे भांडण दोन राजकीय नेत्यांच्या पूर्ववैमनस्यातून झाले आहे.

माझ्या एका मित्राने सांगितले की गंभिर जखमींपैकी एकाचा मृत्यु झाला आहे. (अर्थात ही बातमी खोटीसुद्धा असू शकते.)

उद्या वर्तमानपत्रात तपशिलवार माहिती मिळेलच.


एकंदरीत हा सर्व प्रकार अगदी दुर्दैवी म्हणायला हवा.

या घटनेचा निषेध !

Monday, April 27, 2009

ब्लॉग अपडेट :(

माफ करा मित्रांनो, माझ्या बी.सी.ए. तृतीय वर्षाच्या परिक्षा असल्यामुळे मी काही दिवसांपासून ब्लॉग अपडेट करू शकलो नाही.
माझ्या परिक्षा १० मे रोजी संपतील त्यामुळे आता ब्लॉग १० तारखेनंतरच अपडेट होईल.

धन्यवाद.

Monday, April 20, 2009

सूर्यनारायण कोपला

मित्रांनो सूर्यदेवताची प्रखर नजर नांदेडवर अजून काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे.
काल नांदेड येथे कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सीअस नोंदवील्या गेले तर आज (सोमवारी) http://www.wunderground.com/ ह्या संकेतस्थळावर नांदेडचे तापमान ४३ अंश सेल्सीअस इतके दर्शवीत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेची ही लाट अजून काही दिवस तरी कमी होण्याची शक्यता नाहीये.

तरी राज्याच्या विदर्भ आणि खानदेश या भागांच्या तुलनेत मराठवाड्याची स्थीती चांगलीच म्हणायला हवी.

राज्यातील काही शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे :-
अकोला ४४.५, औरंगाबाद ४१.६, नागपूर ४४.२, पुणे ४१.६, सोलापूर ४३.७, चंद्रपूर ४३.८, वर्धा ४३.४, परभणी ४२.७ अंश, अमरावती ४७, जळगाव ४७.

अजून मे उजाडायचा आहे मित्रांनो.
मे मधे कमाल तापमान उच्चांकाचे कोणकोणते विक्रम मोडतात कुणास ठावूक.


:: आला उन्हाळा, तब्बेत सांभाळा! ::



या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे माहिती आहे ?
आपण स्वतः.
होय आपणच, समस्त मनुष्य वर्ग.
आपल्या स्वार्थासाठी आपण निसर्गाला नुकसान पोहचवून ग्लोबल वार्मींगला कायमचा पाहुणा बनवून घेतला, त्याचेच फळ आपण आत्ता भोगतोय आणि भविष्यातही भोगावे लागतील.

अजून वेळ गेली नाही मित्रांनो.
मान्य आहे की ग्लोबल वार्मिंग आज संपुर्ण जगासाठी एक मोठी समस्या आहे पण ती अजूनही हाताबाहेर नक्कीच गेलेली नाही मित्रांनो.
तुम्ही तुमच्या घरासमोर मोकळ्या जागेत, परसबागेत किंवा शक्य असेल तिथे झाडे लावा.
ग्लोबल वार्मिंगला काबुत आणण्यासाठी तुम्ही तुमचा खारीचा वाटा उचलायलाच हवा.


Saturday, April 18, 2009

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय"

पाहीलाय का ?
नाही ? :O


मराठीत असे चित्रपट फार क्वचितच बनतात, तेव्हा लवकरात लवकर पाहून घ्या.

आता मी जास्त काही बोलत नाही, नाहीतर तुम्ही मलाच रागावाल इतक्या उशिरा का काढला टॉपिक म्हणून. :P


:: चित्रपट समिक्षा ::