Sunday, March 28, 2010
माझ्या फोटो आणि प्रजावाणीची बातमी.
नमस्कार मित्रांनो,
नांदेड शहरातील दिशादर्शक फलकांवरील अशुद्धलेखनाच्या चुकांच्या मी काढलेल्या फोटो तर तुम्हाला माहितच असतील.
मी त्या फोटो आपल्या ब्लॉगवरही पोस्ट केल्या होत्या आणि काही महिन्यांपूर्वी त्या फोटो लोकसत्ता वृत्तपत्रातदेखील छापून आल्या होत्या.
याशिवाय मी त्या फोटो माझ्या ऑर्कूट प्रोफाईलच्या अल्बममध्येसुद्धा अपलोड केल्या होत्या.
त्या फोटो पाहून वार्ड क्र. २२ चे नगरसेवक श्री. विपूल मोळके यांनी त्याबाबत नक्कीच काहितरी करता येईल असे मला सांगितले होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनपा आयुक्त डॉ. श्री. दिपक म्हैसेकर यांना त्याबाबत ई-मेलदेखील केला होता.
हे सगळं मी तुम्हाला आज सांगायचे कारण म्हणजे आजच्या प्रजावाणीची या विषयावरील बातमी.
प्रजावाणीने आजच्या अंकात या दिशादर्शकांवरील अशुद्धलेखनाबद्दल मोठी बातमी छापली आहे.
आता त्या अशुद्धलेखनाच्या चुका दुरूस्त होतील अशी आशा बाळगुयात.
Labels:
स्थानिक वृत्तपत्रांमधील बातम्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
बहाद्दर म.न.पा.
अभिनंदन सौरभ, हे निर्देशनाला आणुन दिल्या बद्दल.
धन्यवाद. :-)
Post a Comment