Sunday, June 6, 2010
बागवान समाजाने टीव्ही संच फोडले !
दूरचित्रवाणीमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, ती शिक्षणात मागे राहतात, या भावनेतून शहरातील बागवान जमातीतील ५० ते ५५ कुटुंबांनी आज रस्त्यावर सामूहिकपण ‘टीव्ही.’ संच फोडले.
मुस्लिमबहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देगलूर नाका व परिसरात बागवान जमात मोठय़ा प्रमाणावर वास्तव्यास आहे.
या जमातीची एक पंच समिती आहे.
समाजातील बिघडत चाललेले वातावरण, वाढता व्यभिचार, शिक्षणात होणारे दुर्लक्ष या पाश्र्वभूमीवर पंच समितीमध्ये गेल्या आठवडय़ात विस्तृत चर्चा झाली.
‘टीव्ही.’मुळे मुले-मुली शिक्षणात मागे राहत आहेत, वेगवेगळ्या मालिकांमुळे त्यांच्यावर वाईट संस्कार होत आहेत. शिवाय व्यभिचार वाढत चालला आहे.
आई-वडील दिवसभर कामात गुंतल्याने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या ‘टीव्ही.’मुळे पाल्य शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
अनेक मालिकांमुळे कौटुंबिक कलह निर्माण होत आहेत, अशा सर्व बाबींवर चर्चा झाली.
त्यानंतर या जमातीच्या प्रमुखांनी घरातील ‘टीव्ही.’ फोडून टाकण्याचे ठरवले.
कोणत्याही परिस्थितीत घरी ‘टीव्ही.’ ठेवायचा नाही, असा निर्णय झाल्यानंतर आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या जमातीतील ५०-५५ कुटुंबांनी कापूस संशोधन केंद्रासमोर एकत्र येऊन आपल्या घरातील ‘टीव्ही.’ संच फोडून टाकले.
अचानक घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
‘काय झाले ? कशामुळे ?’ हे प्रश्न अनुत्तरित असतानाच काही वेळात सर्व चित्र स्पष्ट झाले.
‘टीव्ही.’मुळे होणाऱ्या दुष्परिणामांची इतरांना माहिती व्हावी या उद्देशाने जमातीने पुढाकार घेऊन हे कृत्य केल्याचे समाजाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
व्यावसायिक ठिकाण, खासगी कार्यालये येथे ‘टीव्ही.’ लावण्यास आमचा विरोध नाही, पण घरात ‘टीव्ही.’ असू नये, अशी आमची भूमिका आहे.
त्याला सर्वानी प्रतिसाद द्यावा.
समाजव्यवस्था बिघडण्यास ‘टीव्ही.’ कारणीभूत आहे, अशी आमची धारणा झाल्याने आम्ही आजचा प्रकार केला. आमच्या कृत्याला प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
:: Source ::
Loksatta
ई-सकाळच्या वेबसाईटवर या बातमीवर अनेकांनी कमेंट केले आहेत.
त्यापैकी 'नांदेडीअन' नावाने कमेंट करणार्या एका व्यक्तीचे मत लक्षात घेण्यासारखे आहे.
ते म्हणतात, "Donation of these TV s to any organization was a good option. Its duty of MA NA PA to charge them fine for the e wastage on public land. This action is showing similarities with taliban style."
Labels:
स्थानिक वृत्तपत्रांमधील बातम्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
अनावश्यक.. टिव्ही फोडण्यापेक्षा त्याला बंद करायचे...
Post a Comment