Sunday, October 19, 2008

राहेरचे नृसिंह मंदिर

नमस्कार मित्रांनो,
काही दिवस मी गावाकडे गेल्यामुळे ब्लॉग अपडेट नाही करू शकलो, त्याबद्दल मी आपली माफी मागतो.


पण गावाकडे असतानाच मी राहेरचे नृसिंह मंदिर पाहण्यासाठी गेलो होतो.
मला हे ठिकाण फार आवडले, ह्या ठिकाणाची तुम्हालाही माहिती व्हावी म्हणून हा लेख लिहित आहे.

राहेर हे गाव बिलोली तालुक्यात आहे.
अनेकांचे कुलदैवत असलेले नृसिंहाचे फारच सुरेख असे हेमाडपंथी मंदिर येथे आहे. .



आज हे मंदिर जरी जीर्ण, जुनाट वाटत असेल, तरी इथे गेल्यावर तुम्हाला या मंदिराच्या गतवैभवाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.


मंदिराला लागूनच गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे.
जवळच धरण बांधण्यात आल्यामुळे राहेर गावाला नेहमीच पुराचा फटका बसू लागला त्यामुळे १५/२० वर्षापूर्वी राहेर गाव इतरत्र पुनर्वसीत झाले, तेव्हाच्या घरांचे भग्नावशेष आजही येथे पाहायला मिळतात.


मुख्य मंदिरापासून थोड्याच अंतरावर नृसिंहाचे दुसरे एक मंदिर आहे.
हे मंदिर मात्र फारच दूर्लक्षित आहे असे दिसून येते कारण मंदिराच्या आसपास काटेरी झुडूपे वाढली आहेत आणि मंदिरात तर हजारोंच्या संख्येने वटवाघळांनी आपले आश्रयस्थान बनविले आहे.
त्यांच्या विष्ठेच्या उग्र दर्पामुळे मंदिरात जास्त वेळ थांबणे अशक्य होऊन बसते.


पण एकूणच हा सर्व परिसर पाहण्यासारखा आहे.


कसे पोहचावे :-

राहेर हे तिर्थक्षेत्र बिलोली तालुक्यात आहे.
नांदेड ते राहेर हे अंतर फक्त ६० ते ६५ km आहे.
उमरीपासून राहेर फक्त १६ km आहे.



तेव्हा मित्रांनो, एक दिवसाची सहल काढायची असेल तर राहेरसारखे ठिकाण शोधूनही सापडणार नाही.


0 comments:

Post a Comment

Post a Comment