Friday, August 29, 2008

नांदेड धुक्याने वेढले

होय.
आश्चर्याची बातमी आहे ना ?
पण आहे मात्र खरी.

तसा धुक्याचा पूर्व इतिहास नाही परंतू यापूर्वीसुद्धा २-३ वेळा नांदेडला धुके आले होते पण त्याची घनता इतकी प्रचंड नव्हती.
मुळात नांदेड हे महाराष्ट्रातील अतिशय गरम अश्या जिल्ह्यांपैकी एक म्हणुन ओळखल्या जाते, त्यामुळे इथे धुके येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

पण आज सकाळी जेव्हा नांदेडीअन्स झोपेतून जागे झाले, तेव्हा ते इतके प्रचंड धुके पाहून आश्चर्यचकीत झाले नसतील तर नवलच.
अगदी ३० मीटरपर्यंतची वस्तूसुद्धा स्पष्ट दिसत नव्हती.
काय ह्या नांदेडमधील धुक्यालासुद्धा ग्लोबल वार्मींगसोबत जोडून पाहिल्या जाईल ?









:: छायाचित्रे ::