Thursday, July 28, 2011

PVR Nanded

Tuesday, July 12, 2011

सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा अजून एक कारनामा.

http://www.dnaindia.com/mumbai/report_facebook-helps-pune-police-track-missing-man-after-11-years_1564374

Saturday, July 2, 2011

‘नांदेडीअन्स’चे मोबाईल व्हर्जन !

‘नांदेडीअन्स’चे मोबाईल व्हर्जन वापरताय की नाही मित्रांनो ?

माझ्या काही मित्रांची तक्रार होती की माझा हा ब्लॉग त्यांच्या मोबाईलवर उघडायला (लोड व्हायला) बराच वेळ लागतो, कारण एकतर बरेचसे मोबाईल वेब ब्राऊजर्स युनिकोड सपोर्ट करत नाहीत आणि जे करतात ते लोड व्हायला बराच वेळ घेतात.
त्यामुळे ब्लॉगस्पॉटने दिलेली मोबाईल व्हर्जनची सुविधा मी तुम्हाला उपलब्ध करून दिली होती.

पण सध्या ही सुविधा Beta फेजमध्ये असल्यामुळे काही मोबाईल वेब ब्राऊजर्स अजूनही आपल्या ब्लॉगचे वेब व्हर्जनच दाखवत आहेत.
जोपर्यंत ही सुविधा आपोआप सगळ्या मोबाईल वेब ब्राऊजर्सवर सुरू होत नाही, तोपर्यंत तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या पत्त्याच्या शेवटी
/?m=1 हे लावावे लागेल.

उदा. www.nandedians.blogspot.com/?m=1

आपल्या ब्लॉगचे मोबाईल संस्करण तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा. :-)


फेसबुक, युट्यूब आणि नांदेडचे ट्रॅफिक पोलीस.

नमस्कार नांदेडीअन्स.
बर्‍याच दिवसांनी भेट होते आहे आपली.
सध्या मीसुद्धा तुमच्यासारखाच फेसबुकवर ऍक्टीव्ह आहे.
आपल्या नांदेडीअन्स ग्रूपमध्ये तिकडे जवळपास ३,००० सभासद जमले आहेत, त्यामुळे ब्लॉग अपडेट करण्याऎवजी फेसबुक ग्रूपचा मार्गच सोपा वाटतोय.

नांदेडबद्दल कुणी काही नवीन माहिती, फोटोज, व्हिडीओज वगैरे टाकले आहेत का ते पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे मी मायाजालावर सर्च करत होतो आणि मला एक व्हिडीओ मिळाला युट्यूबवर, ज्यात एका दुचाकीस्वाराने ट्रॅफिक पोलीसांचेच स्टिंग ऑपरेशन केले होते. (या व्हिडीओमध्ये काही ट्रॅफिक पोलीस त्या दुचाकीस्वाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते.)
त्या व्हिडीओची लिंक मी फेसबुकवर शेअर केली आणि त्याला अनेकांचे कमेंट्स यायला लागले.

या ग्रूपमध्ये नांदेडचे अनेक सिनिअर पत्रकारसुद्धा आहेत (प्रिंट आणि ईलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्हीचे.), त्यांना ह्याच व्हिडीओवर एक बातमी बनवायची होती.
पण नांदेडचे पोलीस उप-अधिक्षक श्री. लक्ष्मिकांत पाटील हे त्या ट्रॅफिक पोलीसांवर कारवाई करणार असल्याचे समजल्यावर मी तो पोस्ट फेसबुकवरून उडवला.
पण तो व्हिडीओ युट्यूबवर तसाच आहे आणि इतरही १-२ लोकांनी तोच व्हिडीओ जशास तसा युट्यूबवर अपलोड केलाय.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तपत्रांमध्येसुद्धा या व्हिडीओसंदर्भात बातम्या आल्या होत्या.
काल काही वृत्तपत्रांमध्ये बातमी होती, त्या ट्रॅफिक पोलीसांची वाहतूक शाखेतून पोलीस मुख्यालयी बदली झाल्याची.