Friday, December 25, 2009

गोली वडापाव आता नांदेडमधे
मुंबई, पुणे, नाशिक भागामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला गोली वडापाव आता नांदेडमधे आला आहे.

गोलीच्या नांदेडमधील प्रतिनिधींनी (franchisee) त्यांच्या स्टोअर्ससाठी जागासुद्धा अतिशय मोक्याच्या हेरल्या आहेत.
गोली वडापावच्या नांदेडमधे तीन शाखा उघडल्या आहेत.

) गोली :- गुरूजी (गुरूद्वारा चौरस्ता)
भारताच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या पर्यटकांची इथे नेहमीच वर्दळ असते.

) गोली :- क्विक बाईट्स (चौगुले कोचींग क्लासेसच्या बाजूला)
या भागात तर ११-१२ वीचे सगळे ट्युशन्स असल्या कारणाने दिवसभर इथेही गर्दी असते.
संध्याकाळी ट्युशन सुटल्यावर मित्रांसोबत गप्पा मारता मारता विद्यार्थ्यांची पावलं नक्कीच इथल्या क्विक बाईट्सकडे वळतील यात शंका नाही.

) गोली :- टेम्प्टेशन (आईनाथ पाणीपुरीच्या बाजूला, भाग्यनगर)
आईनाथ पाणीपुरीवाल्याकडची गर्दी आता इथल्या टेम्प्टेशनकडे वळायला लागली आहे.


मी तर बुवा टेस्ट घेतली आहे गोली वडापावची.
छान वडापाव आहेत गोलीचे.

नेहमीच्या वडापावमध्ये चेंज पाहीजे असेल तर तुम्हाला गोलीमधे कटलेट वडापाव, आलुटिक्की वडापाव, शेज्वान वडापाव असे वडापावचे वेगवेगळे फ्लेवर्स खायला मिळतील.
गोलीच्या वडापावव्यतिरीक्त तुम्हाला त्यांचा साबुदाना वडा, समोसा, कांदा भजी इत्यादी पदार्थसुद्धा आवडतील.


गोलीने नांदेडच्या खवैय्येगिरीत भर टाकली आहे.
आखिर खानेवालोंको खाने का बहाना चाहीये


::
गोली वडापावचे अधिकृत संकेतस्थळ ::
http://golivadapav.com/

Monday, December 14, 2009

एक समर्पित संध्याकाळ
६ डिसेंबर ०९ रोजी स्टार माझावर बहिणाबाई चौधरी यांच्यावर अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली 'बहिणाई' ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात येत होती.
फारच मस्त डॉक्युमेंटरी होती ती.


मला बहिणाबाई चौधरी म्हणजे एक निरक्षर बाई पण तरीदेखील एक उत्तम कवियीत्री इतकीच माहिती होती, पण या डॉक्युमेंटरीमुळे खूप छान माहिती मिळाली.

आता माझे असे ठाम मत झाले आहे की बहिणाबाई चौधरी यांच्याइतक्या चांगल्या कविता कुणीही केलेल्या नाहीयेत.
फारच सहज-सोप्या भाषेमधे अतिशय गहन विषयांवर त्या कविता करत असत.मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना


मानवी मनाचे विश्लेषण इतक्या सोप्प्या भाषेत जगातील कुठल्याही व्यक्तीने केले असेल असे मला तरी वाटत नाही.आता हीच डॉक्युमेंटरी नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पाहायला मिळणार आहे, तेव्हा ही संधी सोडू नका.


Friday, December 11, 2009

राज्य शासनाचे उत्कृष्ठ वावाङ्मय निर्मितीचे पुरस्कार जाहीर.

डिसेंबर ०९


नमस्कार मित्रांनो,

महाराष्ट्र राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यावेळी नांदेडच्या दोन साहित्यिकांचा पुरस्कारप्राप्त लेखकांमधे समावेश झालेला आहे.

विजय पाडळकर यांच्या 'गंगा आये कहॉं से - गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास' या साहित्यकृतीला ललित कला आस्वादपर लेखन या विभागातला पु.ल. देशपांडे पुरस्कार
तर
डॉ. भगवान अंजनीकर यांच्या 'महापुरूषांचे चरित्रचिंतन' या पुस्तकास बालवाङ्मय (कविता) या विभागातला ना. वा. टिळक पुरस्कार मिळाला आहे.


या दोन्ही नांदेडीअन्सचे आपल्या नांदेडीअन्स ब्लॉगतर्फे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्याकडून अशाच उत्तमोत्तम साहित्यकृती घडाव्यात यासाठी शुभेच्छा. :-)

Saturday, November 28, 2009

सकाळ रिफ्लेक्शन्स २००९

छायाचित्रण कलेला व्यासपीठ देण्यासाठी "सकाळ' माध्यम समूहातर्फे "रिफ्लेक्‍शन्स 09' ही स्पर्धा व प्रदर्शन "इंडिया आर्ट गॅलरी'च्या सहयोगाने आयोजिण्यात येते.
या छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचा उत्तरार्ध डिसेंबर महिन्यात होणाऱ्या प्रदर्शनाने संपन्न होणार आहे.
या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

यंदा या स्पर्धेसाठी प्रवेशिका येत्या 26 ऑक्‍टोबरपासून उपलब्ध होणार असून, 30 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेतील सहभागासाठी प्रवेशिका दाखल करता येतील.
स्पर्धेच्या प्रवेशिका "सकाळ'ची कार्यालये, इंडिया आर्ट गॅलरी; तसेच www.esakal.com आणि www.indiaart.com या संकेतस्थळांवर विनामूल्य उपलब्ध असतील. www.indiaart.com या संकेतस्थळावरून
येणाऱ्या प्रवेशिका ऑनलाइनही स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेसाठी यंदा-
1) स्त्री,
2) मुलं - उद्याची आशा आणि
3) गर्दीपलीकडचा निसर्ग असे विषय असणार आहेत.

या स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज "सकाळ' कार्यालयात देण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रदर्शनात स्पर्धेतील निवडक छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत, त्यासमवेत नामवंतांची व्याख्याने व प्रेक्षकांबरोबर प्रत्यक्ष संवादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून दर वर्षीप्रमाणे नामवंत छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष काम पाहणार आहेत.मी एक नवखा फोटोग्राफर असूनही या स्पर्धेत भाग घेतला आहे.
मी स्पर्धेसाठी पाठवलेले फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

सकाळ रिफ्लेक्शन्स २००९

Thursday, November 26, 2009

हिवाळ्याची चाहूल

नमस्कार मित्रांनो,
जाम थंडी वाजते आहे ना ?

तसा उशीराच आलाय म्हणा यावेळी हिवाळा.

सोमवारी (२३-११-०९) तापमान ११ अंश सेल्सीअस होते म्हणे. (अच्छा, म्हणून त्या दिवशी शेजारच्या आज्जी-आजोबांची कवळी इतकी वाजत होती तर.)


तापमानाचा हा पारा काही दिवसांत ८ अंशापर्यंतही घसरण्याची शक्यता आहे असा अंदाज महात्मा गांधी मिशनच्या अंतराळ व खगोलशास्त्र विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविला आहे.

तेव्हा थंडीने अजून कुडकुडायला सज्ज व्हा.

Friday, November 20, 2009

ट्रॅफिकवाल्या मामांना एक अनावृत्त पत्र.

नमस्कार मामा,
    आज परत वाहतूकीचे हाल-हवाल पाहण्यासाठी राऊंडवर जाऊन आलो.
काही विशेष नाही हो, उगीच आपली एक भाबडी आशा की ट्रॅफिकला शिस्त लागली असेल आजपासून.

    मामा, कालचा लेख वाचून माझे मित्र मला काय म्हणाले माहित आहे का ?
ते म्हणाले की, "तुझं कसं रे लक्ष गेलं सिग्नल्सकडे ? आम्हाला तर माहित देखील नव्हतं की ही खांब्यावरची लाईटींग सुरू झाली आहे म्हणून."
आत्ता बोला !
किती पांचट जोक मारतात नाही ?
जाऊ देत, त्यात त्यांचा तरी काय दोष म्हणा ? त्यांना लहाणपणीच मास्तरांनी शिकवलंय की निर्जीव वस्तूंमध्ये कसलिही हालचाल होत नसते.
इतके दिवस हे सिग्नल्सचे खांबे धूळखात पडूनच होते ना, त्यामुळे मित्रांना कसे कळणार की या निर्जीव वस्तूमधे सजिवांना थांबवण्याची ताकद आहे.

    काल असाच मी रेड सिग्नल लागल्यामुळे गाडी बंद करून थांबलो होतो, पण माझ्या मागून येणार्‍या गाड्या तशाच पुढे जात होत्या.
एक दोघे तर माझ्याकडे पाहून इतक्या कुत्सीतपणे हसले की बस्स. मला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले.
रेड सिग्नलवर थांबणे म्हणजे बेशिस्त की थांबलेल्यावर हसणे म्हणजे शिस्त हे तुम्हीच सांगा आता.

    लक्ष्मिकांत बेर्डेचा एक चित्रपट होता, त्यात त्याला लाल रंग दिसला की त्याची सगळी शक्ती निघून जायची पण आपल्या नांदेडीअन्सचे याच्या उलटे आहे.
त्यांना ट्रॅफिक सिग्नलचा लाल रंग दिसला की त्यांच्या अंगात शक्ती संचारते जी त्यांना वाहतूकीचे नियम मोडायला प्रवृत्त करते.

असं काय करता मामा ?
अहो पुण्या-मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलमधला लाल रंग नांदेडच्या ट्रॅफिक सिग्नलपेक्षा जास्त गडद आहे का ?
नाही ना ?
मग नांदेडचीच वाहतूक इतकी बेशिस्त का ?
का बरे थांबत नसतील नांदेडीअन्स रेड लाईट लागल्यावर ?


    ट्रॅफिक सिग्नलचे सोडा मामा, ते तरी शिट्टी वाजवून नियम मोडणार्‍याला अडवू शकत नाहीत पण तुम्ही तर आहात ना ? (खरं पाहता तुम्ही कुठे असता हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.)
पण माझे ते दुष्ट मित्र आहेत ना, ते मला नेहमी सांगत असतात की तुम्ही ट्रॅफिक सिग्नलच्या आसपासच्या हॉटेलात हमखास आढळता म्हणे.
काय मामा, तुम्हीच असं करत असाल तर सामान्य जनतेकडून वाहतूकीचे नियम पाळल्या जाण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे गुन्हाच होईल की !

कालच माझे मित्र म्हणाले की, ’चल तुला जादू दाखवतो.’
मी म्हणालो , ’कसली जादू’ ?
जादूचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ते मला त्यांच्या सोबत घेऊन निघाले..
कधी नाही ते पुढे चौकात तुम्ही उभे होतात.
माझे मित्र म्हणाले, "चौकातून ट्रिपल सीट जाताना आम्ही अदृष्य होऊन दाखवतोत."
मी तर चक्रावून गेलो त्यांचे बोलणे ऎकून. मला काहीच कळाले नाही ते काय बोलत होते ते.
एव्हढ्यात ते गाडीवर ट्रिपल सीट बसून तुमच्या पुढून आरामात, सावकाश निघून देखील गेले.
माझ्याजवळ परत येऊन ते म्हणाले, "बघ झालो होतोत की नाही आम्ही अदृष्य ?"
"अरे मला तर तुम्ही दिसत होतात", माझे उत्तर.
तर ते म्हणाले, "ट्रॅफिकवाल्या मामाला दिसलोत का ? दिसलो असतो तर त्यांनी अडवलं नसतं का आम्हाला ?"
परत इतका पांचट जोक ऎकून मी कप्पाळावर हात मारून घेतला.


डी.वाय.एस.पी. ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही "ट्रॉफिक" सिग्नल्सची माहिती देणारा एक बोर्ड ठेवलाय, त्या ठिकाणी किती जणांचे लक्ष जाईल हे तुम्हीच प्रामाणिकपणे सांगा.

    आज तुम्ही दादर्‍यावर वाहतूकीला नियंत्रीत करण्याचा प्रयत्न करत होतात. तुमच्या मागून-पुढून ऑटोरिक्षावाले अगदी स्टंट मारल्यासारखे ऑटॊ चालवत होते.
एक ऑटॊ तर तुम्हा-आम्हाला मच्छर समजून मनपाच्या त्या मच्छर मारण्याच्या गाडिलाही लाजवेल इतका धूर सोडत जात होता.
त्या वेळी PUC नावाची काहीतरी गोष्ट असते असे कुठेतरी वाचल्याचे आठवले पण तुम्ही त्याला एका शब्दानेही बोलला नाहीत म्हणजे माझ्याच वाचण्यात काहीतरी चुकीची माहिती आली असेल.
    खरं सांगतो मामा, पेपरला जेव्हा वाचतो ना की अमूक एका ऑटोवाल्याने तुम्हाला मारले, तेव्हा फार वाईट वाटतं हो.
अहो ट्रॅफिकवाले आहात म्हणून काय झालं, तुम्हीही पोलीस मामाच आहात की !

    तिथून पुढे आलो तर I.T.I. कॉर्नरला तुम्ही बहुतेक तुमच्या गावाकडच्या माणसाला बोलत उभे होतात.
तसं नाही, तुम्ही त्यांच्याशी भररस्त्यात त्यांना त्यांची गाडी थांबवायला लावून मनसोक्त गप्पा मारत होतात म्हणून सहज आपला एक अंदाज लावला हो !


    खरं सांगतो मामा, एव्हढा सगळा लेखन प्रपंच तुमचा अपमान करण्यासाठी मुळीच लिहीला नाही हो.
लोकांच्या मनात दहशत बसवायला सांगत नाहीये मी, पण निदान आदरयुक्त भिती असायलाच हवी.

    नांदेडीअन्सना वाहतूकीचे नियम मोडायचा कसलाही छंद नाहीये मामा, तुम्ही फक्त थोडं मनावर घ्या आणि मग बघा आपले नांदेडीअन्स तुम्हाला साथ देतात की नाही. 
तुमचा एक नांदेडीअन भाचा,
सौरभ सावंत.

Tuesday, November 17, 2009

ट्रॅफिक सिग्नल्स की वाहतूकीच्या दुर्दशेचे सिग्नल्स ?

स्थळ :- चिखलवाडी कॉर्नरजवळील ट्रॅफिक सिग्नल.
ट्रॅफिकवाले मामा :- अनुपस्थीतीत.
रेड लाईटला कुणी थांबतंय का ? :- अक्षरश: कुणीही नाही.
तात्पर्य क्रमांक १ :- नांदेडीअन्सना माहित आहे की ट्रॅफिक सिग्नल हे ट्रॅफिकवाल्या मामांसारखे पावती फाडू शकत नाही.


स्थळ :- आय.टी.आय. कॉर्नर.
ट्रॅफिकवाले मामा :- उपस्थीत.
त्यांना कुणी जुमानतंय का ? :- फारच कमी लोक.
तात्पर्य क्रमांक २ :- ट्रॅफिक सिग्नल्सऎवजी ट्रॅफिकवाल्या मामांना थांबविले तरी काही जास्त फरक पडत नाही.


स्थळ :- आय.टी.एम. कॉलेजपुढील ट्रॅफिक सिग्नल.
ट्रॅफिकवाले मामा :- अनुपस्थीत. (अशोकराव येऊन गेलेत ना ! आता कशाला थांबतील ट्रॅफिकवाले मामा इथे ?)
रेड लाईटला कुणी थांबतंय का ? :- कुणीही नाही.
तात्पर्य क्रमांक ३ :- नांदेडीअन्स दररोज वृत्तपत्र वाचतात, ज्यातून त्यांना कळतं की अशोकरावजी चव्हाण हे नांदेडमध्ये कधी येणार आहेत.


महातात्पर्य = उद्या सगळेच नांदेडीअन्स ट्रॅफिक सिग्नलकडे ट्रॅफिक सिग्नल म्हणून न पाहता दिवाळीची रोषणाई म्हणून पाहायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.

Monday, November 16, 2009

स्वाईन फ्लूचा पहिला बळी

नांदेड, १५ नोव्हेंबर/वार्ताहर
 

‘स्वाइन फ्लू’मुळे शहरातील संगीता कोंडेकर या महिलेचा मृत्यू झाला असून नागरिकांनी या आजाराबाबत दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे.

श्रीमती कोंडेकर यांच्या आजाराबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, १ नोव्हेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे असर्जन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथेही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने पुन्हा ४ नोव्हेंबरला अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ८ नोव्हेंबरला लोटस हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करून त्याच दिवशी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे निदान झाले. परिणामी उपचारास विलंब लागल्याने १४ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांना मधुमेह असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमी होती. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा तात्काळ सल्ला दिला असता तर त्या वाचल्या असत्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘स्वाइन फ्लू’ची तीव्रता कमी झालेली नसून हिवाळ्यामुळे तो आणखी वाढण्याची शक्याता आहे. 

त्यामुळे ज्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशा तक्रारी असतील त्यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे. 

नांदेडचे श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय, शिवाजीनगर भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र यापाठोपाठ जिल्ह्य़ातील सर्व तालुकापातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचाराची सोय आहे. पुरेशी औषधी, टॉमी फ्लू गोळ्या तसेच मास्कही उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 लोकसत्ता - मराठवाडा वृत्तांत (१६ नोव्हेंबर ०९)

Wednesday, October 28, 2009

श्री. अशोकरावजी चव्हाण यांना ५१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. अशोकरावजी चव्हाण यांना ५१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !


समर्थ, सक्षम व समृद्ध महाराष्ट्र उभा करण्यासाठी या जननायकाला मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षांची परिपूर्ण कारकीर्द आणि उदंड आयुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Sunday, October 25, 2009

श्री. अशोकराव चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री

अशोकरावजी चव्हाण यांना ८०% पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा भेटल्यामुळे त्यांना परत एकदा मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले आहे.
काल रात्री उशीरापर्यंत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात आतिषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला.

श्री. अशोकरावजी चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी परत एकदा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

Saturday, October 24, 2009

दिवाळी अंक

दिवाळीला सर्वार्थाने परीपूर्ण करणारे माध्यम म्हणजे दिवाळी अंक असतात असे माझे मत आहे.
दिवाळीला चकली, लाडू, चिवडा यांच्यासोबतच दिवाळी अंकांनाही तीतकीच मागणी असते.

मी वाचलेले आणि मला आवडलेले काही दिवाळी अंक खालीलप्रमाणे आहेत.
तुम्ही कोणते दिवाळी अंक वाचले आणि तुम्हाला त्यातले काय आवडले हे कळवायला विसरू नका. १) लोकमतच्या दिवाळी अंकाची पेपर क्वालीटी एकदम मस्त आहे.
त्यातील गुलजार यांच्या कवीता, आणि त्यांना दिलेल्या Background Images तर निव्वळ अप्रतिम.

अनंत दीक्षित यांनी "सम्राटाच्या मनातलं" (सचिन तेंडूलकरची मुलाखतवजा बातचीत) अतिशय योग्य शब्दांत सांगितलं आहे.
सचिन तेंडूलकरवर टिका करणार्‍यांनी एकदा तरी हा लेख वाचावाच.

निळूभाऊंबरोबरचे ’प्रवासवर्णन’ करणार्‍या मकबुल तांबोळींनी निळू भाऊंना डोळ्यापुढे आणून ठेवले.

शर्मिला टागोर आणि ओम पुरी यांची मुलाखतींमधून त्यांच्या स्ट्रगलबद्दल नवीन माहिती मिळाली.  

२) महा -अनुभव हा दिवाळी अंकसुद्धा फार छान आहे.

अनिल अवचट यांचे आजवर बरेच लेख वाचले होते, पण प्रत्यक्षात त्यांच्याबद्दल वाचण्याची संधी दिली या दिवाळी अंकाने.

महाराष्ट्राचे पाऊल पडले मागे - अरूण साधू आणि महाराष्ट्राचे पाऊल थबकले; ते का ? - सुहास कुलकर्णी यांच्या ह्या लेखांनी डोळ्यात जळजळीत अंजन घालण्याचे काम सहजरीत्या पार पाडले.

सांस्कृतिक संघर्षाचे धुमसते ज्वालामुखी या लेखात निळू दामले यांनी भारतातील आणि जगातील वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या असंतोषांची माहिती दिली आहे.

हटके चित्रपट देणार्‍या विशाल भारद्वाज यांच्या कामगिरीचा मिलिंद चंपानेरकर यांनी घेतलेला आढावा छान आहे.

अंकातील इतर कथा कवितासुद्धा छान आहेत. 3) भटकंती हे मासिक तसे माझे फेव्हरीटच आहे, पण यावेळी दिवाळी अंकात त्यांनी भारत/महाराष्ट्रापेक्षा इतर देशांचीच जास्त भटकंती घडवून आणली आहे.
एव्हढे सोडले तर बाकी प्रवासवर्णनं, लेख छान जमले आहेत.

"वाघोबाला वाचवताना" वाचत असतांना आपल्याला जाणीव होते की वाघासारखा ऎटबाज प्राणी आज कोणत्या परिस्थीतींना सामोरे जात आहे.
अगदी १०० वर्षांपुर्वी भारतात ४०,००० वाघ होते, आणि आज ......
आज उणेपुरे २ ते ३ हजार वाघच भारतात शिल्लक आहेत.

सुधीर गाडगीळांची दिग्गजांबरोबरची भंटकंती त्या दिग्गजांची अनसुनी बातें आपल्यांपर्यंत पोहोचवते.

अच्युत गोडबोलेंची खाद्यभ्रमंती तुम़च्या तोंडाला नक्कीच पाणी आणील.

मागे एकदा मिलिंद गुणाजी एका कार्यक्रमानिमित्त आमच्या नांदेडला आले होते तेव्हा त्यांनी इथेही बरीच भटकंती केली होती.
त्यावर त्यांनी वाजवलेले ’सुरीले पाषाण’ छान नाद करून गेले. (या ठिकाणांबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर ती मी माझ्या ब्लॉगवर अगोदरच पोस्ट केलेली आहे.)

शेवटच्या पानांवर दाखवलेली चित्रविचित्र घरं पाहण्याचा मोह कुणालाही होईल. (बांधण्याचा नाही.)४)  गेल्या ५० वर्षांमध्ये मराठी संस्कृतीवर आणि एकूणच मराठी जगण्यावर ज्यांचे खोल संस्कार आहेत अशा ५० व्यक्तींच्या भल्याबुर्‍या योगदानाची एक अत्यंत संक्षिप्त झलक अक्षर दिवाळी अंकाच्या सुरूवातीलाच देण्यात आली आहे, आणि हेच मला या दिवाळीअंकाचे वैशिष्ट्य वाटले.

अंकातल्या सगळ्याच कथा बर्‍या आहेत.

दिप्ती राऊत यांनी अनुभवलेली वारी वाचतांना आपणही कधीतरी अशी वारी अनुभवावी असे वाटून जाते.

मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला आणि NSG कमांडॊंचे नाव सगळ्यांच्या ऒठावर खेळू लागले.
त्याच्या कितीतरी आधी, एका NSG कमांडोबरोबर संसार करत असतांना आलेला अनुभवर आपल्यासोबत शेअर केलाय ’नियती’तून वैदेही देशपांडे यांनी.

इरावती कर्णिकांची हॅकर ही कथादेखील मस्त आहे.

गणेश मतकरींनी या दिवाळी अंकातून भारतात आजवर बनलेल्या ’गरीबां’च्या सिनेमांचा आढावा घेतला आहे.
हेदेखील वाचनीय आहे.
५)   कालनिर्णयचा दिवाळी अंक माझा सगळ्यात जास्त आवडतो तो त्यांच्या सुटसुटीत मांडणीमुळे, आकर्षक छायाचित्रांमुळे आणि मुख्य म्हणजे त्यातल्या एकंदरीत सगळ्याच कंटेन्ट्समुळे.
पण यावेळी कालनिर्णयचे काही कंटेन्ट मला जास्त भावले नाहीत.

भीष्मराज बाम यांचा ’दहशतवादाचे बदलते स्वरूप’ दत्तप्रसाद दाभोळकर यांचा ’१८५७-१९४७ फाळणीचे गुन्हेगार’ राजन रायकर यांचा ’सर जमशेदजी जीजीभॉय’ हे लेख फारच छान आणि माहितीपूर्ण वाटले.

शशिकांत काळे यांनी आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल दिलेली सखोल माहिती फारच छान आहे. 


६)   म.टा.च्या मुख्य दिवाळी अंकातले सगळेच लेख एकापेक्षा एक चांगले आहेत.
त्यातल्या त्यात मला सगळ्यात जास्त आवडलेले लेख म्हणजे 'तें’ चा, "मी गोळी घालीन म्हणालो, त्याबद्दल...." आणि प्रकाश अकोलकर यांचा मुंबईवर झालेल्या अनेक आघातांचा मागोवा घेणारा "न बुजलेले घाव".

परेश मोकाशी यांचा हरिश्चंद्र धुंडिराजाची फॅक्टरी हा लेखही छान आहे.

एकंदरीत म.टा.चा हा दिवाळी अंक सर्वार्थाने परीपूर्ण आहे.


म.टा.चा दुसरा दिवाळी अंक विदर्भ-मराठवाडा विशेष आहे.

संजीव उन्हाळे यांनी बापुसाहेब काळदातेंची घेतलेली मुलाखत वाचनीय आहे.

नागेश कांगणे यांनी विदर्भाच्या पंढरीची म्हणजेच शेगावची माहिती सांगितली आहे.
त्यात त्यांनी संस्थानचा १०० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे.

वि.ल. धारूरकरांचा "वैभवशाली रूप जपणार" हा लेख अजिंठा, वेरूळ तसेच पैठण या गांवाचे रूप कसे बदलले हा सांगणारा आहे.

डॉ. सुरेश सावंत यांनी फ. मुं. शिंदेंवर लिहीलेला "अवलिया" हा लेख कसा आहे हे तुम्हीच मला सांगा, जेणेकरून मला तुमची प्रतिक्रीया पप्पांपर्यंत पोहोचवता येईल.

Friday, October 23, 2009

महाराष्ट्र विधानसभा २००९ निकाल

नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचे निकाल


मतदारसंघ
विजेते उमेदवार, पक्ष
आणि मिळालेली मते

पराभूत उमेदवार, पक्ष
आणि मिळालेली मते

नां. दक्षिण
ओमप्रकाश पोकर्णा, कॉंग्रेस, ५९,८५२
हेमंत पाटील, शिवसेना, ४२,३५६
नां. उत्तर
डी. पी. सावंत, कॉंग्रेस, ६६,७८५
अनुसया खेडकर, शिवसेना, २२,९०४
भोकर
अशोकराव चव्हाण, कॉंग्रेस, १,२०,८४९
माधवराव किन्हाळकर, अपक्ष, १३,३४६
देगलूर
रावसाहेब अंतापूरकर, कॉंग्रेस, ६४,४०९
सुभाष साबने, शिवसेना, ५८,३९८
हदगाव
माधवराव जवळगावकर, कॉंग्रेस, ९६,५८४
बाबूराव कदम, शिवसेना, ५१,८०३
किनवट
प्रदीप नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, ६९,४५८
भिमराव केराम, भाजप, ५१,२९५
नायगाव
वसंतराव चव्हाण, अपक्ष, ६३,५३४
श्रीनिवास गोरठेकर, राष्ट्रवादी, ५२,४१४
लोहा
शंकरअण्णा धोंडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, ८१,५३९
प्रतापराव चिखलीकर, अपक्ष, ७२,१७५
मुखेड
हनमंत पाटील बेटमोगरेकर, कॉंग्रेस, ६५,९७१
गोविंद राठोड, अपक्ष, ६४,४२४राज्यातील इतर मतदारसंघांचे निकाल ईसकाळवरून साभार.

नंदूरबार -
१ - अक्कलकुवा (अनुसूचित जमाती) - ऍड. के. सी. पाडवी (कॉंग्रेस)
२ - शहादा (अनुसूचित जमाती) - पद्माकर वळवी (कॉंग्रेस)
३ - नंदूरबार (अनुसूचित जमाती) - विजयकुमार गावीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
४ - नवापूर (अनुसूचित जमाती) - शरद गावीत (समाजवादी पक्ष)

धुळे -
५ - साक्री (अनुसूचित जमाती) - योगेंद्र भोये (कॉंग्रेस)
६ - धुळे ग्रामीण - प्रा. शरद पाटील (शिवसेना)
७ - धुळे शहर - अनिल गोटे (लोकसंग्राम)
८ - सिंदखेडा - जयकुमारभाऊ रावळ (भाजप)
९ - शिरपूर (अनुसूचित जमाती) - काशिनाथ पावरा (कॉंग्रेस)

जळगाव -
१० - चोपडा (अनुसूचित जमाती) - जगदीशचंद्र वाळवी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
११ - रावेर - शिरीष चौधरी (अपक्ष)
१२ - भुसावळ (अनुसूचित जाती) - संजय सावकारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१३ - जळगाव शहर - सुरेशकुमार जैन (शिवसेना)
१४ - जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१५ - अमळनेर - कृषिभूषण पाटील (अपक्ष)
१६ - एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना)
१७ - चाळीसगाव - राजीव देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१८ - पाचोरा - दिलीप वाघ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१९ - जामनेर - गिरीश महाजन (भाजप)
२० - मुक्ताईनगर - एकनाथ खडसे (भाजप)

बुलडाणा -
२१ - मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप)
२२ - बुलडाणा - विजयराज शिंदे (शिवसेना)
२३ - चिखली - राहुल बोंद्रे (कॉंग्रेस)
२४ - सिंदखेडराजा - डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२५ - मेहकर (अनुसुचित जाती) - संजय राजमूलकर (शिवसेना)
२६ - खामगाव - गोकुळचंद सानंदा (कॉंग्रेस)
२७ - जळगाव (जमोद) - डॉ. संजय कुटे (भाजप)

अकोला -
२८ - अकोट - संजय गवांडे (शिवसेना)
२९ - बालापूर - बळीराम शिरसकर (अपक्ष)
३० - अकोला पश्‍चिम - गोवर्धन शर्मा (भाजप)
३१ - अकोला पूर्व - हरिदास भाडे (भारीप बहुजन महासंघ)
३२ - मूर्तिजापूर - हरिश पिंपळे (भाजप)

वाशिम -
३३ - रिसोड - सुभाषराव झनक (कॉंग्रेस)
३४ - वाशिम (अनुसूचित जाती) - लखन मलीक (भाजप)
३५ - कारंजा - प्रशांत डहाके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

अमरावती -
३६ - धामणगाव - वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस)
३७ - बडनेरा - रवी राणा (अपक्ष)
३८ - अमरावती - रावसाहेब शेखावत (कॉंग्रेस)
३९ - तिवसा - ऍड. यशोमती ठाकूर (कॉंग्रेस)
४० - दर्यापूर (अनुसूचित जाती) - अभिजीत अडसूळ (शिवसेना)
४१ - मेळघाट - केवळराम काळे (कॉंग्रेस)
४२ - अचलपूर - ओमप्रकाश कडू (अपक्ष)
४३ - मोर्शी - डॉ. अनिल बोंडे (अपक्ष)

वर्धा -
४४ - अर्वी - दादाराव केचे (भाजप)
४५ - देवळी - रणजित कांबळे (कॉंग्रेस)
४६ - हिंगणघाट - अशोक शिंदे (शिवसेना)
४७ - वर्धा - सुरेश देशमुख (अपक्ष)

नागपूर -
४८ - काटोल - अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
४९ - सावनेर - सुनील केदार (कॉंग्रेस)
५० - हिंगणा - विजयभाऊ घोडमारे (भाजप)
५१ - उमरखेड (अनुसूचित जाती) - विजय खडसे (कॉंग्रेस)
५२ - नागपूर दक्षिण पश्‍चिम - देवेंद्र फडणवीस (भाजप)
५३ - नागपूर दक्षिण - दिनानाथ पडोळे (कॉंग्रेस)
५४ - नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे (भाजप)
५५ - नागपूर मध्य - विकास कुंभारे (भाजप)
५६ - नागपूर पश्‍चिम - सुधाकर देशमुख (भाजप)
५७ - नागपूर उत्तर (अनुसूचित जाती) - डॉ. नितीन राऊत (कॉंग्रेस)
५८ - कांपटी - चंद्रशेखर बावनकुले (भाजप)
५९ - रामटेक - आशिष जैस्वाल (शिवसेना)

भंडारा -
६० - तुमसर - अनिल बावणकर (कॉंग्रेस)
६१ - भंडारा - नरेंद्र भोंडेकर (कॉंग्रेस)
६२ - साकोली -नानाभाऊ पाटोले (भाजप)

गोंदिया -
६३ - अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोळे (भाजप)
६४ - तिरोरा - कुशाल बोपाचे (भाजप)
६५ - गोंदिया - गोपालदास अगरवाल (कॉंग्रेस)
६६ - आमगाव (अनुसूचित जमाती) - रामरतनबापू राऊत (कॉंग्रेस)

गडचिरोली -
६७ - आरमोरी (अनुसूचित जमाती) - आनंदराव गेडाम (कॉंग्रेस)
६८ - गडचिरोली (अनुसूचित जमाती) - डॉ. डल्लुजी नामदेव (कॉंग्रेस)
६९ - अहेरी (अनुसूचित जमाती) - दिपक अत्राम (अपक्ष)
चंद्रपूर -
७० - राजूरा - सुभाष धोटे (कॉंग्रेस)
७१ - चंद्रपूर (अनुसूचित जाती) - नानाजी शामकुळे (भाजप)
७२ - बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप)
७३ - ब्रह्मपूरी - अतूल देशकर (भाजप)
७४ - चिमुर - विजय वडेट्टीवार (कॉंग्रेस)
७५ - वरोरा - संजय देवतळे (कॉंग्रेस)

यवतमाळ -
७६ - वणी - वामनराव कासावकर (कॉंग्रेस)
७७ - राळेगाव (अनुसूचित जाती) - प्रा. वसंत पुरके (कॉंग्रेस)
७८ - यवतमाळ - निलेश पावरेकर (कॉंग्रेस)
७९ - दिग्रस - संजय राठोड (शिवसेना)
८० - अरणी - शिवाजीराव मोघे (कॉंग्रेस)
८१ - पुसाद - मनोहर नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
८२ - उमरखेड - विजयराव खडसे (कॉंग्रेस)


हिंगोली -
९२ - वसमत - जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
९३ - कळमनुरी - राजीव सातव (कॉंग्रेस)
९४ - हिंगोली - भाऊराव पाटील गोरेगावकर (कॉंग्रेस)

परभणी -
९५ - जिंतूर - रामप्रसाद कदम (कॉंग्रेस)
९६ - परभणी - संजय जाधव (शिवसेना)
९७ - गंगाखेड - सीताराम घनदाट (अपक्ष)
९८ - पाथरी - मीरा रेंगे (शिवसेना)

जालना -
९९ - परतूर - सुरेशकुमार जेठलिया (अपक्ष)
१०० - घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१०१ - जालना - कैलास गोरंट्याल (कॉंग्रेस)
१०२ - बदनापूर (अनुसूचित जाती) - संतोष सांबरे (शिवसेना)
१०३ - भोकरदन - चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१०४ - सिल्लोड - अब्दुल सत्तार अब्दुल नाबी (कॉंग्रेस)

औरंगाबाद -
१०५ - कन्नड - हर्षवर्धन जाधव (मनसे)
१०६ - फुलंब्री - डॉ. कल्याण काळे (कॉंग्रेस)
१०७ - औरंगाबाद मध्य - प्रदीप जैस्वाल (अपक्ष)
१०८ - औरंगाबाद पश्‍चिम (अनुसूचित जाती) - संजय शिरसाट (शिवसेना)
१०९ - औरंगाबाद पूर्व - राजेंद्र दर्डा (कॉंग्रेस)
११० - पैठण - संजय वाघचौरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१११ - गंगापूर - प्रशांत बंब (अपक्ष)
११२ - वैजापूर - आर. एम. वाणी (शिवसेना)

नाशिक -
११३ - नांदगाव - पंकज भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
११४ - मालेगाव मध्य - मुफ्ती मोहम्मद ईस्माइल ए. खलीक (जनसुराज्य शक्ती)
११५ - मालेगाव बाह्य - दादा भौसे (शिवसेना)
११६ - बागलान (अनुसूचित जमाती) - उमाजी बोरसे (भाजप)
११७ - कळवण - अर्जुन पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
११८ - चांदवड - शिरीष कोतवाल (अपक्ष)
११९ - येवला - छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१२० - सिन्नर - माणिकराव कोकाटे (कॉंग्रेस)
१२१ - निफाड - अनिल कदम (शिवसेना)
१२२ - दिंडोरी (अनुसूचित जमाती) - धनराज महाले (शिवसेना)
१२३ - नाशिक पूर्व - ऍड. उत्तमराव ढेकले (मनसे)
१२४ - नाशिक मध्य - वसंतराव गीते (मनसे)
१२५ - नाशिक पश्‍चिम - नितीन भोसले (मनसे)
१२६ - देवळाली (अनुसूचित जाती) - बबनराव घोलप (शिवसेना)
१२७ - इगतपूरी (अनुसूचित जाती) - निर्मला गावीत (कॉंग्रेस)

ठाणे -
१२८ - डहाणू (अनुसूचित जाती) - राजाराम ओझारे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया)
१२९ - विक्रमगड (अनुसूचित जाती) - ऍड. चिंतामणराव वांगा (भाजप)
१३० - पालघर (अनुसूचित जमाती) - राजेंद्र गावीत (कॉंग्रेस)
१३१ - बोईसर - विलास तारे (बहुजन विकास आघाडी)
१३२ - नालासोपारा - क्षितीजी ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
१३३ - वसई - विवेक पंडीत (अपक्ष)
१३४ - भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती) - विष्णु सावरा (भाजप)
१३५ - शहापूर (अनुसूचित जमाती) - दौलत दरोडा (शिवसेना)
१३६ - भिवंडी पश्‍चिम - अब्दुल रशिद ताहीर मोमीन (समाजवादी पक्ष)
१३७ - भिवंडी पूर्व - अबु आझमी (समाजवादी पक्ष)
१३८ - कल्याण पश्‍चिम - प्रकाश भोईर (मनसे)
१३९ - मुरबाड - किसन काठोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१४० - अंबरनाथ (अनुसूचित जाती) - डॉ. बालाजी कीणीकर (शिवसेना)
१४१ - उल्हासनगर - उत्तमचंद कुमार (भाजप)
१४२ - कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (अपक्ष)
१४३ - डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)
१४४ - कल्याण ग्रामीण - रमेश पाटील (मनसे)
१४५ - मिरा भाईंदर - गिल्बर्ट मेंडोका (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१४६ - ओव्हळा माजीवाडा - प्रताप सरनाईक (शिवसेना)
१४७ - कोपरी पंचपाखडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)
१४८ - ठाणे - राजन विचारे (शिवसेना)
१४९ - मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१५० - ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१५१ - बेलापूर - गणेश नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

मुंबई उपनगर -
१५२ - बोरिवली - गोपाळ शेट्टी (भाजप)
१५३ - दहिसर - विनोद घोसाळकर (शिवसेना)
१५४ - मागठाणे - प्रवीण दरेकर (मनसे)
१५५ - मुलुंड - सरदार तारासिंग (भाजप)
१५६ - विक्रोळी - मंगेश सांगळे (मनसे)
१५७ - भांडुप पश्‍चिम - शिशिर शिंदे (मनसे)
१५८ - जोगेश्‍वरी पूर्व - रवींद्र वाईकर (शिवसेना)
१५९ - दिंडोशी - राजहंस सिंग (कॉंग्रेस)
१६० - कांदिवली पूर्व - रमेश ठाकूर (कॉंग्रेस)
१६१ - चारकोप - योगेश सागर (भाजप)
१६२ - मालाड पश्‍चिम - अस्लम शेख (कॉंग्रेस)
१६३ - गोरेगाव - सुभाष देसाई (शिवसेना)
१६४ - वर्सोवा - बाळदेव खोसा (कॉंग्रेस)
१६५ - अंधेरी पश्‍चिम - अशोक जाधव (कॉंग्रेस)
१६६ - अंधेरी पूर्व - सुरेश शेट्टी (कॉंग्रेस)
१६७ - विलेपार्ले - कृष्णा हेडगे (कॉंग्रेस)
१६८ - चांदिवली - खान मोहम्मद आरीफ (कॉंग्रेस)
१६९ - घाटकोपर पश्‍चिम - राम कदम (मनसे)
१७० - घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)
१७१ - मानखुर्द - अबू आझमी (समाजवादी पक्ष)
१७२ - अणुशक्तीनगर - नवाब मलीक (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१७३ - चेंबूर - चंद्रकांत हंडोरे (कॉंग्रेस)
१७४ - कुर्ला - मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१७५ - कलिना - कृपाशंकर सिंग (कॉंग्रेस)
१७६ - बांद्रा पूर्व - प्रकाश सावंत (शिवसेना)
१७७ - ब्रा पश्‍चिम - बाबा सिद्दीकी (कॉंग्रेस)

मुंबई शहर -
१७८ - धारावी (अनुसूचित जमाती) - वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)
१७९ - सायन कोळीवाडा - जगन्नाथ शेट्टी (कॉंग्रेस)
१८० - वडाळा - कालीदास कोळंबकर (कॉंग्रेस)
१८१ - माहिम - नितीन सरदेसाई (मनसे)
१८२ - वरळी - सचिन अहीर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१८३ - शिवडी - बाळा नांदगावकर (मनसे)
१८४ - भायखळा - मधुकर चव्हाण (कॉंग्रेस)
१८५ - मालबा हिल - मंगल लोढा (भाजप)
१८६ - मुंबादेवी - अमीन पटेल (कॉंग्रेस)
१८७ - कुलाबा - अनी शेखर (कॉंग्रेस)

रायगड -
१८८ - पनवेल - प्रशांत ठाकूर (कॉंग्रेस)
१८९ - कर्जत - सुरेशभाऊ ला (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१९० - उरण - विवेकानंद पाटील (शेतकरी कामगार पक्ष)
१९१ - पेण - धैर्यशील पाटील (शेतकरी कामगार पक्ष)
१९२ - अलिबाग - मिनाक्षी पाटील (शेतकरी कामगार पक्ष)
१९३ - श्रीवर्धन - सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१९४ - महाड - भरतशेठ गोगावले (शिवसेना)

पुणे -
१९५ - जुन्नर - वल्लभ बेनके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१९६ - आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१९७ - खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१९८ - शिरूर - अशोक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
१९९ - दौंड - रमेश थोरात (अपक्ष)
२०० - इंदापूर - हर्षवर्धन पाटील (कॉंग्रेस)
२०१ - बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२०२ - पुरंदर - विजय शिवतारे (शिवसेना)
२०३ - भोर - संग्राम थोपटे (कॉंग्रेस)
२०४ - मावळ - बाळा भेगडे (भाजप)
२०५ - चिंचवड - लक्ष्मण जगताप (अपक्ष)
२०६ - पंपरी - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२०७ - भोसरी - विलास लांडे (अपक्ष)
२०८ - वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२०९ - शिवाजीनगर - विनायक निम्हण (कॉंग्रेस)
२१० - कोथरूड - चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)
२११ - खकवासला - रमेश वांजळे (मनसे)
२१२ - पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप)
२१३ - हडपसर - महादेव बाबर (शिवसेना)
२१४ - पुणे कॅन्टोन्मेंट - रमेश बागवे (कॉंग्रेस)
२१५ - कसबा पेठ - गिरीश बापट (भाजप)

अहमदनगर -
२१६ - अकोले (अनुसूचित जमाती) - मधुकर पिचड (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२१७ - संगमनेर - बाळासाहेब थोरात (कॉंग्रेस)
२१८ - शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (कॉंग्रेस)
२१९ - कोपरगाव - अशोक काळे (शिवसेना)
२२० - श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस)
२२१ - नेवासा - शंकरराव गडाख (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२२२ - शेवगाव पाथर्डी - चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२२३ - राहुरी - शिवाजीराव कर्डीले (भाजप)
२२४ - पारनेर - विजय औटी (शिवसेना)
२२५ - अहमदनगर शहर - अनिल राठोड (शिवसेना)
२२६ - श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२२७ - कर्जत जामखेड - प्रा. राम शिंदे (भाजप)

बीड -
२२८ - गेवराई - बदामराव पंडीत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२२९ - माजलगाव - प्रकाशदादा सोळंके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२३० - बीड - जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२३१ - अष्टी - सुरेश धस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२३२ - केज (अनुसूचित जाती) - डॉ. विमलताई मुंदडा (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२३३ - परळी - पंकजा मुंडे-पालवे (भाजप)

लातूर -
२३४ - लातूर ग्रामीण - वैजनाथ शिंदे (कॉंग्रेस)
२३५ - लातूर शहर - अमित देशमुख (कॉंग्रेस)
२३६ - अहमदपूर - बाबासाहेब पाटील (रिडालोस)
२३७ - उदगीर (अनुसूचित जाती) - सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२३८ - निलंगा - शिवाजीराव पाटील निलंगेकर (कॉंग्रेस)
२३९ - औसा - बसवराज पाटील (कॉंग्रेस)
२४० - उमरगा - ध्यानराज चौगुले (शिवसेना)

उस्मानाबाद -
२४१ - तुळजापूर - मधुकरराव चव्हाण (कॉंग्रेस)
२४२ - उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
२४३ - परांडा - राहुल मोटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

सोलापूर -
२४४ - करमाळा - शामल बागल (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२४५ - माढा - बबनराव शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२४६ - बार्शी - दिलीप सोपल (अपक्ष)
२४७ - मोहोळ (अनुसूचित जाती) - लक्ष्मण ढोबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२४८ - सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख (भाजप)
२४९ - सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)
२५० - अक्कलकोट - सिद्रामप्पा पाटील (भाजप)
२५१ - सोलापूर दक्षिण - दिलीप माने (कॉंग्रेस)
२५२ - पंढरपूर - तुकाराम भालके (स्वाभिमानी पक्ष)
२५३ - सांगोला - गणपतराव देशमुख (शेतकरी कामगार पक्ष)
२५४ - माळशिरस (अनुसूचित जाती) - हनुमंत डोळस (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

सातारा -
२५५ - फलटण (अनुसूचित जाती) - दिपक चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२५६ - वाई - मकरंद जाधव पाटील (अपक्ष)
२५७ - कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२५८ - माण - जयकुमार गोरे (अपक्ष)
२५९ - कराड उत्तर - शामराव पाटील (अपक्ष)
२६० - कराड दक्षिण - विलासराव पाटील (कॉंग्रेस)
२६१ - पाटण - विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२६२ - सातारा - शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

रत्नागिरी -
२६३ - दापोली - सूर्यकांत दळवी (शिवसेना)
२६४ - गुहागर - भास्कर जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२६५ - चिपळूण - सदानंद चव्हाण (शिवसेना)
२६६ - रत्नागिरी - उदय सामंत (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२६७ - राजापूर - राजन साळवी (शिवसेना)

सिंधुदुर्ग -
२६८ - कणकवली - प्रमोद जठार (भाजप)
२६९ - कुडाळ - नारायण राणे (कॉंग्रेस)
२७० - सावंतवाडी - दिपक केसरकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

कोल्हापूर -
२७१ - चंदगड - बाबासाहेब कुपेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२७२ - राधानगरी - के. पी. पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२७३ - कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२७४ - कोल्हापूर दक्षिण - सतेज पाटील (कॉंग्रेस)
२७५ - करवीर - चंद्रदीप नरके (शिवसेना)
२७६ - कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिवसेना)
२७७ - शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य शक्ती पार्टी)
२७८ - हातकणंगले (अनुसूचित जाती) - डॉ. सुजीक मिनचेकर (शिवसेना)
२७९ - इचलकरंजी - सुरेश हाळवणकर (भाजप)
२८० - शिरोळ - सा. रे. पाटील (कॉंग्रेस)

सांगली -
२८१ - मिरज (अनुसूचित जाती) - सुरेश खाडे (भाजप)
२८२ - सांगली - संभाजी पवार (भाजप)
२८३ - इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२८४ - शिराळा - मानसिंग नाईक (अपक्ष)
२८५ - पलूस कडेगाव - पतंगराव कदम (कॉंग्रेस)
२८६ - खानापूर - सदाशिवराव पाटील (कॉंग्रेस)
२८७ - तासगाव कवठेमहांकाळ - आर आर पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
२८८ - जत - प्रकाश शेंडगे (भाजप)एकूण = कॉंग्रेस ८२ + राष्ट्रवादी ६२ + शिवसेना ४४ + भाजप ४६ + मनसे १३ + तिसरी आघाडी ११ + इतर ३०
२८८ = आघाडी १४४ + युती ९० + मनसे १३ + तिसरी आघाडी ११ + इतर ३०

Thursday, October 22, 2009

लोहा आणि नायगावमधील अटीतटीचे सामने

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नायगाव आणि लोहा मतदारसंघाचे चित्र आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्र्यांचे कट्टर शत्रू प्रतापराव पाटील चिखलीकर (अपक्ष) आणि राष्ट्रवादीचे शंकरअण्णा धोंडगे यांच्यात अतिशय चुरशीचा सामना रंगला होता.
प्रत्येक फेरीला फक्त ५०-१०० मतांच्या फरकाने दोघेही पुढे-मागे होत होते, पण शेवटच्या ७-८ फेर्‍यांमध्ये अण्णांनी आघाडी घेतली आणि शेवटी ते ९७०० मतांनी विजयी झाले.
जर चिखलीकर निवडून आले असते तर त्यांना एखादं मोठ्ठं मंत्रीपद देण्याशिवाय पर्यायच नसला असता.
शिर्डी येथे त्यांनी अपक्षांची मिटींग ठेवली होती आणि त्यात त्यांना एकमताने अपक्षांचे प्रमुख बनविण्यात आले होते.


तर दुसरीकडे नायगाव विधानसभा मतदारसंघात वेगळेच चित्र होते.
इथे राष्ट्रवादीचे बापुसाहेब गोरठेकर आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यातच सरळसरळ लढत होती.
सकाळपासूनच गोरठेकर प्रत्येक फेरीगणिक आपली आघाडी एक एक हजाराने वाढवीत होते.
१७ व्या फेरीपर्यंत ही आघाडी ८००० वर आली होती पण यानंतर मात्र वसंतरावांनी मुसंडी मारत जवळपास ४ हजारांची आघाडी घेतली आहे.
शेवटच्या १-२ फेर्‍या राहिल्यात आणि आता गोरठेकरांना लीड भेटण्याची शक्यता फार कमी आहे.

थोड्या वेळानंतर जेव्हा चित्र पुर्ण स्पष्ट होईल तेव्हा नवीन पोस्टमध्ये मी तुम्हाला अपडेट देईन.

Saturday, October 17, 2009

दिवाळीच्या शुभेच्छा !

सर्व नांदेडीअन्सना दिवाळीच्या खमंग, चकाकत्या, रुचकर, मधुर, सोनेरी आणि दणकेबाज शुभेच्छा ! :-)


Monday, October 12, 2009

मतदान करा रे

नमस्कार नांदेडीअन्स,
तसे तर आपण सर्व सुज्ञ आहातच.

एकच विनंती आहे की उद्या मतदानाला जायचे टाळू नका.
मतदानाचा हक्क बजावा.

परवा एका राजकारण्याच्या गाडीतून २१ लाख रूपयांची रोकड पोलीसांनी जप्त केली.
ती रक्कम म्हणे गैरमार्गासाठी वापरण्यात येणार होती.


आज शहरातल्या दुसर्‍या उमेदवाराच्या ३ कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले म्हणे पोलीसांनी.


तीकडे ग्रामिण भागात आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमधे जोरदार राडा झाला.अशा बातम्या ऎकल्यावर खरंच कशाला मतदान करायचं असंही वाटून जातं.
पण दुःखाच्या प्रत्येक रात्रीनंतर एक सोनेरी पहाट असतेच असा विचार करून आपण मतदान करायलाच हवे.

तेव्हा उद्याच्या दिवसाकडे अजून एक हॉलीडे म्हणून न पाहता तुमचा मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि योग्य उमेदवाराला निवडून आणा. :-)


Friday, October 9, 2009

मतदार यादी


मतदार यादीत तुमचे नाव शोधण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
http://220.225.73.214/marathi/FrmMainPage.aspx

सलमान खान येणार

अशोकरावजी चव्हाण हे नांदेडला निवडणूकीत प्रचारासाठी सिने-अभिनेत्यांना आणणार हे जणू समिकरणच झालेआहे.
लोकसभा निवडणूकीत त्यांनी सुनिल शेट्टी, राजू श्रीवास्तव इत्यादी मोठमोठ्या कलाकारांना बोलाविले होते.

विधानसभा निवडणूकीत त्यांनी एक पाऊल पुढे टाकून चक्क सुपरस्टार सलमान खानलाच पाचारण केले आहे.
आता सलमान खान कोण असं विचारू नका.

तर सल्लू भाई हे उद्या कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेड जील्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.
सकाळी .०० वाजल्यापासून भोकर, अर्धापूर, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर येथे त्यांच्या जाहीर सभा होणारआहेत.

इतक्या मोठ्या सुपरस्टारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होणार हे निश्चित. ‍


ता. क. :- ४ वाजून २५ मिनिटं
हुश्श्श !
सलमानला विमानतळापर्यंत निरोप देऊन आलो बुवा. :p
सलमान खानलासुद्धा दोन हात, दोन पाय आहेत हे माहित असूनही एका अनामिक ओढीने त्याच्या गाडीच्या मागे माझी गाडी दामटीत राहीलो.
सोबत माझ्यासारखेच शेकडो लोक होते.

सलमान खान नियोजीत रस्त्यावर पोहोचेपर्यंत आम्ही सगळे शॉर्टकटने त्याच्याआधी तीथे पोहोचू लागलो.
अक्षरशः अगणित नांदेडीअन्सच्या कॅमेर्‍यांमध्ये आज सलमान खान साठविला गेला. (त्यात मीसुद्धा आहेच.)

पूर्वनियोजीत कार्यक्रमानुसार सलमान खानची गाडी राज कॉर्नर, रेस्ट हाऊस, आय.टी.आय, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट ओव्हरब्रिज, यात्री निवास चौकी इथपर्यंत शेकडो चाहत्यांच्या गराड्यात कशीबशी आली खरी पण इथून पुढे न जाता सलमान तीथे़च थांबला आणि दुसर्‍या गाडीत बसून सुसाट वेगाने पुढे निघाला.
सगळ्या चाहत्यांना वाटलं की तो आता देगलूर नाक्याकडे (पूर्वनियोजीत कार्यक्रमाप्रमाणे) जाईल म्हणून आम्ही सगळ्यांनी आमच्या गाड्या तिकडे वळविल्या, पण देगलूर नाक्याला पोहोचल्यावर पोलीसांनी केलेल्या अनाऊंसमेंटवरून कळालं की सलमान इकडे येणार नाही, तो विमानतळाकडे गेलाय.

मग काय, सगळ्यांच्या गाड्या देगलूर नाक्यावरनं मालटेकडी रेल्वे स्टेशन ओलांडून विमानतळाजवळ पोहोचल्या.
सुदैवाने सलमानही नुकताच तीथे पोहोचला होता, तीथेही प्रचंड गर्दी.
विमानतळाच्या धावपट्टीवर त्याचे विमान मोठ्या दिमाखात उभे होते.
त्याने विमानांच्या पायर्‍यांवर जाऊन परत एकदा गेटपाशी थांबलेल्या सर्व नांदेडीअन्सकडे पाहून हात हलवीला आणि गर्दीतून टाळ्या, शिट्ट्यांचा आवाज निनादू लागला.

आणि काही वेळाने सगळे नांदेडीअन्स आपापल्या घराकडे परतू लागले पण तेही सलमानला याचि देही, याची डोळा पाहून आणि त्याच्या नांदेड भेटीला कॅमेर्‍यामध्ये, मोबाईलमध्ये कायमचे साठवून.


ता.क. :- संध्याकाळची ६ वाजून १५ मिनीटं
टी.व्ही. वर बातम्या येत आहेत की सलमान खान देगलूर नाक्याला आला नाही म्हणून तीथल्या संतप्त युवकांनी बसच्या काचा फोडल्या.

Tuesday, October 6, 2009

गोष्ट छोटी डोंगराएवढीनमस्कार मित्रांनो,
आज जरा नांदेडशी संबंधीत नसलेला टॉपिक पोस्ट करतोय, माफ करा.


कालच 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' हा चित्रपट पाहिला.
अतिशय छान झाला आहे.

मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले इत्यादी सर्वांचीच ऍक्टींग चांगली झाली आहे.
निळू फुलेंनी आपल्या थोड्याच का होईना पण त्या त्या Scene मध्ये बाकी सर्वांना खाऊन टाकले आहे.
चित्रपटाचे Background Music तर नीव्वळ अप्रतिम.

नंद्याला एप्रील फूल बनवण्याचा प्रसंग डोळ्यात पाणी आणतो.
उदास झालेल्या नंद्याने क्रीकेट कॉमेंट्री ऎकणार्‍या त्याच्या मित्राला "धोनी आणून देतो का रे ज्वारी ?" असा प्रश्न विचारल्यावर चित्रपटगृहात एकच हशा पिकतो पण लगेच "तेंडूलकर आऊट झाल्यावर बाप मेल्यावानी तोंड करता आणि तीकडे बाप शेतात राबराब राबतो त्याचे काय रे ?" असे प्रश्न जेव्हा नंद्या विचारतो तेव्हा चित्रपटगृहात स्मशानशांतता पसरते.

नंद्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरी येणारे न्युज चॅनेलचे पत्रकार, राजारामला दवाखाण्यात, पोलीसांवर राग येण्याचे प्रसंगही फार चांगले जमले आहेत.
कृषीमंत्र्याची ए.श्टी. तून प्रवास करतांना कशी दमछाक होते हा प्रसंग तीतकाच हलकाफूलका दाखवला आहे.
लोडशेडींगचा प्रश्नही वेळोवेळी चांगल्या प्रकारे मांडण्यात आला आहे.

फक्त एकाच जागी डायरेक्टरकडून थोडी चूक(?) झाल्यासारखी वाटते कारण त्यांनी कृषीमंत्र्यांच्या अपहरणाचा प्रसंग फारच अतिशयोक्तीपूर्ण दाखवला आहे.

एवढे सोडले तर बाकी चित्रपटात सगळीकडे ग्रामिण जीवनाचे वास्तवदर्शनच झाले आहे.

मी तर बुवा पाहिला चित्रपट.
तुम्ही पाहिला नसेल तर लवकर जाऊन पाहा.

Sunday, October 4, 2009

सोनिया गांधींची उद्या नांदेडला जाहीर सभा

नमस्कार मित्रांनो,
परत एक पोस्ट राजकारणावरची.

उद्या म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता आय कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी 'मॅडम'ची कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्री. गुरू गोविंदसिंघजी स्टेडीअमवर जाहीर सभा होणार आहे.

शरद पवार यांची परवाच नव्या मोंढ्याच्या मैदानावर जाहीर सभा झाली होती.
पण सभेला फारच कमी गर्दी होती.

पण एकंदरीत कॉंग्रेस आघाडीचे सर्व मोठमोठे नेते नांदेडला येत असल्यामुळे कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.

पाहूयात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही कॉंग्रेस चमत्कार घडवणार का ते.


ता.क. :- पावसाने प्रचारसभेवर पाणी फेरले.

आत्ताच कळालेल्या बातमीनुसार सोनिया गांधींच्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच सभांची वेळ एक दिवसाने पुढे ढकलली आहे.
म्हणजे नांदेडमध्ये त्यांची सभा आता ५ ऎवजी ६ ऑक्टोबरला होईल.


Wednesday, September 30, 2009

राज ठाकरे आले अन्‌ गेले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 30th, 2009 AT 12:09 AMनांदेड - अहमदपूर येथे सभेला जाण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मंगळवारी (ता. 29) नांदेडच्या विमानतळावर आले, अन्प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ते अहमदपूरकडे रवाना झाले. दरम्यान, यादौऱ्याचा फायदा घेऊन जिल्ह्यातील मनसेच्या काही "उत्साही' पदाधिकाऱ्यांनी शहरात राज ठाकरे यांची जाहीर सभाहोणार असल्याच्या बातम्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन जनतेची दिशाभूल केली. मात्र, सभाच झाल्यानेतळपत्या उन्हात राज यांची प्रतीक्षा करीत बसलेल्या जनतेची घोर निराशा झाली.

राज ठाकरे यांची आज अहमदपूरला सभा होती. नांदेड येथील विमानतळावर हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरून तेअहमदपूरला रवाना होणार होते. मात्र, या दौऱ्याचा (गैर) फायदा घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर त्यांची जाहीर सभा होणार असल्याच्या अफवा पसरविल्या. इतकेच नव्हेतर वर्तमानपत्रात जाहिराती बातम्या देऊन जनतेची दिशाभूलही केली.

या उत्साही कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर सभेची जय्यत तयारी केली होती. जिल्ह्याच्यावेगवेगळ्या भागातून मिळेल त्या वाहनानिशी मनसेचे कार्यकर्ते सभेसाठी आणले होते. सकाळी दहा वाजेपासूनचसभास्थानी शाहिरांना पाचारण करण्यात आले. या शाहिरांनी केंद्र राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावरटीका करणारी गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. दरम्यान, अमरावतीहून सकाळी साडेअकराच्यासुमारास विशेष हेलिकॉप्टरने राज ठाकरे यांचे नांदेडला आगमन झाले. जिल्हाध्यक्ष विनोद पावडे, अजय सरसरआदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरल्यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राजठाकरे अहमदपूरला रवाना झाले. नियोजनातच नसल्यामुळे त्यांची सभा होण्याचा प्रश्नच नव्हता.

दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांच्या या "उद्योगा'मुळे दोन तास राज ठाकरे यांची तळपत्या उन्हात प्रतीक्षा करणाऱ्याजनतेची मात्र घोर निराशा झाली. अखेर जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन विनोद पावडे (नांदेड उत्तर), शिवा नरंगलेलोहा), अशोक नेम्मानीवार (किनवट), केशव हारण पाटील (हदगाव) या चार उमेदवारांनी भाषणबाजी केली.सभेला अपेक्षित गर्दी नसल्यामुळे राज ठाकरे यांनी सभेला उपस्थीत राहायचे टाळले असेही सांगण्यात येते.

Monday, September 28, 2009

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

आपट्याच्या जोडपानांसारखी राहोत आपली मने एकमेकांना जोडून,
विजयादशमीच्या या पावन पर्वावर करुयात सीमोल्लंघन
अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर मात करून !

~ हॅप्पी दसरा ~


Tuesday, September 22, 2009

आता विधानसभा

लोकसभेसाठी तुमचं मत सार्थकी लागलं की नाही तुम्हालाच माहित पण आता पाळी आहे विधानसभेसाठी मतदान करण्याची.

शिवसेना-भाजपाच्या युतीने उमेदवारही जाहीर केले आहेत.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या उमेदवारांची यादीही १-२ दिवसांत जाहीर होईल.


शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाने :-

भोकर :- भीमराव क्षिरसागर
नांदेड दक्षिण :- हेमंत पाटील
देगलूर :- सुभाष साबणे
लोहा :- प्रा. मनोहर धोंडे
मुखेड :- वसंत संबुटवाड

Thursday, September 17, 2009

विनम्र अभिवादन !

मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी लढलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात वीरांना मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

Thursday, August 13, 2009

भुवन :- गुगल अर्थ आणि विकीमॅपीयाचा कर्दनकाळ

इंटरनेटवरून स्वतःची गल्ली, नगर, घर शोधण्यासाठी तुम्ही आजवर गुगल अर्थ किंवा विकीमॅपीयाच वापरत आला असाल पण आता त्या दोन्हीला विसरून जा कारण आता तुमच्या मदतीला येणार आहे भुवन.भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) गुगल अर्थ, विकीमॅपीयापेक्षा अत्यंत नवीतम, अधिक जवळून आणि अधिक सुष्पष्ट छायाचित्रे उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.गुगल अर्थ आपल्याला २०० मीटरपर्यंतच झूम करून दाखवू शकतो पण भुवन मात्र त्याच फोटो तुम्हाला अत्यंत जवळून म्हणजे १० मीटरपर्यंत झूम करून दाखवतो.गुगल त्याचा फोटो डाटाबेस दर चार वर्षाला अपडेट करतो, याऊलट भुवन दरवर्षी डाटाबेस अपडेट करणार आहे.
इतकेच नाही तर तुम्हाला भुवनद्वारे तुमच्या आसपासच्या परीसरातील खूप माहिती मिळणार आहे. (उदा. शाळा, चित्रपटगृह, शॉपिंग सेंटर्स इत्यादी.)

 

Google Earth Vs ISRO Bhuvan

Google Earth
    * Zoom levels up to 200 mt
    * Single layer information
    * Images upgraded every 4 years
    * No alternate viewing options
    * Uses international satellites
 
 
Bhuvan

    * Zoom levels up to 10 mt
    * Multi-layer information
    * Images upgraded every year
    * Options of viewing on different dates
    * Uses Indian satellites:: भुवनची ऑफिशियल वेबसाईट ::

http://bhuvan.nrsc.gov.in/

 
 

Wednesday, August 12, 2009

स्वाईन फ्लू आता नांदेडमध्ये ?

मार्च-एप्रील २००९ च्या आसपास मेक्सिको शहरात स्वाईन फ्लू (H1. N1) ह्या रोगाने आपले डोके वर काढले.
हा रोग जेव्हा माणसांमध्ये दिसून येऊ लागला तेव्हा मेक्सिको सरकारने सगळी कार्यालयं आणि तत्सम गर्दीच्या जागा जीथे ह्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो अशी सर्व ठिकाणे बंद करायला सुरूवात केली.

जून २००९ च्या सुरूवातीस जेव्हा हा रोग सगळ्या जगात पसरायला लागला तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने देखील याची दखल घेऊन ह्याला साथीचा रोग म्हणून घोषित केले. (११ जून २००९)

स्वाईनफ्लूइंडीया ह्या संकेतस्थळावरील माहितीनुसार संपूर्ण जगात जवळपास १,६२,३८० व्यक्तींना ह्या रोगाची लागण झाली आहे.
स्वाईन फ्लूने जगभरात आत्तापर्यंत एकूण १,१५४ लोकांचा बळी घेतला आहे.
भारतातील १४ लोक ह्या साथीच्या रोगामुळे मृत्युमुखी पडले आहेत. (पुणे-७, मुंबई-२, नाशिक-१, गुजरात-२, केरळ-१, तामिळनाडू-१)


तर अश्या हा जगभर थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्लूची नांदेड जील्ह्यातील पहिली केस माहूर येथे ८ ऑगस्ट रोजी आढळून आली.
हा तरूण नौकरीसाठीची मुलाखत द्यायला पुण्याला गेला होता पण ५ तारखेला जेव्हा तो माहूरला परतला तेव्हा त्याला सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अश्या तक्रारी चालू झाल्या.
गावातच औषधपाणी करूनही त्यांचा आजार थांबत नव्हता म्हणून तीथल्या डॉक्टरांनी त्यांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात शिफ्ट व्हायला सांगितले.
परंतू दुसऱ्याच दिवशी ती व्यक्ती दवाखाण्यातून पळून गेली त्यामुळे हे प्रकरण अजूनच गंभीर झाले.

नांदेडचे बहुतांश विद्यार्थी १०-१२ वी नंतरच्या शिक्षणासाठी हमखास पुण्यातच जातात, आणि भारतामध्ये पुण्यात तर या स्वाईन फ्लूने सगळ्यात जास्त थैमान घातलेले आहे त्यामुळे इथल्या पालकांनी आपापल्या पाल्याच्या काळजीस्तव त्यांना परत नांदेडला बोलावून घेतले.


माझे अनेक मित्र पुण्यात वेगवेगळ्या शिक्षणासाठी गेलेले आहेत त्यांच्याशी बोलल्यावर असे कळाले की,
नांदेडला परत आलोत तर आपला अभ्यास बुडेल या भितीने अनेकांनी पुण्यातच राहणे पसंद केले होते पण त्याच सुमारास (सोमवार, १० ऑगस्ट) महाराष्ट्र सरकारने पुण्यातील सर्व खाजगी शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृहे, शॉपींग मॉल्स इत्यादींना ७ दिवसांची सुट्टी जाहीर केली.
यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नांदेडला परतण्याचे नियोजन केले आणि नांदेडहून पुण्याला जाणाऱ्या खाजगी गाड्या रीकाम्या तर येणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या.

पण नांदेडला परतलेल्यांपैकी काही विद्यार्थी आणि इतर व्यक्ती पुण्यामध्येच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या स्वाईनफ्लू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या असाव्यात कारण नांदेडला आल्यावर सहा व्यक्तींमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं दिसायला लागली होती.

त्या संशयीत रुग्णांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या थुंकीचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. (११ ऑगस्ट २००९)
त्या रूग्णांना स्वाईन फ्लू झाला आहे की नाही याबद्दल अजून कोणत्याही वृत्तवाहिनीवर किंवा वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली नाही.

वृत्तवाहिन्यांनी या रोगाचा फार मोठा बागुलबुवा उभा करून लोकांच्या मनात भिती निर्माण केली आहे, पण थोडी काळजी बाळगली तर स्वाईन फ्लू हा रोग सहजपणे टाळता येऊ शकतो.
ता.क. :- पुण्यात अजून एका व्यक्तीचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाला आहे. :(


ताजा कलम :- १५ ऑगस्ट २००९ (४:१४ PM)

संशयीतांपैकी ५ जणांना स्वाईन फ्लू ह्या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Tuesday, August 11, 2009

पुण्याच्या गाड्या रिकाम्या, येणाऱ्या मात्र 'पॅक'

एरवी नांदेड येथून पुणे येथे जाणारी प्रत्येक खासगी बस, रेल्वे प्रचंड गर्दी सामावून धावतात. दोन-दोन दिवसअगोदर बुकींग करावी म्हटले तरी अडचणी येतात; परंतु "स्वाईन फ्लू'च्या भीतीने सध्या या बस रिकाम्या धावतअसून खासगी बस कंपनीला यामुळे 30 ते 40 टक्के फटका बसला आहे. पुणे एक्स्प्रेस दौंड पॅसेंजर या रेल्वेतहीप्रवासी संख्या घटली असून थेट पुणे येथे जाणारे तर तुरळकच आहेत.

ऐन दुष्काळाच्या सावटात उद्भवलेल्या "स्वाईन फ्लू'ने राज्यासह देशात खळबळ माजवून दिली आहे. याआजाराचा सामना करण्यासाठी शासन प्रशासकीय पातळीवर अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. पुणे येथे शिक्षण रोजगाराच्या निमित्ताने तात्पुरते वास्तव्यास असलेली मंडळी मिळेल त्या वाहनाने गावी परतत आहेत. एरवी पुणेयेथे भरभरून जाणारी वाहने सद्यस्थितीत मात्र रिकामी धावताना दिसतात.


पुणे येथे प्रामुख्याने शिक्षणाच्या निमित्ताने तात्पुरत्या वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. शिवाय, यामहानगराचा मध्यमवर्गीय तोंडवळा असल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांचा कल या शहराकडेच आहे. मात्र याच शहराला स्वाईन फ्लूने विळख्यात घेतल्याने सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे. दररोज नवीन बातमीऐकायला मिळत असल्याने त्यात वरचेवर भर पडत आहे. अनेक शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्याने त्यासंस्थांतून शिक्षण घेणारे किंवा नोकरी करणारे आपापल्या शहरांत परतत आहेत. पुणे, मुंबई येथे ज्या वैद्यकीयसोयी तातडीने उपलब्ध होतात, त्या ग्रामीण भागात उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे याचा संसर्ग इतरत्रहोण्याची शक्यता वाढली आहे.
नांदेड येथून पुण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसपेक्षा खासगी बसच अधिक धावतात. त्यात प्रसन्न ट्रॅव्हल्सच्यासर्वाधिक नऊ बस जातात तेवढ्याच परततातही.

या कंपनीचे नांदेड येथील लेखा व्यवस्थापक असगर अली खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नांदेड येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. पुणे येथे मिल्ट्री स्कूलमध्ये शिकणारे किनवट येथील काही विद्यार्थी नुकतेच परतले असून त्यांना आठवड्यानंतर परिस्थिती पाहून परत येण्यास सांगण्यात आले आहे. याच प्रकारे इतरही शैक्षणिक संस्था व खासगी कंपन्यांत कार्यरत असणारे विद्यार्थी, नागरिक परतत आहेत. येणारी प्रत्येक बस पॅक आहे; पण जाणाऱ्यांत मात्र बहुतेक जण हातावर पोट असणारेच आहेत. आपल्याकडे पाऊसच नाही. त्यामुळे पिके हातची गेल्यात जमा आहेत. शेतमजूर व अत्यल्पभूधारकांची परिस्थिती मोठी कठीण झाली आहे. त्यामुळे रोजगारासाठी नाईलाजाने त्यांना पुणे, मुंबईसारख्या महानगरांत जावे लागते.
नांदेड येथून पुणे येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस कंपन्यांत खुराणा कंपनीच्या दोन, नूरच्या चार, शर्माच्या तीन व अंबर कंपनीच्या दोन बस धावतात. याशिवाय एस.टी. महामंडळाच्या तीन बस असून रेल्वेपैकी पुणे एक्‍स्प्रेस व दौंड पॅसेंजर दररोज धावते आहे. यांद्वारे प्रवास करणाऱ्यांचा ढोबळ आढावा घेतला असता, खासगी कंपन्यांच्या बसेसना आता कमी प्रवासी संख्येमुळे नांदेड- पुणे प्रवास करणे परवडणारे राहिले नाही. त्यांचा डिझेलचा खर्चही निघणे कठीण आहे, अशी माहिती आहे. ही परिस्थिती आणखी किती दिवस राहील, हे सांगता येणे कठीण आहे.


चाचणी आणि तपासणी प्रक्रिया -
नांदेड येथे संशयित म्हणून आढळत असलेल्या रुग्णांच्या घशातील स्त्राव कापसाच्या एका बोळ्यावर घेऊन तो "स्वाप' "व्हीटीएम' (व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम) या उपकरणात दोन ते आठ डिग्री तापमानात पुणे येथे "एनआयव्ही' (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी) या संस्थेत तपासणीसाठी पाठविला जातो. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या चार संशयित रुग्णांचा "स्वाप' सोमवारी (ता. दहा) पुणे येथे पाठविण्यात आला आहे. तिथे "आरटीपीसीआर' (रियलटाईम पॉलीमरेज चेन रिऍक्‍शन) ही चाचणी करून विषाणू स्वाईन फ्लूचा आहे की नाही, हे ठरवले जाते. वास्तविक ही तपासणी सहा तासांत होत असली तरी सद्यस्थितीत या संस्थेवर प्रचंड ताण आहे. शिवाय नांदेड ते पुणे अंतर लक्षात घेता रिपोर्ट यायला वेळ लागतो. तरी देखील या आजारावर अतिशय परिणामकारक सिद्ध झालेला "टॅमी फ्लू' हा औषधोपचार संशयित रुग्णांवरही करण्यास परवानगी असल्याने फारशी काळजी करण्याची आवश्‍यकता नसल्याचे खासगी डॉक्‍टरांचे मत आहे.
‍ ‌ ‍

:: सौजन्य ::
सकाळ वृत्तपत्र
मंगळवार ११ ऑगस्ट ०९

Sunday, August 9, 2009

तुमच्या मोबाईलची रींगटोन आणि तुम्ही

नमस्कार मित्रांनो,
मोबाईल तर असेलच तुम्हा सगळ्यांकडे, कारण आजकाल अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर कदाचित मोबाईलचाच नंबर लागत असावा म्हणूनच तर आज ज्याच्या हाती पाहावं त्याच्याकडे मोबाईल हमखास दिसून येईल.

पण तुम्हाला खरं सांगतो, माझ्याजवळ कालपर्यंत मोबाईल नव्हता.
हो, पण त्याला कारणही तसंच आहे.
मी आजवर माझ्या आई-वडीलांसोबतच राहत असल्यामुळे मला कधिही मोबाईलची गरज भासली नाही आणि खरच सांगतो, माझ्यापुढे आजपर्यंत कधिही अशी परिस्थीती उभी टाकली नाही की जिथे मला 'अरे, आपल्याकडे मोबाईल असायला हवा होता’ असे वाटले.

पण आता गोष्ट वेगळी आहे.
आता शिक्षणासाठी घरापासून दूर राहावे लागणार आहे त्यामुळे माझ्या वडीलांनी मला नवीन मोबाईल घेऊन दिलाय.अरे बाप रे, अती झाले का माझे मोबाईलपुराण ?
माफ करा हां, मुळ मुद्द्यावर येतो.
:: तुमच्या मोबाईलची रींगटोन आणि तुम्ही ::

तुमच्या मोबाईलची रींगटोन तुमचा मूड कसा आहे हे परावर्तित करते.
तुमच्या मोबाईलवरच्या रींगटोनवरून अनेकजण तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल मत बनवित असतात.
यु.के. येथील एका मोबाईल विक्रेत्याने (डायल अ फोन) त्याच्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्न विचारला, "तुम्ही व्यक्तीच्या मोबाईल रींगटोनवरून त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधता का ?"
या प्रश्नाला ९७% लोकांनी 'हो' असे उत्तर दिले.


कुण्या एका महान गितकाराने लिहून ठेवले आहे की,
"ऎश तू कर यारा ऎश तू कर, दुनीया जाये तेल लेने ऎश तू कर।"


पण तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व कसे रीफ्लेक्ट व्हावे याची काळजी असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशीच रींगटोन वापरा.


:: माझ्या आवडत्या रींगटोन्सचे कलेक्शन ::
http://tinyurl.com/mkuzt6

Saturday, August 1, 2009

अक्षरधारासुप्रसिद्ध मराठी ग्रंथप्रदर्शन संस्था 'अक्षरधारा' नांदेड शहरात आली आहे.
अक्षरधाराने शहरात कलामंदीर येथे मराठी पुस्तके प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवली असून प्रत्येक नांदेडकराने किमान एकदातरी या प्रदर्शनास भेट द्यावी.

लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

Wednesday, July 15, 2009

नांदेड कंप्युटर डिलर्स असोसीएशन

नांदेड कंप्युटर डिलर्स असोसीएशनच्या संकेतस्थळाचा पत्ता.
http://ncdananded.com/Friday, July 3, 2009

खवय्येगिरी

मित्रांनो, तुमच्यापैकी कित्येक जण उत्तम खवय्ये असतील. (विसरलात का, "मीसुद्धातुमच्यातलाच एक".)

पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना नांदेडमधली खाण्या/पीण्यासाठी प्रसिद्ध असलेली काही विशिष्टठिकाणंच माहित असतात जसे की आईनाथची पाणीपुरी.

कुणालाही प्रश्न विचारला की तुला नांदेडमधले खाण्यासाठी काय आवडते तर त्याचे उत्तर तयारआईनाथची पाणीपुरी’! मग भलेही त्याने तीथली पाणीपुरी कधीतरी एकदाच खाल्लेली असेल.

अशाच अनुभवांवरून मला हा टॉपिक काढण्याचे सुचले.

मग काय, माझ्या मित्रांना पकडून मी काही प्रश्न विचारले :-

१) तुमच्या मते नांदेडमधील खाण्या-पिण्यासाठीची बेस्ट जागा कोणती ? (हॉटेल, हातगाडा इत्यादी.)

२) तुम्ही तीथे सामान्यतः काय ऑर्डर करता ?

३) त्या ठिकाणाची स्पेशालिटी काय आहे ? (किंमत, चव, क्वांटीटी, उपलब्धता इ.)

माझ्या मित्रांनी दिलेली उत्तरं मी आता इथे पोस्ट करतो.

बी.सी.. करणारा राजदीप रायेवार म्हणतो की त्याला भाग्यनगरच्या आईनाथची पाणीपुरी आणि पावभाजी फार आवडते. स्पेशालिटीम्हणजे तीथला प्रत्येक पदार्थ हा स्वस्त आणि मस्त असतो असे त्याचे म्हणने आहे.

मुळचा नांदेडचा पण सध्या पुण्यात आदेश गट्टाणीला आय.टी.आय. कॉर्नरजवळील गोदावरी स्वीट्स मधील स्नॅक्स फार आवडतात आणि जेवणासाठी तो गोपीरुचीरा फॅमिली रेस्टॉरेंटला प्राधान्यदेतो. तो सांगतो की गोदावरी स्वीट्स हे थोडेसे महाग असले तरीत्यांच्या अन्नपदार्थाच्या दर्जामुळे इट्स .के.

निशिगंध, ज्याचे नांदेडच्याच एस.जी.जी.एस. कॉलेजमधून एम.टेक. (CAD/CAM) झाले आहे, तो म्हणतो की जुन्या मोढ्यातील सुंधा भवानी हॉटेल त्याला फार आवडते. त्याच्या मते तेथील दालबाटी चुरमा (कडक घी के साथ) निव्वळ अप्रतीम असते.मीसुद्धा एक चांगला खवय्या असल्यामुळे मला आवडणाऱ्या ठिकाणांचीसुद्धा माहिती देतो.
चिकन
आणि मटनाचे खाद्यपदार्थ
--> हॉटेल सुंदर (गुरूद्वाऱ्याजवळ), मराठा मटन (दत्तनगर).

हॉटेल सुंदर हे अतिशय स्वस्त आणि चवीलाही मस्त असे हॉटेल आहे. मराठा मटन हॉटेलातला मटणाचा झणझणीत रस्सा तर लाजवाबच, पण हे बिअर बारसुद्धा असल्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमीलीला इथे नेऊ इच्छीणार नाही.दही भल्ला --> गुरूद्वारा चौक

गुरूद्वारा चौकाजवळच असलेल्या ह्या हातगाड्यावर दही भल्ला आणि पाणीपुरी फार मस्त मिळते. मला तरी बुवा इथली पाणीपुरी आईनाथच्या पाणीपुरीपेक्षा चवीला जास्त चांगली वाटते.व्हेज मंचुरीअन --> आदित्य स्नॅक्स. (बोरबन भागात)

१२ रुपयाला एक प्लेट व्हेज. मंचुरीअन.

आहे की नाही किंमत आश्चर्यचकीत करणारी. अहो चवसुद्धा तीतकीच चांगली आहे.

मंचुरीअन व्यतिरीक्त इथले फ्राईड राईस, नुडल्स, पनीर ६५ हे पदार्थही चवीला चांगले आहेत.रोज(गुलाब) लस्सी --> जनता कोल्ड्रींक्स (वजिराबाद)

या लस्सीसाठी अमृततूल्य हा एकच शब्द माझ्यापाशी आहे. इथे येणारे अर्ध्याहून जास्त ग्राहक याच लस्सीची मागणी करताना दिसतात.खीचडी --> कविता खिचडी सेंटर (बाफना)

बाफना/देगलूर नाका भागात काम करणारे मजूरच नाही तर नांदेडच्या वेगवेगळ्या भागातून लोक इथली खीचडी आणि भज्जे खायला येतात.जेवणासाठी --> शेर-ए-पंजाब आणि दशमेश

हे दोन्ही ढाबे थोडीशी शहराबाहेर, आसना नदीच्या पूलापुढे आहेत.

दोन्ही हॉटेलं फक्त नावालाच ढाबे आहेत. बाकी चव, स्वच्छता, सजावट या सर्व बाबतीत नांदेड शहरातले हॉटेल्ससुद्धा यांच्यापुढे फीके पडतील.
ही तर झाली शहरातली ठिकाणं, शहराबाहेरही खाण्या-पीण्याची अनेक ठिकाणे प्रसिद्धआहेत. लोह्याचे दही धपाटे, भोकरच्या बसस्टॅंडवरचे खिचडी-भज्जे, महादेव पिंपळगावचे पेढे, किनवट येथील इसाक खान यांचा ढाबा अशी बरीच ज्ञात-अज्ञात ठिकाणं नांदेडला खाण्यापीण्याच्याबाबतीत समृद्ध करतात.एकंदरीत खवय्येगिरी करणाऱ्या नांदेडीअन्सच्या जिभेची वासना कधिही कमी होणार नाही असे आपण म्हणू शकतो.तुम्हालाही जर नांदेडमधल्या कुठल्या ठिकाणचा खाद्यपदार्थ आवडत असेल तर त्याची माहितीआमच्यासोबत शेअर करावी, जेणेकरून आम्हाला त्या पदार्थाचा आनंद घेता येईल.

अखेरकार खानेवालों को खाने का बहाना चाहिये !