Saturday, December 18, 2010

कुठे गेले हिवाळी पाहुणे ?

ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाळा लांबला त्यामुळे जे स्थलांतरीत पक्षी ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये भारतात यायचे, ते आता डिसेंबरमध्ये येऊ लागले आहेत.
पण यावर्षी त्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
दरवर्षी शेकडोंच्या संख्येने येणारे पक्षी यावर्षी विविध जलाशयांवर बोटावर मोजण्याइतपत संख्येनेच आले आहेत.
हवामान बदलामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या पद्धतीतही मोठे बदल होत आहेत, असे मत पक्षीतज्ञ व्यक्त करीत आहेत.

नांदेडमधील विविध जलाशयांवर जमलेले पक्षी :-


Black Winged Stilt - शेकाट्या (हिवाळी स्थलांतरित)


Little cormorant - छोटा पाणकावळा (निवासी)


Small Pratincole - पाणभिंगरी (निवासी)


Little ringed plover - कंठेरी चिखल्या (निवासी)


Lesser pied kingfisher - कवडा धीवर (निवासी)


Ruddy Shelduck - चक्रवाक (हिवाळी स्थलांतरित)



उर्वरित फोटो तुम्ही माझ्या ऑर्कूट अल्बममध्ये पाहू शकता.

नांदेड ---> ८.२°

यावर्षी हिवाळ्याने नांदेड शहरातला गेल्या १० वर्षांतला तापमानाचा निचांक मोडला आहे.
काल नांदेडमध्ये थंडीचा पारा ८.२° सेल्सीअसपर्यंत घसरला होता.
परभणीमध्ये काल तापमान ५.९° सेल्सीअस होते.

या कुडकुडायला लावणार्‍या थंडीचा संबंध ग्लोबल वार्मिंगशी लावायचा की नाही, हे ज्याचे त्याने ठरवावे, कारण आपल्या ब्लॉगवर ग्लोबल वार्मिंगबद्दल आधीच खूप पोस्ट्स आले आहेत.
(विनंती :- कुणीही खोडसाळपणे प्रश्न विचारू नये ‘हा ब्लॉग नांदेडबद्दल आहे की ग्लोबल वार्मिंगबद्दल ?’)ketukmeje

Wednesday, December 8, 2010

गोदाई.

माफ करा मित्रांनो, परीक्षा असल्यामुळे काही दिवसांपासून ब्लॉग अपडेट करू शकलो नाही.

गोदावरी !
महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणारी ही नदी.

प्रदूषणामुळे गोदावरी नदीची काय अवस्था झाली आहे ही दर्शवणारी एक डॉक्युमेन्ट्री नुकतीच पाहण्यात आली.
तशी ही डॉक्युमेन्ट्री गोदावरीच्या नाशिक येथील दुरावस्थेबद्दल बनवण्यात आली आहे, पण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गोदावरीची अशीच दुरावस्था झालेली आहे.
किंबहुना माझ्या मते नांदेडमध्येच सगळ्यात वाईट परिस्थीती आहे.xpasti
नवीन पुलावरून जेव्हा नांदेडीअन्स गोदामातेला नमन करून प्लॅस्टीकच्या पिशव्या 'अर्पण' करतात, तेव्हा त्यांच्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही.

श्रद्धेला आमचा विरोध नाही, असण्याचा प्रश्नही उद्भवत नाही.
पण श्रद्धा व्यक्त करण्याची जी पद्धत आहे, ती नक्कीच चुकीची आहे.takbole

आता तरी गोदामातेची आर्त हाक ऎका मित्रांनो.



Monday, November 22, 2010

पुन्हा भूकंप.

नमस्कार मित्रांनो,
आज गुगलींग करतांना एक वेबसाईट सापडली.

http://earthquake.itgo.com/today.htm

या वेबसाईटबद्दल थोडी शोधाशोध केल्यावर कळाले की या वेबसाईटवर म्हणे भूकंपाचे प्रेडीक्शन करतात आणि ते खरेही ठरतात म्हणे.
(भूकंपाची भविष्यवाणी करण्याइतपत विज्ञान अजून प्रगत झालेले नाही, त्यामुळे या वेबसाईटवर किती विश्वास ठेवावा हे ज्याचे त्याने ठरवावे.)

२८ ऑक्टोबरला या वेबसाईटवर प्रेडीक्शन करण्यात आले होते की येत्या ४८ ते ३८० तासांत कच्छ (गुजरात), नांदेड, अरेबीयन समुद्र किंवा पाकिस्तान येथे ६ ते ७ मॅग्नीट्युडचा भूकंप होऊ शकतो.

या महिण्यात झालेले भूकंप :- (यात गुजरात, पाकिस्तान आणि नांदेडचाही समावेश आहे.)
http://www.imd.gov.in/section/seismo/dynamic/CMONTH.HTM
&
http://www.asc-india.org/recent.htm


११ नोव्हेंबरच्या भूकंपाचा अपडेट मी तुम्हाला दिलेलाच आहे.
काल (२१ नोव्हेंबर २०१०) दुपारी १२:२० वाजता २.३८ रीश्टर स्केल तिव्रतेचा धक्का जाणवला होता. (यावर्षीचा सगळ्यात मोठा.)
आज (२२ नोव्हेंबर २०१०) संध्याकाळी ५.३० वाजता आणि आत्ता ७:२६ PM वाजता भूकंपाचे दोन मोठे हादरे जाणवले. (काय योगायोग आहे ना ! मी तुम्हाला अपडेट देत असतांना भूकंप व्हायची ही तिसरी ते चौथी वेळ आहे.garupale)


भूकंपादरम्यान आणि नंतर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
http://www.nwmcnanded.org/EarthQuake.htm


P.S. :-

Friday, November 12, 2010

महाप्रलयाचा डेमो : पार्ट २ ?

महाप्रलयाचा डेमो : पार्ट १ आठवतोय ना ? (हा पोस्ट वाचा.)
त्या पोस्टमध्ये फक्त दिनांक आणि वेळ बदला.

महाप्रलयाचा डेमो : पार्ट १
दिनांक --> १२ सप्टेंबर २००८
वेळ --> सकाळी २.०० ते ३.३० पर्यंत.

महाप्रलयाचा डेमो : पार्ट २
दिनांक --> १२ नोव्हेंबर २०१०
वेळ --> सकाळी ४.०० ते ५.३० पर्यंत

काल रात्रीच भुकंपाचा एक मोठा धक्का बसला होता हे विशेष.

बाहेर जोरदार पावसाला सुरूवात झालीये.

Thursday, November 11, 2010

भुकंप अपडेट.

आत्ताच एक भुकंपाचा मोठा धक्का जाणवला. (वेळ रात्रीचे ११ वाजून ३१ मिनीटे.)

Thursday, November 4, 2010

Happy Diwali

ि !


Let me take the opportunity to wish you and your family a very happy DIWALI, glowing with peace, joy & prosperity.

Tuesday, October 26, 2010

धक्के भुकंपाचेच.

गेल्या ३-४ वर्षांपासून सुरू असलेली गूढ आवाजांची मालिका आणि धक्के भूकंपाचेच आहेत हे आता तज्ञांनी मान्य केले आहे.
सोमवारी National Geophysical Research Institute च्या तज्ञ्यांचे एक पथक नांदेडला आले होते.
त्यांनी हे स्पष्ट केले की हा प्रकार भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचाच आहे, शिवाय असे धक्के अजून काही आठवडे बसण्याची शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे.

रविवारी एकंदरीत २० धक्के जाणवले होते आणि त्यापैकी ४ धक्के २ रिश्टर स्केलचे होते.
सोमवारीसुद्धा दिवसभरात भूकंपाचे ४ धक्के जाणवले, त्यातल्या सकाळी ५:१५ च्या भूंकपाची रिश्टर स्केलवर २.३ इतकी नोंद झाली.

ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा भूगर्भातून आवाज सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.xpasti


ता.क. :- (ईसकाळ 26-Oct-10)
नांदेड - ऐन दिवाळीच्या तोंडावर अवतरलेले भूकंपाचे भूत मानगुटीवरून उतरता उतरेना अशी नांदेडकरांची अवस्था झाली आहे.
मंगळवारी (ता. 26) रात्री साडेनऊपासून पुन्हा गूढ आवाजांना सुरवात झाली.
बुधवारी (ता. 27) सकाळी सहापर्यंत जवळपास 18 आवाज झाले.
पैकी चार आवाज मोठे होते आणि त्याची रिश्‍टर स्केलवर नोंद 2.28 आणि 2.25 एवढी नोंदली गेली.
आवाज होताच पळापळ होऊन नागरिक घराबाहेर येत आहेत.
सध्या सहामाही परीक्षा सुरू आहेत; पण भूकंपाच्या आवाज व हादऱ्यांनी विद्यार्थ्यांचीही झोप उडाली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी एकदा भूकंपाचा आवाज झाला होता; परंतु तेव्हा त्याला भूकंप मानायला कोणी तयार नव्हते.
त्यानंतर रविवारी (ता. 24) सकाळी पाच वाजता मोठा आवाज झाला आणि हादराही चांगलाच जाणवला.
रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 2.3 एवढी नोंदली गेली आणि प्रशासन सतर्क झाले.
नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य वैज्ञानिक श्रीनागेशा हेदेखील सोमवारी येऊन पाहणी करून गेले.
त्यांनी हा भूकंपाचाच पण सौम्य धक्का असल्याचे सांगितले.
नांदेडचा परिसर "सी झोन'मध्ये येत असल्याने फारसा धोका नसला तरी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
रविवारपासून सुरू झालेला हा सिलसिला थांबायला तयार नाही.
मंगळवारी रात्रीपासूनच आवाज आणि हादऱ्यांची मालिका सुरू झाली.
रात्री साडेनऊ, बारा, साडेबारा अशा प्रकारे सकाळी सहापर्यंत 18 धक्के जाणवल्याचे या भागातील लोक सांगतात. या प्रकाराने नागरिकांची घाबरगुंडी उडाली असून, किरायेदार घर सोडून जात आहेत.
रात्र-रात्र जागून काढावी लागते आहे.
घराबाहेर बसून गप्पाटप्पा करीत कशीबशी रात्र काढावी तर घाण आणि त्यामुळे झालेले डास एक सेकंदही बसू देत नाहीत.
महापालिका साफसफाईत सपशेल अपयशी ठरल्यानंतर नागरिकच आता श्रमदानाने साफसफाई करीत आहेत. त्यांनाच रात्र बाहेर जागून काढायची असल्याने ही पाळी ओढवली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षण, नोकरीसाठी आलेली मंडळी सुरक्षित घर शोधण्याच्या कामी लागली आहे.
कित्येकजण तर गावाकडून येणे-जाणे करण्याच्या तयारीने स्थलांतरित झाले आहेत.

जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक ज्यांची गावे रेल्वेमार्गावर आहेत, असे लोक निघून गेले आहेत.
मालकीहक्क असलेले नागरिक घरे विकण्याची मानसिकता करीत आहेत.
कित्येकजण दिवाळीच्या सुट्या लागण्याची वाट पाहत आहेत.
एकदा का सुट्या लागल्या की, त्यांनाही किमान पंधरा दिवस या भागापासून फारकत घेणे शक्‍य होणार आहे.

चार हादरे मोठे
मंगळवारी (ता. 26) रात्री साडेनऊपासून बुधवारी (ता. 27) सकाळी सहापर्यंत अतिशय सौम्य असे अनेक हादरे बसले; परंतु त्यातल्या त्यात जाणवणारे हादरे 18 होते. त्यापैकी चार तर 2.25 आणि 2.28 रिश्‍टर स्केल एवढ्या नोंदीचे होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष पावडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.


ता.क. :- (27-Oct-10)
काल नांदेड शहर पुन्हा भूकंपाने हादरले.
काल (बुधवारी) शहराला लहान-मोठे अनेक धक्के बसले, पण सायंकाळी ७.२२ वाजता भूकंपाचा मोठा हादरा बसला.
या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.३ एवढी नोंदविल्या गेली.

Sunday, October 24, 2010

भुकंपाचा सौम्य धक्का.

सुप्रभात मित्रांनो,
आत्ताच 10 मिनीटांपूर्वी (सकाळचे ५ वाजून २५ मिनीटं.) नांदेडला भुकंपाचा एक सौम्य धक्का बसला.
जोराच्या आवाजाबरोबर जमीन हादरल्यामुळे सगळे नागरिक घराबाहेर आले आहेत.
भुकंपाची मालिका परत एकदा सुरू होते की काय असे वाटायला लागले आहे कारण काही दिवसांपूर्वी असाच एक छोटा धक्का जाणवला होता.
ता.क. :- हा पोस्ट लिहीत असतांनाच अजून एक छोटा आवाज झाला.

ता.क. :- वेळ सकाळचे ६ वाजून ४९ मिनीटं
ह्या धक्क्याने फार मोठा हादरा जाणवला.
माझा लॅपटॉप टेबल थरारला.gigitjari
हा धक्का सिडको भागालासुद्धा जाणवला.

Sunday, October 17, 2010

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा !

आपट्याच्या जोडपानांसारखी राहोत आपली मने एकमेकांना जोडून,
विजयादशमीच्या या पावन पर्वावर करुयात सीमोल्लंघन
अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर मात करून !








Sunday, October 3, 2010

युवक महोत्सव

स्वा.रा.ती.म. आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशवंत २०१०’ या युवक महोत्सवाचे आज उद्घाटन झाले.
यावेळी मा. मु. श्री. अशोकरावजी चव्हाण, शाहरूख खान, करण जोहर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

यशवंत कॉलेजच्या मैदानात सुमारे दहा हजार प्रेक्षक बसू शकतील असा वॉटरप्रूफ सभामंडप तयार करण्यात आला आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यांतील शंभर महाविद्यालयांचा विक्रमी सहभाग या युवक महोत्सवात असणार आहे.

नवीन शहर बससेवा

होय, लालपरी बंद झाली एकदाची.penat
गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडलेल्या नवीन सिटीबसेसना आता रस्त्यावरून धावण्याचा मुहूर्त लागला आहे.
मनपाला JNNURM अंतर्गत मिळालेल्या ३० बसेस एस.टी. महामंडळ चालवणार आहे.
आज या बससेवेसे उद्घाटन झाले.

गोवर्धन घाट पुलाचे उद्‌घाटन

गोवर्धन घाट पुलाचे उद्‌घाटन काल मा. मुख्यमंत्री श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते झाले.
गोवर्धन घाट पुलामुळे नवीन पुलावरील वाहतूकीचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

Tuesday, September 28, 2010

ट्रेजर बाजारमध्ये अतिरेकी.

नेहमीप्रमाणे काल दुपारी विद्यापीठातून घरी येत होतो.
रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त दिसत होता.
‘ट्रेजर बाजार’कडे जाणारे सगळे रस्ते बंद केले होते.
‘काय झालं’ म्हणून ३-४ ट्रॅफिकवाल्या मामांना विचारलं पण ते एका शब्दानेही बोलायला तयार नव्हते.
शेवटी नावघाट पुलावरून घरी आलो.

थोड्याच वेळात मित्रांचे फोनवर फोन यायला लागले.
काही मित्र या घटनेबद्दल विचारपूस करत होते, तर काही मित्र ऎकिव गोष्टींना फुगवून सांगत होते.
‘देगलूर नाक्याजवळ काहीतरी भांडण झाले आहे.’, ‘ट्रेजर बाजारमध्ये आतंकवादी घुसले आहेत.’ अशा वेगवेगळ्या अफवांना दिवसभरात अक्षरशः ऊत आला होता.

वातावरण इतकं भयपूर्ण आणि तणावग्रस्त होतं की अशी काही घटना घडली असती तर न्युज चॅनल्सवर आत्तापर्यंत बातमी आली असती.
पण कोणत्याही न्युज चॅनलवर या प्रकाराची बातमी येत नव्हती त्यामुळे मला वाटतं होतं की ही पोलीसांची नक्कीच एक मॉकड्रील असावी.(मी मित्रांना तसं सांगितलंसुद्धा होतं.)

नक्की काय घडतंय हे कुणालाही कळत नव्हतं.
रात्रभर नांदेडमध्ये सगळीकडे याच विषयाची कुजबुज सुरू होती.
नांदेडीअन्स वेगवेगळे तर्क-वितर्क लावत होते आणि वातावरण अजूनच तणावग्रस्त होत होतं.
शेवटी सकाळी वृत्तपत्रांमधून कळाले की हे पोलीसांचं एक प्रात्यक्षिकच होतं.


वर्तमानपत्रांनी पोलीसांच्या या कृतीचा चांगलाच ‘समाचार’ घेतलाय.

1) उपस्थित युवकांनी या अतिरेक्यालाच अशी भिती घातली



2) दुसरा अतिरेकी हातात स्टेनगन घेवून युवतींना पळवून लावण्याचा प्रयत्न करीत असताना युवती मात्र मोठ्या आनंदात बाहेर पडल्या.



3) तर तिसरा अतिरेकीही अशी पोज देत होता.
ही संधी साधून मॉलमधील एका युवतीनेही आपल्या मोबाईलमध्ये या अतिरेक्याला बंदिस्त केले.



4)सकाळ



5) उद्याचा मराठवाडा



6) प्रजावाणी



7) लोकमत

Friday, September 24, 2010

परत मुसळधार

संध्याकाळचे ४ वाजले आहेत, खूप अंधारून आलं आहे आणि बाहेर ढगफुटी झाल्यागत पाऊस कोसळतो आहे.

यावर्षी पावसाने नांदेडमध्ये बहुतेक सगळे उच्चांक तोडले असावेत.
गेल्या ५-६ वर्षांमध्येसुद्धा एव्हढा पाऊस पडला नसावा असे वाटते.

ता.क. :- आमच्या भागात १५ मिनिटांच्या आतच सगळीकडे गुडघाभर पाणी साचले आहे.jelir (पाऊस अजूनही सुरूच आहे.)
कुणी मला एखादे जहाज विकत घ्यायला आर्थिक मदत करील का ?

Thursday, September 16, 2010

Nanded @ Nights

दिवसा लख्ख प्रकाशात आपलं नांदेड कसं दिसतं हे तर आपल्याला माहितच आहे. (चांगलचं दिसतं, उगी नावं ठेवू नका.jelir)
पण तुम्ही कधी रात्री निरीक्षण केलंय का आपलं नांदेड किती मनोहारी दिसतं याचं ?rindu
नाही ना ?
मग ह्या फोटो पाहा.

http://www.orkut.com/ExternalAlbum?uid=7239984522049257699&aid=1224018384&t=17167649635370437493&vid=05499051088541280706&ik=ACGyDXsng1dihpRprIKTuc68B1mJYbS8lg

आठ किलो गांजासह विक्रेत्यास अटक.

शहरातील शिवाजीनगर नई आबादी भागात एका हॉटेलवर धाड टाकून अतिरिक्त पोलिस अधिक्षक शहाजी उमाप व पोलिस उपाधिक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने ८ किलो गांजा जप्त केला.
या कारवाईनंतर नई आबादी भागातील जमाव पोलिस ठाण्यासमोर जमला होता, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
गांजा विक्री करणार्‍या एका इसमास पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता घडली.

शिवाजीनगर भागातील नई आबादी येथील एका हॉटेलमध्ये गांजा विक्री होत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांना मिळाली.
यावरून त्यांनी उपअधिक्षक लक्ष्मीकांत पाटील व त्यांच्या पथकासह या हॉटेलवर छापा मारला असता आरोपी शेख इसाक यांच्या जवळून ८ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला.
कारवाईनंतर आरोपीच्या समर्थनार्थ मोठा जमाव पोलिस ठाण्याच्या दिशेने आला होता पण पोलिसांनी या जमावाला हुसकावून लावले.

गांजा विक्री करणार्‍या इसमाला पोलिसांनी धाड टाकून पकडल्यानंतर त्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पुर्व डी.बी.च्या किती जणांना हप्ता दिला जातो याची माहिती उमाप यांना दिली असल्याचे समजते.
त्यामुळे ठाण्यातील काही कर्मचार्‍यांचे चेहरे उतरलेले होते.


दैनिक प्रजावाणी १६ सप्टें. २०१०

Saturday, September 11, 2010

गणपती बाप्पा मोरऽऽया !

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !senyum
आजपासून सुरू होणारा गणरायाचा गजर पुढचे ११ दिवस मोठ्या जल्लोषात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होईल. menari

कर्णकर्कश्श, चित्र-विचित्र गाणी लावू नका.takbole
गणेशोत्सवाचे पावित्र्य जपा.doa

गणपती बाप्पा मोरऽऽया !

ईद मुबारक

तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !
ईद मुबारक.peluk

Thursday, August 19, 2010

हेतू चांगला, पण कृती..... ?

नमस्कार मित्रांनो,
बागवान समाजाने टी.व्ही. फोडल्याची बातमी आपण विसरला तर नाहीत ना ?
विसरला असाल तर इथे वाचा.
http://nandedians.blogspot.com/2010/06/blog-post.html

या घटनेच्या काही दिवसांनंतर प्रजावाणी वृत्तपत्रात श्री. अभयकुमार दांडगे यांचा ‘टी.व्ही. नकोच : बागवान समाजाचा स्तुत्य उपक्रम’ हा लेख प्रकाशित झाला होता.
या लेखामध्ये दांडगे सरांनी बागवान समाजाची ही कृती योग्य असल्याचे म्हटले होते.

प्रतिवाद करण्याइतका मी काही ज्ञानपंडीत नाही पण मला हा लेख कुठेतरी खटकला होता.
त्यामुळे मीसुद्धा माझ्या मनातल्या भावना प्रजावाणीपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले, पण माझ्या मतांवर चहूबाजूने टीका होईल या भीतीने मी माझा लेख माझ्याजवळच ठेवला.gigil

तो लेख आपल्या ब्लॉगवर टाकावा की नाही, याबद्दलसुद्धा बर्‍याच दिवसांपासून द्विधा मनःस्थितीत होतो, पण आज हिंमत करून तो लेख इथे प्रकाशित करतोय.



रविवार दि. १३ जूनच्या प्रजावाणीच्या अंकात श्री. अभयकुमार दांडगे यांचा ’टी.व्ही. नकोच : बागवान समाजाचा स्तुत्य उपक्रम’ हा लेख वाचला आणि आश्चर्याचा धक्का बसला कारण बागवान समाजाचा हेतू चांगला असला तरी त्यांचा उपक्रम मला स्तुत्य नक्कीच वाटला नाही.

८-१० दिवसांपूर्वी शहरातल्या देगलूरनाका परिसरात मोठ्या संख्येने राहत असलेल्या बागवान समाजाने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या भावनेतून घरातील टी.व्ही. मशीदीसमोर आणून फोडून व जाळून टाकले.
बातमी होतीच तशी महत्त्वाची.
त्यामुळे दुसर्‍या दिवशी सगळ्याच वृत्तपत्रांनी ही बातमी हायलाईट केली.
एका नावाजलेल्या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर जेव्हा ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा त्यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या.
त्यातलीच एक विचार करायला भाग पाडणारी अशी एक प्रतिक्रिया :-
"एखाद्या गरजू संस्थेला या टी.व्ही. दान करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकला असता. टी.व्ही. फोडण्याणे आणि जाळण्याणे जे ई-वेस्ट तयार झाले, त्याला जबाबदार कोण ?"

ही बातमी कळाल्यानंतर सगळ्याच पालकांना हा प्रकार चांगला वाटला असेल; कारण प्रत्येक पालकाला टी.व्ही. नावाच्या वस्तूबद्दल राग वाटतोच.
(मुलगा अभ्यासात हुषार नसेल किंवा त्याला कमी गुण मिळाले; तर बहुतांश वेळा त्याचे खापर टी.व्ही.वरच फोडल्या जाते.)
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट.
वाईट याचे वाटते की, आपण नेहमी वाईट बाजूच अगोदर पाहतो आणि तिलाच अवास्तव महत्त्व देतो.
चांगली बाजू नेहमी उशीरा पुढे येते आणि तेव्हा आपण पश्चाताप करत असतो.

तुम्ही म्हणाल, 'टी.व्ही.ला काय चांगली बाजू असू शकते ? तो इडिअट बॉक्स वेळ वाया घालवण्याशिवाय काय करू शकतो ?’
पण तसे नाही, उलट टी.व्ही.पासून नुकसानापेक्षा फायदेच अधिक आहेत.

दांडगे सरांनी टी.व्ही.वर दाखवली जाणारी अश्लील गाणी, चित्रपट इत्यादींवर आक्षेप घेतला आहे.
मान्य आहे की हल्ली टी.व्ही.वर असे कार्यक्रम सर्रास दाखवले जातात पण टी.व्ही.चा रिमोट तर आपल्याच हातात असतो ना !
हल्ली प्रत्येक टी.व्ही.मध्ये ’चाईल्ड लॉक’ किंवा ’पॅरेन्टल कंट्रोल’चे सॉफ्टवेअर येते, त्याद्वारे तुम्ही मुलांनी कोणते चॅनल्स पाहावेत आणि कोणते नाही हे सहज ठरवू शकता.
हां, जे पालक आपल्या मुलांना डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट, हिस्टरी किंवा नॅटजीओसारखे चॅनेल्ससुद्धा पाहू देणार नसतील त्यांनी परग्रहवासी असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे म्हणजे त्यांना कुणीही काहीही म्हणणार नाही.setan


मला जाणवलेले टी.व्ही.चे काही फायदे :-

१) मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास कुणामुळे होतो ?
याच टी.व्ही.मुळे ना ?
हल्लीची पिढी फार हुषार आहे, असे आपण वारंवार का म्हणतो ?
हा निसर्गातील बदल आहे का ?
नाही.
टी.व्ही.चा वाढता वापर हेच यामागचे मुख्य कारण आहे.

२) इंटरनेट हा माहितीचा सगळ्यात मोठा खजिना आहे, पण आजही इंटरनेट खेड्यापाड्यांत पोहोचलेले नाही किंवा सगळ्यांना त्याचा वापर करता येत नाही.
पण टी.व्ही.चे तसे नाही.
आज प्रत्येक घरात टी.व्ही. आहे, प्रत्येकाला तो हाताळता/चालवताही येतो, त्यामुळे टी.व्ही. हाच माहितीचा सगळ्यात मोठा Easy to access खजिना आहे, असे म्हणावे लागेल.

३) टी.व्ही.मुळे मुलांनी मैदानी खेळ खेळायचे सोडून दिले, असे आपण नेहमी म्हणतो.
अहो, पण आज मैदाने आहेतच कुठे ?
आणि भारत तर ठरला क्रिकेटवेडा देश, मग मुलांनी घरात क्रिकेट खेळलेलं चालेल का तुम्हाला ?
टी.व्ही.वर बुद्धीला चालना देणारे बरेच खेळ असतात, मुलांनी थोडावेळ ते खेळले तर काय बिघडलं ?

४) २४ तास सुरू असलेल्या वृत्तवाहिन्यांमुळे आपल्याला घरबसल्या कळतं की आपल्या आजूबाजूला काय चालले आहे.
सध्याच्या अपडेटेड युगात आपल्याला मागे पडून चालणार नाही.
आणि अपडेटेड राहायचं असेल तर टी.व्ही.ला पर्याय नाही.


एका नावाजलेल्या चॅनलच्या, नावाजलेल्या कार्यक्रमामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे.
प्रॉब्लम्स तो है सबके साथ । बस नजरीये की है बात ।sembah

आपला दृष्टिकोन महत्त्वाचा.
आपण ज्या रंगाच्या चष्म्याने जगाकडे बघू, जग आपल्याला त्याच रंगाचं दिसेल.

म्हणून मी माझ्या या मतावर ठाम आहे की, बागवान समाजाचा हेतू चांगला असला तरी त्यांचा उपक्रम मात्र नक्कीच स्तुत्य नव्हता.

Friday, August 6, 2010

धन्यवाद ई-सकाळ.

मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे.
सहस्त्रकुंडचा धबधबा’ या आपल्या मागच्याच ब्लॉगपोस्टला ई-सकाळने त्यांच्या ‘फोटो फीचर’ या सदरामध्ये जागा दिली आहे. (5 August 2010)

E-Sakal :- http://www.esakal.com/esakal/20100805/4771680647032254495.htm
आपला ब्लॉगपोस्ट :-http://nandedians.blogspot.com/2010/08/blog-post.html


गे मातृभाषे तुझे मी फेडीन पांग सारे..’ हा ब्लॉगपोस्टसुद्धा ई-सकाळच्या ‘फीचर्स’मध्ये प्रकाशित झाला आहे. (5 August 2010)

E-Sakal :- http://72.78.249.124/esakal/20100805/4712705764724752231.htm
आपला ब्लॉगपोस्ट :- http://nandedians.blogspot.com/2010/03/blog-post_28.html


ई-सकाळने ‘माझा ऍंगल’ या सदरात मागच्या आठवड्यासाठी ‘कावळा’ हा विषय ठेवला होता, त्यात मी फोटो काढलेल्या एका 'नादेंडीअन' कावळ्याने स्थान पटकावले आहे. jelir (2 August 2010)



खोल जंगलात, आंतरिक समाधानात हरवलेला, ध्यानात मग्न झालेला, जटाजूट धारण केलेला, लांब दाढी वाढलेला हा ऋषीच जणू! उगाच नाही वडाला, वटवृक्ष म्हणत!
http://www.esakal.in/ar/220810_maza_angle.aspx



यापूर्वीसुद्धा ई-सकाळने ‘राहेर’वरील माझ्या माहितीवजा लेखाला प्रसिद्धी दिली होती. (21 October 2008)

आपला ब्लॉगपोस्ट :- http://nandedians.blogspot.com/2008/10/blog-post_19.html


रानफुले लेऊन सजल्या हिरव्या वाटा (19-09-2010)
http://72.78.249.124/esakal/20100919/4802356899225169331.htm


तुम्हालासुद्धा तुमच्या कथा, कविता, मजेशीर अनुभव किंवा फोटोज ई-सकाळसोबत शेअर करायच्या असतील तर तुम्ही ते webeditor@esakal.com या E-mail ID वर पाठवू शकता.


नवोदित फोटोग्राफर्स, लेखक, कवी इत्यादींना आपली कला, आपले लेखन सादर करण्यासाठी E-sakal ने ही एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.
ज्यांचे फोटो, लिखाण प्रकाशित झाले आहेत त्यांना तर यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. senyum

माझ्यासारख्या नवशिक्या फोटोग्राफरच्या फोटोज, लेख ई-सकाळने छापल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. cium

Tuesday, August 3, 2010

सहस्त्रकुंड धबधबा

सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे.
धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात मोडतो तर पलीकडचा भाग यवतमाळ जिल्ह्याच्या (विदर्भ) उमरखेड या तालुक्यात येतो.

पावसाळ्यात हा धबधबा अधिक खुलून तर येतोच शिवाय पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांच्या गर्दीनेही फुलून जातो.
पण इतक्या सुंदर पर्यटनस्थळीसुद्धा पर्यटकांसाठी कसल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीयेत हे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल. (मराठवाड्यात अनेक प्रेक्षणीय पर्यटनस्थळं आहेत, पण पर्यटकांसाठी सोयी-सुविधा फारच क्वचित ठिकाणी आढळून येतात.)

सहस्त्रकुंड धबधबा नांदेडपासून अवघ्या १०० किलोमिटर अंतरावर आहे.


या वर्षी चांगला पाऊस होत असल्यामुळे धबधब्यातून कोसळणारी धार खूप मोठी झाली आहे.


मुसळधार पावसामुळे अजस्त्र बनलेला, स्वतःला खोल दरीत झोकून देऊन तुषारांचे वैभव निर्माण करणारा सहस्त्रकुंडचा धबधबा :-


मोठ्या आकारात पाहण्यासाठी प्रत्येक फोटोवर क्लिक करा.



Friday, July 30, 2010

‘बाभळी’चे काटे रूतले.

पोटनिवडणुक डोळ्यापुढे ठेवून केलेला बाभळीचा स्टंटसुद्धा चंद्राबाबूंना वाचवू शकला नाही.
चंद्राबाबूच्या मोहर्‍यांना त्यांचं डिपॉजीटसुद्धा वाचवता नाही आलं. ihikhik
या स्टंटमुळे सहानुभूतीची लाट येईल असे चंद्राबाबूंना वाटले होते, पण महाराष्ट्राच्या पाण्यात आहेच अशी ताकद की भल्या-भल्यांना या लाटेचा तडाखा खावा लागतो. encem
आता गोदावरीत येऊन पापक्षालन करा म्हणावं त्यांना.sengihnampakgigi

Sunday, July 25, 2010

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !


तुम्हां सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या हातून गुरूंची सेवा घडत राहो आणि त्याच गुरूंच्या आशिर्वादांमुळे तुमचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो अशी प्रार्थना.

Thursday, July 22, 2010

पाऊस परतला.


काही दिवस दडी मारून बसलेला पाऊस आज परत विजांच्या प्रचंड कडकडाटात धो-धो बरसतोय.



Tuesday, July 20, 2010

ड्रामा कंपनी आता औरंगाबादला

ड्रामा कंपनीचा मुक्काम आता धर्माबादमधून हलला असून त्यांची पालं आता औरंगाबादच्या फाईव्ह स्टार जेलमध्ये पडणार आहेत.
तसं तर त्यांना कालच औरंगाबाद जेलमध्ये हलवण्याचे ठरले होते आणि सगळा तसा बंदोबस्तही झाला होता पण चंद्राबाबूंनी A.C. गाडीसाठी अक्षरशः जमिनीवर लोळण घेतली होती.
आज महाराष्ट्र सरकारने ५०,००० रूपये खर्च करून एक स्पेशल AC बस मागवली होती.
थोड्याच वेळापुर्वी चंद्राबाबूंना त्यांच्या समर्थकांसह औरंगाबाद जेलकडे रवाना करण्यात आले आहे
आजही चंद्राबाबू आणि त्यांचे समर्थक जागेवरून हलायला तयार नव्हते पण पोलीसांना बळाचा उपयोग करून त्यांना बसमध्ये बसवले.

तत्पूर्वी चंद्राबाबूंच्या काही आमदार/खासदार समर्थकांनी पोलीसांशीच धक्काबुक्की केली होती.
शेवटी परीस्थीती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच (आणि इतर कोणताही पर्याय उरला नव्हता म्हणून) पोलीसांना चंद्राबाबू समर्थकांवर सौम्य लाठीमार करावा लागला.
या लाठीमाराचा थोडासा प्रसाद खोट्य़ा बातम्या पसरवणार्‍या आंध्रातल्या मिडीयावाल्यांनासुद्धा मिळाला.tepuktangan

या नौटंकी कंपनीने महाराष्ट्र सरकार आणि पोलीसांवर अनेक खोटे आरोप केले, जसे की ‘आम्हाला चांगले जेवायला दिले जात नाहीये’, ‘पिण्याच्या पाण्याची सोय नाही’, ‘AC नाही’, वगैरे वगैरे.
पण ‘स्टार माझा’चे पत्रकार श्री. योगेश लाठकर आणि श्री. राहूल कुलकर्णी यांनी या बातमीला योग्य ते कव्हरेज मिळवून दिले आणि सत्य परिस्थीती सगळ्यांपुढे आणली.sembah

बघुयात आता पुढे काय होते ते....


ता. क. :- २० जुलै २०१० (३:१९ PM)
थोड्या वेळापूर्वी आंध्र-महाराष्ट्र सिमेवर तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांवरच हल्लाबोल केला.
काचेच्या बाटल्या आणि दगडफेकीत ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सौजन्य :- झी २४ तास।


ता. क. :- (९:४९ PM) २१ जुलै २०१०

चंद्राबाबूंना अक्षरशः हाकललं. (स्टार माझा)

चंद्राबाबूंना काल नांदेडहून औरंगाबादला नेल्यानंतरची ही बातमी.

बाभळी बंधा-याच्या मुद्द्यावरुन महाराष्टात घुसखोरी करणारे आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची अखेर हैदराबादला रवानगी करण्यात आलीय.
त्यांना हैदराबादला पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं त्यांच्यावरचे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत चंद्राबाबूंची नाटकं सुरुच होती. बाबूंना हैदराबादेत धाडण्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करण्यात आली असताना त्यांनी विमानात बसण्यास नकार दिला. अखेर महाराष्ट्र सरकारनं त्यांना जबरदस्तीनं विमानात बसवलं आणि हैदराबादला रवाना केलं.
त्याआधी घुसखोऱी करणा-या चंद्राबाबूंच्या विरोधातले सगळे गुन्हे मागे घेण्यात आलेत. राज्य सरकारनं निर्देश दिल्यानंतर नांदेडच्या एसपी आणि कलेक्टरनं यासंदर्भातलं शिफारसपत्र मॅजिस्ट्रेटपुढे सादर केलं. स्वताच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रशासनास वेठीस धरु पाहणा-या चंद्राबाबूंचा खेळ तूर्तास थांबणार आहे।



P. S. :- 21 July 2010 7:04 PM

तेलगु तर तेलगु, पण आता हिंदी/इंग्रजी न्युज चॅनल्ससुद्धा चंद्राबाबू नायंडूची बाजू घेत आहेत.
ह्याला प्रांतवाद नाही म्हणत का ?
marah

http://www.youtube.com/watch?v=beL4aabWNUA