Tuesday, June 22, 2010

किंगफिशरचा विमान अपघात टळला.


२२-०६-१०
Source :- दैनिक `उद्याचा मराठवाडा'


विमानतळाच्या आसपास मांसविक्रीची दुकाने असू नयेत असा एक नियम आहे, पण नांदेड विमानतळाच्या सभोवताली अशी अनेक दुकानं आहेत हे आपल्याला माहित आहे.
साहजिकच या दुकानांतून बाहेर पडलेल्या मांसाच्या तुकड्यांकडे अनेक पक्षी आकर्षित होतात.
मग भविष्यात या कारणाने एखादा मोठा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण ?sedih

Saturday, June 19, 2010

कृत्रिम पाऊस.

नमस्कार मित्रांनो.
अनेक दिवसांपासून मी आपल्या डॉ. राजा मराठे (‘आपल्यायासाठी की ते नांदेडीअन आहेत.) आणि त्यांच्या संशोधनावर लेख लिहायचा विचार करत होतो, पण या ना त्या कारणाने ते राहूनच गेले.
आजच्या सकाळमध्ये अभय कुळकजाईकर सरांनी याच विषयावर एक लेख लिहीलाय, तोच इथे देतो.


डॉ. राजा मराठे यांनी सुरू केलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग सगरोळी (ता. बिलोली) येथे गुरुवारी (ता.17) यशस्वी झाला.
प्रयोगानंतर वीस तासांनी म्हणजेच शुक्रवारी (ता. 18) दुपारी या भागात पावसाने हजेरी लावल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

'सकाळ सोशल फाऊंडेशन'च्या वतीने डॉ. मराठे यांनी सगरोळी, नायगाव परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू केला आहे.
सगरोळीत संस्कृती संवर्धन मंडळाच्या सहकार्याने गुरुवारी (ता. 17) दुपारी चारच्या सुमारास सगरोळी येथे जवळपास दोन तास हा प्रयोग केला.
या प्रयोगानंतर दोन ते बहात्तर तासांच्या आत पाऊस पडेल, असे डॉ. मराठे यांनी सांगतिले.
अपेक्षेनुसार दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रयोगाच्या वीस तासांनंतर पावसाच्या सरी कोसळल्या.

या प्रयोगासाठी दोनशे लिटर क्षमतेची लोखंडी टाकी, त्यावर लोखंडी जाळी यात हवा जाण्यासाठी तयार केलेली नळी होती.
टाकीमध्ये जळण म्हणून लाकडाचे तुकडे, भुशाच्या विटा टाकण्यात आल्या.
त्यावर रॉकेल टाकून ते पेटवले.
चांगले पेटावे म्हणून बाहेरून भात्याने जोरात हवा दिली. जाळ चांगला पेटल्यानंतर टाकीमध्ये मीठ टाकण्यात आले.
साधारण दोन तासांच्या या प्रयोगात तीन ते चार किलो बारीक मीठ तर जवळपास दहा किलो मीठाचे तुकडे टाकण्यात आले.
धुराबरोबर मीठाचे सूक्ष्म कण आकाशात जातात.
पाऊस पडण्यासाठी ढगामधील पाण्याचे छोटे, मोठे थेंब एकमेकांकडे आकर्षित होणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उत्प्रेरकाची गरज असते.
मीठाचे सूक्ष्म कण उत्प्रेरकासारखे काम करतात ढगातील पाण्याचे थेंबात रूपांतर होते, असे डॉ. मराठे म्हणाले.

हा प्रयोग करण्यासाठी आकाश ढगाळ असणे, आद्रर्ता अधिक असणे आणि वारा नसणे आवश्यक असते.
हा प्रयोग केल्यानंतर डॉ. मराठे यांच्या अपेक्षेनुसार दोन ते बहात्तर तासांत पाऊस पडणे आवश्यक आहे.
सगरोळी येथे प्रयोगानंतर मध्यरात्री दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या.
एका वरुण यंत्राद्वारे हा प्रयोग केल्यास चार किलोमीटर परीघ क्षेत्रावर म्हणजे एका गावावर पाऊस पडेल, असे डॉ. मराठे यांनी सांगितले.

लोखंडी टाकीपासून तयार केलेल्या यंत्रापेक्षा कमी खर्चिक यंत्र म्हणून विटांनी तयार केलेल्या हौदाचा प्रयोग येथे करण्यात आला.
दोनशे विटा घेऊन चार बाय चारचा हौद करून त्यात संविधा जाळण्यात आल्या त्यात मीठ टाकण्यात आले.
हा प्रयोग प्रत्येक शेतकरी करू शकतो.
गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
डॉ. राजा मराठे यांच्या अल्पखर्चिक वरुण यंत्राची माहिती "सकाळ'ने प्रकाशित केल्यानंतर संस्कृती संवर्धन मंडळाने हा प्रयोग करण्याचे ठरविले होते.
परिसरातील शेतकऱ्यांसाठी गेल्या 50 वर्षांपासून ही संस्था कार्य करीत असून, शेतकऱ्यांसाठी डॉ. मराठे यांच्या मार्गदर्शनाने कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.


...असा पाडावा पाऊस
कृत्रिम पावसाचा हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी उंबर, पिंपळ, वड, आंबा, पळस या चिकाची झाडे असलेल्या संविधा जाळाव्यात, त्यात भुशाच्या विटा टाकल्यास वातावरणात कार्बन तयार होतो.
मीठाऐवजी नवसागर टाकल्यास अधिक चांगले.
यात वाफेला शोषून घेणारे घटक आहेत.
नवसागरामुळे बाष्पीभवन होते ढगातील पाण्याचे थेंबात रूपांतर होते, असे डॉ. मराठे यांनी सांगितले.


डॉ. राजा मराठे यांच्या वरूणयंत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.




Tuesday, June 15, 2010

घन ओथंबून येती.

व्वा, काय पडला पाऊस !
मनसोक्त भिजलो बुवा.

दोन दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत होत्या की ’सगळा मराठवाडा भिजला’, ’मराठवाड्यात जोरदार पाऊस’ वगैरे पण नांदेडमध्ये पाऊसच पडत नव्हता.
मान्सून मराठवाड्यात तसा ११ जूनलाच दाखल झाला होता.
परभणी, औरंगाबाद, बीड, हिंगोली इथे जोरदार पाऊस पडत होता पण नांदेडकरांना अजून पावसाचे दर्शन झाले नव्हते.

फक्त नांदेडवरच निसर्गाची अवकृपा झाली की काय अशी भिती वाटायला लागली होती कारण आकाशात काळे ढग तर जमून यायचे पण त्याच वेळी जोर्‍याचा वारा सुटून त्या ढगांना आपल्यासोबत घेऊन जायचा. :-(
पण सुदैवाने आज तसे झाले नाही.
सकाळपासूनच ढगांनी गर्दी केली होती आकाशात आणि आत्ता ५.१५ च्या सुमारास तो बरसलाच अन्‌ तेही मनसोक्त. :-)

आता मान्सून सगळ्या मराठवाड्यात सक्रीय झाला असे म्हणायला हरकत नाही.


ता. . :- २८ जून २०१० १०.५१ AM
पडला बुवा काल पाऊस मस्तपैकी.
१३ दिवसांनंतर पडला पाऊस.
काय झालंय पावसाला ?soal


ता. क. --> २८ जून २०१० 4:18 PM
मस्त, जोरदार पाऊस पडतोय बाहेर.menari


ता. क. --> १ जुलै २०१० 4:26 PM
गेल्या ४ दिवसांपासून थोडी थोडी विश्रांती घेऊन दमदार पाऊस पडतोय नांदेडात.tepuktangan
आज तर थोडा मनसोक्तच बरसतोय.
गेला तासभर जोरदार पाऊस पडतोय.
जून महिण्याची सगळी कसर जुलैमध्ये भरून काढणार बहुतेक वरूणराजा.

Sunday, June 6, 2010

बागवान समाजाने टीव्ही संच फोडले !


दूरचित्रवाणीमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, ती शिक्षणात मागे राहतात, या भावनेतून शहरातील बागवान जमातीतील ५० ते ५५ कुटुंबांनी आज रस्त्यावर सामूहिकपण ‘टीव्ही.’ संच फोडले.
मुस्लिमबहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देगलूर नाका व परिसरात बागवान जमात मोठय़ा प्रमाणावर वास्तव्यास आहे.
या जमातीची एक पंच समिती आहे.
समाजातील बिघडत चाललेले वातावरण, वाढता व्यभिचार, शिक्षणात होणारे दुर्लक्ष या पाश्र्वभूमीवर पंच समितीमध्ये गेल्या आठवडय़ात विस्तृत चर्चा झाली.

‘टीव्ही.’मुळे मुले-मुली शिक्षणात मागे राहत आहेत, वेगवेगळ्या मालिकांमुळे त्यांच्यावर वाईट संस्कार होत आहेत. शिवाय व्यभिचार वाढत चालला आहे.
आई-वडील दिवसभर कामात गुंतल्याने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या ‘टीव्ही.’मुळे पाल्य शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
अनेक मालिकांमुळे कौटुंबिक कलह निर्माण होत आहेत, अशा सर्व बाबींवर चर्चा झाली.
त्यानंतर या जमातीच्या प्रमुखांनी घरातील ‘टीव्ही.’ फोडून टाकण्याचे ठरवले.

कोणत्याही परिस्थितीत घरी ‘टीव्ही.’ ठेवायचा नाही, असा निर्णय झाल्यानंतर आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या जमातीतील ५०-५५ कुटुंबांनी कापूस संशोधन केंद्रासमोर एकत्र येऊन आपल्या घरातील ‘टीव्ही.’ संच फोडून टाकले.
अचानक घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
‘काय झाले ? कशामुळे ?’ हे प्रश्न अनुत्तरित असतानाच काही वेळात सर्व चित्र स्पष्ट झाले.

‘टीव्ही.’मुळे होणाऱ्या दुष्परिणामांची इतरांना माहिती व्हावी या उद्देशाने जमातीने पुढाकार घेऊन हे कृत्य केल्याचे समाजाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
व्यावसायिक ठिकाण, खासगी कार्यालये येथे ‘टीव्ही.’ लावण्यास आमचा विरोध नाही, पण घरात ‘टीव्ही.’ असू नये, अशी आमची भूमिका आहे.
त्याला सर्वानी प्रतिसाद द्यावा.
समाजव्यवस्था बिघडण्यास ‘टीव्ही.’ कारणीभूत आहे, अशी आमची धारणा झाल्याने आम्ही आजचा प्रकार केला. आमच्या कृत्याला प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


:: Source ::
Loksatta



-सकाळच्या वेबसाईटवर या बातमीवर अनेकांनी कमेंट केले आहेत.
त्यापैकी 'नांदेडीअन' नावाने कमेंट करणार्‍या एका व्यक्तीचे मत लक्षात घेण्यासारखे आहे.

ते म्हणतात, "Donation of these TV s to any organization was a good option. Its duty of MA NA PA to charge them fine for the e wastage on public land. This action is showing similarities with taliban style."