Sunday, April 13, 2008

नांदेड उत्सव मेला

बच्चेकंपनीसाठी अजुन एक खुषखबर.

राजमहल सर्कस पाठोपाठ नांदेडमधे आता 'नांदेड उत्सव मेला' चे आयोजन होत आहे.

उत्सव मेलासाठी कंपनीने एयरपोर्ट रोडवर हॉटेल नागार्जुनापुढे जागा घेतली आहे.

बच्चेकंपनी आणि काही प्रमानात का होइना पण मोठ्यांसाठीसुद्धा ह्या उन्हाळी सुट्ट्या सत्कारणी लावन्याचा चांस मिळाला आहे.

Thursday, April 10, 2008

राजकमल सर्कस

प्रसिद्ध राजकमल सर्कस नांदेड येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सोमवार १४ एप्रिल२००८ पासुन सुरु होत आहे. (नवा मोंढा)
ह्या सर्कसचा या अगोदरचा मुक्काम नागपुर येथे होता. (२३-१२-२००७)

तर मग काय नांदेडीअन्स, लुटनार ना मग सुट्ट्यांमधे सर्कसची मजा ?








Monday, April 7, 2008

नंबरप्लेटची गाथा !

कोणत्याही गाडीवर नंबर प्लेट असणे किती महत्त्वाचे असते हे तुम्हाला खालील छायाचित्रावरून कळेलच.


ही गाडी बहुतेक परग्रहावरुन आली असावी कारण गाडीला नंबरप्लेटचं नाहीये.
आत्ता बोला !

हां, नंबरप्लेटच्या जागेवर माननीय सोनीया गांधी आणि माननीय अशोकराव चव्हाण मात्र दिमाखदारपणे विराजमान झालेले दिसुन येत आहेत.


पुन्हा तेच !!!




~~देवालाच माहित की नांदेडमधे अशा किती गाड्या फिरत आहेत.~~

Friday, April 4, 2008

भूकंपामुळे घाबरू नका, काळजी घ्या !

भूकंपापूर्वी काळजी घ्या!
भूकंप कधी होईल हे सांगता येत नाही. त्याच्या वेळेबाबत निश्‍चित अनुमान काढण्याइतपत शास्त्राची प्रगती झालेली नाही. त्यामुळे भूकंपाला घाबरून जाऊ नका, परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे आवाहन महात्मा गांधी मिशनच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले.

नातेवाईकांचे पत्ते, दूरध्वनी जवळ ठेवा
नागरिकांनी घरात दोन, तीन दिवस पुरेल एवढे टिकाऊ खाद्यपदार्थ, बॅटरी, अतिरिक्त सेल, प्रथमोपचाराचे साहित्य, औषधी, पाणी, काही रोख रक्कम या वस्तू कुटुंबातील सर्वांना माहिती असतील अशा जागी ठेवाव्यात. घरातील उंच ठिकाणी वजनदार व काचेच्या वस्तू ठेवू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत संपर्काचे व शाळेत जाणाऱ्या मुलांच्या भेटीच्या विशिष्ट जागेचे नियोजन करून ठेवावे. जवळच्या मित्र व नातेवाईकांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक याची माहिती कुटुंबातील प्रत्येकाकडे लेखी स्वरूपात द्यावी.

स्वत-वरील उपचारानंतर इतरांना मदत करा
भूकंपानंतर स्वत- जखमी झाला असाल तर आधी आपल्यावर उपचार करा. त्यानंतर इतरांना मदत करावी व जखमींना प्रथमोपचार द्यावेत. प्रसारमाध्यमांद्वारे आलेल्या सूचनांची व उपाययोजनांची माहिती करून घ्यावी, मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्यास आगपेटीची काडी ओढू नये त्याऐवजी शिट्टी वाजवावी अथवा कोणताच पर्याय नसल्यास ओरडावे. नाकावर व तोंडावर रुमाल ठेवावा. प्रशासनाकडून सूचना मिळण्यापूर्वी पडलेल्या इमारतीकडे जाऊ नये.

विजेच्या तारांपासून सावध रहा -
भूकंपाचा कालावधी हा अत्यल्प असतो, त्यामुळे चार-पाच पावले टाकावी लागणार असतील तरच घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा टेबल, पलंग, पक्का दरवाजा याखाली अथवा सिमेंटच्या कॉलमजवळ जिथे वजनदार वस्तू पडणार नाहीत, अशा ठिकाणी डोक्‍यावर हात ठेवून बसावे. काचेच्या खिडक्‍यांपासून दूर राहावे. भूकंपानंतर आणखी धक्के बसण्याची शक्‍यता असल्याने पडलेल्या इमारती व विद्युत तारांपासून सावध राहावे. लिफ्टचा वापर करू नये, त्याऐवजी जिन्याचा वापर करावा. गडबडीत पळत बाहेर येऊ नये. वाहनात असाल तर वाहन थांबवून वाहनातच बसून राहावे. घराचे बांधकाम करताना वास्तुशास्त्रज्ञांकडून घराचा आराखडा तयार करून आणि महापालिकेची परवानगी घेतल्याशिवाय घराचे बांधकाम करू नये. काही घरे, इमारती पडण्याचा धोका असेल तर त्याची माहिती प्रशासनास कळवावी.

भूकंपरोधक घराची बांधणी हवी
भविष्यातील भूकंपापासूनचा धोका टाळण्यासाठी भूकंपविरोधक घरे बांधण्यासाठी नागरिकांचे व बांधकाम कारागिरांचे प्रबोधन करणे काळाची गरज आहे. घराची दुरुस्ती, मजबुतीकरण व पुनर्बांधणीसाठी जनतेला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. किल्लारीच्या भूकंपानंतर भूकंपप्रवण घरांना भूकंपरोधक करण्यासाठी त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण व पुनर्बांधणी तांत्रिकदृष्ट्या शक्‍य करून अनुदान देण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या अनुदानातून अनेकांनी आपली घरे भूकंपरोधक करून घेतली आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा राज्यातील भूकंपप्रवण जिल्ह्यातील घराचे सर्वेक्षण करून त्याला भूकंपरोधक करण्यासाठी घर दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी शासनाने अनुदान योजना जाहीर करावी व त्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय स्तरावर समिती स्थापन करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
अग्निशमन केंद्र - १०१, २५२५५५
नियंत्रण कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय) - २३५०७७
नियंत्रण कक्ष (पोलिस अधीक्षक कार्यालय) - १००, २३४७२०
नियंत्रण कक्ष (महापालिका कार्यालय) - २३४४६१
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय - १०२, २३५७११.

~!~ भुकंप पुन्हा सुरू ~!~

मागील काही महिन्यांपासून बंद झालेले भुकंपाचे धक्के आता पुन्हा सुरु झाल्यामुळे नागरिकांमधे परत दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

आज सकाळी (
Friday, April 4, 2008 ) नांदेड शहराला ६ वाजून ५० मिनिटाला भुकंपाचा चांगला मोठा धक्का जाणवला.
नांदेडमधे आजपर्यंत झालेल्या भुकंपामधे हा सगळ्यात जास्त वेळ जाणवलेला धक्का होता.
पण या भुकंपाच्या धक्क्याची व्याप्ती कुठ्पर्यंत होती हे मात्र कळु शकले नाही.

मागच्या वर्षीसुद्धा थांबलेली भुकंपाची मालिका एप्रील महिन्यातच परत सुरु झाली होती.
यावरुन असा अंदाज लावता येईल की उन्हाळ्यात जेव्हा जमिनीतील पाण्याची पातळी कमी होते, तेव्हा जमिनीला लहान-मोठ्या भेगा पडतात आणि जेव्हा या भेगा पडतात तेव्हा भुकंपाचे असे छोटे-मोठे धक्के जाणवत असतात.


भुकंपाचे भाकित करणे तर आपल्या हाती नाही, त्यामुळे भुकंपादरम्यान आपला बचाव कसा करता येईल याच्या काही टिप्स मी पुढच्या टॉपिकमध्ये देईन.