Monday, December 29, 2008

रात्रीचे भारनियमन रद्द !!!

होय, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण ही बातमी १००% खरी आहे.
विज-वितरण कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नांदेड शहरातील रात्रीचे भारनियमन कमी केले आहे.
पण विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारनियमन तर करावे लागेल ना !
त्यासाठी विज-वितरण कंपनीने सकाळी ५.३० ते ८.३० आणि दुपारी १ ते ३ ही वेळ भारनियमनासाठी निश्चित केली आहे.

पण आमच्यासारखे जे बी.एस.एन.एल. ब्रॉडबॅंडच्या (होम ५०० प्लॅनचे) ग्राहक आहेत त्यांची मात्र फार मोठी पंचाईत होणार आहे.
कारण या प्लॅनमध्ये रात्री २ ते सकाळी ८ असे Happy Hours ठरविण्यात आले आहेत.
या वेळेमध्ये तुम्हाला बिलाची आकरणी होत नाही.
रात्री २ वाजता जागरण करण्यापेक्षा सर्व ग्राहक सकाळी ४-५ ते सकाळी ८ या ३ तासांना इंटरनेट वापरण्याची पर्वणीच समजतात.

पण विज-वितरण कंपनीच्या या वेळामुळे आता आमची चांगलीच पंचाईत होणार आहे.

जाउ देत.
कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है

एकंदरीत मुख्यमंत्री आपल्या नांदेडचे असल्यामुळे आपल्याला फायदा झाला असे म्हणावे का ?


ता.क. :- भारनियमनाची वेळ पुन्हा बदलली आहे.

Friday, December 26, 2008

जनतेच्या न्यायालयात आज 'कसाब'ला फाशी

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याला दि. २६ डिसेंबर ०८ रोजी भाजपाच्यावतीने जनतेच्या न्यायालयात राष्ट्रप्रेमी जनतेची मते जाणून घेवून प्रतिकात्मक फाशी दिली जाणार आहे.
यावेळी राष्ट्रप्रेमी जनतेने उपस्थीत राहावे असे आवाहन भाजपाचे शहर अध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी केले आहे.

मुंबईवर हल्ला करून शेकडो निरपराध लोकांना तसे़च पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारणाऱ्यापैकी एक अतिरेकी अजमल कसाब हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.
त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे.
राष्ट्रप्रेमी जनतेच्या मनातील वेदना ऐकून घेताना कसाबवर जनता न्यायालय भरवून खटला चालवला जाणार आहे.

जूना मोंढा भागात हा कार्यक्रम होणार आहे.
सकाळी ११ वाजल्यापासून या जनता न्यायालयाच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे.
राष्ट्रप्रेमी जनता, भाजपाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाश कौडगे यांनी केले आहे।


दैनिक प्रजावाणी
शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २००८
Friday, December 12, 2008

मुख्याध्यापिकेकडून शाळेतच प्रियकराचा गोळ्या घालून खून !

नांदेड - नांदेडच्या तरोडा बुद्रुक शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेतच आपल्या प्रियकराचा गोळ्या घालून खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; ज्ञानेश्‍वरी फड असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून तिचे व शीलानंद कांबळे या युवकाचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोन वर्षांपूर्वी शीलानंदने ज्ञानेश्‍वरीवर चाकू हल्ला केला होता. त्या प्रकरणात त्याची रवानगी नाशिक येथील तुरुंगात करण्यात आली होती.

शुक्रवारी तो जामिनावर सुटल्यानंतर थेट शाळेत गेला. त्याच्या हातात शस्त्र होते. तो आपल्यावर हल्ला करणार या भीतीने ज्ञानेश्‍वरीने त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यात तो जागीच ठार झाला. हा प्रकार घडला त्यावेळी शाळेचे वर्ग सुरू होते. स्वसंरक्षणासाठी तिने रिव्हॉल्व्हरचा परवाना घेतला होता. तिनेच भाग्यनगर पोलिसांना दूरध्वनी करून हा प्रकार कळविला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.


---ई-सकाळ

Wednesday, December 10, 2008

मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले ई-गव्हर्नर

राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी आपल्या कार्यकुशलतेची व लोकाभिमुख नेतृत्वाची झलक दाखविण्यास सुरूवात केली आहे.

राज्यातील कोणताही नागरिक आता त्यांच्याशी ई-मेल करून संवाद साधू शकतो आणि आपल्या सुचना किंवा तक्रारी त्यांच्यापुढे मांडू शकतो.


लोकांच्या मनात सरकार आणि प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न, सूचना मुख्यमंत्र्यांना थेट पाठवता याव्यात यासाठी चव्हाण यांनी नवा ईमेल तयार केला आहे.


ashokchavanmind@rediffmail.com

असा पत्ता त्यांनी मीडियामार्फत मंगळवारी राज्यभरात पाठवला.


अशोकराव चव्हाण यांचा या माध्यमातून राज्यातील जनमाणसांची प्रतिमा जाणून घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
शासनाचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राज्याचे माहिती व जनसंपर्क खात्यात काही बदल करून ते सक्षम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा ई-मेल आय.डी. राज्यातील जनतेला देवून 'हायटेक' नेतृत्वाची झलक दाखविली आहे.
आणि त्यांच्या ह्या कृतीद्वारे त्यांनी लोकांपुढे ई-गव्हर्नन्सची संकल्पना मांडली आहे.

-- सत्यप्रभा

मुख्यमंत्रीपदी अजूनही श्री. विलासराव देशमुख ?

महाराष्ट्र राज्याचे नविन मुख्यमंत्री माननीय श्री. अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेवून दोन दिवस उलटले तरीही महाराष्ट्र सरकारच्या अधिकारिक संकेतस्थळाने श्री. विलासराव देशमुख यांनाच मुख्यमंत्रीपदी बसविले आहे.

तुम्ही महाराष्ट्र सरकारचे अधिकारिक संकेतस्थळ उघडून पाहाल तर तुम्हाला अजूनही
(१०-१२-२००८. दुपारी १२ वाजता)
तिथे मुख्यमंत्री पदावरती श्री. विलासराव देशमुखच असलेले दिसतील.


महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ उघडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://maharashtra.gov.in/english/government/index.php?rep_type_id=1


एकिकडे महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेत आहे असे चित्र रंगविन्यात येते आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळच ईतके आळशी झाले आहे की ते दोन दिवसात एकदाही अपडेट झालेले नाही.


Monday, December 8, 2008

नांदेडचे श्री. अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
नांदेडच्या सर्व जनतेसाठी हा आनंदाचा क्षण आहे.
कै. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर जिल्ह्याला पुन्हा एकदा नेतृत्त्वाची संधी मिळाली आहे.

खरं तर कालच अशोकराव चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर मी त्यांचे अभिनंदन केले होते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा मी त्यांना लवकरच मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या, तेव्हा ते गालातल्या गालात हसले होते.
माझ्यासह सर्वांनाच अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे वाटत होते.

त्रिशताब्दी सोहळ्यातील विकासकामांची व कार्यक्रमांच्या आयोजनाची मूळ संकल्पना ही त्यांचीच होती.
यानिमित्ताने सोनिया गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांसह अनेक बड्या नेत्यांनी त्यांचे काम जवळून पाहिले, त्यामुळे त्यांचे देशपातळीवर कौतुक झाले.


अशोकराव अत्यंत स्वच्छ मनाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांना माणसांची पारख आहे, दिलेला शब्द ते पाळतात, अशा कितीतरी गोष्टी अशोकरावांबद्दल सांगता येतील.
अशोकराव व्यवस्थापन शास्त्राचे पदवीधर असल्याने त्यांना विकासाचा आराखडा तयार करणे अधिक सोपे जाईल.
वडिलांचा वारसा व आईचा अशिर्वाद सोबत घेऊन ज्या दिशेने अशोकराव निघाले आहेत, त्या मार्गावर ते कधिच चाचपडणार नाहित. उलट अधिक गतिमान होवून महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतील.


केवळ नांदेडकरांचा विकास होईल असे म्हनणे संकुचितपणाचे ठरेल, त्यामुळे सबंध राज्यात ते आपला प्रभाव पाडतील असा विश्वास वाटत आहे.
संघटनकौशल्य व अभ्यासूवृत्तीमुळे ते भरीव कामगिरी करतील. ज्याप्रमाने शंकरराव जलसंस्कृतीचे जनक ठरले, तसेच अशोकराव औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवतील.

साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची त्यांना जाण आहे.
अखिल भारतीय नाट्यसंमेलन असो की लोकोत्सव त्यांनी ही चळवळ अधिक पोषक केली.
अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याचाही त्यांचा मानस आहे.

( प्राचार्य डॉ. सुरेश सावंत )श्री. अशोक शंकरराव चव्हाण यांचा परिचय :

जन्म तारीख : २८ ऑक्टोबर १९५८

जन्म ठिकाण : मुंबई

कौटुंबिक माहिती : पत्नी श्रीमती अमिता, दोन मुली

शिक्षण : बी.एससी., एम.बी.ए.

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी

पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)

मतदार संघ : १७१-मुदखेड, जिल्हा नांदेड

व्यवसाय : शेती व व्यापार

इतर माहिती : अध्यक्ष, शारदा भवन शिक्षण संस्था, नांदेड या संस्थेमार्फत आर्टस्, कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज, विधी महाविद्यालय, फार्मसी, संगणक प्रशिक्षण, बी.एड.कॉलेज अशा एकोणीस शाखा सुरू केल्या, या संस्थेस राज्य शासनाचे उत्कृष्ट संस्था पारितोषिक व दलितमित्र पुरस्कार प्राप्त.

अध्यक्ष, साई सेवाभावी ट्रस्ट, नांदेड या संस्थेमार्फत शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

राज्यस्तरीय लोकोत्सव व नांदेड लोकोत्सव २००४ चे आयोजन मुख्य प्रवर्तक.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, लक्ष्मीनगर, देगाव-येळेगांव, जिल्हा नांदेड या कारखान्यास सतत तीन वर्षे केंद्र शासनाचे प्रथम पारितोषिक प्राप्त.

अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना.

नांदेड शहर १९८७-८९ सदस्य, कन्सल्टेटिव्ह कमिटी, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हॉयरनमेंट अँड फॉरेस्ट, भारत सरकार, नवी दिल्ली सदस्य, कन्सल्टेटिव्ह कमिटी, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रिव्हेन्सेस ऑन्ड पेन्शन्स, भारत सरकार, नवी दिल्ली सदस्य, डिव्हीजनल रेल युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी, हैद्राबाद सदस्य, ऑडव्हायजरी कमिटी, साऊथ सेंट्रल रेल्वे १९९१-९२ सदस्य, ऑडव्हायजरी पॅनल, सेंट्रल फिल्म सेन्सॉर बोर्ड, मुंबई १९८६-९२ सरचिटणीस व उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी १९९५-९९ सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी १९८७-८९ सदस्य, लोकसभा १९९२-९८ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद १९९९-२००४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.

ऑक्टोबर २००४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड मार्च १९९३ ते सप्टेंबर १९९४ सार्वजनिक बांधकाम, नगर विकास आणि संसदीय कार्य खात्यांचे राज्यमंत्री सप्टेंबर १९९४ ते मार्च १९९५ गृह (आयुक्तालये वगळून) संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महसूल व राज्यशिष्टाचार खात्याचे मंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री जानेवारी २००३ ते ऑक्टोबर २००४ परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री नोव्हेंबर २००४ पासून उद्योग व खनिकर्म, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री.

परदेश प्रवास : अमेरिका, रशिया, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, नेपाळ सिंगापूर, चीन हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया व इजिप्त इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

छंद : टेबल टेनिस, वाचन आणि प्रवास
श्री. अशोकराव चव्हाण यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.


Sunday, December 7, 2008

नांदेड शहराचा नकाशा (फ्लॅश)