Wednesday, February 25, 2009

नांदेडीअन >>>>> सचिन मोहिते

सचिन मोहिते हे नाव माहित नसलेला लोकमतचा वाचक तुम्हाला नांदेडमध्ये कुठेही सापडणार नाही.
होय, तोच सचिन ज्याच्या छायाचित्रांशिवाय लोकमतची 'हॅलो नांदेड' ही पुरवणी अक्षरशः अपूर्ण आहे.

तोच सचिन मोहिते ज्याने सामान्य जनमानसांच्या मनात असलेली प्रेस फोटोग्राफर्सबद्दलची प्रतिमाच बदलून टाकली.

प्रेस फोटोग्राफर म्हटलं की डोळ्यापुढे काही ठराविक प्रकारच्याच फोटो येतात, जसे की शहरात पार पडलेल्या विविध कार्यक्रमांच्या, राजकीय घडामोडींचा किंवा शहरात घडणाऱ्या इतर काही घटनांच्या फोटो.

सचिन मोहिते अशा फोटो काढत नाही असे नाही, पण त्यासोबतच त्याच्या इतरही काही फोटो असतात ज्या अगदी थोड्याशा जागेत भरपूर काही सांगून जातात.
अशा फोटोंना इंग्रजीमध्ये 'StoryTelling Photos' असे म्हणतात.

अशा प्रकारच्या फोटो काढणे हे सुद्धा एक प्रकारचे चॅलेंजच असते कारण ती फोटो काय सांगत आहे याबद्दल प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी मते असू शकतात.
काही लोक त्या फोटोला नकारात्मक दृष्टीकोणातून बघतात तर काही व्यक्ती त्यातून बरेच काही सकारात्मकही घेतात.

अशाच काही फोटोज सचिनने आपल्यासोबत शेअर केल्या आहेत.

बघा, तुम्हाला त्या फोटोंमधून काही अर्थ काढता येतो का ते.






मी देवाजवळ अशी प्रार्थना करतो की सचिन मोहितेची उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि त्याच्या फोटोंना आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविल्या जावो.
तमाम नांदेडीअन्सतर्फे सचिनला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा !

Monday, February 23, 2009

नांदेडीअन्स कम्युनिटीचे शतक

अभिनंदन !

अभिनंदन !!

अभिनंदन !!!





नमस्कार मित्रांनो, जसे की आपण पहातच असाल, आपल्या ब्लॉगच्या ऑर्कूटवरील कम्युनिटीचे १०० सभासद झालेले आहेत.




आपण माझ्या ब्लॉगला आणि ब्लॉगच्या कम्युनिटीला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहीन.




आपण आपल्या शंका, सुचना, प्रतिसाद आम्हाला कळविल्या तर आम्हाला आनंदच होईल.





सदैव आपल्या सेवेत.






तुमच्यापैकीच एक नांदेडीअन,


सौरभ सुरेश सावंत.









ऑर्कूटवरील कम्युनिटीचा पत्ता :-

http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=53386905

Sunday, February 22, 2009

बुगी - वूगी

नाही नाही, मी आजही कोणत्या नाटकाची किंवा सिरीअलची जाहिरात करत नाहिये.
अहो आपला अजून एक नांदेडीअन सध्या टी.व्ही. वर झळकतो आहे.



आपण रामेश्वर महाजनबद्दल तर वाचलच असेल आपल्या ब्लॉगवर.
होय, तेच ते जे स्टार वनच्या 'हॅलो कौन.... ? पैचान कौन !' या मालिकेमध्ये सहभागी झाले होते.



त्यांच्या मागोमाग आता युवराज शिंदे हा नांदेडीअन सोनी टी.व्ही.च्या सुप्रसिद्ध बुगी वूगी या सिरिअलमध्ये आपली नृत्यकला सादर करत आहे.
विशेष बाब म्हणजे तो याआधी स्टार वनच्या 'हॅलो कौन.... ? पैचान कौन !' ह्या कार्यक्रमातसुद्धा सहभागी झाला होता.


तो ३ वर्षांचा असताना त्याचे वडील वारले.
पण त्याच्या आईने अपार मेहनत घेऊन त्याला लहानाचे मोठे केले.
पण तो जाणता झाला तेव्हाही त्याच्या घरची परिस्थीती अत्यंत हलाखीचीच होती.
त्याने अगदी दीड रुपये रोजासाठी भेळच्या गाड्यावर प्लेट धुण्याचे कामसुद्धा केलेले आहे.


काही वर्षांनंतर त्याची आईसुद्धा त्याला सोडून देवाघरी गेली.
पण तो अजून पुर्णपणे पोरका झाला नव्हता कारण त्याच्यासोबत अजूनही त्याची नृत्याची कला होती.
पुढे 'रॉकस्टार अकादमी' च्या माध्यमातून तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि आज तो विविध टि.व्ही. चॅनेल्सच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेऊन स्वतःची कला संपूर्ण जगासमोर मांडत आहे आणि पर्यायाने नांदेडचे नाव उंचावत आहे.



प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते युवराजकडे पाहून खरे आहे असे वाटते.



त्याच्या अथक परिश्रमांना, त्याच्या जिद्दीला आणि त्याला नांदेडीअन्सचा सलाम.

Thursday, February 19, 2009

जाणता राजा - शिवाजी महाराज

रयतेचा राजा, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
त्यानिमित्त या युगप्रवर्तक महापुरूषाला नांदेडीअन्सतर्फे मानाचा मुजरा !

शिवरायांच्या जडणघडणीत राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊमाँसाहेबांचा वाटा फार मोलाचा आहे.
त्यांनीच शिवरायांच्या बालमनावर सुसंस्काराची शिल्पे कोरली.
शिवरायांनी आयुष्याच्या आरंभीच स्वराज्य संस्थापनेचा नेक निर्धार केला आणि तो जिद्दीने सिद्धीस नेला, यामागची प्रेरणाही जिजाऊमाँसाहेबांचीच.

शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून आग्रा येथून मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली.
शिवरायांनी दगाफटका करू पाहणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटे तोडली आणि त्याला जीवनभराची अद्दल घडविली.
दुष्टबुद्धीने आणि दगाफटका करण्याच्या हेतूने भेटीस आलेल्या अफजलखानाचा तितक्याच चातुर्याने वध केला.
परस्त्री मातेसमान मानणाऱया शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी-चोळीचा आहेर करून सन्मानाने परत पाठविले.

ह्या झाल्या शिवरायांच्या जीवनातील काही नाट्यमय आणि अद्भूत घटना.

काही लोक या नाट्यमय घटनांमध्येच शिवरायांचे मोठेपण शोधण्याचा प्रयत्न करतात.
वास्तविक शिवरायांचे मोठेपण यात दडलेले आहे की शिवरायांनी शत्रूसाठी लढणाऱ्या आणि मरणाऱ्या मावळ्यांचे संघटन केले.
त्यांना त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले.
या मावळ्यांचे लढाऊ सामर्थ्य स्वराज्यस्थापनेच्या कामी सत्कारणी लावले.
शिवरायांनी मावळ खोऱ्यातील दगडाधोंड्यांमध्ये प्राण फुंकले आणि त्यांच्यात स्वराज्यस्थापनेची चेतना जागविली.
शिवरायांचे मोठेपण यात दडले आहे की त्यांनी जिवाला जीव देणाऱ्या माणसांचा ताटवा उभा केला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रयतेचे राज्य स्थापन केले, हा समकालीन आणि उत्तरकालीन मराठ्यांना पुरून उरणारा शिवरायांचा तेजस्वी असा वारसा आहे.
दुर्दैवाने शिवरायांना फारच अल्प आयुष्य लाभले.
त्यांचे सारे आयुष्य अंतर्गत आणि बाह्य शत्रूंशी लढण्यात खर्ची पडले.
जर त्यांना दीर्घायुष्य आणि स्वास्थ्य लाभले असते तर त्यांनी देशात विविध क्षेत्रांत आमूलाग्र क्रांती घडवून आणली असती, असे त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता लक्षात येते.

शिवरायांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व हे मोठे रोमहर्षक तसेच त्यागाची, संघर्षाची व समर्पणाची प्रेरणा देणारे आहे.
त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नेटाने पुढे चालविणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना वाहिलेली आदरांजली ठरेल.

माळाकोळीत अखेर बाटली "आडवी' झालीच !!!

लोहा - माळाकोळी (ता. लोहा)
येथील रणरागिणींनी दारूबंदीसाठी पुकारलेला लढा अखेर बुधवारी (ता. 18) यशस्वी ठरला. गेल्या ग्रामसभेत प्रशासन व दारूविक्रेत्यांनी केलेल्या "अभद्र युती'च्या नाकावर टिच्चून एक हजार 324 महिलांनी बाटली "आडवी' केली आणि अनेक संसार उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचविले. ग्रामसभेच्या निर्णयानंतर महिला संघटन शक्तीचा विजय आबालवृद्धांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

माळाकोळी हे गाव शिल्पकारांचे. परंतु मागील काही वर्षांत येथे दारूने शिरकाव केला आणि नागरिकांसह युवकही या व्यसनाला बळी पडू लागले. त्याचा त्रास महिलांना होऊ लागला. अनेक संसार देशोधडीला लागले. त्यामुळे येथील सर्व महिलांनी एकत्र येऊन गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्याला पुरुष व युवकांनीही साथ दिली. ता. दोन फेब्रुवारी रोजी दारूबंदीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे महिलांची नावे योग्यप्रकारे नोंदविली गेली नाहीत. एकाच नावापुढे निरक्षर महिलांचे ठसे घेतले गेले. ही बाब जेव्हा महिलांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी रौद्ररूप धारण केले. पोलिसांनीही महिला, पुरुषांसह वयोवृद्धांनाही झोडपले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. तेव्हापासूनच दारूबंदीचा हा लढा तीव्र होत गेला.

पोलिसांच्या लाठ्या झेलल्यानंतरही या महिलांमधील दारूबंदीचा निर्धार तसूभरही ढळला नाही. त्यांनी माळाकोळी ते नांदेड चार दिवस पायी अंतर कापून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. महिलांच्या या उत्स्फूर्त आंदोलनाला प्रसिद्धिमाध्यमांनीही उचलून धरले. परिणामी हा लढा राज्यभर गाजला. जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या प्रत्यक्ष चर्चेनंतर पुन्हा ग्रामसभा घेण्याचे ठरले. त्यानुसार गुरुवारी (ता. 18) ग्रामसभा घेण्यात आली. सकाळी दहा वाजता बारा ज्योतिर्लिंग सांस्कृतिक सभागृहात पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय केंद्रे, नायब तहसीलदार एन. जी. झंवर, मंडळ अधिकारी एम. व्ही. कांबळे, विस्तार अधिकारी आर. ए. पांडे, शिवाजी ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाशसिंह बोपेराय, पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, दारूबंदी अधिकारी बबन देवकते आदींच्या उपस्थितीत मतदार नोंदणीला सुरवात झाली.

दुपारी बारापासून महिलांचे लोंढेच्या लोंढे सभास्थळी येऊ लागले. प्रारंभी ग्रामसभेत सूचक म्हणून सुरेखा सखाराम तेलंग यांनी पुढाकार घेतला, तर पुष्पा संजय कागणे यांनी अनुमोदन दिले. सभास्थळी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदार नोंदणी झाल्यानंतर आवश्‍यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महिलांच्या एकूण दोन हजार 208 या मतदारसंख्येपैकी एक हजार 324 महिलांची ग्रामसभेला उपस्थिती होती. त्यामुळे गणपूर्ती झालीच होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपस्थित महिलांनी हात उंचावत मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शेवटी प्रभारी गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी "आडवी बाटली'चा विजय घोषित केला. निकाल घोषित होताच सभास्थळी उपस्थित महिला व ग्रामस्थांनी प्रचंड जल्लोष करीत जणू दिवाळीच साजरी केली.



मतदानासाठी भूमिकन्या न्यूयॉर्कहून आली
माळाकोळीच्या रणरागिणींनी जीवावर उदार होऊन दारू हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. दारूविक्रेते व प्रशासनाच्या अभद्र युतीला उघड आव्हान दिले. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलल्या, तरीही निर्धार ढळू दिला नाही.
त्यांच्या या जिद्दीच्या बातम्या प्रसिद्धिमाध्यमांनी सातासमुद्रापार झळकवल्या. माळाकोळीची भूमिकन्या उषा रामकिशन तिडके या न्यूयॉर्क येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या भगिनींनी उभारलेला लढा पाहिला आणि बुधवारी मतदानासाठी त्या थेट न्यूयॉर्कहून माळाकोळीत दाखल झाल्या. आज मतदानात भाग घेऊन त्यांनी बाटली "आडवी' करण्यास आपलाही हातभार लावला.


सौजन्य :- ई-सकाळ



cççUçkçÀòU¾, (çÆpç.vççboí[) çÆo.18 -
cççUçkçÀòU¾ ³òLç¾uç cççÆnuççbvç¾ H‰kçÀçjuòu³çç oçªyçbo¾ Dççboòuçvççuçç DçYçÓlçHçÓJç& ³çMç çÆcçUçuò. HçÓJçÑ mLççÆiçlç Pççuòu³çç iç´çcçmçYòlç y‰OçJççj¾ oçª®ç¾ yççìuç¾ DçKòj Dçç[Jç¾ Pççuç¾. 2167 HókçÀ¾ 1324 cççÆnuççbvç¾ oçªyçbo¾mçç"¾ cçlçoçvç kòÀuò.
vççboí[ çÆpçu¿ççlç¾uç uçònç lççu‰kçw³ççlç¾uç cççUçkçÀòU¾ ní iççJç iòu³çç kçÀçn¾ cççÆnv³ççbHççmçÓvç ®ç®ƒlç Dççuò nòlò. ÒçMççmçvç DçççÆCç oçªçÆJç¬òÀl³ççb®³çç mçbiçvçcçlççc‰Uí 2 HòÀyç´áJççj¾ jòpç¾ YçjçÆJçC³ççlç Dççuòuç¾ iç´çcçmçYçç GOçUC³ççlç Dççuç¾ nòlç¾; Hçjbl‰ iççJççlç¾uç oçªuçç nÎHççj kçÀjç³ç®ò®ç, Dçmçç ®çbiç yççbOçuòu³çç cççÆnuççbvç¾ Dççpç DçYçÓlçHçÓJç& ÒççÆlçmççoçlç DçççÆCç kçÀ[kçÀ HçòçÆuçmç yçboòyçmlççlç HçCç Mççblçlòlç Òç®çb[ cçlçoçvç kçÀªvç oçªyçbo¾®çç çÆvçCç&³ç Iòlç SkçÀ FçÆlçnçmç Iç[çÆJçuçç Dççní. 2167 cççÆnuçç cçlçoçjçbHókçÀ¾ lçyyçuç 1324 cççÆnuççbvç¾ iç´çcçmçYòlç mçnYççiç Iòlç oòvn¾ nçlç Gb®ççJçÓvç oçª®ç¾ yççìuç¾ Dçç[Jç¾ kòÀuç¾. çÆJçMòøç cnCçpò Jç³çòJçÉ× cççÆnuççbvç¾n¾ Dççpç cçò"îçç mçbK³òvò mçYòuçç npòj¾ uççJçuç¾ nòlç¾. iççJççlç cçò"îçç ÒçcççCççJçj çÆMçuHçkçÀçj Dçmçu³ççc‰Uí n¾ kçÀuçç®ç o窮³çç Dççnçj¾ iòuç¾ nòlç¾. Hçjbl‰ cççÆnuççb®çç H‰{çkçÀçj DçççÆCç SkçÀòH³ççc‰Uí Dççlçç iççJççlç¾uç SkçÀ oíMç¾ oçª oákçÀçvç, SkçÀ yç¾Dçjyççj Jç SkçÀ yç¾DçjMçç@Hç¾ nÎHççj nòCççj Dççní.
2 HòÀyç´áJççj¾ jòpç¾®³çç iç´çcçmçYòojc³ççvç HçòçÆuçmççbvç¾ cççÆnuççbJçj kòÀuòuçç Dçv³çç³çkçÀçjkçÀ uçç"¾nuuçç Jç cççÆnuççbçÆJç©×®ç oçKçuç kòÀuòu³çç i‰v¿ççc‰Uí Dççpç iççJççlç¾uç cççÆnuçç ÒçMççmçvç箳çç çÆJçjòOççlç SkçÀçÆpçJççvò SkçÀJçìu³çç nòl³çç. 11 cççÆnuçç Jç H‰©øççbvçç oòvç çÆoJçmç l‰©biçJççmçn¾ YçòiççJçç uççiçuçç nòlçç. lçmò®ç cççUçkçÀòU¾ lò vççboí[ DçMç¾ pçvçpççiçjCç Hço³çç$çç kçÀç{lç ³çç cççÆnuççbvç¾ çÆpçunç kçÀ®òj¾Jçj YçJ³ç cçò®çç&n¾ kçÀç{uçç nòlçç. l³ççvçblçj mLççÆiçlç kçÀjC³ççlç Dççuòuç¾ iç´çcçmçYçç Dççpç IòC³ççlç Dççuç¾. mçkçÀçU¾ 10 lò 5 ³çç JòUílç cççÆnuççbvçç vççJçvç‚oCç¾ kçÀjC³ççmçç"¾ JòU oíC³ççlç Dççuçç nòlçç. Hçjbl‰ cççÆnuççb®³çç ÒççÆlçmççoçc‰Uí oáHççj¾®ç DççJçM³çkçÀ vççJçvç‚oCç¾ HçÓCç& Pççuç¾ nòlç¾. oçª oákçÀçvç yçbo kçÀjC³çç®çç "jçJç m‰®ççÆJçC³ççmçbYçç&lç m‰jíKçç lòuçbiç ³ççbvç¾ HççJç&lç¾yççF& kçÀçiçCò ³ççbvçç çÆJçvçblç¾ kòÀuç¾. HççJç&lç¾yççF¥vç¾ ®çbêkçÀuçç jçcçpç¾ kçÀçiçCò ³ççbvçç "jçJç cççb[C³ççmç m‰®ççÆJçuò. l³ççmç uç#cç¾ Yç¾cçjçJç kçÀçbyçUí ³ççbvç¾ Dçv‰cçòovç çÆouò. ®çbêkçÀuççyççF& kçÀçiçCò ³ççbvç¾ "jçJç cççb[uçç. mçjHçb®ç J³çbkçÀì çÆlç[kòÀ ³ççbvç¾ GHççqmLçlç cççÆnuççbkçÀ[í cçlçoçvççmçç"¾ lçò mççoj kòÀuçç. l³ççvçblçj GHççqmLçlç npççjò cççÆnuççbvç¾ oçªyçbo¾®çç "jçJç nçlç Gb®ççJçÓvç cçbpçÓj kòÀuçç.
iç´çcçmçYòuçç GHççÆJçYççiç¾³ç HçòçÆuçmç DççÆOçkçÀçj¾ ÒçkçÀçMççEmçn yçòHòjç³ç, ÒçYççj¾ içìçÆJçkçÀçmç DççÆOçkçÀçj¾ mçbpç³ç kòbÀêí, çÆJçmlççj DççÆOçkçÀçj¾ çÆMçJççpç¾ {JçUí, oçªyçbo¾ çÆvçj¾#çkçÀ yçyçvç oíJçkçÀÊò, lçbìçc‰kçwlç¾®ò DçO³ç#ç içòHççU çÆlç[kòÀ, pççuçÄoj kçÀçiçCò, Yççjlç cçmkòÀ, J³çbkçÀì YççuòjçJç, iç´ç.Hçb. mçom³ç Mçjo c‰b[í, cççpç¾ Dçç.içòçEJçojçJç kòbÀêí, oíJç¾oçmç iç¾lò cçnçjçpç DççoÄ®ç¾ GHççqmLçlç¾ nòlç¾.
ojc³ççvç, iççJççlç k‰À"uççn¾ Dçv‰çÆ®çlç ÒçkçÀçj Iç[Ó vç³ò cnCçÓvç cçò"¾ HçòçÆuçmç k‰ÀcçkçÀ lóvççlç kçÀjC³ççlç Dççuç¾ nòlç¾.


सौजन्य :- लोकमत





फोटो गॅलरी
सौजन्य :- ई-सकाळ

कंधार - एक ऐतिहासिक शहर

कंधारचा किल्ला न पाहिलेला नांदेडीअन तसा दुर्मीळच.
तरिही पुस्तकात कंधारच्या इतिहासाबद्दल वाचणारे, शाळेत इतिहास या विषयात शिक्षकांकडून ऎकणारे पण आपल्याच जिल्ह्यातील कंधार येथे न जाणारे काही महाभाग असतातच.
असो, हा लेख वाचल्यानंतर तरी ते कंधारला एकदा जाऊन येतील अशी अपेक्षा करूयात.


तर मी सांगत होतो कंधारबद्दल.
राष्ट्रकूट राजवटीत कंधार हे एक मुख्य शहर होते.
कंधार येथे उत्खननात सापडलेल्या एका राष्ट्रकूटकालीन शिलालेखाहून दहाव्या शतकातील कंधार येथे केल्या गेलेल्या बऱ्याच बांधकामांबद्दल माहिती मिळते.
हा शिलालेख सर्वप्रथम श्री. भट्टाचार्य आणि डॉ. सिरकार यांनी शोधून काढला असे कळते.

कंधार येथे केल्या गेलेल्या उत्खननांमधे आजपर्यंत बऱ्याच राष्ट्रकूटकालीन मूर्ती आणि शिलालेख सापडलेले आहेत.
यावरून कळते की त्याकाळी कंधार हे किती महत्त्वाचे शहर असेल.

१९८२ साली डेक्कन कॉलेज, पुणे यांनी केलेल्या उत्खननात ६२ फूट उंचीची क्षेत्रपालाची मूर्ती मिळाली.
त्या मूर्तीच्या पायाची लांबी १.७० मीटर आहे तर रूंदी ०.६२ मीटर आहे.
सध्या त्या मूर्तीचे अवशेष कंधार येथील किल्ल्याच्या आवारातच ठेवलेले आहेत.

कंधारचा किल्ला हा भुईकोट किल्ल्यांच्या प्रकारात मोडतो.
हा किल्ला राष्ट्रकूटांच्या काळात बांधला गेलेला आहे आणि नंतरच्या इतर राजांनी आपापल्या कारकिर्दीत त्याची डागडुजी केली असावी.
हा किल्ला जवळपास २४ एकरांमधे पसरलेला आहे असून किल्ल्याभोवती पाण्याचा एक मोठा खंदक आहे.

किल्ल्यात सध्या मोठ्या प्रमाणावर डागडुजी सुरू असल्यामुळे किल्ल्याचे मुळ वैभव नष्ट झाले आहे, तरीही किल्ल्याच्या आतील भागांत काही जागा अगदी जशास तशा आहेत.
कंधारचा हा भुईकोट किल्ला कंधार शहरापासून ४ कि.मी. अंतरावर आहे.



कंधारमध्ये पाहण्यासारखी अजून बरीच ठिकाणे आहेत :-


१) जगतुंग समुद्र :-
हा भव्य तलाव म्हणजे राष्ट्रकूटकालीन पाण्याचा साठा करण्यासाठी बांधलेले तळे होय.
दहाव्या शतकात बांधलेला हा तलाव आजही उपयोगात आणला जातो.
ह्याच्या भव्य आकारामुळे याला जगतुंग समुद्र म्हणतात.

२) अष्टभुजा खडंकी देवी :-
जगतुंग तलावाच्या काठावरच हे अतिशय जुने असे मंदीर आहे.
या मुर्तीची मान थोडी तिरकी आहे हे इथके वैशिष्ट्य.
इथून जगतुंग तलावाचे दृष्य अतिशय विलोभनीय दिसते.

३) हाजी सैय्या दर्गा :-
चौदाव्या शतकात एक मोठे सुफी संत सय्यद सईउद्दीन रफाई हे कंधार येथे वास्तव्यास होते.
इसवीसन १३४८ मध्ये अजून एक मोठे सुफी संत हजरत शेख अली सांगडे सुलतान कंधारमध्ये होऊन गेले.
ह्या दर्गेत उंचावर बांधलेली एक लोखंडी साखळी आहे. असे म्हणतात की तुम्ही जर त्या साखळीला हात लावला तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

४) राष्ट्रकूट संग्रहालय :-
कंधार येथे केल्या गेलेल्या उत्खननांमध्ये ज्या मूर्ती सापडल्या आहेत, त्यांपैकी बहुतेक मूर्ती या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
१९९२ साली या संग्रहालयाचे उद्घाटन झाले आहे.

५) सात शिवलींग मंदीर :-
राष्ट्रकूट संग्रहालयाच्या पायथ्यालाच हे नवीनच बांधण्यात आलेले मंदीर आहे.
ह्या मंदीराचा आकार हुबेहूब शिवपिंडीसारखा आहे.
मुख्य शिवपिंड हे सात छोट्या छोट्या शिवपिंडींपासून बनविलेले आहे.
हे मंदीर मन्याड नदीच्या अगदी काठावरच आहे.

६) घागरदरा :-
घागरदरा इथे महादेवाचे मंदीर आहे.
घागरदरा हे ठिकाण कंधारपासून २२ कि.मी. अंतरावर आहे.
अतिशय शांत, निसर्गरम्य अशा या ठिकाणी आल्यावर तुम्हाला इथून परत जावेच वाटणार नाही.
मंदीरापासून थोड्याच अंतरावर एक छोटेसे धरण बांधण्यात आलेले आहे.
उन्हाळ्यात जेव्हा नदीच्या पात्रात पाणी कमी असते, तेव्हा तुम्ही चक्क पात्रातूनच धरणापर्यंत पायी जाऊ शकता.
हा अनूभव निश्चितच न विसरता येण्यासारखा असतो.


काय मग नांदेडीअन्स, कधी निघणार कंधारला ?



:: फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ::
इथे क्लिक करा.

Wednesday, February 11, 2009

जिंदगी का सफर, है ये कैसा सफर....

रात्रीचे साधारणतः आठ वाजण्याची वेळ, शिवाजीनगरच्या ओव्हरब्रीजवर वाहनांची वर्दळ.
कुणी जीवनाचा चढाव उतरत आहे तर कुणी चढत आहे.
या साऱ्या गर्दीत एक मालवाहू रिक्षा मात्र संथगतीने शिवाजनगरच्या दादऱयावरून कलामंदीरकडे जात आहे.
रिक्षात आज वेगळाच माल आहे........

रिक्षावर एका व्यक्तीने धरलेली एक अंधूक प्रकाशातील बत्ती जीवनाचा शेवट दर्शविणारी.
चित्र थोडं नेहमीपेक्षा वेगळचं.
गाडिचा वेग वाढवून मालवाहतूक टेम्पो जवळ आल्याबरोबर अगरबत्तिच्या सुगंधाचा दरवळ आणि वाढलेले काळजाचे ठोके......

आज मालाएवजी चक्क एक प्रेत गाडीत सजवून ठेवलेलं.
दोन्ही बाजूला ४-४ माणसं खाली बसलेली तर एक हातात बत्ती घेऊन उशाशी उभा.
समोर गाडीच्या टपावर २ माणसं.
एक हातात मडकं घेवून तर दुसरा त्याला अगदी गच्च धरून सांभाळायला.

ड्रायव्हरच्या दोन बाजूला दोन वयस्क माणसं विचारमग्न अवस्थेत.
सगळा तेरा माणसांचा बाजार आणि तोही एका मालवाहतूक गाडीमध्ये.
या गाडीच्या मागे-पुढे गाडी तर सोडाच, पण साधी सायकलही नाही.
मनात एकच प्रश्न, 'किती गतिमान झालं आपलं जीवन ?'.

मुल जन्माला येताना घाई, त्यासाठी देखील मुहूर्त पाहणं, त्यात आणखी काही प्रकार.
पण मृत्युला सामोरे जावून घाटावर जाताना देखील गडबड.
आयुष्याचे तीन-तेरा तेही फक्त तेरा माणसांच्या साक्षीने ?

मन विमनस्क अवस्थेत.
घड्याळाच्या काट्याबरोबर चालणारे जीवन आज जन्म आणि मृत्यूच्या चक्रालादेखील आपल्याबरोबरच पळवत नसेल ना ?
आणि पळवतच असेल तर इतकी जगण्याची नव्हे, पळण्याची धडपड कशासाठी ?
समृद्ध भारतीय परंपरेत मरणादारी आणि तोरणाघरी जावे असा प्रघात आहे.
एक वेळा तोरणाघरी गेलं नाही तरी चालेल पण मरणाघरी जरूर जावे अशी आमची संस्कृती सांगते.

मग या संस्कृतीचे पाईक आम्ही आमची माणूसकी विसरत चाललो की काय ?
माणसाला घाटावर पोहोचविल्यानंतर तिथल्या स्मशानशांततेला आम्ही घाबरत तर नाही ना ?
किंवा जीवनातील अंतीम सत्याला सामोरे जायची आमची हिंमत राहिली नाही काय ?

हे सारं चित्र पाहून कदाचीत तो प्रेतात्मा म्हणतं असेल :-

कफन माझे दूर करूनी
पाहिले मी बाजूला,
एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला
हे सारे दृष्य बघुनी
माझेच आसू आले गालावरी,
जन्मभर हसूनी मी
रडलो असा मेल्यावरी.



ऋषिकेश कोंडेकर
दैनिक समिक्षा
दि. ११ फेब्रुवारी २००९

Monday, February 9, 2009

कविता

कविता नसते करायची
ती असते मनात कुठेतरी सुप्त,
वारंवार तिला शोधण्याचा प्रयत्न करूनही
कवीचे मन मात्र नेहमीच अतृप्त.

जिभेवर रेंगाळायला लागतात शब्द मग
कधीतरी, कुठेतरी अचानक,
पेन आणि कागद जवळ नसल्याने
कवीच्या मनाची सुरू होते तगमग.

त्याच तगमगीमुळे मग
तो आतल्या आत अस्वस्थ होत राहतो,
कुठूनतरी मग पेन आणि कागद पुढ्यात येते
आणि तो त्याच्या भावना कागदावर उतरवतो.

भावना कागदावर उतरविणे
हे सुद्धा काही सोपे नाही,
असंख्य चुका होतात लिहिताना
मग खाडाखोडीतच वाया जातात कागद आणि शाई.

अशा या प्रचंड संकटातून
काही वेळाने कवीची होते मुक्तता,
तो पकडतो कोण्यातरी जवळच्याला
आणि मग त्या बिच्याऱ्याची पुरी वाट लागून जाते
ती कविता ऐकता ऐकता.



कविता फारच पकाऊ किंवा वाईट झाली असेल तर एक बालीश प्रयत्न म्हणून माफ करावे.



- सौरभ सुरेश सावंत

Monday, February 2, 2009

नांदेड - डी.डीं. च्या नजरेतून



नांदेड
...महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या या शहराला गेल्या महिन्यापासून मुख्यमंत्र्याचे शहर म्हणून ओळख मिळाली आहे. वास्तविक अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ मुदखेड. मात्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात त्यांनी या शहरापासून केली आणि तेव्हापासून त्यांची तीच ओळखच बनली. अशोकरावांचे वडील कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे पहिले नगराध्यक्ष. त्यांच्यामुळे देशाच्या नकाशावर या शहराला ठळक स्थान मिळाले. १९८६ मध्ये खासदारकीची निवडणूक लढवून अशोकरावांनी येथूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. मात्र नंतर १९९० साली पराभव झाल्याने त्यांनी हा मतदरासंघ बदलला. मात्र आता ते मुख्यमंत्री झाल्याने नांदेडला एक आगळा मान मिळाला आहे. एकाच शहरातील दोन व्यक्ती मुख्यमंत्री होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. आता येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होतील व बारामतीलाही तो मान मिळेल. मात्र त्यातही पहिलेपणाचा मान नांदेडचाच. तरीही शहरात फिरताना मुख्यमंत्र्यांची चापलुसी करणारे बॅनर्स फारसे दिसत नाहीत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

नांदेड झपाट्याने बदलत आहे. अगदी ओळखू न येण्याइतपत. मात्र हा सारा बदल केवळ तीन-चार वर्षांतील आहे. अनेक वर्षांनंतर शहराचा फेरफटका मारून या बदलाचा आढावा घेतला.



प्रथम तुज पाहता...

से Nanded
नांदेडचे रेल्वे स्थानक आता भव्य आणि खरोखर व्यग्र असल्याचे भासते. ही सगळी ब्रॉडगेजची किमया. एरवी या स्थानकाने आतापर्यंत तीनपेक्षा जास्त वेळेस आपले रूप बदलले आहे. जिल्हा परिषद, टपाल कार्यालय, न्यायालय, आधी पालिका आणि आता महापालिका...अशा अनेक कार्यालयांपासून हाकेच्या अंतरावर असणारा भाग आता मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जातो. आमच्या लहानपणी तो शहरापासून दूर वाटायचा. याचं कारण शहरातील मुख्य वस्ती स्टेशनच्या अलिकडे होती. स्टेशनमध्ये कोळशाची इंजिने यायची तेव्हा त्याची शिट्टी घरापर्यंत ऐकू यायची.

नांदेडला पहिली रेल्वे धावली १९०४ मध्ये. त्यावेळी निजामाने मराठवाड्यात मीटरगेज रुळ टाकले. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर (ज्यात दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ आणि दैनिक प्रजावाणीचे संपादक सुधाकर डोईफोडे आघाडीवर होते) इथे ब्रॉडगेज गाडी आली १९९५ मध्ये. विशेष म्हणजे गेल्या १०५ वर्षांत मराठवाड्यात एक फुटाचाही रेल्वेमार्ग वाढलेला नाही. त्यामुळे बीडसारख्या जिल्ह्यात परळी वगळता कुठेही रेल्वे जात नाही. एवढ्या वर्षांमध्ये स्टेशनचा विस्तार अनेकदा झाला. मात्र तेव्हाही घरात करमत नाही म्हणून वेळ काढायला इथे येऊन बसणाऱयांची कमतरता नव्हती. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना तर त्यांच्या सरावासाठी ही हक्काची जागा होती.

लोकांची ती सवय सहजासहजी जाणारही नव्हती. ब्रॉडगेजनंतर मुंबई आणि दिल्लीशी येथील गाड्यांची घसट वाढत गेली आणि रेल्वे स्थानकाला 'व्यावसायिक' स्वरूप येऊ लागले. शहरात येणाऱया पाहुण्याला पहिली झलक मिळते ते येथे. आता गुरू-ता-गद्दीच्या निमित्ताने त्याला एखाद्या तारांकीत हॉटेलचे रुप देण्यात आले आहे. तरीही स्टेशनच्या स्वच्छ आणि छाप पाडणाऱया आवाराबाहेर येताच कचऱयाचे ढीग स्वागत करतातच. हे स्टेशन रोडवर पन्नास पन्नास वर्षे धंदा करणाऱया हॉटेलवाल्यांचे पाप ! नोकरशाहीत हेडमास्तर या नावाने प्रसिद्ध असलेले आणि दोन वेळा केंद्रीय अर्थमंत्री, दोनदा गृहमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्री झालेले शंकरराव चव्हाण नांदेडकरांना शिस्त लावू शकले नाहीत. तिथे गुरु-ता-गद्दीसाठी ती अंगी बाळगण्यात येईल, अशी अपेक्षा कशी करायची.

रेल्वे स्टेशन हे आमच्यासाठी एका आणखी गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ते म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळेस आणि रात्री उशिरापर्यंतही, तेथे वर्तमानपत्रे आणि नियतकालिकेही मिळायची. पेपरचे स्टॉल हा प्रकार माझ्या लहानपणी तरी नांदे़मध्ये अनोळखी प्रकार होता. वर्तमानपत्रे एक तर घरी पोऱया टाकायचा किंवा बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनहून येणारी एखादी व्यक्ती ते आणायची. त्यामुळे सकाळी घरी पेपर आला नाही तर रेल्वे स्टेशनपर्यंत जाऊन ते आणावे लागायचे. विशेष म्हणजे या स्टॉलवर मराठीपेक्षाही हिंदी किंवा तेलुगु नियतकालिके अधिक मिळायची.

सध्या दिल्ली ते बंगळूर धावणाऱया एक्स्प्रेस गाड्यांची वर्दळ नांदेडच्या स्थानकावर चालू असते. तिकिट तपासनीस कठोरतेने तिकिट तपासतात आणि फलाटांवर गप्पा मारणाऱयांपेक्षा प्रवाशांची संख्या अधिक दिसते. थोडक्यात म्हणजे गावाचा प्रवास शहराकडे होतोय!



संथ वाहते गोदावरी

से Nanded
गोदावरी ही नांदेडची ओळख मानण्यात येते. खरं तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहताना गोदावरी पाहण्यात जी मजा आहे ती अन्य कशात नाही. मात्र ते पाणी अन्य ऋतुंत तसेच वाहिल याची खात्री नाही. शिवाय वाढत्या लोकसंख्येचे दुखणेही नाल्याच्या रुपाने तीला वाहावे लागते. गोदावरीची अगदीच मुळा मुठा झालेली नाही. त्यामुळे अजूनही तीत पाणी आणि रसायने वेगवेगळी ओळखता येतात. शिवाय नांदेडमध्ये उद्योग चालण्यापेक्षा बंद पडण्याचेच प्रमाण अधिक असल्याने त्या तुलनेत अजूनही येथे पाणी वाहते.

अगदी अलिकडे , कदाचित गुरु-ता-गद्दीच्या निमित्ताने असावे, पण गोदावरीच्या एका काठाचे चांगलेच सुशोभीकरण झाले आहे. नव्या पुलावरून (तसा तो बांधूनही तीस-एक वर्षे झाली असतील पण निजामाच्या राजवटीत बांधलेल्या पुलाच्या तुलनेत तो नवा आहे), सायंकाळच्या वेळी गुरुद्वारा लंगर साहिब, गुरुद्वारा नगीना घाट असे ओळीने गुरुद्वारे रोषण झालेले असतात. नदीवर नव्याने बांधलेले घाट या गुरुद्वारांवरील दिव्यांच्या उजेडात नदीपात्रातील आपले सुंदर प्रतिबिंब न्याहाळत असतात. केंद्र सरकारकडून आलेल्या १३०० कोटी रुपयांपैकी काही अंश तरी खर्च झाला आहे, हे या सुशोभित घाटांवरून दिसून येते. एरवी गोवर्धन घाटापासून नगीना घाटपर्यंत पूर्वी घाणीचेच साम्राज्य होते. त्याजागी ही रम्य आणि सुशोभित जागा माणसांना किमान पाच मिनिटे तरी खिळवून ठेवते. ही नव्याची नवलाई न ठरता कायमस्वरूपी हेच दृश्य दिसावे, अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे.



म्हातारा इतुका न...


से Nanded
नाही. मी या पुतळ्याबद्दल बोलत नाही आहे. हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला सोडविल्याबद्दल कृतज्ञता म्हणून तो उभारण्यात आला आहे. त्यांच्या मागे जो टॉवर आहे, तो मात्र सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा आहे. एकेकाळी सर्वात उंच बांधकाम म्हणून तिला मान होता. आता अवतीभवतीच्या इमारती आणि मुख्यतः गल्लीभूषण, रस्ताभूषणांच्या बॅनरची गर्दी झाल्यामुळे टॉवरची रया गेल्यात जमा आहे. आधी साध्या चुन्याच्या असलेल्या टॉवरला पंधरा पर्षांपूर्वी काळ्या टाईल्सचे चिलखत लावण्यात आले. त्यामुळे तो बिचारा आणखी बापुडवाणा दिसू लागला. शिवाय त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात उष्णता वाढू लागल्याचेही वाद सुरू झाले. आता यंदा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजनेच्या निमित्ताने त्याला पुन्हा मेक-अप करण्यात येत आहे. तो झाल्यावर टॉवर पुन्हा नायक होणार, चरित्र नायक होणार का एखादे विनोदी पात्र बनून वर्तमानाची खिल्ली उडविणार, काळच जाणे. (कारण त्याची साक्ष काढायला टॉवरवरचे घड्याळ अद्याप चालू आहे.)

तरी उघड्यावर असल्याने टॉवर सुदैवाने लोकांना दिसतो तरी. नांदेडमध्ये एक किल्ला आहे हे त्या शहरात राहणाऱया अनेकांना माहितही नाही. गोदावरीच्या काठीच वसलेल्या त्या नंदगिरीच्या किल्ल्यावर पालिकेने (आता महापालिकेने) कब्जा करून तिथे डंकिन केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांना तिथे प्रवेशच नाही.



तीन सौ साल गुरु दे नाल

से Nanded
गेल्या अनेक वर्षांमध्ये नांदेडच्या दृष्टीने घडलेली सर्वात चांगली घटना म्हणजे गुरु-ता-गद्दी सोहळा. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये अनेक चांगली कामे झाली, रस्ते सुधारले, नव्या इमारती झाल्या. परदेशातून आलेल्यांसाठी खास एक एनआरआय भवन उभे राहिले. मागे १९९९ साली शहरात खालसा त्रिशताब्दी सोहळा झाला होता. त्यावेळी सुमारे पाच लाख लोक जमले होते तरीही प्रशासनाची कोंडी झाली होती. यंदा मात्र अंदाज २० लाख शीख यात्रेकरू (सरकारी भाषेत भाविक) जमले असतानाही सर्व काही सुरळीत सुरू होते. याचे श्रेय चव्हाण यांना निश्चितच जाते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांचे असहकार्य असतानाही त्यांनी या सर्व कामांची नीट संपादनी केली. त्यानंतर पंतप्रधान आणि त्यांच्या वरिष्ठ मॅडम यांना नांदेडमध्ये आणून आपण कसे काम करतो, याची झलकही दाखविली. त्याचे फळ म्हणून त्यांना दोन महिन्यांतच मुख्यमंत्रीपद मिळाले असावे.


से Nanded

बाहेरच्या लोकांनी विचारले, तुमच्याकडे पाहण्यासारखे काय आहे, की नांदेडकर हमखास गुरुद्वाऱयाचे नाव घेतात. त्याचे महत्त्व आहेही तसेच. मात्र गुरु गोविंदसिंह यांची समाधी असलेल्या सचखंड साहिबशिवाय शहर व परिसरात आणखी आठ ते नऊ गुरुद्वारे आहेत. गुरद्वारा नगीनाघाट साहिब, गुरुद्वारा माता साहिब, बंदाघाट साहिब यांसाऱखे गुरुद्वारे केवळ पाहण्यासाठीच नाहीत, तर ते अनुभवण्यासारखेही नक्कीच आहेत. मालटेकडी साहिब सारखे नवे गुरुद्वारेही येथे नव्याने उभारण्यात येत आहेत.

शीख संप्रदायाचे नांदेडशी असलेले नाते शहरात जागोजागी दृष्टीस पडते. त्यात काही असाहजिक आहे, असे मला वाटतही नाही. गुरु गोविंदसिंह रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंह इंजिनियर कॉलेज अशा संस्था आहेत, तशा गुरु गोविंदसिंह चषकासाऱख्या हॉकी स्पर्धा आहेत. अशा बाबी पाहून अनेकांना नांदेड महाराष्ट्रात आहे का पंजाबमध्ये असा प्रश्न पडतो. त्यात शहरात सर्रास वापरण्यात येणारी हैदराबादी हिंदी...तो एक वेगळाच सांस्कृतिक धक्का आहे. विशेष म्हणजे नांदेडमधील शीखांची भाषा पंजाबी शीष अगदी थट्टेवारी नेतात.

तरीही पंजाबमधील राजकारणाची अपरिहार्य़ सावली येथे पडलेलीच असते. पंजाबमधील दहशतवाद ऐन भरात असताना, १९८६ साली गुरुद्वारा लंगर साहिबमध्ये शीखांमधीलच एका पंथाच्या प्रमुखाचा मुक्काम होता. हा धर्मगुरु दहशतवाद आणि खासकरून त्यासाठी धर्माचा वापर याच्या विरोधात होता. तर त्याची लंगर साहिबच्या दारात स्टेनगनने गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आता, गुरु-ता-गद्दी व्यवस्थापन समितीचे कामकाज आणि तिचे अध्यक्ष एम. एस. गिल यांच्याबद्दलच्या तक्रारी, यांनी स्थानिक वर्तमानपत्रांना गेले वर्षभर खाद्य पुरविले.

नांदेडचा मुख्य गुरुद्वारा, सचखंड साहिब हा गुरु गोविंदसिंग यांच्या समाधीस्थळी बांधलेला आहे. राजा रणजितसिंह यांनी त्यांच्या कालखंडात या गुरुद्वाऱयाचे बांधकाम करवून घेतले. गुरु गोविंदसिंग यांचे दागिने, शस्त्र येथे ठेवलेले आहेत. मुख्य म्हणजे ते सर्वसामान्यांना पाहताही येतात. केवळ चॅनेल किंवा माध्यमांसमोर तोंड उघडणाऱया बोलघेवड्या विश्वस्तांपुरते ते मर्यादित नाहीत. प्रत्येक शीख व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाच्या दहा टक्के हिस्सा गुरुद्वाऱयाला द्यावा लागतो. शिवाय वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत एकदा तरी सचखंड साहिबचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे घुमटाला सोन्याचा पत्रा आणि आत सोन्याची नक्षी असलेल्या या प्रार्थनास्थळाला उत्पन्नाची वानवा नाही. मात्र एकूणच भक्तांना देवाआधी दानपेटीचे दर्शन घडविण्याची जाज्वल्य परंपरा गुरुद्वाऱयांमध्ये नसते. तरीही, अगदी आपापल्या क्षेत्रात मोठी उंची गाठलेली मंडळी येथे भक्तीभावनेने सेवा करतात. इंग्लंडमध्ये मोठा उद्योग सांभाळणारी आसामी येथे येणाऱ्यांची पादत्राणे सांभाळत असते तर पी. एचडी. केलेले प्राध्यापक लंगरमध्ये वाढपी काम करतात. तेथे कोणीही कोणत्याही प्रकारचा बडेजाव नाही. गुरु गोविंदसिंग यांच्याशी संबंधित आठ गुरुद्वारे नांदेडमध्ये आहेत. शिवाय घोड्यांची पागाही आहे. पंजाबमधील अत्यंत उंची जातीचे घोडे येथे पाहायला मिळतात. होळी आणि दसऱयाला हे पांढरेशुभ्र घोडे जेव्हा शहरात मिरवणुकीने फिरतात, त्यावेळी डोळ्यांचे पारणे फिटते.



सर्वे यस्य वशात् गात् स्मृतिपथं

से Nanded
नांदेडला महापालिका मिळाली १९९७ मध्ये. त्यासाठी नदीपलिकडील वाघाळा आणि सिडको, हडको हा भाग शहराला जोडण्यात आला. आता तरोडा हा नांदेडच्या सीमेवर वसलेल्या खेड्याचा समावेश पालिका ह्द्दीत करण्याची योजना आहे. त्याला विरोध म्हणून आंदोलने सुरू झाली आहेत. पन्नास वर्षॉपूर्वी पालिकेचे कामकाज ज्या इमारतीत होत होते, ती इमारत आता पूर्णपणे पाडण्यात आली आहे. त्याजागी नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. पालिकेच्या इमारतीशेजारी ग्रंथालय आणि वाचनालय होते. तेही जमीनदोस्त करण्यात आले आहे. पालिकेच्या इमारतीतील लालबहादूर शास्त्री सभागृह हे पूर्वी शहरात प्रसिद्ध होते. १९८३-८४ साली जेव्हा पहिल्यांदा दूरदर्शनचे प्रक्षेपण शहरात सुरू झाले, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये झालेले दौरे आम्ही याच सभागृहात वाचनालयातील टीव्हीवर पाहिले होते.

आता नवीन होणाऱया इमारतीत सभागृह असेल मात्र त्याला लालबहादूर शास्त्रींचे नाव असेल का नाही, याबाबत मला शंका आहे. वाचनालय आणि ग्रंथालयाच्या बाबतीत तर आणखीच गंमत आहे. हे दोन्ही आता शिवाजीनगर आणि गोकुळनगर भागात हलविण्यात आले आहेत. मात्र जुन्या ग्रंथालयाच्या जाण्याने जनता राजवटीची नांदेडमधील शेवटची आठवण नाहीशी झाली आहे. एरवी शहरभर निरनिराळ्या इमारतींना कॉंग्रेसच्या नेत्यांची अथवा गुरु गोविंदसिंहांचे नाव आहे. ही एकमेव संस्था होती जी राम मनोहर लोहिया यांच्या नावाने उभी होती. सर्व सरकारी संस्था कॉंग्रेसच्या ताब्यात असण्याच्या आणि राजकीयदृष्ट्या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष अशा पक्षांचा जोर असतानाच्या काळात आता स्थलांतरीत वाचनालयाला त्यांचे नाव देण्याची मागणी आता कोण करणार. या वाचनालयात बसून एमपीएससी-यूपीएससीचा अभ्यास करणाऱयांची संख्या खूप मोठी होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगु, उर्दू या सहा भाषांतील नियतकालिके, वर्तमानपत्रे या वाचनालयात येत असत. मला वैयक्तिकदृष्ट्या राम मनोहर लोहिया वाचनालयाबद्दल विशेष ममत्व होते. कारण व्यंगचित्रांची माझी पहिली ओळख येथेच झाली. टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, हिंदू, इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया, संडे, धर्मयुग, जनसत्ता . चे वाचन मी येथेच केले. नांदेडमध्ये हाताच्या बोटांपेक्षाही कमी असे माझे जे मित्र होते ते या वाचनालयातच भेटले होते. सर्व भारतीय भाषा एकाच लिपीचे वेगवेगळे रुप घेऊन लिहिल्या जातात, हे सांगणारे भारतीय वर्णमाला हा ग्रंथ मी येथेच वाचला. त्यामुळे पुढे मला निरतिशय फायदा झाला. थोडक्यात म्हणजे आज मी जो काय आहे तो या वाचनायलामुळे आहे.

पुढे मी अमेरिकन लायब्ररी, ब्रिटीश लायब्ररी, एशियाटिक सोसायटी (सेंट्रल लायब्ररी), मॅक्स म्युल्लर भवन, पुण्यातील नगर वाचन मंदिर विभागीय ग्रंथालय अशी अनेक वाचनायलये पालथी घातली. मात्र रा. . लो. वाचनालयासारखा मोकाट संचार कुठेही केला नाही. त्या वाचनालयात पुस्तके फारशी उत्कृष्ट होती, सुविधा चांगल्या होत्या अशातला भाग नाही. मात्र तेथील कर्मचारी वर्ग आमचा दोस्त झाला होता शिवाय आम्हाला हवं ते तिथे मिळत होतं. ते वाचनालय उभं असलेली जमीन बोडकी झालेली परवा पाहिली आणि त्या सगळ्या आठवणी आल्या. सर्वे यस्य वशात् गात् स्मृतिगात्पथं कालाय तस्मै नमः....!






Devidas Deshpande
Senior Correspondent,

Pune Mirror.

सर्पविज्ञान, पर्यावरणविषयक जनजागृती यात्रा नांदेडला येणार

समाजात सापाबद्दल समज, गैरसमज आहेत. साप चावला की माणूस मरतो, हा सुद्धा समज आहे, याबाबत महाराष्ट्र शासन वनविभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व औरंगाबाद महापालिकेचे प्राणिसंग्रहालय यांच्या वतीने महाराष्ट्रात सर्पविज्ञान व पर्यावरण जनजागृती यात्रा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ही यात्रा ता. दोन फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक व्ही. जे. वरवंटकर यांनी शनिवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, की या यात्रेचे नेतृत्व जळगावचे राजेश ठोंबरे हे करत आहेत. गेल्या मंगळवारी (ता. २७) औरंगाबाद येथून ही यात्रा सुरू झाली. जालना, बीड, लातूर आटोपल्यानंतर नांदेड जिल्ह्यात ता. दोन फेब्रुवारी रोजी प्रवेश करणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या सिमेवर माळेगाव यात्रा येथे ही यात्रा येईल. त्यानंतर माळाकोळी, लोहा, सोनखेडमार्गे नांदेड मुक्कामी येईल.
लोकमान्य मंगल कार्यालय, विद्युत भवनजवळ यात्रेचा मुक्काम राहील. बुधवारी (ता. तीन) सर्पविज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी राधेश्‍याम मोपलवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. महापालिकेचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, शल्यचिकित्सक डॉ. एस. पी. पाटील, माजी आमदार व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष पी. जी. दस्तुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.


एका सुसज्ज वाहनातून मांडोळ, डुलक्‍या, घोणस, ट्रिंकेट, धूळनागीण, कवड्या, धामण, रुखई, अजगर, मांजऱ्या, हरणटोळ, हिरवा घोणस, फुरसे, मन्यार, नाग अशा सर्पाच्या अठरा ते वीस जाती या यात्रेत राहतील. याबाबतचे नियम पूर्णपणे पाळून मोठ्या काचेच्या पेटीतून आवश्‍यक त्या फलकासह हे प्रदर्शन विद्यार्थी व नागरिकांना निःशुल्क पहावयास मिळेल. याबरोबरच सर्पाची माहिती देणारी विविध पुस्तके, सीडी, सर्प घरात आल्यास सहजपणे उचलून दूर नेता येईल, अशा विशेष प्रकारच्या काठ्या, याबाबीही सर्पयात्रेत उपलब्ध असतील. ग्रामीण भागात सप्रयोग व्याख्याने देईल, यात्रेत पंधरा सर्पमित्रांचा चमू असेल. यात्रेचे नेतृत्व राजू ठोंबरे, गजेंद्र सुरकार, उल्हास ठाकूर, अमित सय्यद हे करत आहेत. नांदेडला ही यात्रा आल्यानंतर दहा ते पंधरा किलोमीटर परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना उद्‌बोधन करण्यात येईल.


--ई-सकाळ