Wednesday, July 15, 2009

नांदेड कंप्युटर डिलर्स असोसीएशन

नांदेड कंप्युटर डिलर्स असोसीएशनच्या संकेतस्थळाचा पत्ता.
http://ncdananded.com/



Friday, July 3, 2009

खवय्येगिरी

मित्रांनो, तुमच्यापैकी कित्येक जण उत्तम खवय्ये असतील. (विसरलात का, "मीसुद्धातुमच्यातलाच एक".)

पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना नांदेडमधली खाण्या/पीण्यासाठी प्रसिद्ध असलेली काही विशिष्टठिकाणंच माहित असतात जसे की आईनाथची पाणीपुरी.

कुणालाही प्रश्न विचारला की तुला नांदेडमधले खाण्यासाठी काय आवडते तर त्याचे उत्तर तयारआईनाथची पाणीपुरी’! मग भलेही त्याने तीथली पाणीपुरी कधीतरी एकदाच खाल्लेली असेल.

अशाच अनुभवांवरून मला हा टॉपिक काढण्याचे सुचले.

मग काय, माझ्या मित्रांना पकडून मी काही प्रश्न विचारले :-

१) तुमच्या मते नांदेडमधील खाण्या-पिण्यासाठीची बेस्ट जागा कोणती ? (हॉटेल, हातगाडा इत्यादी.)

२) तुम्ही तीथे सामान्यतः काय ऑर्डर करता ?

३) त्या ठिकाणाची स्पेशालिटी काय आहे ? (किंमत, चव, क्वांटीटी, उपलब्धता इ.)

माझ्या मित्रांनी दिलेली उत्तरं मी आता इथे पोस्ट करतो.

बी.सी.. करणारा राजदीप रायेवार म्हणतो की त्याला भाग्यनगरच्या आईनाथची पाणीपुरी आणि पावभाजी फार आवडते. स्पेशालिटीम्हणजे तीथला प्रत्येक पदार्थ हा स्वस्त आणि मस्त असतो असे त्याचे म्हणने आहे.

मुळचा नांदेडचा पण सध्या पुण्यात आदेश गट्टाणीला आय.टी.आय. कॉर्नरजवळील गोदावरी स्वीट्स मधील स्नॅक्स फार आवडतात आणि जेवणासाठी तो गोपीरुचीरा फॅमिली रेस्टॉरेंटला प्राधान्यदेतो. तो सांगतो की गोदावरी स्वीट्स हे थोडेसे महाग असले तरीत्यांच्या अन्नपदार्थाच्या दर्जामुळे इट्स .के.

निशिगंध, ज्याचे नांदेडच्याच एस.जी.जी.एस. कॉलेजमधून एम.टेक. (CAD/CAM) झाले आहे, तो म्हणतो की जुन्या मोढ्यातील सुंधा भवानी हॉटेल त्याला फार आवडते. त्याच्या मते तेथील दालबाटी चुरमा (कडक घी के साथ) निव्वळ अप्रतीम असते.



मीसुद्धा एक चांगला खवय्या असल्यामुळे मला आवडणाऱ्या ठिकाणांचीसुद्धा माहिती देतो.




चिकन
आणि मटनाचे खाद्यपदार्थ
--> हॉटेल सुंदर (गुरूद्वाऱ्याजवळ), मराठा मटन (दत्तनगर).

हॉटेल सुंदर हे अतिशय स्वस्त आणि चवीलाही मस्त असे हॉटेल आहे. मराठा मटन हॉटेलातला मटणाचा झणझणीत रस्सा तर लाजवाबच, पण हे बिअर बारसुद्धा असल्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमीलीला इथे नेऊ इच्छीणार नाही.



दही भल्ला --> गुरूद्वारा चौक

गुरूद्वारा चौकाजवळच असलेल्या ह्या हातगाड्यावर दही भल्ला आणि पाणीपुरी फार मस्त मिळते. मला तरी बुवा इथली पाणीपुरी आईनाथच्या पाणीपुरीपेक्षा चवीला जास्त चांगली वाटते.



व्हेज मंचुरीअन --> आदित्य स्नॅक्स. (बोरबन भागात)

१२ रुपयाला एक प्लेट व्हेज. मंचुरीअन.

आहे की नाही किंमत आश्चर्यचकीत करणारी. अहो चवसुद्धा तीतकीच चांगली आहे.

मंचुरीअन व्यतिरीक्त इथले फ्राईड राईस, नुडल्स, पनीर ६५ हे पदार्थही चवीला चांगले आहेत.



रोज(गुलाब) लस्सी --> जनता कोल्ड्रींक्स (वजिराबाद)

या लस्सीसाठी अमृततूल्य हा एकच शब्द माझ्यापाशी आहे. इथे येणारे अर्ध्याहून जास्त ग्राहक याच लस्सीची मागणी करताना दिसतात.



खीचडी --> कविता खिचडी सेंटर (बाफना)

बाफना/देगलूर नाका भागात काम करणारे मजूरच नाही तर नांदेडच्या वेगवेगळ्या भागातून लोक इथली खीचडी आणि भज्जे खायला येतात.



जेवणासाठी --> शेर-ए-पंजाब आणि दशमेश

हे दोन्ही ढाबे थोडीशी शहराबाहेर, आसना नदीच्या पूलापुढे आहेत.

दोन्ही हॉटेलं फक्त नावालाच ढाबे आहेत. बाकी चव, स्वच्छता, सजावट या सर्व बाबतीत नांदेड शहरातले हॉटेल्ससुद्धा यांच्यापुढे फीके पडतील.




ही तर झाली शहरातली ठिकाणं, शहराबाहेरही खाण्या-पीण्याची अनेक ठिकाणे प्रसिद्धआहेत. लोह्याचे दही धपाटे, भोकरच्या बसस्टॅंडवरचे खिचडी-भज्जे, महादेव पिंपळगावचे पेढे, किनवट येथील इसाक खान यांचा ढाबा अशी बरीच ज्ञात-अज्ञात ठिकाणं नांदेडला खाण्यापीण्याच्याबाबतीत समृद्ध करतात.



एकंदरीत खवय्येगिरी करणाऱ्या नांदेडीअन्सच्या जिभेची वासना कधिही कमी होणार नाही असे आपण म्हणू शकतो.



तुम्हालाही जर नांदेडमधल्या कुठल्या ठिकाणचा खाद्यपदार्थ आवडत असेल तर त्याची माहितीआमच्यासोबत शेअर करावी, जेणेकरून आम्हाला त्या पदार्थाचा आनंद घेता येईल.

अखेरकार खानेवालों को खाने का बहाना चाहिये !