Wednesday, May 11, 2011
भारतीय प्रशासन सेवेत नांदेडीअन्स.
होय मित्रांनो, UPSC २०१० चा निकाल लागलाय.
हिमायतनगरचे राहूल अशोक रेखावार (भारतात १५ वी रॅंक आणि महाराष्ट्रातून पहिले) आणि कंधारचे प्रशांत जीवन पाटिल (भारतात ४४ वी रॅंक.) यांनी UPSC परीक्षेत आपली पताका डौलाने फडकवली आहे.
दोघांचीही नेमणूक भारतीय प्रशासन विभागात, म्हणजे IAS मध्ये होणार आहे.
या दोघांनाही तमाम नांदेडीअन्सतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! :-)
Tuesday, May 10, 2011
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक फेसबुकवरच्या ‘नांदेडीअन्स’ ग्रूपमध्ये.
माफ करा, खूप दिवसांनंतर अपडेट करतोय ब्लॉग.
हां, तर मला परत एकदा फेसबुकबद्दल बोलायचंय.
मागेही मी सांगितलं होतं की ऑर्कूट, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून अनेक समाजोपयोगी, विकासाची कामं होऊ शकतात. (उदाहरणही दिलं होतं मी.)
आता तर फेसबुकवरच्या ‘नांदेडीअन्स’ ग्रूपमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक हेसुद्धा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
तुम्हालाही तुमच्या वार्डाच्या किंवा शहरातल्या इतर ठिकाणच्या काही समस्या डॉ. निपुण विनायक यांना कळवायच्या असतील तर ही चांगली संधी आहे.

Subscribe to:
Posts (Atom)