भारनियमनाने नांदेडमध्ये कळस गाठलाय असं म्हणायला आता काही हरकत नाही कारण पूर्वी दिवसातून ५ तास (सकाळी २.३० आणि संध्याकाळी २.३० तास) लाईट जायची नंतर ती दिवसातून ६.३० तास (सकाळी ३.१५ तास आणि सायंकाळी ३.१५ तास) जायला लागली मग आता काही दिवसाअगोदरपर्यंत तीच्या वेळेत अजून थोडी वाढ झाली आणि ती ७.३० तास (सकाळी ३.४५ तास आणि सायंकाळी ३.४५ तास) जायला लागली.
पण आता नांदेडीअन्संचा धीर सुटत चाल्लाय असे दिसत आहे कारण विज-वितरण कंपनीच्या कार्यालयांवर हल्ले होण्याच्या घटणांमध्ये वाढ होत आहे.
त्याचे कारणही तसेच आहे, विज-वितरण कंपनी आता भारनियमनाच्या वेळेव्यतीरिक्त ३ ते ४ तास अतिरीक्त म्हणजेच एकूण १० ते ११ तास भारनियमन करत आहे.
आणि ह्या अतीरिक्त भारनियमनाचा ठराविक असा वेळ्सुद्धा घोषित केलेला नाहिये.
रात्री बेरात्री कधीही विज गुल होत आहे.
आधीच पाऊस न पडल्यामुळे वातावरणात अधिकचा उष्मा जाणवत आहे आणि त्यातूनच रात्री लाईट गेली की नागरिक उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी गच्चीवर झोपत आहे आणि चोर-भामटे नेमके या आयत्या संधिचा फायदा घेत आहेत.
रात्रीच्या भारनियमनाचाकरण्याच्या घटनांमध्येसुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे.
या पार्श्वभुमीवर मला विज-वितरण कंपनी आणि नांदेडीअन्संना इतकेच सांगावेसे वाटते आहे की
' सावधान रात्र वैरयाची आहे '.
ताजा कलम (१) :-
मी हा लेख १८ तारखेला लिहिला होता, आणि १९ तारखेपासून वृत्तपत्रांमध्ये खालील बातम्या यायला लागल्या.
१) वीज - वितरन कंपनीकडून जाहीर आवाहन
२) सन्मित्रनगरात घरफोडी
३) भारनियमनात एका तासाने वाढ
४) भारनियमन विरोधात छावाची गांधीगिरी
५) महावितरन कार्यालयावर हल्ला
६) अतिरिक्त भारनियमनाने नांदेडकर घामाघूम
७) भारनियमनाचा पहिला बळी
८) आता किती तास लाईट राहणार याच्या बातम्या
९) देगलूर येथे वीज कार्यालयाची तोडफोड
ताजा कलम (२):-
सध्या शहरात सकाळी ४.१५ आणि सायंकाळी ४.१५ तासांचे भारनियमन होत आहे परंतू त्याच्या जोडीलाच अतिरिक्त आणि अघोषित भारनियमनसुद्धा सुरुच आहे।
ताजा कलम (३):-
कालपासून (२५ जुलै ०८) शहरात भारनियमन सकाळी ४.४५ आणि रात्री ४.४५ तास वीज गूल होत आहे।
:: छायाचित्रमय मागोवा ::








