सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 30th, 2009 AT 12:09 AM
नांदेड - अहमदपूर येथे सभेला जाण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मंगळवारी (ता. 29) नांदेडच्या विमानतळावर आले, अन् प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ते अहमदपूरकडे रवाना झाले. दरम्यान, यादौऱ्याचा फायदा घेऊन जिल्ह्यातील मनसेच्या काही "उत्साही' पदाधिकाऱ्यांनी शहरात राज ठाकरे यांची जाहीर सभाहोणार असल्याच्या बातम्या व जाहिराती वर्तमानपत्रात देऊन जनतेची दिशाभूल केली. मात्र, सभाच न झाल्यानेतळपत्या उन्हात राज यांची प्रतीक्षा करीत बसलेल्या जनतेची घोर निराशा झाली.
राज ठाकरे यांची आज अहमदपूरला सभा होती. नांदेड येथील विमानतळावर हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरून तेअहमदपूरला रवाना होणार होते. मात्र, या दौऱ्याचा (गैर) फायदा घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर त्यांची जाहीर सभा होणार असल्याच्या अफवा पसरविल्या. इतकेच नव्हेतर वर्तमानपत्रात जाहिराती व बातम्या देऊन जनतेची दिशाभूलही केली.
या उत्साही कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर सभेची जय्यत तयारी केली होती. जिल्ह्याच्यावेगवेगळ्या भागातून मिळेल त्या वाहनानिशी मनसेचे कार्यकर्ते सभेसाठी आणले होते. सकाळी दहा वाजेपासूनचसभास्थानी शाहिरांना पाचारण करण्यात आले. या शाहिरांनी केंद्र व राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावरटीका करणारी गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. दरम्यान, अमरावतीहून सकाळी साडेअकराच्यासुमारास विशेष हेलिकॉप्टरने राज ठाकरे यांचे नांदेडला आगमन झाले. जिल्हाध्यक्ष विनोद पावडे, अजय सरसरआदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरल्यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राजठाकरे अहमदपूरला रवाना झाले. नियोजनातच नसल्यामुळे त्यांची सभा होण्याचा प्रश्नच नव्हता.
दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांच्या या "उद्योगा'मुळे दोन तास राज ठाकरे यांची तळपत्या उन्हात प्रतीक्षा करणाऱ्याजनतेची मात्र घोर निराशा झाली. अखेर जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन विनोद पावडे (नांदेड उत्तर), शिवा नरंगलेलोहा), अशोक नेम्मानीवार (किनवट), केशव हारण पाटील (हदगाव) या चार उमेदवारांनी भाषणबाजी केली.
सभेला अपेक्षित गर्दी नसल्यामुळे राज ठाकरे यांनी सभेला उपस्थीत राहायचे टाळले असेही सांगण्यात येते.
Wednesday, September 30, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment