Thursday, April 7, 2011

मी शारूक मांजरसुंभेकर !

नमस्कार मित्रांनो,
महेश मांजरेकर दिग्दर्शीत ‘मी शारूक मांजरसुंभेकर’ या नाटकाबद्दल आपण एव्हाना विविध वाहिण्यांवरून बरंच काही ऎकलं असेल, पाहिलं असेल.
हेच नाटक आज रात्री ९.३० वाजता कुसुम नाट्यगृहात पाहण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे.
या नाटकाबद्दल अधिक माहिती तुम्हाला आजच्या बहुतांश स्थानिक वर्तमानपत्रात मिळेलच.

या नाटकाची काही समीक्षणं तुम्हाला खालील लिंक्सवर वाचायला मिळतील.Link
http://www.loksatta.com/lokprabha/20101210/natya.htm

http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/7683321.cms

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MumbaiEdition-3-2-06-03-2011-44c5b&ndate=2011-03-06&editionname=mumbai

http://shalshirako.blogspot.com/2011/01/blog-post_09.html

शेवटच्या लिंकमधील समीक्षणचा काही भाग मी इथे उद्धृत करतोय.
"मांजरसुभेकर याची निराशा, हताशा आणि तरीही उसळी घेणारी अपराजित उर्मी या सगळ्याचं अफलातून सादरीकरण सिद्धू समोर करत असतो आणि दाताखाली खडा यावा, गवई बेसूर व्हावा, मोबाइल बॅटरी संपून अवचित बंद पडावा तसे अतिशय सवंग, हीन, सरळसरळ अश्लील विनोद नाटकाची वाट लावत रहातात. ही या नाटकाची आयरनी ऑफ ड्रामा आहे."


अवांतर :- मी काही इथे या नाटकाची जाहिरात करत नाहीये, पण सिद्धार्थ जाधवसारख्या एका जबरदस्त ताकदीच्या कलावंताचा अभिनय पाहण्याची तुमची संधी केवळ माहितीअभावी हुकू नये म्हणून हा ब्लॉगपोस्ट !

0 comments:

Post a Comment

Post a Comment