Saturday, July 2, 2011

फेसबुक, युट्यूब आणि नांदेडचे ट्रॅफिक पोलीस.

नमस्कार नांदेडीअन्स.
बर्‍याच दिवसांनी भेट होते आहे आपली.
सध्या मीसुद्धा तुमच्यासारखाच फेसबुकवर ऍक्टीव्ह आहे.
आपल्या नांदेडीअन्स ग्रूपमध्ये तिकडे जवळपास ३,००० सभासद जमले आहेत, त्यामुळे ब्लॉग अपडेट करण्याऎवजी फेसबुक ग्रूपचा मार्गच सोपा वाटतोय.

नांदेडबद्दल कुणी काही नवीन माहिती, फोटोज, व्हिडीओज वगैरे टाकले आहेत का ते पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे मी मायाजालावर सर्च करत होतो आणि मला एक व्हिडीओ मिळाला युट्यूबवर, ज्यात एका दुचाकीस्वाराने ट्रॅफिक पोलीसांचेच स्टिंग ऑपरेशन केले होते. (या व्हिडीओमध्ये काही ट्रॅफिक पोलीस त्या दुचाकीस्वाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते.)
त्या व्हिडीओची लिंक मी फेसबुकवर शेअर केली आणि त्याला अनेकांचे कमेंट्स यायला लागले.

या ग्रूपमध्ये नांदेडचे अनेक सिनिअर पत्रकारसुद्धा आहेत (प्रिंट आणि ईलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्हीचे.), त्यांना ह्याच व्हिडीओवर एक बातमी बनवायची होती.
पण नांदेडचे पोलीस उप-अधिक्षक श्री. लक्ष्मिकांत पाटील हे त्या ट्रॅफिक पोलीसांवर कारवाई करणार असल्याचे समजल्यावर मी तो पोस्ट फेसबुकवरून उडवला.
पण तो व्हिडीओ युट्यूबवर तसाच आहे आणि इतरही १-२ लोकांनी तोच व्हिडीओ जशास तसा युट्यूबवर अपलोड केलाय.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तपत्रांमध्येसुद्धा या व्हिडीओसंदर्भात बातम्या आल्या होत्या.
काल काही वृत्तपत्रांमध्ये बातमी होती, त्या ट्रॅफिक पोलीसांची वाहतूक शाखेतून पोलीस मुख्यालयी बदली झाल्याची.

1 comments:

Shubham chakrawar said...

are tora background colour change kar...............and ha u writes good keep it up......

Post a Comment

Post a Comment