Sunday, June 28, 2009
पाऊस आला
काल रात्री २ वाजल्यापासून पावसाने जो जोर पकडला आहे तो अजूनही कायम आहे.
हा ब्लॉगपोस्ट लिहीत असतांनाच (सकाळचे ११.००) बाहेर अजूनही मस्त पाऊस पडत आहे.
वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे एव्हाणा तुम्ही चहा पीत पीत बाहेरच्या वातावरणाचा आनंद लुटतअसाल.
रवीवार असल्यामुळे आज नेहमीच्या धावपळीपासूनही सुटका झालेली असेल.
बाहेर पडून पावसाचा आनंद लुटायचा की नाही हे मात्र सर्वस्वी तुमच्याच हाती आहे.
चलाअ, मी एक कविता पोस्ट करतो, ती वाचल्यावर मग तुम्ही स्वतःला पावसात नाचण्या-बागडण्यापासून रोखूचशकणार नाही.
रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे
रंग येऊन पानोपानि स्मरवितो तराणे
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.
बालपणाच्या आठवणी घेऊन तो येतो
पाण्यातल्या होड्या नि गाणि तो गातो
वारा पण अलगद डोलु लागतो
हिरवा निसर्ग सारा ओलागार होतो
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.
मित्र तो, सखा तो, हळवार येतो
मन प्रसन्न करुन तो आनंद देतो
गरम चहाचा स्वाद तो वेगळाच देतो
खिडकित बघताना तो डाळे टिपुन घेतो
हाताच्या बोटावर तो आपला नाच करतो
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.
-- राहूल पाठक
Thursday, June 25, 2009
दहावीचा निकाल
सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! जे उत्तीर्ण झाले नाहीत त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे. निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाचा उपयोग करावा. http://mahresult.nic.in/ssc2009/ssc09.htm | |
Monday, June 22, 2009
दैनिक सत्यप्रभा आता इंटरनेटवर
नांदेडच्या 'दैनिक सत्यप्रभा' या वृत्तपत्राची आवृत्ती आता इंटरनेटवरही उपलब्ध झाली आहे.
आणि अशा प्रकारे नांदेडच्या स्थानिक वृत्तपत्राची आवृत्ती सर्वप्रथम इंटरनेटवर आणण्याचा बहुमानदेखील दैनिक सत्यप्रभानेच पटकावीला आहे. :-)
साईटवरच्या काही सुविधा अजून पुर्णपणे कार्यान्वीत झाल्या नसल्या तरी लवकरच त्या सुरळीत होतील आणि तुम्हाला त्यांचा फायदा घेता येईल अशी आशा करूयात.
दैनिक सत्यप्रभाच्या भावी वाटचालीस 'नांदेडीअन्सतर्फे' हार्दिक शुभेच्छा !
:: Link ::
http://satyaprabha.com/
Friday, June 5, 2009
ती फाईटर प्लेन्स आता नांदेडात
तामसा आणि भोकर परिसरात घिरट्या घालणाऱ्या "त्या" विमानांबद्दल आपण अगोदरच वाचलं असेल.
मित्रांनो, तीच विमानं आता गेल्या दोन दिवसांपासून नांदेड शहरावर घिरट्या घालीत आहेत.
अगदी कमी उंचीवरून, प्रचंड आवाज करीत आणि अतिशय वेगाने ही विमानं नांदेड शहरावरून उड्डाण घेत आहेत.
नांदेडीअन्स अशी विमानं नांदेडमध्ये पहिल्यांदाच पाहात आहेत त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मनातवेगवेगळ्या शंका - कुशंका निर्माण होत आहेत की ही विमानं नांदेडमध्ये कशासाठी, इतक्या खालून उडण्यामागेत्यांचे प्रयोजन काय, वगैरे वगैरे.
अजूनपर्यंत कोणत्याही वृत्तवाहिनीने किंवा वृत्तपत्राने याबाबत कोणतीच माहिती जाहीर केली नसल्यामुळे यातर्क-वितर्कांना अजून उधानच येत आहे.
सकृतदर्शनी ही विमानं दिसायला भारतीय वायुसेनेत कार्यरत असलेल्या "हॉक" विमानांसारखीच दिसत आहेत.
आपणा सर्वांना तर माहितच आहे की बिदर (कर्नाटकातील एक जिल्हा) येथे भारतीय वायुसेनेचे तळ आहे.
माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः वर्षभरापुर्वी आपल्या वायुसेनेने काही "हॉक" विमानं विकत घेतली होती आणिती विमानं बिदर येथेच कार्यरत आहेत. (माझी माहिती बरोबरच असेल याची काही शाश्वती नाही.)
असा अंदाज बांधायला काही हरकत नाही की ही विमानं "हॉक"च असतील आणि ती नांदेड येथे काही सराव करतअसतील.
पण हा सर्वस्वी एक अंदाजच आहे, ऑफिशीयल माहिती मिळेपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही.
:: Photos ::
ता.क. :- या साईटवरील चित्रं आणि माहिती पाहून ही विमानं "British Aerospace Hawk 132 ZK122" आहेत असे दिसून येते.
Wednesday, June 3, 2009
लातुरच्या राजस्थान विद्यालयात तोडफोड
अहो, लातुरचा उल्लेख असला म्हणून काय झालं, नांदेडशीच संबंधित आहे ही बातमी.
अरे नाही, कोणत्या राजकीय वादातून नाही झाली ही तोडफोड.
अहो तुम्हाला तर माहितच आहे ना, आपल्या मुखेड तालुक्यातील १२वीच्या परिक्षेतील सामुहिक कॉपी प्रकरण!
तेच ते, ज्यात सुरूवातीला लातुर बोर्डाने फक्त १६० परिक्षार्थ्यांनाच चौकशीकरीता बोलाविलं होतं पण नंतर अधिक चौकशीनंतर विद्यार्थ्यांची हीच संख्या ३,००० पर्यंत पोहोचली.
उद्या महाराष्ट्रात सगळीकडे १२ वीचा निकाल लागेल, पण मुखेडच्या या ३,००० विद्यार्थ्यांना मात्र निकालासाठी अजून बरीच वाट पाहावी लागण्याचे चिन्हं दिसत आहेत कारण लातुर बोर्डाने या सर्वच्या सर्व ३,००० विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.
याच विद्यार्थ्यांच्या संतापाचा फटका आज दुपारी लातुर येथील राजस्थान विद्यालयाला बसला.
विद्यार्थ्यांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी करत तोडफोड केली, तसेच पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी केलेल्या सौम्य लाठीमारात एका पत्रकाराचा कॅमेराही फुटला त्यामुळे स्थानिक पत्रकारांनी एकत्र येऊन पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली.
या विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉफी केल्याचा आरोप महाविद्यालय आणि मंडळाचा असून, विद्यार्थ्यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. महाविद्यालयाने जाणून-बुजून निकाल राखीव ठेवले असून, हे निकाल जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बघुयात पुढे हे प्रकरण काय वळण घेते.
या बातमीच्या अपडेट वेळोवेळी पोस्ट करण्यात येतील.
ता. क. :- (मंगळवार ४ जून, ९:३० AM)
आमचे मित्र सौरभ कौरवार यांनी आम्हाला हा व्हिडीओ पाठविला आहे.
हा व्हिडीओ त्यांनी स्वतःच्या मोबाईलमधून शूट केला आहे.
काल जेव्हा तोडफोड झाली, तेव्हा सौरभ कौरवार हा राजस्थान विद्यालयातच होता.
Tuesday, June 2, 2009
आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक पाहण्याची आज सुवर्णसंधी
आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक दरदिवशी पृथ्वीला जवळपास १६ प्रदक्षिणा घालते. मात्र, काही विशिष्ट दिवशीच आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणाहून हे अंतराळस्थानक पाहता येणे शक्य आहे.
मंगळवारी ही संधी उपलब्ध होणार असून आकाश जर निरभ्र असेल तर साध्या डोळ्यांनीही ते पाहता येईल.
या स्थानकाला जोडलेल्या उपकरणांवर सूर्यप्रकाश पडल्याने ते प्रकाशमान होणार असून या वेळी त्याची तेजस्विता एखाद्या ताऱ्याप्रमाणे (उणे १.२) भासेल.
आकाशातील उत्तर ध्रुवाजवळून सप्तर्षी तारकासमूह, भुतक मार्ग, वृश्चिक तारकासमूहाकडे, असा या अंतराळ स्थानकाचा मार्ग असेल. भुतकजवळ असताना ते अगदी स्पष्टपणे ओळखता येईल. या वेळी उत्तर क्षितीजावरून जवळपास ३७ अंश उंचीवर ते दिसणार आहे.
१९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल, तेव्हा ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक असेल. तेव्हा ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे असेल. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे.
या स्थानकाचे पृथ्वीजवळ असतानाचे अंतर ३५० किलोमीटर एवढे असते. तेव्हा ते साध्या डोळ्यांनी पाहणे शक्य आहे. तासाला २७ हजार ७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते.
पृथ्वीवरील गुरत्वीय बदलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. वजन विरहीत अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल, जेणेकरून मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येईल, याचा अभ्यास केला जात आहे.
मूळ अंतराळस्थानकाला आतापर्यंत १४ वेगवेगळ्या उपकरणांनी जोडलेले आहे. या अंतराळ स्थानकात आजवर भारतीय वंशाच्या कल्पना चावला व त्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी काम केले आहे. कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुनीता विल्यम्स यांनी सलग सहा महिने या स्थानकात वास्तव्य करण्याचा विक्रम केला आहे, असेही श्री. औंधकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
Monday, June 1, 2009
हिंगोली गेट उड्डाणपुल
यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या निश्चितच थोड्याफार प्रमाणात का होईना पण कमी होईल.
याबद्दल आपले काय मत आहे ?