Sunday, June 28, 2009

पाऊस आला

आज खऱ्या अर्थाने मान्सून आला असे वाटत आहे.
काल रात्री वाजल्यापासून पावसाने जो जोर पकडला आहे तो अजूनही कायम आहे.
हा ब्लॉगपोस्ट लिहीत असतांनाच (सकाळचे ११.००) बाहेर अजूनही मस्त पाऊस पडत आहे.
वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे एव्हाणा तुम्ही चहा पीत पीत बाहेरच्या वातावरणाचा आनंद लुटतअसाल.
रवीवार असल्यामुळे आज नेहमीच्या धावपळीपासूनही सुटका झालेली असेल.

बाहेर पडून पावसाचा आनंद लुटायचा की नाही हे मात्र सर्वस्वी तुमच्याच हाती आहे.
चलाअ, मी एक कविता पोस्ट करतो, ती वाचल्यावर मग तुम्ही स्वतःला पावसात नाचण्या-बागडण्यापासून रोखूचशकणार नाही.

रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे
रंग येऊन पानोपानि स्मरवितो तराणे
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.

बालपणाच्या आठवणी घेऊन तो येतो
पाण्यातल्या होड्या नि गाणि तो गातो
वारा पण अलगद डोलु लागतो
हिरवा निसर्ग सारा ओलागार होतो
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.

मित्र तो, सखा तो, हळवार येतो
मन प्रसन्न करुन तो आनंद देतो
गरम चहाचा स्वाद तो वेगळाच देतो
खिडकित बघताना तो डाळे टिपुन घेतो
हाताच्या बोटावर तो आपला नाच करतो
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला.

-- राहूल पाठक

0 comments:

Post a Comment

Post a Comment