Friday, June 5, 2009

ती फाईटर प्लेन्स आता नांदेडात

तामसा आणि भोकर परिसरात घिरट्या घालणाऱ्या "त्या" विमानांबद्दल आपण अगोदरच वाचलं असेल.
मित्रांनो, तीच विमानं आता गेल्या दोन दिवसांपासून नांदेड शहरावर घिरट्या घालीत आहेत.
अगदी कमी उंचीवरून, प्रचंड आवाज करीत आणि अतिशय वेगाने ही विमानं नांदेड शहरावरून उड्डाण घेत आहेत.नांदेडीअन्स अशी विमानं नांदेडमध्ये पहिल्यांदाच पाहात आहेत त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मनातवेगवेगळ्या शंका - कुशंका निर्माण होत आहेत की ही विमानं नांदेडमध्ये कशासाठी, इतक्या खालून उडण्यामागेत्यांचे प्रयोजन काय, वगैरे वगैरे.
अजूनपर्यंत कोणत्याही वृत्तवाहिनीने किंवा वृत्तपत्राने याबाबत कोणतीच माहिती जाहीर केली नसल्यामुळे यातर्क-वितर्कांना अजून उधानच येत आहे.
सकृतदर्शनी ही विमानं दिसायला भारतीय वायुसेनेत कार्यरत असलेल्या "हॉक" विमानांसारखीच दिसत आहेत.आपणा सर्वांना तर माहितच आहे की बिदर (कर्नाटकातील एक जिल्हा) येथे भारतीय वायुसेनेचे तळ आहे.
माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः वर्षभरापुर्वी आपल्या वायुसेनेने काही "हॉक" विमानं विकत घेतली होती आणिती विमानं बिदर येथेच कार्यरत आहेत. (माझी माहिती बरोबरच असेल याची काही शाश्वती नाही.)
असा अंदाज बांधायला काही हरकत नाही की ही विमानं "हॉक" असतील आणि ती नांदेड येथे काही सराव करतअसतील.
पण हा सर्वस्वी एक अंदाजच आहे, ऑफिशीयल माहिती मिळेपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही.


:: Photos ::ता.क. :- या साईटवरील चित्रं आणि माहिती पाहून ही विमानं "British Aerospace Hawk 132 ZK122" आहेत असे दिसून येते.

http://www.airplane-pictures.net/image31781.html

0 comments:

Post a Comment

Post a Comment