Friday, December 25, 2009
गोली वडापाव आता नांदेडमधे
मुंबई, पुणे, नाशिक भागामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला गोली वडापाव आता नांदेडमधे आला आहे.
गोलीच्या नांदेडमधील प्रतिनिधींनी (franchisee) त्यांच्या स्टोअर्ससाठी जागासुद्धा अतिशय मोक्याच्या हेरल्या आहेत.
गोली वडापावच्या नांदेडमधे तीन शाखा उघडल्या आहेत.
१) गोली :- गुरूजी (गुरूद्वारा चौरस्ता)
भारताच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या पर्यटकांची इथे नेहमीच वर्दळ असते.
२) गोली :- क्विक बाईट्स (चौगुले कोचींग क्लासेसच्या बाजूला)
या भागात तर ११-१२ वीचे सगळे ट्युशन्स असल्या कारणाने दिवसभर इथेही गर्दी असते.
संध्याकाळी ट्युशन सुटल्यावर मित्रांसोबत गप्पा मारता मारता विद्यार्थ्यांची पावलं नक्कीच इथल्या क्विक बाईट्सकडे वळतील यात शंका नाही.
३) गोली :- टेम्प्टेशन (आईनाथ पाणीपुरीच्या बाजूला, भाग्यनगर)
आईनाथ पाणीपुरीवाल्याकडची गर्दी आता इथल्या टेम्प्टेशनकडे वळायला लागली आहे.
मी तर बुवा टेस्ट घेतली आहे गोली वडापावची.
छान वडापाव आहेत गोलीचे.
नेहमीच्या वडापावमध्ये चेंज पाहीजे असेल तर तुम्हाला गोलीमधे कटलेट वडापाव, आलुटिक्की वडापाव, शेज्वान वडापाव असे वडापावचे वेगवेगळे फ्लेवर्स खायला मिळतील.
गोलीच्या वडापावव्यतिरीक्त तुम्हाला त्यांचा साबुदाना वडा, समोसा, कांदा भजी इत्यादी पदार्थसुद्धा आवडतील.
गोलीने नांदेडच्या खवैय्येगिरीत भर टाकली आहे.
:: गोली वडापावचे अधिकृत संकेतस्थळ ::
http://golivadapav.com/
Labels:
खाना-खजाना
Monday, December 14, 2009
एक समर्पित संध्याकाळ
६ डिसेंबर ०९ रोजी स्टार माझावर बहिणाबाई चौधरी यांच्यावर अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली 'बहिणाई' ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात येत होती.
फारच मस्त डॉक्युमेंटरी होती ती.
मला बहिणाबाई चौधरी म्हणजे एक निरक्षर बाई पण तरीदेखील एक उत्तम कवियीत्री इतकीच माहिती होती, पण या डॉक्युमेंटरीमुळे खूप छान माहिती मिळाली.
आता माझे असे ठाम मत झाले आहे की बहिणाबाई चौधरी यांच्याइतक्या चांगल्या कविता कुणीही केलेल्या नाहीयेत.
फारच सहज-सोप्या भाषेमधे अतिशय गहन विषयांवर त्या कविता करत असत.
मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर
मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर
मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना
मानवी मनाचे विश्लेषण इतक्या सोप्प्या भाषेत जगातील कुठल्याही व्यक्तीने केले असेल असे मला तरी वाटत नाही.
आता हीच डॉक्युमेंटरी नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पाहायला मिळणार आहे, तेव्हा ही संधी सोडू नका.
Labels:
संमिश्र/विविधा
Friday, December 11, 2009
राज्य शासनाचे उत्कृष्ठ वावाङ्मय निर्मितीचे पुरस्कार जाहीर.
३ डिसेंबर ०९
नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यावेळी नांदेडच्या दोन साहित्यिकांचा पुरस्कारप्राप्त लेखकांमधे समावेश झालेला आहे.
विजय पाडळकर यांच्या 'गंगा आये कहॉं से - गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास' या साहित्यकृतीला ललित कला आस्वादपर लेखन या विभागातला पु.ल. देशपांडे पुरस्कार
तर
डॉ. भगवान अंजनीकर यांच्या 'महापुरूषांचे चरित्रचिंतन' या पुस्तकास बालवाङ्मय (कविता) या विभागातला ना. वा. टिळक पुरस्कार मिळाला आहे.
या दोन्ही नांदेडीअन्सचे आपल्या नांदेडीअन्स ब्लॉगतर्फे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्याकडून अशाच उत्तमोत्तम साहित्यकृती घडाव्यात यासाठी शुभेच्छा. :-)
Labels:
काही नांदेडीअन्स
Subscribe to:
Posts (Atom)