Friday, December 25, 2009
गोली वडापाव आता नांदेडमधे
मुंबई, पुणे, नाशिक भागामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला गोली वडापाव आता नांदेडमधे आला आहे.
गोलीच्या नांदेडमधील प्रतिनिधींनी (franchisee) त्यांच्या स्टोअर्ससाठी जागासुद्धा अतिशय मोक्याच्या हेरल्या आहेत.
गोली वडापावच्या नांदेडमधे तीन शाखा उघडल्या आहेत.
१) गोली :- गुरूजी (गुरूद्वारा चौरस्ता)
भारताच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या पर्यटकांची इथे नेहमीच वर्दळ असते.
२) गोली :- क्विक बाईट्स (चौगुले कोचींग क्लासेसच्या बाजूला)
या भागात तर ११-१२ वीचे सगळे ट्युशन्स असल्या कारणाने दिवसभर इथेही गर्दी असते.
संध्याकाळी ट्युशन सुटल्यावर मित्रांसोबत गप्पा मारता मारता विद्यार्थ्यांची पावलं नक्कीच इथल्या क्विक बाईट्सकडे वळतील यात शंका नाही.
३) गोली :- टेम्प्टेशन (आईनाथ पाणीपुरीच्या बाजूला, भाग्यनगर)
आईनाथ पाणीपुरीवाल्याकडची गर्दी आता इथल्या टेम्प्टेशनकडे वळायला लागली आहे.
मी तर बुवा टेस्ट घेतली आहे गोली वडापावची.
छान वडापाव आहेत गोलीचे.
नेहमीच्या वडापावमध्ये चेंज पाहीजे असेल तर तुम्हाला गोलीमधे कटलेट वडापाव, आलुटिक्की वडापाव, शेज्वान वडापाव असे वडापावचे वेगवेगळे फ्लेवर्स खायला मिळतील.
गोलीच्या वडापावव्यतिरीक्त तुम्हाला त्यांचा साबुदाना वडा, समोसा, कांदा भजी इत्यादी पदार्थसुद्धा आवडतील.
गोलीने नांदेडच्या खवैय्येगिरीत भर टाकली आहे.
:: गोली वडापावचे अधिकृत संकेतस्थळ ::
http://golivadapav.com/
Labels:
खाना-खजाना
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
अर्रे वा!!
टेस्ट घ्यायला यावेच लागेल.
सौरभ, मी तुला टॅगलय. http://manatkayaahe.blogspot.com/2009/12/blog-post_24.html
यात सुद्धा मी भाग्यनगर कॉर्नर माझा फ़ेवरेट आहे असे लिहीले आहे, त्यात अजुन एका कारणाची भर...
आमच्या औरंगाबादेत पण आलयं गोली, सरस्वती भुवन कॉलेज अन देवगिरी कॉलेजकडे... मस्त आहे...! ;)
- विशल्या!
Post a Comment