आज गुगलींग करतांना एक वेबसाईट सापडली.
http://earthquake.itgo.com/today.htm
या वेबसाईटबद्दल थोडी शोधाशोध केल्यावर कळाले की या वेबसाईटवर म्हणे भूकंपाचे प्रेडीक्शन करतात आणि ते खरेही ठरतात म्हणे.
(भूकंपाची भविष्यवाणी करण्याइतपत विज्ञान अजून प्रगत झालेले नाही, त्यामुळे या वेबसाईटवर किती विश्वास ठेवावा हे ज्याचे त्याने ठरवावे.)
२८ ऑक्टोबरला या वेबसाईटवर प्रेडीक्शन करण्यात आले होते की येत्या ४८ ते ३८० तासांत कच्छ (गुजरात), नांदेड, अरेबीयन समुद्र किंवा पाकिस्तान येथे ६ ते ७ मॅग्नीट्युडचा भूकंप होऊ शकतो.
या महिण्यात झालेले भूकंप :- (यात गुजरात, पाकिस्तान आणि नांदेडचाही समावेश आहे.)
http://www.imd.gov.in/section/seismo/dynamic/CMONTH.HTM
&
http://www.asc-india.org/recent.htm
११ नोव्हेंबरच्या भूकंपाचा अपडेट मी तुम्हाला दिलेलाच आहे.
काल (२१ नोव्हेंबर २०१०) दुपारी १२:२० वाजता २.३८ रीश्टर स्केल तिव्रतेचा धक्का जाणवला होता. (यावर्षीचा सगळ्यात मोठा.)
आज (२२ नोव्हेंबर २०१०) संध्याकाळी ५.३० वाजता आणि आत्ता ७:२६ PM वाजता भूकंपाचे दोन मोठे हादरे जाणवले. (काय योगायोग आहे ना ! मी तुम्हाला अपडेट देत असतांना भूकंप व्हायची ही तिसरी ते चौथी वेळ आहे.

भूकंपादरम्यान आणि नंतर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
http://www.nwmcnanded.org/EarthQuake.htm
P.S. :-
