Saturday, September 13, 2008

महाप्रलयाचा डेमो ?

दिनांक --> १२ सप्टेंबर २००८
वेळ --> सकाळचे २.००
स्थळ --> नांदेड


दि. १२ सप्टेंबर २००८ रोजी अगदी पहाटे २.०० वाजता गगनभेदी कडकडाटामुळे नांदेडीअन्सची झोपच उडून गेली.
असा एकही नांदेडीअन मिळणार नाही की जो या आवाजाने जागा झाला नसेल.

त्या दिवशी सकाळी २.०० वाजता निसर्गाने रौद्ररुप धारण केले आणि सर्व नांदेडीअन्सची पाचावर धारण बसली.
होय, अगदी एखाद्या भयपटाला शोभावे असेच वातावरण तयार झाले होते त्यावेळी.

विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट हा तर प्रत्येक नांदेडीअनने कित्येकदा अनुभवला होता, पण या वेळेस मात्र हे आवाज अगदी गगणभेदी असेच होते.
पाऊसही अगदी आभाळ फाटल्यागत कोसळत होता.
भरीत भर म्हणून याच वेळामध्ये वीज पुरवठा अचानक खंडीत झाला आणि परिस्थिती अधिकच भयावह झाली.

जवळपास दिड/दोन तासाने म्हणजेच ३.३०/४.०० वाजता निसर्गाचे रौद्ररूप शांत झाले.

जसा जसा दिवस वर येत होता तसा तसा हाच विषय प्रत्येक नांदेडीअनच्या जिभेवर रेंगाळत होता.

शेवटी प्रत्येक नांदेडीअनच्या तोंडी एकच शब्द होते की :-
" निसर्गाचे असे रौद्ररूप आम्ही यापूर्वी कधिही अनुभवले नाही. "
१३ तारखेच्या वृत्तपत्रांमध्ये याबद्दल आलेल्या काही बातम्याप्रजावाणी
शनिवार, दि. १३ सप्टेंबर २००८

गगनभेदी कडकडाटामुळे नागरिक भयभीत


उत्तर रात्रीच्या गाढझोपेत असलेल्या नांदेडकरांना आकाश हलवून सोडणार्या गगनभेदी विजांच्या कडकडाटाने हादरवून सोडले.
१० सप्टेंबर रोजी झालेल्या महाप्रयोगाच्या चर्चेतून नागरिक सावरत नाहीत तोच मध्यरात्री २ च्या सुमारास झालेल्या मोठमोठ्या आवाजाने सर्वांची झोप उडाली.
दीर्घ प्रतिक्षेनंतर जिल्हाभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून काल मध्यरात्री २ च्या सुमारास आकाशात विजेचा कडकडात होताना मोठा आवाज झाला. हा आवाज इतका मोठा होता की जमीनीसह घरातील काही वस्तू हलल्याचा भास होत होता.

काही जणांनी डोंगरावरील मोठ्या दगडांची टक्कर झाल्यासारखा आवाज ऐकू आल्याचे सांगितले.
या महाकाय आवाजामुळे अनेकांची झोप उडाली. अर्धा तास आवाजांचा प्रलय सुरू होता. त्यानंतर वीज पुरवठा खंडीत झाल्याने भितीत भर पडत होती.
आयुष्यात प्रथमच वीजांच्या अशा कडकडाचा विचित्र असा आवाज ऐकल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.

वृत्त वाहिन्यांनी दोन दिवसांपूर्वीच महाप्रयोगामुळे जगबुडी होणार असल्याची भिती पसरवून कल्पोकल्पीत कथा तयार केल्या होत्या त्यामुळे नागरिकांमध्ये तर्क-वितर्क होत होते.
गेल्या वर्षभरापासून जमिनीतून येणार्या आवाजामुळे नांदेडकरांना भुकंपसदृष्य आवाज नवे नाहीत, परंतू महाप्रयोगातून होणारया प्रलयाच्या अफवेमुळे नांदेडकरांच्या शंकेतही भर पडली होती.
सकाळ

शनिवार, दि. १३ सप्टेंबर २००८

महाप्रयोगाबाबत अफवा अन्‌ घबराट


गुरुवारी मध्यरात्रीनंतर नांदेडमध्ये मुसळधार पावसाला सुरवात झाली. या कालावधीत रात्री पावणेतीनच्या सुमारास आभाळात जोरदार गडगडाट सुरू झाला.
या भयंकर आणि भेसूर आवाजाने नांदेडकरांमध्ये घबराट पसरली होती. विविध रुग्णालयांत रुग्णांबरोबर असलेले नातेवाइक घाबरून बाहेर आले. लहान मुले झोपेतून खडबडून उठून बसली. शुक्रवारी सकाळी शहरात सर्वत्र वेगवेगळी चर्चा होती. जिनिव्हा येथे सुरू असलेल्या महाप्रयोगाचाच हा परिणाम असावा, अशीही अफवा पसरली होती.

महात्मा गांधी मिशन संचलित अंतराळ व तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, की हा घडलेला प्रकार "स्ट्रीक लाइटनिंग' व "फोर्क लाइटनिंग'चा होता.
बंगालच्या उपसागरात पावसासाठी आवश्‍यक असलेली स्थिती होती. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. याचवेळी अरबी समुद्राकडे "द्रोणीय' स्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणीही पावसासाठी आवश्‍यक असलेले घटक निर्माण होत आहेत. त्यामुळे येथेही पावसाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. या दोन वेगवेगळ्या परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्याने रात्री पावणेतीन ते साडेतीन या कालावधीत मोठे आवाज सुरू झाले.
निसर्गाच्या ताकदीचा एक वेगळा चमत्कार या "लाइटनिंग " मुळे अनुभवता आला.


:: काही छायाचित्रं ::0 comments:

Post a Comment

Post a Comment