Saturday, December 18, 2010

कुठे गेले हिवाळी पाहुणे ?

ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाळा लांबला त्यामुळे जे स्थलांतरीत पक्षी ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये भारतात यायचे, ते आता डिसेंबरमध्ये येऊ लागले आहेत.
पण यावर्षी त्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
दरवर्षी शेकडोंच्या संख्येने येणारे पक्षी यावर्षी विविध जलाशयांवर बोटावर मोजण्याइतपत संख्येनेच आले आहेत.
हवामान बदलामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या पद्धतीतही मोठे बदल होत आहेत, असे मत पक्षीतज्ञ व्यक्त करीत आहेत.

नांदेडमधील विविध जलाशयांवर जमलेले पक्षी :-


Black Winged Stilt - शेकाट्या (हिवाळी स्थलांतरित)


Little cormorant - छोटा पाणकावळा (निवासी)


Small Pratincole - पाणभिंगरी (निवासी)


Little ringed plover - कंठेरी चिखल्या (निवासी)


Lesser pied kingfisher - कवडा धीवर (निवासी)


Ruddy Shelduck - चक्रवाक (हिवाळी स्थलांतरित)



उर्वरित फोटो तुम्ही माझ्या ऑर्कूट अल्बममध्ये पाहू शकता.

नांदेड ---> ८.२°

यावर्षी हिवाळ्याने नांदेड शहरातला गेल्या १० वर्षांतला तापमानाचा निचांक मोडला आहे.
काल नांदेडमध्ये थंडीचा पारा ८.२° सेल्सीअसपर्यंत घसरला होता.
परभणीमध्ये काल तापमान ५.९° सेल्सीअस होते.

या कुडकुडायला लावणार्‍या थंडीचा संबंध ग्लोबल वार्मिंगशी लावायचा की नाही, हे ज्याचे त्याने ठरवावे, कारण आपल्या ब्लॉगवर ग्लोबल वार्मिंगबद्दल आधीच खूप पोस्ट्स आले आहेत.
(विनंती :- कुणीही खोडसाळपणे प्रश्न विचारू नये ‘हा ब्लॉग नांदेडबद्दल आहे की ग्लोबल वार्मिंगबद्दल ?’)ketukmeje

Wednesday, December 8, 2010

गोदाई.

माफ करा मित्रांनो, परीक्षा असल्यामुळे काही दिवसांपासून ब्लॉग अपडेट करू शकलो नाही.

गोदावरी !
महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणारी ही नदी.

प्रदूषणामुळे गोदावरी नदीची काय अवस्था झाली आहे ही दर्शवणारी एक डॉक्युमेन्ट्री नुकतीच पाहण्यात आली.
तशी ही डॉक्युमेन्ट्री गोदावरीच्या नाशिक येथील दुरावस्थेबद्दल बनवण्यात आली आहे, पण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गोदावरीची अशीच दुरावस्था झालेली आहे.
किंबहुना माझ्या मते नांदेडमध्येच सगळ्यात वाईट परिस्थीती आहे.xpasti
नवीन पुलावरून जेव्हा नांदेडीअन्स गोदामातेला नमन करून प्लॅस्टीकच्या पिशव्या 'अर्पण' करतात, तेव्हा त्यांच्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही.

श्रद्धेला आमचा विरोध नाही, असण्याचा प्रश्नही उद्भवत नाही.
पण श्रद्धा व्यक्त करण्याची जी पद्धत आहे, ती नक्कीच चुकीची आहे.takbole

आता तरी गोदामातेची आर्त हाक ऎका मित्रांनो.