गोदावरी !
महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणारी ही नदी.
प्रदूषणामुळे गोदावरी नदीची काय अवस्था झाली आहे ही दर्शवणारी एक डॉक्युमेन्ट्री नुकतीच पाहण्यात आली.
तशी ही डॉक्युमेन्ट्री गोदावरीच्या नाशिक येथील दुरावस्थेबद्दल बनवण्यात आली आहे, पण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गोदावरीची अशीच दुरावस्था झालेली आहे.
किंबहुना माझ्या मते नांदेडमध्येच सगळ्यात वाईट परिस्थीती आहे.

नवीन पुलावरून जेव्हा नांदेडीअन्स गोदामातेला नमन करून प्लॅस्टीकच्या पिशव्या 'अर्पण' करतात, तेव्हा त्यांच्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही.
श्रद्धेला आमचा विरोध नाही, असण्याचा प्रश्नही उद्भवत नाही.
पण श्रद्धा व्यक्त करण्याची जी पद्धत आहे, ती नक्कीच चुकीची आहे.

आता तरी गोदामातेची आर्त हाक ऎका मित्रांनो.
0 comments:
Post a Comment