Wednesday, October 29, 2008

दिन दिन दिवाळी

भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना.


नांदेडीअन्सच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !


Sunday, October 26, 2008

गुरु - ता - गद्दी काळातील सोहळ्यांचे वेळापत्रक

तख्त स्नान
27-Oct-08

दिपमाला
28-Oct-08

नगर किर्तन महला दिपमाला
29-Oct-08

गुरु - ता - गद्दी
30-Oct-08

श्री गुरु गोविंदसिंघ यांचे परलोकगमन
3-Nov-08

समाप्ती किर्तन दरबार आणि नगर किर्तन
4-Nov-08

Tuesday, October 21, 2008

सकाळ - मुक्‍तपीठ - राहेर - नांदेड.!!!

नमस्कार मित्रांनो,
आज मी आपल्याला एक खुषखबर सांगणार आहे.

ती खुषखबर अशी की ई-सकाळचे सहयोगी संपादक, श्री. सम्राट फडणीस यांनी आपला
राहेर या तिर्थस्थळावर लिहिलेला लेख ई-सकाळच्या मुक्‍तपीठ या सदरात स्लाईडशोसहित छापला आहे.

मी त्याबद्दल त्यांचा सदैव ऋणी राहीन.


हा पूर्ण लेख मुक्‍तपीठमधे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.esakal.com/esakal/10212008/MUKTAPITHDD93C98C7D.htm


तुम्हालाही तुमचा लेख, अनुभव किंवा इतर काही मजकूर मुक्‍तपीठसाठी पाठवायचा असेल तर तुम्ही खालील पत्त्यावर पाठवू शकता.
"सकाळ मुक्तपीठ" ,
सकाळ पेपर्स लिमिटेड,
५९५ बुधवार पेठ, पुणे ४११००२.


आणि ई-मेल अड्रेस आहे....
muktapeeth@esakal.com

Sunday, October 19, 2008

राहेरचे नृसिंह मंदिर

नमस्कार मित्रांनो,
काही दिवस मी गावाकडे गेल्यामुळे ब्लॉग अपडेट नाही करू शकलो, त्याबद्दल मी आपली माफी मागतो.


पण गावाकडे असतानाच मी राहेरचे नृसिंह मंदिर पाहण्यासाठी गेलो होतो.
मला हे ठिकाण फार आवडले, ह्या ठिकाणाची तुम्हालाही माहिती व्हावी म्हणून हा लेख लिहित आहे.

राहेर हे गाव बिलोली तालुक्यात आहे.
अनेकांचे कुलदैवत असलेले नृसिंहाचे फारच सुरेख असे हेमाडपंथी मंदिर येथे आहे. .



आज हे मंदिर जरी जीर्ण, जुनाट वाटत असेल, तरी इथे गेल्यावर तुम्हाला या मंदिराच्या गतवैभवाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.


मंदिराला लागूनच गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे.
जवळच धरण बांधण्यात आल्यामुळे राहेर गावाला नेहमीच पुराचा फटका बसू लागला त्यामुळे १५/२० वर्षापूर्वी राहेर गाव इतरत्र पुनर्वसीत झाले, तेव्हाच्या घरांचे भग्नावशेष आजही येथे पाहायला मिळतात.


मुख्य मंदिरापासून थोड्याच अंतरावर नृसिंहाचे दुसरे एक मंदिर आहे.
हे मंदिर मात्र फारच दूर्लक्षित आहे असे दिसून येते कारण मंदिराच्या आसपास काटेरी झुडूपे वाढली आहेत आणि मंदिरात तर हजारोंच्या संख्येने वटवाघळांनी आपले आश्रयस्थान बनविले आहे.
त्यांच्या विष्ठेच्या उग्र दर्पामुळे मंदिरात जास्त वेळ थांबणे अशक्य होऊन बसते.


पण एकूणच हा सर्व परिसर पाहण्यासारखा आहे.


कसे पोहचावे :-

राहेर हे तिर्थक्षेत्र बिलोली तालुक्यात आहे.
नांदेड ते राहेर हे अंतर फक्त ६० ते ६५ km आहे.
उमरीपासून राहेर फक्त १६ km आहे.



तेव्हा मित्रांनो, एक दिवसाची सहल काढायची असेल तर राहेरसारखे ठिकाण शोधूनही सापडणार नाही.


Wednesday, October 15, 2008

नांदेडचा नकाशा

नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हा सगळ्यांसाठी आणला आहे नांदेडमधील गुरूद्वारे, कॅंपसाईट्स आणि इतर काही महत्त्वाची ठिकाणे दाखविणारा नकाशा.





:: साभार ::
HRP Mapmakers Pvt. Ltd.
Bhagyanagar, Nanded.

Thursday, October 9, 2008

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

आपट्याच्या जोडपानांसारखी राहोत आपली मने एकमेकांना जोडून,
विजयादशमीच्या या पावन पर्वावर करुयात सीमोल्लंघन
अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर मात करून !

















~ हॅप्पी दसरा ~


Wednesday, October 8, 2008

३०० साल, गुरु दे नाल !! लाईव्ह इन कॉन्सर्ट विथ दलेर मेहंदी

दिनांक --> १८ ऑक्टोबर २००८
स्थळ --> M.G.M. कॉलेज, नांदेड
वेळ --> संध्याकाळी ६.०० वाजता


:: कलाकार ::
दलेर मेहंदी
असराणी
प्रिया पांचाळ
जय छनियारा
पलाश मुच्छल


:: तिकिट विक्री ::
९३७०२५६४९७ , ०९८३३६३५६६६




Tuesday, October 7, 2008

सोनिया गांधी आज नांदेडात

गुरू - ता - गद्दी त्रिशताब्दीच्या ऎतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर (की येणाऱ्या निवडनुकांच्या पार्श्वभूमीवर ?) कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या.



सोनिया गांधी यांचा आज दिवसभराच्या दौऱ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे होता :-

सकाळी ११.२० वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले.
११.२५ वाजता नांदेड विमानतळ येथून मोटारीने सचखंड गुरुद्वाऱ्याकडे प्रयाण.
११.४० वाजता सचखंड गुरुद्वारा येथे आगमन.
दुपारी १२.४० वाजता सचखंड गुरुद्वारा येथून मोटारीने नगिनाघाटकडे प्रयाण.
१२.४५ वाजता नगिनाघाट येथे आगमन, JNURM अंतर्गत नदीकाठच्या पूर्ण झालेल्या कामाची पहाणी व उद्घाटण.
दुपारी १.२० वाजता नगिनाघाट येथून मोटारीने ITM कडे प्रयाण.
१.२५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व दुपारचे जेवन.
दुपारी १.५५ वाजता विश्रामगृह येथून स्टेडिअमकडे प्रयाण.
दुपारी २.०० वाजता श्री. गुरुगोविंदसिंघजी स्टेडिअमवर आगमन व जाहिर सभा.
दुपारी ३.१५ ला श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडिअमवरुन मोटारीने विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी ३.२५ वाजता विमानतळ येथे आगमन.
दुपारी ३.३० वाजता नांदेड विमानतळ येथून विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण.


सोनिया गांधीजींच्या सभेसाठी शहरातून तसेच पूर्ण नांदेड जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरुन मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते स्टेडिअमवर जमा झाले होते.
त्यांच्या
खाजगी गाड्या पार्क करण्यासाठी नविन मोंढ्याच्या मैदानावर सोय करण्यात आली होती तर बाहेरुन आलेल्या बसेसच्या पार्किंगची पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर विशेष सोय करण्यात आली होती.

दरम्यान या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
विशेष म्हणजे सोनिया गांधी दिल्लीकडे रवाना झाल्याबरोबर लगेचच शहरात पावसाला सुरुवात झाली.


काही छायाचित्रं









Friday, October 3, 2008

किंगफिशर एअरलाईन्स वेळापत्रक (नांदेड ते मुंबई व्हाया लातूर)


होय मित्रांनो, ज्या गोष्टिचे स्वप्न आपण मध्यमवर्गीय अगदी चातकाप्रमाणे बघत होतोत ते स्वप्न आता प्रत्यक्षात खरे झाले आहे.

होय, किंगफिशर एअरलाईन्सने मुंबई ते नांदेड विमानसेवा सुरू केली आहे.
म्हणजे आता तुम्ही २ तासात नांदेड ते मुंबई हे अंतर गाठू शकणार आहात.
हेच अंतर केवळ १ तासात पूर्ण झाले असते, पण ही फ्लाईट व्ह्याया लातूर केल्यामुळे प्रवासाचा एक तास तर वाढलाच आहे आणि शिवाय तुम्हाला आणि तुमच्या खिशाला १००० ते १५०० रुपयाचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागेल.
म्हणजेच नांदेड ते मुंबई विमान प्रवासासाठी एका व्यक्तीला साधारणतः ४००० ते ४५०० रुपये, तर नांदेड ते लातूरसाठी १५०० ते १८०० रुपये भाडे आकारले जाईल.


आठवड्यातून तीन दिवस मुंबई - नांदेड - लातूर - मुंबई ही विमानसेवा राहणार आहे.

नांदेडच्या विमानतळावरून सोमवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा राहील.
सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण होईल व दुपारी साडेबारा वाजता ते नांदेडला पोचेल, तर दुपारी दीड वाजता हे विमान लातूरच्या दिशेने उड्डाण करील.
दुपारी एक पन्नास वाजता ते लातूरचा पोचेल व दुपारी अडीच वाजता मुंबईच्या दिशेने प्रयाण करील. साडेतीन वाजता सांताक्रूझ, मुंबई येथे पोचेल, असा अंदाज आहे.


दरम्यान किंगफिशर कंपनीच्या एटीआर - ७२ ह्या ६६ प्रवासी क्षमता असलेल्या विमानाने मुंबई - नांदेड ही उड्डाण चाचणी २६ सप्टेंबर रोजी केवळ एका तासात यशस्वीरित्या पूर्ण केली.


वेळापत्रक



जुने वेळापत्रक बदलले आहे.


नविन वेळापत्रक :-



नो स्मोकिंग



नमस्कार मित्रांनो,

सिगारेट ओढणाऱ्या व्यक्‍तींसाठी एक वाईट बातमी,

आणि
सिगारेटच्या अगदी वासानेसुद्धा त्रस्त होणाऱ्या व्यक्‍तींसाठी एक चांगली बातमी.



केंद्र सरकारने २ ऑक्टोबर २००८ पासून देशभरात सरसकट सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी कायदा लागू केला आहे.
एखादी व्यक्ती धूम्रपान करताना आढळल्यास अन्य कुणी संबंधित प्राधीकाऱ्याकडे तक्रार केल्यावर सिगारेट ओढणाऱ्या त्या व्यक्तीला २०० रुपये दंड भरावा लागेल.


या कायद्याअंतर्गत सार्वजनिक स्थळाचे मालक, व्यवस्थापक अथवा पर्यवेक्षक वा प्रभारी जबाबदार राहतील.
त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाण धूम्रपानमुक्त ठेवण्याचे संपूर्ण दायित्व राहील.




सार्वजनिक ठिकाणे कोणती?
- रुग्णालये व आरोग्यकेंद्रे, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, करमणूक केंद्रे, हॉटेल, रेस्टॉरंट, खासगी कार्यालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शॉपिंग मॉल इत्यादी, आणि वरील सर्व ठिकाणांच्या आजूबाजूचा परिसर.



तेव्हा समस्त धुम्रपान शौकिनांनो...!
आता आपला शौक पूर्ण करण्यासाठी एखादी खासगी जागाच निवडा, नाहितर आमचा कॅमेरा आहेच ना !