गुरू - ता - गद्दी त्रिशताब्दीच्या ऎतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर (की येणाऱ्या निवडनुकांच्या पार्श्वभूमीवर ?) कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या.
सोनिया गांधी यांचा आज दिवसभराच्या दौऱ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे होता :-
सकाळी ११.२० वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले.
११.२५ वाजता नांदेड विमानतळ येथून मोटारीने सचखंड गुरुद्वाऱ्याकडे प्रयाण.
११.४० वाजता सचखंड गुरुद्वारा येथे आगमन.
दुपारी १२.४० वाजता सचखंड गुरुद्वारा येथून मोटारीने नगिनाघाटकडे प्रयाण.
१२.४५ वाजता नगिनाघाट येथे आगमन, JNURM अंतर्गत नदीकाठच्या पूर्ण झालेल्या कामाची पहाणी व उद्घाटण.
दुपारी १.२० वाजता नगिनाघाट येथून मोटारीने ITM कडे प्रयाण.
१.२५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व दुपारचे जेवन.
दुपारी १.५५ वाजता विश्रामगृह येथून स्टेडिअमकडे प्रयाण.
दुपारी २.०० वाजता श्री. गुरुगोविंदसिंघजी स्टेडिअमवर आगमन व जाहिर सभा.
दुपारी ३.१५ ला श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडिअमवरुन मोटारीने विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी ३.२५ वाजता विमानतळ येथे आगमन.
दुपारी ३.३० वाजता नांदेड विमानतळ येथून विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
सोनिया गांधीजींच्या सभेसाठी शहरातून तसेच पूर्ण नांदेड जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरुन मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते स्टेडिअमवर जमा झाले होते.
त्यांच्या खाजगी गाड्या पार्क करण्यासाठी नविन मोंढ्याच्या मैदानावर सोय करण्यात आली होती तर बाहेरुन आलेल्या बसेसच्या पार्किंगची पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर विशेष सोय करण्यात आली होती.
दरम्यान या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
विशेष म्हणजे सोनिया गांधी दिल्लीकडे रवाना झाल्याबरोबर लगेचच शहरात पावसाला सुरुवात झाली.
Tuesday, October 7, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment