Monday, December 8, 2008

नांदेडचे श्री. अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
नांदेडच्या सर्व जनतेसाठी हा आनंदाचा क्षण आहे.
कै. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर जिल्ह्याला पुन्हा एकदा नेतृत्त्वाची संधी मिळाली आहे.

खरं तर कालच अशोकराव चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर मी त्यांचे अभिनंदन केले होते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा मी त्यांना लवकरच मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या, तेव्हा ते गालातल्या गालात हसले होते.
माझ्यासह सर्वांनाच अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे वाटत होते.

त्रिशताब्दी सोहळ्यातील विकासकामांची व कार्यक्रमांच्या आयोजनाची मूळ संकल्पना ही त्यांचीच होती.
यानिमित्ताने सोनिया गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांसह अनेक बड्या नेत्यांनी त्यांचे काम जवळून पाहिले, त्यामुळे त्यांचे देशपातळीवर कौतुक झाले.


अशोकराव अत्यंत स्वच्छ मनाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांना माणसांची पारख आहे, दिलेला शब्द ते पाळतात, अशा कितीतरी गोष्टी अशोकरावांबद्दल सांगता येतील.
अशोकराव व्यवस्थापन शास्त्राचे पदवीधर असल्याने त्यांना विकासाचा आराखडा तयार करणे अधिक सोपे जाईल.
वडिलांचा वारसा व आईचा अशिर्वाद सोबत घेऊन ज्या दिशेने अशोकराव निघाले आहेत, त्या मार्गावर ते कधिच चाचपडणार नाहित. उलट अधिक गतिमान होवून महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतील.


केवळ नांदेडकरांचा विकास होईल असे म्हनणे संकुचितपणाचे ठरेल, त्यामुळे सबंध राज्यात ते आपला प्रभाव पाडतील असा विश्वास वाटत आहे.
संघटनकौशल्य व अभ्यासूवृत्तीमुळे ते भरीव कामगिरी करतील. ज्याप्रमाने शंकरराव जलसंस्कृतीचे जनक ठरले, तसेच अशोकराव औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवतील.

साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची त्यांना जाण आहे.
अखिल भारतीय नाट्यसंमेलन असो की लोकोत्सव त्यांनी ही चळवळ अधिक पोषक केली.
अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याचाही त्यांचा मानस आहे.

( प्राचार्य डॉ. सुरेश सावंत )श्री. अशोक शंकरराव चव्हाण यांचा परिचय :

जन्म तारीख : २८ ऑक्टोबर १९५८

जन्म ठिकाण : मुंबई

कौटुंबिक माहिती : पत्नी श्रीमती अमिता, दोन मुली

शिक्षण : बी.एससी., एम.बी.ए.

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी

पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)

मतदार संघ : १७१-मुदखेड, जिल्हा नांदेड

व्यवसाय : शेती व व्यापार

इतर माहिती : अध्यक्ष, शारदा भवन शिक्षण संस्था, नांदेड या संस्थेमार्फत आर्टस्, कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज, विधी महाविद्यालय, फार्मसी, संगणक प्रशिक्षण, बी.एड.कॉलेज अशा एकोणीस शाखा सुरू केल्या, या संस्थेस राज्य शासनाचे उत्कृष्ट संस्था पारितोषिक व दलितमित्र पुरस्कार प्राप्त.

अध्यक्ष, साई सेवाभावी ट्रस्ट, नांदेड या संस्थेमार्फत शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

राज्यस्तरीय लोकोत्सव व नांदेड लोकोत्सव २००४ चे आयोजन मुख्य प्रवर्तक.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, लक्ष्मीनगर, देगाव-येळेगांव, जिल्हा नांदेड या कारखान्यास सतत तीन वर्षे केंद्र शासनाचे प्रथम पारितोषिक प्राप्त.

अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना.

नांदेड शहर १९८७-८९ सदस्य, कन्सल्टेटिव्ह कमिटी, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हॉयरनमेंट अँड फॉरेस्ट, भारत सरकार, नवी दिल्ली सदस्य, कन्सल्टेटिव्ह कमिटी, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रिव्हेन्सेस ऑन्ड पेन्शन्स, भारत सरकार, नवी दिल्ली सदस्य, डिव्हीजनल रेल युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी, हैद्राबाद सदस्य, ऑडव्हायजरी कमिटी, साऊथ सेंट्रल रेल्वे १९९१-९२ सदस्य, ऑडव्हायजरी पॅनल, सेंट्रल फिल्म सेन्सॉर बोर्ड, मुंबई १९८६-९२ सरचिटणीस व उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी १९९५-९९ सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी १९८७-८९ सदस्य, लोकसभा १९९२-९८ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद १९९९-२००४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.

ऑक्टोबर २००४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड मार्च १९९३ ते सप्टेंबर १९९४ सार्वजनिक बांधकाम, नगर विकास आणि संसदीय कार्य खात्यांचे राज्यमंत्री सप्टेंबर १९९४ ते मार्च १९९५ गृह (आयुक्तालये वगळून) संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महसूल व राज्यशिष्टाचार खात्याचे मंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री जानेवारी २००३ ते ऑक्टोबर २००४ परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री नोव्हेंबर २००४ पासून उद्योग व खनिकर्म, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री.

परदेश प्रवास : अमेरिका, रशिया, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, नेपाळ सिंगापूर, चीन हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया व इजिप्त इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

छंद : टेबल टेनिस, वाचन आणि प्रवास
श्री. अशोकराव चव्हाण यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.


0 comments:

Post a Comment

Post a Comment