Thursday, August 13, 2009

भुवन :- गुगल अर्थ आणि विकीमॅपीयाचा कर्दनकाळ

इंटरनेटवरून स्वतःची गल्ली, नगर, घर शोधण्यासाठी तुम्ही आजवर गुगल अर्थ किंवा विकीमॅपीयाच वापरत आला असाल पण आता त्या दोन्हीला विसरून जा कारण आता तुमच्या मदतीला येणार आहे भुवन.



भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) गुगल अर्थ, विकीमॅपीयापेक्षा अत्यंत नवीतम, अधिक जवळून आणि अधिक सुष्पष्ट छायाचित्रे उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.



गुगल अर्थ आपल्याला २०० मीटरपर्यंतच झूम करून दाखवू शकतो पण भुवन मात्र त्याच फोटो तुम्हाला अत्यंत जवळून म्हणजे १० मीटरपर्यंत झूम करून दाखवतो.



गुगल त्याचा फोटो डाटाबेस दर चार वर्षाला अपडेट करतो, याऊलट भुवन दरवर्षी डाटाबेस अपडेट करणार आहे.
इतकेच नाही तर तुम्हाला भुवनद्वारे तुमच्या आसपासच्या परीसरातील खूप माहिती मिळणार आहे. (उदा. शाळा, चित्रपटगृह, शॉपिंग सेंटर्स इत्यादी.)

 

Google Earth Vs ISRO Bhuvan

Google Earth
    * Zoom levels up to 200 mt
    * Single layer information
    * Images upgraded every 4 years
    * No alternate viewing options
    * Uses international satellites
 
 
Bhuvan

    * Zoom levels up to 10 mt
    * Multi-layer information
    * Images upgraded every year
    * Options of viewing on different dates
    * Uses Indian satellites



:: भुवनची ऑफिशियल वेबसाईट ::

http://bhuvan.nrsc.gov.in/

 
 

Wednesday, August 12, 2009

स्वाईन फ्लू आता नांदेडमध्ये ?

मार्च-एप्रील २००९ च्या आसपास मेक्सिको शहरात स्वाईन फ्लू (H1. N1) ह्या रोगाने आपले डोके वर काढले.
हा रोग जेव्हा माणसांमध्ये दिसून येऊ लागला तेव्हा मेक्सिको सरकारने सगळी कार्यालयं आणि तत्सम गर्दीच्या जागा जीथे ह्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो अशी सर्व ठिकाणे बंद करायला सुरूवात केली.

जून २००९ च्या सुरूवातीस जेव्हा हा रोग सगळ्या जगात पसरायला लागला तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने देखील याची दखल घेऊन ह्याला साथीचा रोग म्हणून घोषित केले. (११ जून २००९)

स्वाईनफ्लूइंडीया ह्या संकेतस्थळावरील माहितीनुसार संपूर्ण जगात जवळपास १,६२,३८० व्यक्तींना ह्या रोगाची लागण झाली आहे.
स्वाईन फ्लूने जगभरात आत्तापर्यंत एकूण १,१५४ लोकांचा बळी घेतला आहे.
भारतातील १४ लोक ह्या साथीच्या रोगामुळे मृत्युमुखी पडले आहेत. (पुणे-७, मुंबई-२, नाशिक-१, गुजरात-२, केरळ-१, तामिळनाडू-१)


तर अश्या हा जगभर थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्लूची नांदेड जील्ह्यातील पहिली केस माहूर येथे ८ ऑगस्ट रोजी आढळून आली.
हा तरूण नौकरीसाठीची मुलाखत द्यायला पुण्याला गेला होता पण ५ तारखेला जेव्हा तो माहूरला परतला तेव्हा त्याला सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अश्या तक्रारी चालू झाल्या.
गावातच औषधपाणी करूनही त्यांचा आजार थांबत नव्हता म्हणून तीथल्या डॉक्टरांनी त्यांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात शिफ्ट व्हायला सांगितले.
परंतू दुसऱ्याच दिवशी ती व्यक्ती दवाखाण्यातून पळून गेली त्यामुळे हे प्रकरण अजूनच गंभीर झाले.

नांदेडचे बहुतांश विद्यार्थी १०-१२ वी नंतरच्या शिक्षणासाठी हमखास पुण्यातच जातात, आणि भारतामध्ये पुण्यात तर या स्वाईन फ्लूने सगळ्यात जास्त थैमान घातलेले आहे त्यामुळे इथल्या पालकांनी आपापल्या पाल्याच्या काळजीस्तव त्यांना परत नांदेडला बोलावून घेतले.


माझे अनेक मित्र पुण्यात वेगवेगळ्या शिक्षणासाठी गेलेले आहेत त्यांच्याशी बोलल्यावर असे कळाले की,
नांदेडला परत आलोत तर आपला अभ्यास बुडेल या भितीने अनेकांनी पुण्यातच राहणे पसंद केले होते पण त्याच सुमारास (सोमवार, १० ऑगस्ट) महाराष्ट्र सरकारने पुण्यातील सर्व खाजगी शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृहे, शॉपींग मॉल्स इत्यादींना ७ दिवसांची सुट्टी जाहीर केली.
यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नांदेडला परतण्याचे नियोजन केले आणि नांदेडहून पुण्याला जाणाऱ्या खाजगी गाड्या रीकाम्या तर येणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या.

पण नांदेडला परतलेल्यांपैकी काही विद्यार्थी आणि इतर व्यक्ती पुण्यामध्येच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या स्वाईनफ्लू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या असाव्यात कारण नांदेडला आल्यावर सहा व्यक्तींमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं दिसायला लागली होती.

त्या संशयीत रुग्णांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या थुंकीचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. (११ ऑगस्ट २००९)
त्या रूग्णांना स्वाईन फ्लू झाला आहे की नाही याबद्दल अजून कोणत्याही वृत्तवाहिनीवर किंवा वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली नाही.

वृत्तवाहिन्यांनी या रोगाचा फार मोठा बागुलबुवा उभा करून लोकांच्या मनात भिती निर्माण केली आहे, पण थोडी काळजी बाळगली तर स्वाईन फ्लू हा रोग सहजपणे टाळता येऊ शकतो.




ता.क. :- पुण्यात अजून एका व्यक्तीचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाला आहे. :(


ताजा कलम :- १५ ऑगस्ट २००९ (४:१४ PM)

संशयीतांपैकी ५ जणांना स्वाईन फ्लू ह्या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Tuesday, August 11, 2009

पुण्याच्या गाड्या रिकाम्या, येणाऱ्या मात्र 'पॅक'

एरवी नांदेड येथून पुणे येथे जाणारी प्रत्येक खासगी बस, रेल्वे प्रचंड गर्दी सामावून धावतात. दोन-दोन दिवसअगोदर बुकींग करावी म्हटले तरी अडचणी येतात; परंतु "स्वाईन फ्लू'च्या भीतीने सध्या या बस रिकाम्या धावतअसून खासगी बस कंपनीला यामुळे 30 ते 40 टक्के फटका बसला आहे. पुणे एक्स्प्रेस दौंड पॅसेंजर या रेल्वेतहीप्रवासी संख्या घटली असून थेट पुणे येथे जाणारे तर तुरळकच आहेत.

ऐन दुष्काळाच्या सावटात उद्भवलेल्या "स्वाईन फ्लू'ने राज्यासह देशात खळबळ माजवून दिली आहे. याआजाराचा सामना करण्यासाठी शासन प्रशासकीय पातळीवर अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. पुणे येथे शिक्षण रोजगाराच्या निमित्ताने तात्पुरते वास्तव्यास असलेली मंडळी मिळेल त्या वाहनाने गावी परतत आहेत. एरवी पुणेयेथे भरभरून जाणारी वाहने सद्यस्थितीत मात्र रिकामी धावताना दिसतात.


पुणे येथे प्रामुख्याने शिक्षणाच्या निमित्ताने तात्पुरत्या वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. शिवाय, यामहानगराचा मध्यमवर्गीय तोंडवळा असल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांचा कल या शहराकडेच आहे. मात्र याच शहराला स्वाईन फ्लूने विळख्यात घेतल्याने सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे. दररोज नवीन बातमीऐकायला मिळत असल्याने त्यात वरचेवर भर पडत आहे. अनेक शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्याने त्यासंस्थांतून शिक्षण घेणारे किंवा नोकरी करणारे आपापल्या शहरांत परतत आहेत. पुणे, मुंबई येथे ज्या वैद्यकीयसोयी तातडीने उपलब्ध होतात, त्या ग्रामीण भागात उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे याचा संसर्ग इतरत्रहोण्याची शक्यता वाढली आहे.
नांदेड येथून पुण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसपेक्षा खासगी बसच अधिक धावतात. त्यात प्रसन्न ट्रॅव्हल्सच्यासर्वाधिक नऊ बस जातात तेवढ्याच परततातही.

या कंपनीचे नांदेड येथील लेखा व्यवस्थापक असगर अली खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नांदेड येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. पुणे येथे मिल्ट्री स्कूलमध्ये शिकणारे किनवट येथील काही विद्यार्थी नुकतेच परतले असून त्यांना आठवड्यानंतर परिस्थिती पाहून परत येण्यास सांगण्यात आले आहे. याच प्रकारे इतरही शैक्षणिक संस्था व खासगी कंपन्यांत कार्यरत असणारे विद्यार्थी, नागरिक परतत आहेत. येणारी प्रत्येक बस पॅक आहे; पण जाणाऱ्यांत मात्र बहुतेक जण हातावर पोट असणारेच आहेत. आपल्याकडे पाऊसच नाही. त्यामुळे पिके हातची गेल्यात जमा आहेत. शेतमजूर व अत्यल्पभूधारकांची परिस्थिती मोठी कठीण झाली आहे. त्यामुळे रोजगारासाठी नाईलाजाने त्यांना पुणे, मुंबईसारख्या महानगरांत जावे लागते.
नांदेड येथून पुणे येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस कंपन्यांत खुराणा कंपनीच्या दोन, नूरच्या चार, शर्माच्या तीन व अंबर कंपनीच्या दोन बस धावतात. याशिवाय एस.टी. महामंडळाच्या तीन बस असून रेल्वेपैकी पुणे एक्‍स्प्रेस व दौंड पॅसेंजर दररोज धावते आहे. यांद्वारे प्रवास करणाऱ्यांचा ढोबळ आढावा घेतला असता, खासगी कंपन्यांच्या बसेसना आता कमी प्रवासी संख्येमुळे नांदेड- पुणे प्रवास करणे परवडणारे राहिले नाही. त्यांचा डिझेलचा खर्चही निघणे कठीण आहे, अशी माहिती आहे. ही परिस्थिती आणखी किती दिवस राहील, हे सांगता येणे कठीण आहे.


चाचणी आणि तपासणी प्रक्रिया -
नांदेड येथे संशयित म्हणून आढळत असलेल्या रुग्णांच्या घशातील स्त्राव कापसाच्या एका बोळ्यावर घेऊन तो "स्वाप' "व्हीटीएम' (व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम) या उपकरणात दोन ते आठ डिग्री तापमानात पुणे येथे "एनआयव्ही' (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी) या संस्थेत तपासणीसाठी पाठविला जातो. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या चार संशयित रुग्णांचा "स्वाप' सोमवारी (ता. दहा) पुणे येथे पाठविण्यात आला आहे. तिथे "आरटीपीसीआर' (रियलटाईम पॉलीमरेज चेन रिऍक्‍शन) ही चाचणी करून विषाणू स्वाईन फ्लूचा आहे की नाही, हे ठरवले जाते. वास्तविक ही तपासणी सहा तासांत होत असली तरी सद्यस्थितीत या संस्थेवर प्रचंड ताण आहे. शिवाय नांदेड ते पुणे अंतर लक्षात घेता रिपोर्ट यायला वेळ लागतो. तरी देखील या आजारावर अतिशय परिणामकारक सिद्ध झालेला "टॅमी फ्लू' हा औषधोपचार संशयित रुग्णांवरही करण्यास परवानगी असल्याने फारशी काळजी करण्याची आवश्‍यकता नसल्याचे खासगी डॉक्‍टरांचे मत आहे.
‍ ‌ ‍

:: सौजन्य ::
सकाळ वृत्तपत्र
मंगळवार ११ ऑगस्ट ०९

Sunday, August 9, 2009

तुमच्या मोबाईलची रींगटोन आणि तुम्ही

नमस्कार मित्रांनो,
मोबाईल तर असेलच तुम्हा सगळ्यांकडे, कारण आजकाल अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर कदाचित मोबाईलचाच नंबर लागत असावा म्हणूनच तर आज ज्याच्या हाती पाहावं त्याच्याकडे मोबाईल हमखास दिसून येईल.

पण तुम्हाला खरं सांगतो, माझ्याजवळ कालपर्यंत मोबाईल नव्हता.
हो, पण त्याला कारणही तसंच आहे.
मी आजवर माझ्या आई-वडीलांसोबतच राहत असल्यामुळे मला कधिही मोबाईलची गरज भासली नाही आणि खरच सांगतो, माझ्यापुढे आजपर्यंत कधिही अशी परिस्थीती उभी टाकली नाही की जिथे मला 'अरे, आपल्याकडे मोबाईल असायला हवा होता’ असे वाटले.

पण आता गोष्ट वेगळी आहे.
आता शिक्षणासाठी घरापासून दूर राहावे लागणार आहे त्यामुळे माझ्या वडीलांनी मला नवीन मोबाईल घेऊन दिलाय.



अरे बाप रे, अती झाले का माझे मोबाईलपुराण ?
माफ करा हां, मुळ मुद्द्यावर येतो.




:: तुमच्या मोबाईलची रींगटोन आणि तुम्ही ::

तुमच्या मोबाईलची रींगटोन तुमचा मूड कसा आहे हे परावर्तित करते.
तुमच्या मोबाईलवरच्या रींगटोनवरून अनेकजण तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल मत बनवित असतात.
यु.के. येथील एका मोबाईल विक्रेत्याने (डायल अ फोन) त्याच्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्न विचारला, "तुम्ही व्यक्तीच्या मोबाईल रींगटोनवरून त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधता का ?"
या प्रश्नाला ९७% लोकांनी 'हो' असे उत्तर दिले.


कुण्या एका महान गितकाराने लिहून ठेवले आहे की,
"ऎश तू कर यारा ऎश तू कर, दुनीया जाये तेल लेने ऎश तू कर।"


पण तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व कसे रीफ्लेक्ट व्हावे याची काळजी असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशीच रींगटोन वापरा.


:: माझ्या आवडत्या रींगटोन्सचे कलेक्शन ::
http://tinyurl.com/mkuzt6

Saturday, August 1, 2009

अक्षरधारा



सुप्रसिद्ध मराठी ग्रंथप्रदर्शन संस्था 'अक्षरधारा' नांदेड शहरात आली आहे.
अक्षरधाराने शहरात कलामंदीर येथे मराठी पुस्तके प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवली असून प्रत्येक नांदेडकराने किमान एकदातरी या प्रदर्शनास भेट द्यावी.

लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.