एरवी नांदेड येथून पुणे येथे जाणारी प्रत्येक खासगी बस, रेल्वे प्रचंड गर्दी सामावून धावतात. दोन-दोन दिवसअगोदर बुकींग करावी म्हटले तरी अडचणी येतात; परंतु "स्वाईन फ्लू'च्या भीतीने सध्या या बस रिकाम्या धावतअसून खासगी बस कंपनीला यामुळे 30 ते 40 टक्के फटका बसला आहे. पुणे एक्स्प्रेस व दौंड पॅसेंजर या रेल्वेतहीप्रवासी संख्या घटली असून थेट पुणे येथे जाणारे तर तुरळकच आहेत.
ऐन दुष्काळाच्या सावटात उद्भवलेल्या "स्वाईन फ्लू'ने राज्यासह देशात खळबळ माजवून दिली आहे. याआजाराचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासकीय पातळीवर अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. पुणे येथे शिक्षण वरोजगाराच्या निमित्ताने तात्पुरते वास्तव्यास असलेली मंडळी मिळेल त्या वाहनाने गावी परतत आहेत. एरवी पुणेयेथे भरभरून जाणारी वाहने सद्यस्थितीत मात्र रिकामी धावताना दिसतात.
पुणे येथे प्रामुख्याने शिक्षणाच्या निमित्ताने तात्पुरत्या वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. शिवाय, यामहानगराचा मध्यमवर्गीय तोंडवळा असल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांचा कल या शहराकडेच आहे. मात्र याच शहराला स्वाईन फ्लूने विळख्यात घेतल्याने सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे. दररोज नवीन बातमीऐकायला मिळत असल्याने त्यात वरचेवर भर पडत आहे. अनेक शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्याने त्यासंस्थांतून शिक्षण घेणारे किंवा नोकरी करणारे आपापल्या शहरांत परतत आहेत. पुणे, मुंबई येथे ज्या वैद्यकीयसोयी तातडीने उपलब्ध होतात, त्या ग्रामीण भागात उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे याचा संसर्ग इतरत्रहोण्याची शक्यता वाढली आहे.
नांदेड येथून पुण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसपेक्षा खासगी बसच अधिक धावतात. त्यात प्रसन्न ट्रॅव्हल्सच्यासर्वाधिक नऊ बस जातात व तेवढ्याच परततातही.
या कंपनीचे नांदेड येथील लेखा व्यवस्थापक असगर अली खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नांदेड येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. पुणे येथे मिल्ट्री स्कूलमध्ये शिकणारे किनवट येथील काही विद्यार्थी नुकतेच परतले असून त्यांना आठवड्यानंतर परिस्थिती पाहून परत येण्यास सांगण्यात आले आहे. याच प्रकारे इतरही शैक्षणिक संस्था व खासगी कंपन्यांत कार्यरत असणारे विद्यार्थी, नागरिक परतत आहेत. येणारी प्रत्येक बस पॅक आहे; पण जाणाऱ्यांत मात्र बहुतेक जण हातावर पोट असणारेच आहेत. आपल्याकडे पाऊसच नाही. त्यामुळे पिके हातची गेल्यात जमा आहेत. शेतमजूर व अत्यल्पभूधारकांची परिस्थिती मोठी कठीण झाली आहे. त्यामुळे रोजगारासाठी नाईलाजाने त्यांना पुणे, मुंबईसारख्या महानगरांत जावे लागते.
नांदेड येथून पुणे येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस कंपन्यांत खुराणा कंपनीच्या दोन, नूरच्या चार, शर्माच्या तीन व अंबर कंपनीच्या दोन बस धावतात. याशिवाय एस.टी. महामंडळाच्या तीन बस असून रेल्वेपैकी पुणे एक्स्प्रेस व दौंड पॅसेंजर दररोज धावते आहे. यांद्वारे प्रवास करणाऱ्यांचा ढोबळ आढावा घेतला असता, खासगी कंपन्यांच्या बसेसना आता कमी प्रवासी संख्येमुळे नांदेड- पुणे प्रवास करणे परवडणारे राहिले नाही. त्यांचा डिझेलचा खर्चही निघणे कठीण आहे, अशी माहिती आहे. ही परिस्थिती आणखी किती दिवस राहील, हे सांगता येणे कठीण आहे.
चाचणी आणि तपासणी प्रक्रिया - नांदेड येथे संशयित म्हणून आढळत असलेल्या रुग्णांच्या घशातील स्त्राव कापसाच्या एका बोळ्यावर घेऊन तो "स्वाप' "व्हीटीएम' (व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम) या उपकरणात दोन ते आठ डिग्री तापमानात पुणे येथे "एनआयव्ही' (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी) या संस्थेत तपासणीसाठी पाठविला जातो. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या चार संशयित रुग्णांचा "स्वाप' सोमवारी (ता. दहा) पुणे येथे पाठविण्यात आला आहे. तिथे "आरटीपीसीआर' (रियलटाईम पॉलीमरेज चेन रिऍक्शन) ही चाचणी करून विषाणू स्वाईन फ्लूचा आहे की नाही, हे ठरवले जाते. वास्तविक ही तपासणी सहा तासांत होत असली तरी सद्यस्थितीत या संस्थेवर प्रचंड ताण आहे. शिवाय नांदेड ते पुणे अंतर लक्षात घेता रिपोर्ट यायला वेळ लागतो. तरी देखील या आजारावर अतिशय परिणामकारक सिद्ध झालेला "टॅमी फ्लू' हा औषधोपचार संशयित रुग्णांवरही करण्यास परवानगी असल्याने फारशी काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे खासगी डॉक्टरांचे मत आहे.
:: सौजन्य ::
सकाळ वृत्तपत्र
मंगळवार ११ ऑगस्ट ०९
Tuesday, August 11, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment