Thursday, September 16, 2010

आठ किलो गांजासह विक्रेत्यास अटक.

शहरातील शिवाजीनगर नई आबादी भागात एका हॉटेलवर धाड टाकून अतिरिक्त पोलिस अधिक्षक शहाजी उमाप व पोलिस उपाधिक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने ८ किलो गांजा जप्त केला.
या कारवाईनंतर नई आबादी भागातील जमाव पोलिस ठाण्यासमोर जमला होता, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
गांजा विक्री करणार्‍या एका इसमास पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता घडली.

शिवाजीनगर भागातील नई आबादी येथील एका हॉटेलमध्ये गांजा विक्री होत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांना मिळाली.
यावरून त्यांनी उपअधिक्षक लक्ष्मीकांत पाटील व त्यांच्या पथकासह या हॉटेलवर छापा मारला असता आरोपी शेख इसाक यांच्या जवळून ८ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला.
कारवाईनंतर आरोपीच्या समर्थनार्थ मोठा जमाव पोलिस ठाण्याच्या दिशेने आला होता पण पोलिसांनी या जमावाला हुसकावून लावले.

गांजा विक्री करणार्‍या इसमाला पोलिसांनी धाड टाकून पकडल्यानंतर त्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पुर्व डी.बी.च्या किती जणांना हप्ता दिला जातो याची माहिती उमाप यांना दिली असल्याचे समजते.
त्यामुळे ठाण्यातील काही कर्मचार्‍यांचे चेहरे उतरलेले होते.


दैनिक प्रजावाणी १६ सप्टें. २०१०

0 comments:

Post a Comment

Post a Comment