सुप्रभात मित्रांनो,
होय, भूकंपांची मालिका परत एकदा सुरू झाली आहे, आणि यावेळच्या धक्क्यांची तीव्रतासुद्धा वाढलेली जाणवते आहे.
आज सकाळी ३.३० ते ४.०० या वेळात जवळपास १०-१२ भूकंप झाले पण यापैकी ३-४ धक्के खूप मोठे होते.
‘रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणीप्रमाणे नांदेडीअन्सने भूकंप झाल्यावर घराबाहेर पडण्याचे बंद केले होते, पण आज सकाळच्या या धक्क्यांनी मात्र परत एकदा सगळ्या नांदेडीअन्सना घराबाहेर काढले.
एक निरीक्षण :- नांदेडचे बहुतांश भूकंप अमावस्या, पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्या/पौर्णिमेच्या आसपासच होत आहेत.
उद्या अमावस्या आहे मित्रांनो.
ता. क. :- पहिल्या दोन धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ इतकी नोंदवली गेली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment