Thursday, February 28, 2008

नांदेडमधील प्रेक्षणीय स्थळे.

अर्धापुर : ता. बिलोली. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील थोर स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी.
येथे त्यांचे स्मारक आहे.
बिलोली-कुंडलवाडी मार्गावर.


उनकेश्वर : ता. किनवट. गरम पाण्याचे झरे .


किनवट : १३७ चौ. किलोमीटर पैनगंगेच्या परिसरात नांदेड यवतमाळ जिल्ह्यात हे वन्यप्राणी अभयारण्य पसरलेले आहे.
येथे वाघ, हरिण . प्राणी तसेच रंगीबेरंगी पक्षी आढळतात.



कंधार : राष्ट्रकुट चालुक्य राजवटीत वैभवाच्या शिखरावर असलेले प्राचीन ऐतिहासिक शहर. भव्य भुईकोट किल्ला.



गोरठा : श्री संतश्रेष्ठ दासगणू महाराज यांचे समाधिस्थान. लोकप्रीय किर्तनकार संत चरित्रकार. व्यवसायाने पोलीस शिपाई. शिर्डीच्या साईबाबांचा अनुग्रह मिळाल्यानंतर एका साधूसंतात त्यांचे रूपांतर. त्यांनी लिहिलेले 'गजानन विजय' हे शेगावच्या श्री गजानन महाराजांचे चरित्र पारायणासाठी वापरले जाते. नांदेड-बासर मार्गावर.



नांदेड : गोदावरी नदीवरील प्राचीन ऐतिहासिक धार्मिक स्थान. शिखांचे दहावे शेवटचे गुरु श्रीगुरुगोविन्दसिंहजी यांची समाधी. त्यामुळे या स्थानास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
येथे आठ गुरुद्वारा आहेत.

  1. तख्त सचखंड श्री हुजूर अचबलनगर साहेब
  2. मालाटेकडी साहेब
  3. संगतसाहेब
  4. हिराघाट
  5. मातासाहेब
  6. बंदाघाटसाहेब
  7. शिकारघाट
  8. नगिनाघाट
हनुमानगढ़ हे प्राचीन देवस्थान.
चैतन्यनगरमधे १९९६ मध्ये शिवमंदिराची स्थापना करण्यात आली .

जवळची ठिकाणे : सत्यगनपती मंदिर, गजानन महाराज मंदिर, विसावा उद्यान .


माहूर : ता.
किनवट. प्राचीन ऐतिहासिक धार्मिक स्थान. देवीच्या साडेतीन पीठांपैकी श्री रेणुकामातेचे जागृतपीठ. येथे सती अनुसुयेचे तसेच दत्तशिखरावर दत्तात्रेयांचे मंदिर आहे . श्री रेणुकामातेच्या मंदिरासमोर प्राचीन रामगड किल्ला .


माळेगाव : श्री खंडोबाचे जागृत स्थान . नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा.


राहेर : जागृत नृसिंह मंदिर. गावात अनेक मंदिरांचे शिल्पावशेष सापडतात.


वडेपुरी : उंच डोंगरावर रत्नेश्वरी मातेचे मंदिर. नवरात्रात हजारो भाविक पायी दर्शनासाठी जातात.


विष्णूपुरी : नांदेडजवळील गोदावरी नदीवरील आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प.


संगम : गोदावरी मांज़रा या दोन नद्यांच्या संगमावरील पवित्र स्थान. संगमावर प्राचीन संगमेश्वराचे मंदिर.


सहस्त्रकुंड : पैनगंगा नदीवरील धबधबा. मुदखेड-किनवट मार्गावर सहस्त्रकुंड हे रेलवे स्टेशन आहे.


0 comments:

Post a Comment

Post a Comment