Friday, February 29, 2008

मराठी साहित्यिकांचा सत्कार करून शिवसेनेने साजरा केला मराठी दिन

नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख श्री हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कै. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानेआज दी. २७ रोजी जागतिक मराठी दिन साजरा करण्यात आला.


जेष्ठ साहित्यिक राम शेवाळकर, लक्ष्मीकांत तांबोळी, डॉ. भगवान कौठेकर, वृषाली किन्हाळकर, देविदास फुलारी, सुधाकरराव डोईफोडे, डॉ. सुरेश सावंत, मथु सावंत, प्रा. जगदीश कदम, डॉ. हंसराज वैद्य, रमेश गिरी, भु. द. वाडीकर, माधव कुंडलवाडीकर, शंकर वाडेवाले, प्रफुल्ल मंदकर, बापु दासरी, रवीचंद्र हडसनकर, आदींचाशाल-श्रीफळ व सन्मानपत्र, हार या पध्दतीने प्रत्येक साहित्यिकांच्या घरी जाऊन एका आगळ्या-वेगळ्यापध्दतीने सत्कार करण्यात आला.


मथु सावंत यानी शिवसेना ही मराठी व मराठी माणसाबद्दल अस्मिता जोपासणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्षआहे. पदोपदी शिवसेना व शिवसैनिक मराठीबद्दल धाव घेउन येताना मी पूर्वीपासून पाहत आहे.
त्यात आज सर्वत्र मराठी माणसे मराठीपण जपत असताना शिवसेनेने आज मराठी दिवस साहित्यिकांचा सत्कारकरून आठवणीत ठेवाल्याबद्दल शिवसेना व जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांचे आभार मानले.





0 comments:

Post a Comment

Post a Comment