कुसुमाग्रजांचा आजचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दै. लोकसत्तेत त्यांच्या तुलनेने अप्रसिद्ध अशा 'कल्पनेच्या तीरावर' या कादंबरीवर लेख आला आहे. तो येथे वाचता येईल.
वर्षातून असा एक दिवस साजरा करून काय साध्य होते यावर बरीच चर्चा झाली आहे. परंतु, कुठलाही प्रसंग साजरा करणे हीसुद्धा समाजाची एक सांस्कृतिक गरज असते असे म्हणता येईल. त्यानिमित्ताने का होईना, पण मातृभाषेची आठवण होणे हेहि नसे थोडके.
असो, कुसुमाग्रजांच्या कवितांचे महाजालावरील संकलन काव्य कुसुमावली या संकेतस्थळावर सापडेल. तर त्यांच्या काही निवडक प्रसिद्ध कविता, दोन याचक आणि कणा या अनुदिनीवर आधी नोंदवल्या आहेत.
साभार :
http://marathisahitya.blogspot.com/
Wednesday, February 27, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment