नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम तर मी सगळ्या नांदेडीअन्सची माफी मागू इच्छितो कारण परीक्षा असल्यामुळे मी माझा ब्लॉग अपडेट नाही करु शकलो.
या कारणामुळे मी ठरविलं होतं की या वेळेस ब्लॉगवर काहीतरी हटके माहिती टाकायची.
मी सुट्ट्यांमधे 100 नांदेडीअन्सच्या अभिरुचीचा सर्वे घेतला होता.
या 100 लोकांमध्ये माझे मित्र, माझे नातेवाइक, काही ओळखीच्या व्यक्ती आणि काही पूर्णपणे अनोळखी व्यक्तींचासुद्धा समावेश होता.
मी 'Friends Internet Cafe' , Anand Nagar यांचे आभार मानतो कारण त्यांनी मला फॉर्म वितरणामध्ये खूप मोठी मदत केली.
मित्रांनो, 'नांदेडीअन्सची अभिरुची' या सर्वेचा निकाल आपल्यापुढे प्रदर्शित करताना मला फार मोठा आनंद होत आहे.
या सर्वेमध्ये खालील प्रश्नांवर नांदेडीअन्सची मते मागविण्यात आली होती.
सर्वेमध्ये भाग घेतलेल्या व्यक्तींची संख्या = 100
विचारलेले एकुण प्रश्न = 10
कंसातील आकडे = मिळालेली मते
प्रश्न
१) नांदेड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळं कोणते ?
तसे पाहता या प्रश्नाला अजुन वेगळे पर्याय देता आले असते.
असो, इथे तर माहूरने बाजी मारली.
माहूरला ५०% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
१) काळेश्वर ( २२ )
२) पैनगंगा अभयारण्य(किनवट) ( १६ )
३) माहूर ( ६१ )
४) उनकेश्वर ( १ )
२) नांदेड शहरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटगृह.
श्याम टॉकीजने इथे निर्विवाद बहुमत मिळवलेलं आहे.
१) ज्योती ( १५ )
२) गणेश ( १३ )
३) श्याम ( ७१ )
४) शारदा ( १ )
३) नांदेडमधील सर्वाधिक खपाचे दैनिक कोणते ?
दै. प्रजावाणी हे उत्तर तसं पाहता अपेक्षितच होतं
नांदेडीअन्सनी आता त्याच्यावर इंटरनेटवरही शिक्कामोर्तब केलेलं दिसतय.
१) दै.सकाळ ( २१ )
२) दै.लोकमत ( २५ )
३) दै.प्रजावाणी ( ४३ )
४) दै.पुण्यनगरी ( ११ )
४) नांदेडमधील सर्वोत्कृष्ट दवाखाना.
या प्रश्नाच्या उत्तरावरून आता अस स्पष्ट झालय की नांदेडीअन्स आता बिमार पडल्यावर अश्विनी दवाखान्यातच जाणार.
१) यशोदा ( १६ )
२) अश्विनी ( ६२ )
३) धन्वंतरी ( १५ )
४) ऍपेक्स ( ७ )
५) नांदेडमधील सर्वोत्कृष्ट चाट भांडार.
या प्रश्नालासुद्धा अजुन २-३ पर्याय जोडता आले असते पण मला माहीत होत की आईनाथ पाणीपुरी हा पर्याय असल्यामुळे इतरांचा त्याच्यापुढे निभाव लागणार नाही.
१) हॉटेल जनप्रिय ( १९ )
२) आईनाथ ( ६४ )
३) रसोई ( ११ )
४) कविता ( ६ )
६) नांदेडमधील सर्वोत्कृष्ट सुपर-मार्केट.
कामधेनू सुपर-मार्केटने बरोबर ५०% मते घेउन पहिले स्थान पटकाविले आहे, तर दुसरया स्थानावर वत्सल सुपर-मार्केट दिमाखदारपणे विराजमान झाले आहे.
१) वत्सल ( १९ )
२) कामधेनू ( ५० )
३) संसार ( १७ )
४) गृहसेवा ( १४ )
७) नांदेड जील्ह्यातील सामाजिक जाणीव असलेला नेता.
नांदेडीअन्सच्या अभिरुचीने माननीय अशोकराव चव्हाण यांना जील्ह्यातील सामाजिक जाणीव असलेला नेता असे मानले आहे.
अशोकरावांना या पदावर निवडून आले याचा अर्थ त्यांच्यावरची जबाबदारी अजून वाढली आहे.
१) अशोकराव चव्हाण ( ७१ )
२) अनुसयाताई खेडकर ( ६ )
३) डी.बी.पाटील ( ११ )
४) भास्करराव पाटील खतगावकर ( १२ )
८) नांदेड शहरातील सर्वोत्कृष्ट कॉलेज.
इथे मात्र यशवंत कॉलेजच निवडुन येणार हे मला पक्कं ठाउक होत कारण दहावी पास झाल्यावर प्रत्येक नांदेडीअनच्या मनामधे एकाच कॉलेजचं नाव येत, आणि ते म्हणजे यशवंत कॉलेज.
१) यशवंत कॉलेज ( ६५ )
२) पीपल्स कॉलेज ( ९ )
३) सायंस कॉलेज ( १५ )
४) आय.टी.एम. कॉलेज ( ११ )
९) गुरु-ता-गद्दी सोहळ्यापर्यंत नांदेडमधील सर्व विकासकामे पूर्ण होतील का ?
या सर्वेमधला हा कदाचित सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल.
आणि नेमकी याच प्रश्नाला नांदेडीअन्सच्या मनामधली घालमेल दिसून आली.
कोणत्याही एका पर्यायाला बहुमत मिळालेलं नाहीये.
१) हो ( २१ )
२) कदाचित ( ३५ )
३) नाही ( ३१ )
४) अशक्यप्राय ( ११ )
१०) नांदेड जिल्हा आय.टी. क्षेत्रात पिछाडत चालला आहे असे तुम्हाला वाटते का ?
हा प्रश्न सामान्य नांदेडीअनच्या मानाने किंबहुना सगळ्यात दुर्लक्षित प्रश्न असावा कारण या दृष्टीने कधी कोण्या नांदेडीअनने विचारच केला नसेल.
६०% लोकांच्या मते नांदेड जिल्हा आय.टी. क्षेत्रात पिछाडत नाहीये.
१) हो ( ४० )
२) नाही ( ६० )
तर मित्रांनो, तुम्हाला हा सर्वे कसा वाटला ते जरूर कळवा.
काही शंका, सुचना असतील तर त्या सुद्धा आमच्यापर्यंत निसंकोचपणे पोहचू द्या.
Friday, May 2, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Atishay chhan topic nivadla aahes.
Pudhchya suttyat asa survey ghetlas tar plz tyat prashn sankhya wadhav.
Thik aahe.
Suggestion granted sir :)
Post a Comment