Thursday, May 8, 2008

साहित्यसागरसांगली


सांगली येथे भरलेले ८१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक १८ ते २१ जानेवारी २००८ या काळात संपन्न झाले. संमेलनाची भव्यता, मा. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन, विविध प्रदर्शने, संमेलन पहाण्यासाठी उसळलेली अलोट गर्दी अशा अनेक बाबतीत हे संमेलन पूर्वीच्या संमेलनांपेक्षा आगळे वेगळे व विक्रमी ठरले. मात्र या संमेलनातील विचारमंथन, सर्व कार्यक्रम व प्रदर्शनांचा लाभ मराठी बांधवांना सदासर्वकाळ घेता यावा यासाठी हे संकेतस्थळ म्हणजे साहित्यसंमेलनाचे चिरस्थायी स्मारक व साहित्यक्षेत्रातील एक दीपस्तंभ ठरावे अशी ज्ञानदीपची धारणा आहे व त्यासाठी संमेलनासंबंधी सर्व माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे.

सहभागी साहित्यिक व इतर मान्यवर

संमेलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्व साहित्यिक व इतर मान्यवर व्यक्तींनी आपले पत्ते, सहभागाचे स्वरूप, संमेलनात सादर केलेले आपले साहित्य, विचार, लेख, कथा, कविता ज्ञानदीपकडे सीडी वा इ मेलने पाठविल्यास त्याचा या संकेतस्थळावर समावेश करण्यात येईल.



सभासद नोंदणी

संकेतस्थळाला भेट देणार्‍या प्रत्येकाने सभासद नोंदणी ( मोफत) करून आपले अभिप्राय पाठविले व या संकेतस्थळासंबंधी आपल्या मित्रांना कळविले तर हे संकेतस्थळ सर्वांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरू शकेल.


आवाहन

ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनने संमेलन समितीकडून कोणतेही अर्थ साहाय्य न घेता हे संकेतस्थळ तयार केले आहे. मात्र हे सर्वार्थाने परिपूर्ण होऊन नित्यनूतन व वर्धिष्णु राहण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आपल्या उत्पादनाची वा व्यवसायाची जाहिरात करून वा या संकेत स्थळावरील कोणताही एक विभाग प्रायोजित करून आपण या कार्यास हातभार लावू शकता. ज्ञानदीपच्या मायमराठी डॉट कॉम या संकेतस्थळावरील मराठी भाषा, संस्कृती व महाराष्ट्र दर्शन विषयक माहिती व मायसांगली डॉट कॉम वरील सांगलीविषयक माहिती परिपूर्ण करण्याच्या कार्यासही यामुळे गती येईल.

आपणा सर्वांकडून याबाबतीत सक्रीय सहकार्य मिळेल व मराठी साहित्य आभासी विश्वात साहित्यसागरसांगली हा तारा सातत्याने तळपत राहील असा ज्ञानदीपला विश्वास वाटतो.


0 comments:

Post a Comment

Post a Comment