खूप उशीरा का होईना पण काही महिन्यांपूर्वीच नांदेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अंतरदर्शक बोर्ड लावले आहेत.
या फलकांवर स्थळ, दिशा, अंतर(कि.मी) इत्यादी बाबी दर्शविलेल्या असाव्यातच असा नियम आहे, पण नियम पाळला तर ते नांदेडीअन्स कसले ?
नांदेडमध्ये असलेल्या बहुतांशी अंतरदर्शक फलकांवर अंतर दर्शविण्याऐवजी राजनितिक बॅनर, कोणत्या तरी कंपनीची जाहीरात चिटकविन्यात आली आहे.
तुम्ही मुंबई, पूण्याला गेलात तर तुम्हाला अंतरदर्शकावर फक्त आणि फक्त स्थळ, दिशा, अंतर(कि.मी) ह्याच गोष्टी दिसतील.
मुंबई पूणेच काय, मराठवाड्याच्या इतर कोणत्याही जील्ह्यात अंतरदर्शक फलकावर तुम्हाला असे राजनितिक बॅनर, जाहीरात दिसणार नाहीत.
:: काही पुरावे ::
0 comments:
Post a Comment