Sunday, June 29, 2008

छायाचित्रमय नांदेड

नमस्कार मित्रांनो, या वेळेस मी जास्त काही लिहून तुम्हाला पकवण्यापेक्षा घेऊन आलोय नांदेडची काही नवीन-जुनी छायाचित्रं.

एक वर्षापूर्वीचं नांदेड, आत्ताचं नांदेड, विकासकामे सुरु असलेलं नांदेड, नांदेडची काही पर्यटनस्थळं, नांदेडचे काही ज्वलंत प्रश्न या सर्व बाबींचा समावेश आहे या चित्रमय टॉपिकमध्ये.

हे सर्व फोटो मी माझ्या ऑर्कूट प्रोफाईलच्या अल्बमध्ये अपलोड केले आहेत, त्यामुळे तुम्हाला माझा ऑर्कूट अल्बम पाहावा लागेल।

आणि जर दुर्दैवाने तुम्ही अजुन ऑर्कूटवर तुमची प्रोफाईल बनवली नसेल तर तुम्हाला ती बनवावी लागेल कारण मी अपलोड केलेल्या फोटोंव्यतिरीक्त पूर्ण ऑर्कूटवर बरेच काही शिकण्यासारखे आहे.

ऑर्कूटवर अकाउंट काढण्यासाठी खालील लिंकवर जा.
नवीन अकाउंट काढणे

आणि माझ्या अल्बममधील नांदेडचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
(^*-<>-*^) Nanded (^*-<>-*^)

Saturday, June 21, 2008

रस्तेबांधणीचा उत्कृष्ठ नमूना

सध्या नांदेड शहरात गुरु-ता-गद्दी मुळे सुरु असलेल्या विकासकामांनी आता चांगलीच गती घेतली आहे.
याच कामांच्या अंतर्गत आय.टी.आय. ते मयुर विहार कॉलोनी (पिपल्स कॉलेजच्या मागचा रस्ता) हा रस्ता बनविण्यात येत आहे.

रस्त्याचे चालू असलेले बांधकाम पाहताना कोनालाही प्रथमदर्शी असेच वाटेल की हा रस्ता नांदेडच्या वैभवात भर पाडेल इतका छान होईल.
पण रस्ता होईल तेव्हा होईल, तोपर्यंत तुम्हाला खालील फोटो बघितल्यावर कळेल की महानगरपालीका किंवा JNNURM आणि विज-वितरण कंपनीमधे किती चांगला ताळमेळ आहे.





Sunday, June 15, 2008

वळू - नंदिबैल - नांदेड

नमस्कार मित्रांनो,
एव्हाना आपण 'वळू - The Wild Bull' हा मराठी चित्रपट पाहिला असावा असे मला वाटते.
पाहिला नसेल तर जरुर पाहावा कारण चित्रपट अतिशय छान आहे.

आता तुम्ही विचार करित असाल की मी शीर्षक 'वळू - नंदिबैल - नांदेड' असे का दिले आहे.
त्याचे कारण असे की माझे वडिल डॉ.सुरेश सावंत ह्यांच्या 'पळसपापडी' या कवितासंग्रहातील आणि नंदिबैल या कवितेतील एक कडवं वळू या चित्रपटात वापरण्यात आलं आहे.

ही गोष्ट जेव्हा आम्हाला चित्रपट पाहताना कळाली, तेव्हा साहजिकच आम्हाला खूप आनंद झाला पण ऋणनिर्देशात कुठे नोंद असती तर बरे झाले असते असे वाटले.

माझ्या वडिलांनी या संदर्भात वळूच्या संबंधितांना एक पत्र लिहिले आहे, ते मी इथे छापत आहे.


आपला 'वळू - The Wild Bull' हा चित्रपट अगत्यपूर्वक पाहिला . अतिशय आवडला.
या चित्रपटात आपण ग्रामीण जीवनाचे यथातथ्य दर्शन घडविले आहे.
वास्तवदर्शी चित्रणामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार आणि मान्यता मिळत आहे. त्याबद्दल 'वळू'च्या टीमचे हार्दिक अभिनंदन !

आता एक गोष्ट अगदी खाजगी.....
चित्रपटातील शाळेतल्या एका दृष्यात "नंदिबैल आला आता नंदिबैल आला" या गिताच्या ओळींचा अगदी चपखलपणे उपयोग करुन घेण्यात आला आहे.
वास्तविक त्या माझ्या 'नंदिबैल' ह्या कवितेतील ओळी असून ही कविता 'बालभारती' इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे.

एका नामांकित चित्रपटात कवितेच्या ओळी श्रुतयोजन म्हणून हा त्या कविचाही सन्मान असतो.
हा चित्रपट पाहणारया विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी आणि माझ्या आप्तस्वकियांनी आनंद व्यक्त करून माझे अभिनंदन केले.
ही कविता ग्रामीण भागात रुजली असल्याचे मत एका समिक्षकाने नोंदविले. याचा कवी म्हणून मलाही स्वाभाविकच आनंद आहे तथापी 'ऋणनिर्देशा'त कुठे नोंद असती तर बरे झाले असते.

कृपया पोच द्यावी, ही विनंती.
भावना समजून घ्याव्यात.


आपला स्नेहाकांक्षी
( डॉ.सुरेश सावंत )

Saturday, June 7, 2008

उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल - 2008

HSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या माझ्या सर्व नांदेडीअन बांधवांचं हार्दिक अभिनंदन.
आता १२वी नंतर कोणता अभ्यासक्रम घ्यायचा ते लवकरात लवकर ठरवा आणि त्या दिशेने तयारीला लागा.

तुम्हा सर्वांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा.


आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी वाईट वाटून घ्यायची बिलकूल गरज नाही.
१०वी किंवा १२वीचे
गुण म्हणजे आयुष्यातलं सर्व काही असते असं बिलकूल नाही.

माझा अनुभव विचाराल तर माझ्या दृष्टीने ह्या गुणांची किंमत फक्त चांगल्या कॉलेजमधे प्रवेश घेण्यापुरतीच असते.

तेव्हा बिलकूल निराश होऊन जाऊ नका, उठा आणि दाखवून द्या जगाला की तुम्हीही मागे नाही आहात.

तुम्हा सर्वांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा.

For Results
http://mahresult.nic.in/



Friday, June 6, 2008

नांदेडीअन >>>>> विजय होकर्णे

नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपल्या ब्लॉगवर एका प्रसिद्ध नांदेडीअनची मुलाखत सादर करत आहे.

हे नांदेडीअन आहेत नांदेडचे प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. विजय होकर्णे.

:: मुलाखत ::

नाव :- विजय वैजनाथ आप्पा होकर्णे

पत्ता :- , पायल प्लाझा, वजिराबाद, नांदेड.

फोन नंबर :- (०२४६२) २३७४४९, ९४२२१६२०२२

-मेल आय.डी. :- maheshvhokarne@rediffmail.com

शिक्षण :- बी..

फोटोग्राफी या क्षेत्राकडे आपण कसे वळलात ?
आमच्या मामाचा हा परंपरागत व्यवसाय होता. त्यामुळे हे क्षेत्र मी निवडलं.

फोटोग्राफीचे शास्त्रशुद्ध शिक्षण आपण कुठून घेतले आहे ?
झाडबुके फोटो स्टुडीओ, महावीर चौक, नांदेड.

या क्षेत्रात आपण एखाद्या व्यक्तीला आपला गुरू मानता का ?
हो, या क्षेत्रातले माझे गुरू श्री. किशनराव झाडबुके हे आहेत.

या क्षेत्रात आपण अनुभवलेले काही चांगले अनुभव :-
प्रत्येक फोटोतून नवनिर्मितीचा आनंद, मानसिक आणि आंतरिक समाधान मिळते.

या क्षेत्रात आपणास आलेले काही वाईट अनुभव :-
या क्षेत्रात सगळ्यात मोठा वाईट अनुभव तुम्हाला तेव्हाचं कळतो जेव्हा तुम्ही स्वत: काढलेलं छायाचित्र कोणीतरी दुसरा मनुष्य चोरून त्याच्या नावावर छापतो.

फोटोग्राफी हा तुमचा छंद आहे की तुम्ही त्याकडे एक करीअर म्हणून पाहता ?
फोटोग्राफीमध्ये तुम्ही छंद जोपासत करीअरही करू शकता.

तुम्ही काढलेले आणि तुम्हाला सर्वाधिक आवडलेले काही फोटोग्राफ्स :-
सापाच्या मिलनाचे दुर्मिळ छायाचित्रं, बाबा अमरनाथ गुहा, शेकरू आणि माळढोक.

आपल्या एखाद्या छायाचित्राची राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे का ?
होय, माझ्या अनेक छायाचित्रांची राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद झालेली आहे.
काही वर्षांपूर्वी नांदेडला जो पूर आला होता, त्या पूर-परिस्थिति आणि मदतकार्याच्या हवाई छायाचित्रणाची राष्ट्रीय पातळीवर नोंद झालेली आहे.

असा एखादा विषय ज्यावर तुम्हाला सर्वात जास्त फोटोग्राफी करायला आवडते ?
मला वाईल्ड-लाईफ आणि निसर्ग छायाचित्रण करायला फार आवडतं.

या क्षेत्रात आपल्याला आजवर मिळालेले मानसन्मान :-

  1. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्रात (लोकराज्य) अष्टपैलू छायाचित्रकार म्हणून नोंद.
  2. पूर-परिस्थीती बचावकार्यात सहभाग आणि वास्तवदर्शी छायाचित्रांबद्दल मा.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मान.
  3. मा. महासंचालिका तथा सचिव (माहिती जनसंपर्क महासंचालनालय) यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'चित्र बोली' छायाचित्र प्रदर्शनात अनेक छायाचित्रांचा समावेश.
  4. याच प्रदर्शनात पूर-परिस्थीती बचावकार्याच्या हवाई छायाचित्रणाबद्दल प्रमाणपत्र आणि सन्मान.
  5. मा. कै. शंकररावजी चव्हाण यांच्या जीवनावर आधारित 'गोदाकाठचा महान कर्मयोगी' या लघुपटाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.
  6. 'गोदाकाठचा महान कर्मयोगी' हा लघुपट राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील, मा.सोनीया गांधी, मा.शिवराज पाटील चाकुरकर, मा. लोकसभा सभापती आणि मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थीतीत राष्ट्रपती भवनात प्रदर्शित.

फोटोग्राफीसाठी आपण कोणता कॅमेरा वापरता ?
फोटोग्राफीसाठी आजवर मी नानाविध प्रकारचे कॅमेरे वापरलेले आहेत.
रोमीफ्लॅश, रोमीकार्ड, याशीका १२०, मामीया, पेंटॅक्स, निकॉन, कॅनन, सोनी.

आजवरच्या आपल्या फोटोग्राफीमधे आपल्याला कोणत्या महनीय सहवास लाभला ?
श्री. किशनराव झाडबुके, मा.कै. शंकरराव चव्हाण, मा.कै. कुसुमताई चव्हाण, मा. रघू बोरवावकर, सुधाकर कुळकर्णी, विलास देशपांडे, प्रल्हाद जाधव, मा. मारूती चितमपल्ली, मा. अशोकराव चव्हाण, आणि माझी पत्नी अरुणा होकर्णे

धन्यवाद होकर्णे सर, आपण आपल्या कामातून आमच्या ब्लॉगसाठी वेळ काढला आणि आपल्या असंख्य फोटो असलेल्या 'फोटो बॅंक' मधून आम्हाला काही छायाचित्रं उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.

Wednesday, June 4, 2008

नांदेडीअन्स....................

खुषखबर !

खुषखबर !!

खुषखबर !!!




खास तुम्हा सर्वांच्या आग्रहास्तव मी लवकरच घेऊन येत आहे नांदेडच्या काही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची परिचयवजा मुलाखत.

आता या प्रसिद्ध नांदेडीअन्सबद्दल तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकाल आपल्या या ब्लॉगव्दारे.




अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी ब्लॉगला भेट देत राहा.

Sunday, June 1, 2008

गदर्भराज आणि नांदेड ( सर्वेश काबरा )

Bus is about to enter Nanded city and see who is there to welcome you…. Lot many DONKEYS.


It was really a very shameful experience for me. Before some days I came to Nanded with some of my friends and what was the first scene – many donkeys standing at the beginning point of new bridge in the CIDCO roadside. My friends looked at me and I began looking here and there pretending that I have not seen anything. Then our bus passed the bridge and again in the old mondha we saw some donkeys eating the garbage spread on the road, that was really very embarrassing moment for me. Finally we got down from the bus at Kalamandir and there again we were welcomed by the donkeys.


I thought that the NWMC has appointed donkeys to welcome the tourists and the people as they need not be paid any salary and they clean the roads by eating the garbage. I am not joking, wherever we went, we were accompanied by the donkeys. Right from Railway station square to Vazirabad (which is the largest market), Shreenagar (Educational Institution Hub), VIP road (name itself suggests the importance), Bhagyanagar (One of the beautiful areas of the city). Most shocking was one donkey was there outside the Gurudwara also.. Now that is the limit..!!


My friends who are from the small towns, they started laughing at me saying that, they have not seen these much donkeys in there towns and villages as they saw in Nanded (The city which is called as a future city). Not only Donkeys but also cows, dogs walk in between the roads. Cows and dogs are no problem because it can be seen anywhere but donkeys are too mucchhh… I really felt vary bad when they said like these.


I appeal to the NWMC to please look into this matter by taking strict actions against the idiot owners of these donkeys who leave them on the roads. These donkeys not only walk on the roads but also create very irritating noise. Please find out some solution on this otherwise this will really result into the shame of the city.


As on today we can see that tourists have already started approaching the city for Gurudwara and it is obvious that no one will like to see donkeys in the morning after whole night journey in the bus. I expect the corporation should take some action against this. We should bring this to the notice of the corporation.

But HOW????


चित्रमय माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर जा

http://s304.photobucket.com/albums/nn185/gadarbhraj/