Sunday, June 15, 2008

वळू - नंदिबैल - नांदेड

नमस्कार मित्रांनो,
एव्हाना आपण 'वळू - The Wild Bull' हा मराठी चित्रपट पाहिला असावा असे मला वाटते.
पाहिला नसेल तर जरुर पाहावा कारण चित्रपट अतिशय छान आहे.

आता तुम्ही विचार करित असाल की मी शीर्षक 'वळू - नंदिबैल - नांदेड' असे का दिले आहे.
त्याचे कारण असे की माझे वडिल डॉ.सुरेश सावंत ह्यांच्या 'पळसपापडी' या कवितासंग्रहातील आणि नंदिबैल या कवितेतील एक कडवं वळू या चित्रपटात वापरण्यात आलं आहे.

ही गोष्ट जेव्हा आम्हाला चित्रपट पाहताना कळाली, तेव्हा साहजिकच आम्हाला खूप आनंद झाला पण ऋणनिर्देशात कुठे नोंद असती तर बरे झाले असते असे वाटले.

माझ्या वडिलांनी या संदर्भात वळूच्या संबंधितांना एक पत्र लिहिले आहे, ते मी इथे छापत आहे.


आपला 'वळू - The Wild Bull' हा चित्रपट अगत्यपूर्वक पाहिला . अतिशय आवडला.
या चित्रपटात आपण ग्रामीण जीवनाचे यथातथ्य दर्शन घडविले आहे.
वास्तवदर्शी चित्रणामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार आणि मान्यता मिळत आहे. त्याबद्दल 'वळू'च्या टीमचे हार्दिक अभिनंदन !

आता एक गोष्ट अगदी खाजगी.....
चित्रपटातील शाळेतल्या एका दृष्यात "नंदिबैल आला आता नंदिबैल आला" या गिताच्या ओळींचा अगदी चपखलपणे उपयोग करुन घेण्यात आला आहे.
वास्तविक त्या माझ्या 'नंदिबैल' ह्या कवितेतील ओळी असून ही कविता 'बालभारती' इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे.

एका नामांकित चित्रपटात कवितेच्या ओळी श्रुतयोजन म्हणून हा त्या कविचाही सन्मान असतो.
हा चित्रपट पाहणारया विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी आणि माझ्या आप्तस्वकियांनी आनंद व्यक्त करून माझे अभिनंदन केले.
ही कविता ग्रामीण भागात रुजली असल्याचे मत एका समिक्षकाने नोंदविले. याचा कवी म्हणून मलाही स्वाभाविकच आनंद आहे तथापी 'ऋणनिर्देशा'त कुठे नोंद असती तर बरे झाले असते.

कृपया पोच द्यावी, ही विनंती.
भावना समजून घ्याव्यात.


आपला स्नेहाकांक्षी
( डॉ.सुरेश सावंत )

0 comments:

Post a Comment

Post a Comment