तुम्हा सगळ्यांना माहित असेलच की BSNL ने आता घरपोच बील द्यायचे बंद केले आहे.
(नाही नाही, आपल्याला BSNL ऑफिसमध्ये जाऊन बील घ्यायची वेळ अजून तरी आली नाही.)
तर BSNL आता तुमच्या Landline टेलीफोनचे बील तुमच्या मोबाईलवरच SMS द्वारे पाठवणार आहे, आणि याची सुरूवातदेखील झाली आहे. (जानेवारी महिन्याच्या बीलापासून.)
दोन दिवसांपूर्वी माझ्या वडीलांच्या मोबाईलवर BSNL कडून Landline च्या बीलासंदर्भात खाली दिलेला SMS आला.
(येथे मुद्दामहूनच मी पूर्ण फोन नंबर आणि पूर्ण नाव दिलेले नाही, कारण ही आमची माहिती नाही. BSNL ने दुसर्यांचे बील आमच्या मोबाईलवर पाठवले आहे.)
Bill issued for No:
2462-2875**
Name: SHRI ##### JAGANNATH ########
bill date: 03-Feb-10,
Amt. Rs. 398.00.
Pls pay by 24-Feb-10.
NDAOTR-024622534**
BSNL ने हे ज्यांचे बील आमच्या नावावर फाडले आहे, ते योगायोगाने आमच्या ओळखीचेच आहेत.
BSNL आपल्या कार्यपद्धतीत बदल करत आहे ही निश्चीतच चांगली बाब आहे, पण असे कुणाचेही बील कुणाच्याही नावावर जाऊ लागले तर याला काय म्हणायचे हे तुम्हीच ठरवा.
2 comments:
याला काही उपाय नाही. आमच्या सांगण्यावरुन ते केंव्हाच बदलणार नाहित. त्यांच्या गतीने, त्याना जमेल तसं ते बदलत आहेत. आपण त्याच्या गतिने होणा-या बदलासकट त्याना स्विकारने हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे.
नाहीच पटलं व याच क्षेत्रातिल सेवा देणा-या इतर कंपन्या तुमच्या शहरात असल्यास पर्यायाच नक्कि विचार करा.
बिएसएनएल च्या सर्विस मध्ये सुधारणा झाली आहे, मला तरी मस्त सर्विस मिळत आहे, आणि त्यांच्या पोर्टल वर बिलाची पीडीएफ कॉपी सुद्धा मिळते...
Post a Comment