Thursday, April 8, 2010

सूर्यनारायन कोपतोय.

सूर्यनारायन कोपला.
आठवतोय का हा ब्लॉगपोस्ट ? (इथे क्लिक करा.)
मागच्या वर्षी २० एप्रीलला लिहीला होता मी तो ब्लॉगपोस्ट. (तेव्हा नांदेडचे तापमान ४२ अंश सेल्सीअसवर पोहोचले होते.)

यावर्षीही परीस्थीती काही वेगळी नाहीये.
यावर्षीच्या एप्रीलच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ४२ ते ४३ च्या दरम्यान जाऊन पोहोचले आहे.
अजून मे यायचा बाकी आहे.


मार्चमध्ये ४-५ वेळा पाऊस पडून गेला, तोही अगदी मुसळधार.
नंतर १-२ दिवस वातावरण थंड झाले होते, पण एप्रीलपासून उन्हाने परत आपला पारा चढवलाय. (त्यात वीज वितरण कंपनीने एप्रील फूल केलेच आहे आपल्याला. [हा पोस्ट वाचा.])


मागच्या वेळी मी खरंतर म्हणालो होतो की ग्लोबल वार्मिंगची समस्या अजूनही हाताबाहेर गेलेली नाही, पण या १ वर्षात अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यांच्यामुळे मला माझ्याच विधानावर विश्वास ठेवावा वाटत नाहीये. (अनेक देशांमध्ये रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टी, जंगलातील भयंकर मोठे वणवे, आपल्याकडे तर मागचा पावसाळा कोरडा आणि हिवाळा विनाथंडीचा झाला इ.)


चला, किमान प्रार्थना करूया की नांदेडच्या उन्हाळ्याने यावर्षी कोणताही रेकॉर्ड ब्रेक करू नये.


ता.क. :- (१५ एप्रील २०१० ३.३० PM)
आपल्या ब्लॉगवरील विजेट आणि Weather Underground वर नांदेडचे आजचे तापमान ४४° दाखवत आहे.


ता. क. :- (१६ एप्रील २०१० ८:२८ PM)
ग्लोबल वार्मिंगवर लिहून लिहून थकलोय मी.
अर्ध्या तासापूर्वी सोसाट्याचा वारा सुटला होता शहरात. (शहरात काही पाऊस पडला नाही, पण नांदेडच्या आसपासच्या परीसरात खूप जोरदार पाऊस पडला म्हणे.)


ता. क. :- (२९ एप्रील २०१० ६:३६ PM)
छान पाऊस पडतोय बाहेर.
मातीचा सुगंध दरवळतोय.


ता.क. :- ४ मे २०१० (८.५५ AM)
तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
सध्या तापमान ४३ अंशावरून ३३-३४ अंशावर आले आहे.


ता. क. :- ११ मे २०१० (८.३७ AM)
रेकॉर्डब्रेक !
काल नांदेडचे तापमान ४४.१ अंश सेल्सीअस होते. (कालचे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त.)


ता. क. :- १६ मे २०१०
२ दिवसांपूर्वी नांदेडचे तापमान ४४.३ होते.
गेल्या ३-४ दिवसांपासून भयंकर उकडतंय.
तापमान अजून २ अंशाने जरी वाढले तरी तंदूरी चिकन बनवण्यासाठी भट्टीची गरज भासणार नाही.
दुपारी भयंकर उन आणि रात्री प्रचंड उकाडा !
काही खरं नाही बुवा.


ता. क. :- (३ जून २०१० ७:४० AM)
सुटलोत (बहुतेक ?) एकदाचे या गर्मीपासून.
काल सकाळी पाऊस पडला आणि दिवसभर ढगाळ वातावरण होते.
काही दिवसांपूर्वीच सकाळी ७ वाजतादेखील चांगलेच तापायचे, पण आज सकाळचे ८ वाजत आलेत तरीही उन पडले नाही आणि वातावरणसुद्धा थंड आहे.

0 comments:

Post a Comment

Post a Comment