आज सकाळी वृत्तपत्रामध्ये ही बातमी वाचून अक्षरशः सुन्न झालो.
आधीच आपल्या मराठवाड्यात जंगलं राहीली नाहीत, काही ठिकाणी आहेत तर तीथेही मनुष्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
आपल्या नांदेडमध्ये तर माहूर आणि किनवट या दोन तालुक्यांमध्येच थोडंफार जंगल शिल्लक राहीलं आहे.
त्यात अशी बातमी म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच. :(
पण या ३ बिबट्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याबद्दल कुणीही खात्रीपुर्वक सांगू शकत नाहीये.
वृत्तपत्रांच्या मते या बिबट्यांवर विषप्रयोग झाला असावा.
या बिबट्यांनी २ दिवसांपूर्वी एका शेतातील म्हैस मारली होती आणि तीला खायला हे बिबटे दुसर्या दिवशी आले आणि उर्वरीत म्हशीचे मांस खाऊन तीथेच मरून पडले.
याचाच अर्थ की बिबट्यांच्या परत येण्यापूर्वी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या मृत म्हशीच्या मांसात विष कालवले असणार, आणि त्यामुळे बिबट्यांचा मृत्यू ओढावला असणार.
पण वृत्तवाहिन्यांच्या मते आसपासच्या परीसरात या ३ बिबट्यांव्यतीरीक्त कुठेही मृत जनावराचे मांस सापडले नाही.
यावरून काही जण असा निष्कर्ष काढताहेत की या बिबट्यांचा मृत्यू ऊष्माघातामुळे झाला असावा.
आत्ताच एका वृत्तवाहिनीवर वनविभागाच्या अधिकार्यांच्या संशयास्पद कार्यवाहीबद्दल सांगत होते.
वनविभागाच्या अधिकार्यांनी म्हणे मृत बिबट्यांचे शवविच्छेदन न करता त्यांची तीथेच विल्हेवाट लावली.
वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी या बातमीचा सातत्याने पाठपुरावा केला तरच दोषी लोकांना शिक्षा होऊ शकते
एकंदरीत हा सगळा प्रकार फारच दुर्दैवी म्हणावा लागेल. :(
ता. क. :- (5 May 2010)
1) हा प्रकार झाल्यानंतर काही दिवसांतच या जंगलात परत एका अस्वलाची शिकार झाली.
2) काल लोहा तालुक्यातल्या आंडगा या गावात एका विहीरीत ४ नर काळविटांचे मृतदेह सापडले.
शेतातील कुंपनात सोडलेल्या विजेच्या शॉकमुळे त्यांचा मृत्यु झाला असावा आणि नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांना विहीरीत टाकून देण्यात आले असावे असा संशय व्यक्त केल्या जातोय.
Wednesday, April 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
Once these animals will be extinct then there won't be any jobs left for all these irresponsible blokes.
Post a Comment