skip to main |
skip to sidebar
From the makers of Planet Earth, Discovery Channel presents the all-new, 11-part series LIFE.
प्लॅनेट अर्थ सिरीजने सगळ्या दुनियेला वेड लावले होते.
याच सिरीजमुळे डिस्कव्हरीच्या रेटींगमध्ये प्रचंड वाढ झाली होती.
प्लॅनेट अर्थच्या बरोबर 2 वर्षांनंतर आता ही डॉक्युमेंटरी येत आहे.
२४ मे ते ६ जूनदरम्यान दररोज रात्री ८ वाजता ही मालिका डिस्कव्हरी वाहीनीवर दाखवण्यात येणार आहे.
(सध्या जास्त ऑनलाईन येणे होते नसल्याने हा टॉपिक काढायला थोडा उशीर झाला त्याबद्दल माफ करा.)[:(]
१२ जूननंतर ही सिरीज दर रवीवारी रात्री ८ वाजता दाखवण्यात येणार आहे.
७० बेस्ट ऑफ द बेस्ट कॅमेरामन्सच्या मदतीने जगभर फिरून शूट केलेले हे व्हिडीओज खरंच अचंबित करणारे आहेत.
(ह्या शुटींगला ३,००० दिवस लागले म्हणे.[:o])
व्हिडीओ क्लियारीटीसुद्धा फारच मस्त आहे.
याचसंदर्भातले एक वाक्य वाचा :-
"If there was ever a reason for someone to have HD (High Definition) or to invest in an HD set, this is it," said Clark Bunting, president and general manager of Discovery Channel.
:: या मालिकेतील एपीसोड्सचे विषय ::
Reptiles and Amphibians
Mammals
Fish
Birds
Creatures of the Deep
Hunters and Hunted
Insects
Plants
Primates
Making of Life
:: Videos ::
http://www.youtube.com/watch?v=YIjiIAQpCsQ
&
http://www.youtube.com/watch?v=BoqCcHQZlWw&feature=related
अनेक दिवसांनंतर डिस्कव्हरीवर एक चांगली सिरीज सुरू झाली आहे.
जरूर पाहा.
होय मित्रांनो.
हा रखडलेला प्लॅन आता सुरू झालाय.
काळेश्वर मंदीराजवळच्या शंकरसागर जलाशयात बोटींग सुरू झाली आहे.
इथे साध्या बोटींगसहीत वाटर स्कूटर, मोटर बोटसारखे वाटर स्पोर्ट्ससुद्धा सुरू झाले आहेत.
तेव्हा उशीरा का होईना, पण नांदेडीअन्सना सुट्ट्या एन्जॉय करण्याची आणखी एक जागा मिळाली म्हणायची. :-)
वेळ :- सकाळी ९ ते सुर्यास्तापर्यंत.
बारावीचा निकाल लागला आज.
अपेक्षेप्रमाणे निकाल कमीच लागला. (अपेक्षेप्रमाणे यासाठी की कारण कॉपी-मुक्ती अभियानामुळे हे व्हायचेच होते.)
उत्तीर्ण होणार्यांची टक्केवारी एकंदरीत राज्यभरातच कमी झाली आहे.
त्यातल्या त्यात नांदेडमध्ये ही टक्केवारी सगळ्यात कमी आहे. (२५% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत फक्त.)
नांदेडमध्ये कॉपी-मुक्ती अभियान अगदी मनापासून राबवल्याचे हे चांगले फलित.
अनुत्तीर्ण झालेल्यांबद्दल आम्हाला वाईटच वाटते हो, पण या कॉपी-मुक्ती अभियानामुळे खरे हुषार विद्यार्थी पुढे आले याचा जास्त आनंद वाटतोय. :-)
५० ते ६०% का होईनात पण ते गुण स्वतःच्या मेहनतीने मिळवणार्यांची आता तरी कुठे किंमत होईल.
नांदेडच्याच दिव्या बियाणीने राज्यातून पहिला येण्याचा मान पटकावलाय. (दिव्या बियाणी ही नांदेडमधले पत्रकार श्री. गोवर्धन बियाणी यांची मुलगी आहे.)
दिव्या बियाणीचे नांदेडीअन्सच्या तमाम वाचकांकडून हार्दिक अभिनंदन आणि तिच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! :-)
या कॉपी-मुक्ती अभियानातसुद्धा स्वतःची गुणवत्ता अधोरेखित करणार्या नांदेडमधील काही शाळा/महाविद्यालये :-
१) सायन्स कॉलेज - ८०.६४ %
२) यशवंत कॉलेज - ७५.३९ %
३) राजर्षी शाहू ज्यु. कॉलेज - ६३.२४ %
ता.क. :-(१७ जून २०१० १:४० PM)
१० वीचासुद्धा निकाल लागला आज. (सोबतच लातूर पॅटर्नचासुद्धा निकाल लागला.)
अमरावती ---> ८६.१६%
नाशिक ---> ८४.९०%
पुणे ---> ८३.९४%
कोल्हापूर ---> ७९.७५%
नागपूर ---> ७८.६४%
लातूर ---> ४४.४८%
हुश्श्श......!
एप्रील-मेमधले रेकॉर्डब्रेक तापमान आणि गेल्या काही दिवसातला प्रचंड उकाडा (अगदी रात्रीदेखील.), या दोनगोष्टींपासून आता नांदेडीअन्सची बहुतेक सुटका होण्याची चिन्हं दिसताहेत.
मी हा ब्लॉगपोस्ट टाकत असतांना बाहेर मस्त जोरदार पाऊस सुरू झाला होता, पण हा पोस्ट टाकेपर्यंत तो निघून गेला. (तुम्ही लोकांनी मला पावसात भिजायचा आनंदसुद्धा घेऊ दिला नाही.) :(
जाऊ द्या, असाही चातक झालोच आहे मग अजून थोडी वाट पाहतो पावसाची. :P
चला, बाय.
एव्हाना तुम्हाला सुट्ट्या लागल्या असतील.
सुट्ट्यांमध्ये 'फिरायला कुठे जायचे ?' हा एक यक्षप्रश्नच असतो.
आपण नेहमी ठरवतो की सुट्ट्यांत कुठेतरी शांत, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायला हवे, पण तसे ठिकाण ठरवण्यातच सुट्ट्या निघून जातात.
मग असे ठिकाण ठरवण्यासाठी डोकेफोड आणि बजेटचे बॅलंस बनवण्यासाठी आकडेमोड सुरू होते.
बाहेर फिरायला जाल तेव्हा जाल, पण अगोदर नांदेडमधली तरी काही ठिकाणं पाहून या.
आपल्या ब्लॉगमध्ये डाव्या साईडच्या "Labels" या कॉलममधील "निसर्ग/पर्यटन/प्रवासवर्णन" या लिंकवर क्लिक करा.
तीथे मी नांदेडमधील काही अशा पर्यटनस्थळांची माहिती दिली आहे जी फार कमी लोकांना ज्ञात असतील.
त्या ठिकाणांची माहिती वाचूनही तुमच्या डोळ्यापुढे जर त्या ठिकाणाचे काल्पनिक चित्र उभे राहत नसेल तर माझ्या ऑर्कूट प्रोफाईलला भेट द्या, तीथे मी या सगळ्या ठिकाणांच्या फोटो टाकलेल्या आहेत.
एव्हढ्या उन्हामध्ये तर तुम्ही काही निघणार नाही घराबाहेर, तेव्हा पावसाच्या १-२ सरी येऊन जाऊ देत मग तुम्ही जा या ठिकाणांना भेट द्यायला.
ते ठिकाण पाहून आल्यानंतर तुमचे अनुभव आणि तीथे काही छायाचित्रं काढली असतील तर ती शेअर करा आमच्यासोबत.
चला बाय, हॅप्पी जर्नी. :-)
नांदेड, दि.६ (प्रतिनिधी) -
आंध्र व कर्नाटकात अतिरेकी शिरल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमिवर आज शहरात रेल्वेस्टेशन परिसरातून एका ऑटोमध्ये गुरूद्वारा आणि नंतर वजिराबादेतील बेंगलोर बेकरीपर्यंत आलेल्या तीन संशयीतांनी नांदेड पोलिसांची झोप उडवली आहे.
पोलिसांनी रेल्वेस्टेशन, विमानतळ, मॉल्स, सिनेमागृह, हॉटेल्सची तपासणी सुरू केली आहे.
तसेच शहरात नाकाबंदी केली असून पेट्रोलिगमध्येही वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांनी सांगीतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जुन्या मध्यवर्ती नाक्यासमोरून तिघे जण एका ऑटोत बसले.
त्यांनी ऑटोचालक इरफान याला गुरूद्वारा नेण्यास सांगितले.
गुरूद्वाराजवळ पोहोचल्यानंतर हे तिघेजण उतरून पुढे निघाले.
त्यांची बॅग ऑटोतच राहिल्याचे लक्षात येताच ऑटोचालकाने त्या प्रवाशांना आवाज देवून बॅग राहिल्याची आठवण करून दिली. त्यावेळी त्रासिक चेहऱ्यांनी त्यांनी ती बॅग घेतली. मात्र ते तिघेही पुन्हा त्याच ऑटोत बसले.
वजिराबादमधील बैंगलोर बेकरीपर्यंत रिक्षा आल्यावर त्यांनी ऑटो थांबविण्यास सांगितले.
उतरतांना भाड्यापोटी त्यांनी चालक इरफानला १०० रूपयांची नोट दिली.
इरफानने चिल्लर नसल्याचे सांगितल्यावर राहू दे असे म्हणून ते तेथून निघाले.
या सर्व घटनेमध्ये ऑटोचालकाचा त्या तीन प्रवाशाबद्दलचा संशय बळावळा.
त्यामुळे तो वजिराबादहून थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात आला.
त्याने सर्व हकीकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितली.
पोलिस अधीक्षकांनी ही घटना गंभीरतेने घेतांना तात्काळ खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या.
सायंकाळी पाचच्या सुमारास वजिराबाद चौकात वाहनांची तपासणीही करण्यात आली.
तसेच गुरूद्वारा परिसराचाही आढावा घेण्यात आला.
पोलिस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांनी शहरातील पोलिस निरीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांची सायंकाळी बैठक घेतली.
या बैठकीत सर्व बाजुंनी तपास करण्याच्या सूचना दिल्या. विशेष पोलिस महानिरीक्षक शारदाप्रसाद यादव यांनीही या घटनेचा पोलिस अधीक्षकांकडून आढावा घेतला.
पुणे बॉम्ब स्फोटात वापरण्यात आलेली बॅग आणि रिक्षा चालक वर्णन करीत असलेल्या बॅगेत साम्य आढळून येत असल्याने नांदेड पोलिसांनी पुणे पोलिसांशी संफ साधला आहे.
:: Source ::
दैनिक लोकमत.
& Zee 24 Taas
महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहूती देणार्या त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
आणि
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
जय जय महाराष्ट्र आपला,
गर्जू देत महाराष्ट्र आपला.