नांदेड, दि.६ (प्रतिनिधी) -
आंध्र व कर्नाटकात अतिरेकी शिरल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमिवर आज शहरात रेल्वेस्टेशन परिसरातून एका ऑटोमध्ये गुरूद्वारा आणि नंतर वजिराबादेतील बेंगलोर बेकरीपर्यंत आलेल्या तीन संशयीतांनी नांदेड पोलिसांची झोप उडवली आहे.
पोलिसांनी रेल्वेस्टेशन, विमानतळ, मॉल्स, सिनेमागृह, हॉटेल्सची तपासणी सुरू केली आहे.
तसेच शहरात नाकाबंदी केली असून पेट्रोलिगमध्येही वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांनी सांगीतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जुन्या मध्यवर्ती नाक्यासमोरून तिघे जण एका ऑटोत बसले.
त्यांनी ऑटोचालक इरफान याला गुरूद्वारा नेण्यास सांगितले.
गुरूद्वाराजवळ पोहोचल्यानंतर हे तिघेजण उतरून पुढे निघाले.
त्यांची बॅग ऑटोतच राहिल्याचे लक्षात येताच ऑटोचालकाने त्या प्रवाशांना आवाज देवून बॅग राहिल्याची आठवण करून दिली. त्यावेळी त्रासिक चेहऱ्यांनी त्यांनी ती बॅग घेतली. मात्र ते तिघेही पुन्हा त्याच ऑटोत बसले.
वजिराबादमधील बैंगलोर बेकरीपर्यंत रिक्षा आल्यावर त्यांनी ऑटो थांबविण्यास सांगितले.
उतरतांना भाड्यापोटी त्यांनी चालक इरफानला १०० रूपयांची नोट दिली.
इरफानने चिल्लर नसल्याचे सांगितल्यावर राहू दे असे म्हणून ते तेथून निघाले.
या सर्व घटनेमध्ये ऑटोचालकाचा त्या तीन प्रवाशाबद्दलचा संशय बळावळा.
त्यामुळे तो वजिराबादहून थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात आला.
त्याने सर्व हकीकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितली.
पोलिस अधीक्षकांनी ही घटना गंभीरतेने घेतांना तात्काळ खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या.
सायंकाळी पाचच्या सुमारास वजिराबाद चौकात वाहनांची तपासणीही करण्यात आली.
तसेच गुरूद्वारा परिसराचाही आढावा घेण्यात आला.
पोलिस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांनी शहरातील पोलिस निरीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांची सायंकाळी बैठक घेतली.
या बैठकीत सर्व बाजुंनी तपास करण्याच्या सूचना दिल्या. विशेष पोलिस महानिरीक्षक शारदाप्रसाद यादव यांनीही या घटनेचा पोलिस अधीक्षकांकडून आढावा घेतला.
पुणे बॉम्ब स्फोटात वापरण्यात आलेली बॅग आणि रिक्षा चालक वर्णन करीत असलेल्या बॅगेत साम्य आढळून येत असल्याने नांदेड पोलिसांनी पुणे पोलिसांशी संफ साधला आहे.
:: Source ::
दैनिक लोकमत.
& Zee 24 Taas
Friday, May 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
काही तपास पुढे सरकला का ?
अवघड आहे
अजून सापडले नाहीत रे ते.
त्या ऑटोचालकाने बॅगचे वर्णन पोलीसांना सांगितले असता असे आढळले की अगदी त्याच प्रकारची बॅग पुण्याच्या जर्मन बेअरी प्रकरणात वापरली होती.
शहरात खूप टाईट ठेवली आहे सिक्युरीटी.
पोलीसांनी त्या ३ संशयीतांची रेखाचित्रेसुद्धा जाहीर केली आहेत.
Post a Comment