जमावबंदीचा नियम मोडून बाभळी बंधार्याकडे यायला निघालेल्या आंध्राच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या चंद्राबाबू नायडूंना कालच पोलीसांनी अटक केली होती.
‘
बंधार्यावर जाऊ देणार नसाल तर अटक करा’ असाच त्यांचा पवित्रा होता.
पोलीसांनी चंद्राबाबूंसह १०० जणांना काल अटक केली होती, यात ४८ आमदार व ८ खासदारांचा समावेश आहे.
चंद्राबाबूंना आज न्यायालयात आणले असतांना त्यांनी जामीन नाकारला.
चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्यासोबतच्या आमदार/खासदारांना २ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
काल बाभळी बंधारा कृती समिती (सर्वपक्षीय)च्या वतीने धर्माबादमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाचे नेतृत्व खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार वसंतराव चव्हाण, डॉ. बालाजी कोंपलवार यांच्यासह इतरही पदाधिकार्यांनी केले.
यावेळी या सर्वांची भाषणेही झाली.
या मोर्चामध्ये उमरी, नायगाव, धर्माबाद, कुंडलवाडी आदी परीसरांमधून गावकरी मंडळी सामिल झाली होती.
मुळात हा सगळा प्रकार म्हणजे एक राजकीय स्टंटबाजीच आहे.
येत्या काही दिवसांतच आंध्रप्रदेशात विधानसभा पोटनिवडणूका आहेत, त्यात आंध्रातील जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीच चंद्राबाबू हा स्टंट करत आहेत.
मागे २-३ वर्षांपूर्वीसुद्धा आंध्राच्या काही खासदार/आमदारांनी असाच प्रयत्न केला होता, पण तेव्हा खुद्द गावकर्यांनीच त्यांना पळवून लावले होते.
कालच्या प्रकरणामध्ये गावकर्यांची भुमिका :-जनतेच्या मनात प्रचंड रोष असला तरी, काल धर्माबादकरांनी माणुसकी म्हणून आंध्रातून आलेल्या चंद्राबाबू समर्थकांना पाणी पाजले व खिचडी खाऊ घातली.
काल नांदेडमध्ये (धर्माबाद) प्रवेश करतांना चंद्राबाबू न्युज चॅनल्सच्या पत्रकारांना आंध्रातून सोबत घेऊनच आले होते.
धर्माबादकरांना आज कळाले की आंध्रातील पत्रकार आंध्रामध्ये चुकीच्या, खोट्या बातम्या प्रसारीत करत आहेत.
‘
खोट्या बातम्या प्रसारीत कराल तर तुमच्या OB Van जाळून टाकू.’ असा सज्जड इशाराच गावकर्यांनी न्युज चॅनेल्सच्या पत्रकारांना दिलाय.
सुप्रीम कोर्टामध्ये बाभळी प्रश्नाची सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे, आता सगळ्यांचेच लक्ष तिकडे लागले आहे.यासंदर्भातल्या काही बातम्या :-"बाभळी'ला विरोध ही राजकीय स्टंटबाजीबंदी धुडकावणाऱ्या चंद्राबाबूंना अटक चंद्राबाबू अटकेतपाणीप्रश्नावर लढणारा 'फाईव्हस्टार' आंदोलक !बाभळी बंधार्याचा वाद माहित नसलेल्यांसाठी :-काय आहे बाभळी बंधा-याचा वाद?